Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

मुख्यमंत्री फडणवीस हेलीकॉप्टरने शिर्डीच्या विमानतळावरून रवाना!

KJKunal Jamdade
Aug 06, 2025 07:46:21
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैजापूर तालुक्यातील शनीदेवगावकडे रवाना... शिर्डीच्या विमानतळावरून हेलीकॉप्टरने रवाना.. राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजनही सोबत.. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनी देवगाव येथे गंगागीरी महाराज सप्ताहाची होणार सांगता..
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Aug 06, 2025 10:46:18
Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्यात वाढत्या गुन्हेगारीवर आणि अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी अकोला पोलिसांनी सपाटा लगावला आहेय.. जिल्ह्यात अवैध दारू भट्ट्यांवर झाड सत्र सुरू असून अकोला शहरातील अकोट फाईल परिसरात अवैध दारू तयार करणाऱ्या एका घरावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून याचा भांडाफोड केला आहेय.. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून 200 लिटर गावठी दारूचा साठा यासह दारू बनवण्याची सामग्री आणि इतर साहित्य जप्त केलं असून आरोपीला अटक केली आहेय .
4
Report
GMGANESH MOHALE
Aug 06, 2025 10:46:09
Washim, Maharashtra:
वाशिम: File:0608ZT_WSM_ART_TEACHER रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:राज्य सरकारच्या कला शिक्षण मंडळाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, केवळ ५०० किंवा अधिक विद्यार्थी असलेल्या शाळांमध्येच कलाशिक्षक नेमण्याची अट लागू केली आहे. त्यामुळे ५०० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील कलाशिक्षकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता असून,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वाशीम जिल्ह्यात २४५ अंशतः अनुदानित शाळांपैकी फक्त सुमारे १०० शाळांमध्येच ५०० हून अधिक विद्यार्थी आहेत. उर्वरित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या कलाशिक्षकांच्या जागा रिक्त झाल्यास त्या भरल्या जाणार नाहीत.त्यामुळे नव्या पिढीला कला शिक्षणाची संधी कमी मिळणार आहे.'कला ही व्यक्तिमत्व विकासाचा महत्त्वाचा भाग असून, शासनाने ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा निर्णय घेतला आहे,'अशी तीव्र प्रतिक्रिया कलाशिक्षकांनी दिली असून,त्यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. बाईट:अमोल काळे,कला शिक्षक
5
Report
AAASHISH AMBADE
Aug 06, 2025 10:45:15
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :---0608ZT_CHP_CONG_PROTEST ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहरात काँग्रेसचे अनोखे आंदोलन, खड्डे असलेल्या रस्त्याचे इव्हेंट आमदार असे नामकरण अँकर:-- चंद्रपूर शहराचे  स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार हे केवळ इव्हेंट घेण्यात मश्गूल असल्याचा आरोप करत काँग्रेसने आज शहरात अनोखे आंदोलन केले. शहरातील महाकाली मंदिराच्या मार्गावर असलेल्या व नव्यानेच बांधलेल्या डांबरी रस्त्यावर शेकडो खड्डे पडले आहेत. मात्र केवळ इव्हेंट साजरे करण्यात व्यस्त असलेल्या किशोर जोरगेवार यांना रस्त्यातील हे खड्डे मात्र दिसत नाहीत. काँग्रेसने या संपूर्ण खड्डेमय रस्त्याला इव्हेंट आमदार रोड असे नामकरण करत आज त्याचा सोहळा केला. शहर विविध समस्यांनी ग्रस्त असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असून नव्याने बांधलेले 40 कोटी रुपयांचे रस्ते सुद्धा खड्डेमय झाले आहेत. अशा स्थितीत प्रशासन व भाजप आमदारांना इशारा देण्यासाठी इव्हेंट आमदार रोडचे नामकरण अनोख्या पद्धतीने करण्यात आले. बाईट १) रामू तिवारी, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
8
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 06, 2025 10:34:35
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातून उत्तराखंडला गेलेले चार ही तरुण सुखरूप सोलापुरातून उत्तराखंडला गेलेले चार ही तरुण सुखरूप चौघे ही तरुण बेस कॅम्पमध्ये सुखरूप असल्याची माहिती विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी धोटे हे चौघे सोलापुरातील तरुण उत्तराखंड गेले होते गंगोत्री येथील बेस कॅम्पमध्ये सर्व जण सुखरूप असल्याचा मेसेज यातील एका तरुणाने आपल्या मित्राला वॉट्सअप द्वारे पाठवला आहे तर जिल्हा प्रशासनाने देखील माहिती तपासली असता सर्व जण सुखरूप असल्याचे समजले आले मोबाईल फोनला नेटवर्क नसल्याने सपंर्क होतं नसल्याचे तरुणांनी मेसेज द्वारे कळवले आहे दरम्यान उत्तराखंड येथील परिस्थिती नियंत्रणात येताच चौघेही सोलापूरला परत येतील
8
Report
SMSATISH MOHITE
Aug 06, 2025 10:31:28
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_DCM Feed on - 2C ------------------------- Anchor - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. गेल्या शुक्रवारी खतगावकर यांच्या पत्नी तथा अशोक चव्हाण यांच्या ज्येष्ठ भगिनी स्नेहलता पाटील खतगावकर यांचे निधन झाले होते. आज अजित पवार यांनी खास नांदेडमध्ये येत खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी दिवंगत स्नेहलता पाटील खतगावकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर अजित पवार नांदेड विमानतळावरून विमानाने संभाजी नगरकडे रवाना झाले. --------------------------------------
9
Report
PTPRAVIN TANDEKAR
Aug 06, 2025 10:30:19
Bhandara, Maharashtra:
एकनाथ शिंदे हे दिल्ली वारी वर जात असल्यावर शिंदे हे सेटिंग मास्टर आहेत - संजय राऊत Anchor- दररोज 9.30 वाजता एक भोंगा तुम्हाला खाद्य देतो आणि ते आम्ही ते दिवस भर चिघळत बसतो.आणि ते कुणावर काय काय बोलत असतात.ऐकेकाडी साठ सत्तर ची संख्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने असायांची ती आता 20 वर आली आहे त्यांनी ह्या सेटिंग कडे लक्ष द्यावी कि ही संख्या कशी वाढेल. मग आता उद्धव ठाकरे दिल्ली ला जात आहेत स्नेह भोजनासाठी राहुल गांधी सोबत मग ते पण सेटिंग बोलायचं का असा टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हे दिल्ली वारी वर जात असून हे सेटिंग मास्टर आहेत यावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत वर टोला लागवला. BYTE - दादा भुसे ऑन संजय राऊत भंडारा जिल्हात आपण गुणवत्ता आढावा घेत आहात परंतु नवीन संच मान्यता नुसार शिक्षकांची पदे कमी होत आहेत. अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत.6ते 8वर्गावर भाषा विषय करिता शिक्षक नाही.20पट संख्या अट मुळे भाषा पदवीधर अतिरिक्त होत आहे मग गुणवत्ता कशी राहील.यावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया. Anchor -असं कुठी हि या संदर्भात काल पण लोकप्रतिनिधी आमदार महोदय ची चर्चा मंत्रालयामध्ये संपन्न झालेली आहे याच्यामध्ये काही गोष्टींच्या समज गैरसमज आहेत परंतु आपल्याला शेवटी तो विद्यार्थी हे आपलं दैवत आहे ना ते विद्यार्थी टिकले पाहिजे दुसरं की शाळा पाहिजे की विद्यार्थी टिकवायचे याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे BYTE :- दादा भुसे ऑन शिक्षण विभाग शिक्षक संघटचा आरोप होत आहे कि कुठलीही चौकशी न करता शिक्षकाना आरोपी केल्या जात आहे.राज्यात शिक्षक संघटनेच रोष.. असं कुठंही होणार नही शिक्षण विभाग म्हणून आमची पण ती जबाबदारी आहे. जो कोण निरपारध आहे. कुणावर ही अन्याय होणार नाही.चुकीचं काम होणार नाही परंतु चौकशी मध्ये जो कोणी दोषीअसेल त्यावर कारवाई होणार.शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कारवाई करणायचं आदेश दिले जाईल. BYTE :- शिक्षण मंत्री दादा भुसे
9
Report
SKSACHIN KASABE
Aug 06, 2025 10:21:19
Pandharpur, Maharashtra:
06082025 Slug - PPR_LAMPI_ANIMAL file 05 ------ Anchor - सोलापूर जिल्ह्यात 403 जनावरांवर लंपीचा उपचार तर 1108 जनावरे लंपीने झाली बरी झाली गेल्या महिन्याभरात 1544 जनावरे लंपीने बाधित सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात सध्या सर्वाधिक जनावरांमधील लंपीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामध्ये सद्यस्थितीला माळशिरस मध्ये 132 तर पंढरपुरात 68 लंपी आजाराची जनावरे आढळून आली आहेत. सोलापूर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात 1544 पशुधन हे लंपी आजारामुळे बाधित झाले होते. यामध्ये 1108 जनावरे बरी झाली आहेत. तर 33 जनावरे दगावली आहेत. सध्या 403 जनावरांवर उपचार सुरू आहे. माळशिरस आणि पंढरपुरातील सर्वाधिक जनावरे लंपीच्या प्रादुर्भावात येताना दिसत आहेत. यासाठी उपाय योजना म्हणून प्रशासनाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. गोचीड गोमाशी मुळे हा आजार जनावरांच्या मधे पसरतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो. यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. जनावरांमध्ये त्वचेवर गाठी, ताप, नाक आणि डोळ्यातून पाणी येणे, तसेच लाळ येणे यांसारखी लक्षणे दिसल्यास, ते लंपी आजाराचे लक्षण असू शकते.अशा जनावरांना इतर जनावरांपासून त्वरित वेगळे करावे पशु पालकांनी जनावरांचे गोठे, तसेच वापरण्यात येणारी भांडी आणि उपकरणे स्वच्छ ठेवावी. नियमितपणे निर्जंतुकीकरण करावे. गोठ्यात डास, माश्या आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात. जनावरांना सकस आणि चांगले पशुखाद्य द्यावे, ज्यामुळे त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढेल. स्वच्छ आणि ताजे पाणी उपलब्ध करून द्यावे. ------ Byte - कुलदीप जंगम, प्रभारी जिल्हाधिकारी सोलापूर डॉ. तानाजी खांडेकर, सहायक पशु वैद्यकीय अधिकारी,
13
Report
ABATISH BHOIR
Aug 06, 2025 10:19:58
Kalyan, Maharashtra:
कल्याण न्यूज फ्लॅश.. शंकरराव चौक परिसरात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न घटना सीसीटीव्हीत कैद चोरटे एटीएम फोडू शकले नाही मात्र एटीएम मशीनचा मोठा नुकसान बाजारपेठ पोलिसांनी चार तासाच्या आत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना केली अटक मंगेश जगताप आणि नौशाद अंसारी असे चोरट्यांची नावे
9
Report
JJJAYESH JAGAD
Aug 06, 2025 10:17:05
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहेय..जिल्ह्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या आलेगांव येथे अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली त्यानंतर अधीक्षकांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने आलेगाव येथे नदीकाठी सुरू असलेल्या एका दारू भट्टीवर धाड टाकत अवैधरित्या दारू तयार करणाऱ्या एका आरोपीला सुमारे 85 हजारच्या मुद्देमालसह अटक केलीय.. पोलिसांनी जप्त केलेली दारू आणि साहित्य पूर्णतः नष्ट केले आहेत..
13
Report
AKAMAR KANE
Aug 06, 2025 10:16:35
kolhapur, Maharashtra:
2c ला shots जोडले आहे -------- नागपूर मनसे चे पालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयात आंदोलन .. खामला येथील मटण मार्केट हटवण्याच्या मागणीसाठी ह आहे .. मनसेने या आधी देखील आंदोलन केले होते ... मात्र मनसे सैनिक विषय घेतात व सोडून देतात असा त्यांच्यावर आरोप झाला , हा आरोप खोडून काढण्यासाठी मनसेचे पालिकेच्या झोन कार्यालयात उप आयुक्तांना कोंबडया देत निवेदन दिले .. ----------- नागपूर बाईट - तुषार गि-हे शहर उपाध्यक्ष.. *अवैध चिकन मटन मार्केटला छुपा पाठिंबा देणाऱ्या मनपाच्या लक्ष्मीनगर झोनच्या उपायुक्तांना मनसेने दिली कोंबड्यांची दिली भेट* - मागील वर्षभरापासून सहकार नगर परिसरात असलेल्या अवैध चिकन मटन मार्केटच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.. - याकडे महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोनकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे... - त्यामुळे मनसेला नागरिकांच्या तक्रारीनंतर यावर निवेदन दिले.. तरी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज चक्क कोंबड्या भेट देत चक्क टेबलवर मनसेच्या पदाधिकारी ह्यांनी केलं... - अवैध मार्केट चालविणाऱ्या लोकांसोबत मनपातील काही हितसंबंध असल्याचा आरोप केला... - संतप्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी झोन सहाय्यक उपायुक्त यांना कोंबड्या भेट दिल्या . - मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व मनसेचे नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.. - *कोंबड्या भेट दिल्यानंतर महानगरपालिकेच्या लक्ष्मी नगर झोनला जाग आली.... त्यानंतर त्यांनी हे मार्केट हलविण्याचा आश्वासन दिले.... मात्र खऱ्या अर्थाने कारवाई केव्हा होणार याकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले.*
9
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 06, 2025 10:06:32
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग : गेल्यावेळी आमची फसवणूक झाली यावेळी आम्ही माघार घेणार नाही - मनोज जरांगे पाटील *- ऑन सोलापूर दौरा :* - कालपासून आम्ही नवीन मोहीम राबवली. सभा घेतल्यानंतर बांधवांची चर्चा करतोय - धाराशिव पासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला. - सोलापूर नंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि अहिल्यानगर दौरा असणार.. - हा दौरा झाल्यानंतर मराठा बांधवांची चर्चा करून 29 ऑगस्ट रोजी सर्वांनी जायचं - ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं, एक घर, एक गाडी निघणार हा नारा सोलापुरातून देतो - मीडियाच्या बांधवांची खोटं बोलून जमत नाही ते चिरफाड करतात. - सोलापुरात दोन तासापासून बैठका सुरू होत्या - प्रत्येकाने आपली वाहन घेऊन निघायचं. एकदम सोपी मोहीम आहे. एक घर, एक गाडी घेऊन निघायचं. - सोलापूरच्या युवकांना आव्हान करतो, आरपारची लढाई आहे - रेकॉर्ड ब्रेक सभा होणार. असा समुद्र मराठ्यांना कधीच बघायला मिळणार नाही.. या लढाईचे तुम्ही साक्षीदार व्हा. - 29 ऑगस्टची अंतिम लढाई असणार आहे. - मुंबई जाताना शांततेत जायचं आणि शांततेत यायचं आहे. विजय मिळवल्याशिवाय परत यायचं नाही. - सरकारने जर आपली माणसं आंदोलनात घुसवले तर एक इंचही मागे सरायचं नाही - मराठ्यांनी कुठेही जाळपोळ, दगडफेक करायची नाही - मुंबईकडे जाण्यासाठी पाच हजार पाण्याचे टँकर लागणार - मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा.. - अंतरवाली सराटी येथून सकाळी दहा वाजता आम्ही निघणार.. शिवनेरी चा पहिला मुक्काम करावा लागेल आपले फक्त पंधरा किलोमीटरचे अंतर आहे - शिवनेरी वरून चाकण, राजगुरुनगर, लोणावळा, आझाद मैदान मार्गे जावं लागेल - यात जर मुलांचे हाल होत असेल तर मार्ग बदलावा लागेल *- ऑन स्थानिक संस्था निवडणूक* - आम्ही निवडणूक आल्या म्हणून आंदोलन कधीच करत नाही - तुम्ही आजी -माजी नगरसेवक नेते या सर्वांना सांगा की आमच्या सोबत मुंबईला चला कारण आम्ही तुमच्यासाठी झटलो आहोत *- आम्ही प्रचार करून गुलाल उधळून डोळे फोडून घेतो तर तुम्ही आमचे लेकरा बाळ मोठ करण्याच्या वेळेस आलं पाहिजे* - जर ते सोबत आले तर ते आपले 27% ओबीसी आरक्षण हा निर्णय चांगलाच आहे *ऑन सरकार मागणी* - जोपर्यंत सरकारकडून कुणबी आणि मराठा हा अध्यादेश येत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही - सरकारकडे 58 लाख कुणबी असल्याच्या नोंदी आहेत त्यामुळे त्यांना कायदा पारित करावा लागेल - आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक आहेत असा जीआर काढायला काही हरकत नाही - हैद्राबाद गॅजेट, सातारा संस्थान गॅजेट , बॉम्बे अनुसंस्था गॅझेट हे आम्ही घेणार आहोत कारण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण बसू शकतो - राज्यातले सरसकट गुन्हे मागे घेण्याचा आदेश सरकारने त्यावेळी केला होता - मराठा आरक्षणासाठी जीव दिलेल्या लोकांच्या आर्थिकतेचा विचार केला जावा... अशा अनेक मागण्या आहेत जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही - गेल्यावेळी आमची फसवणूक झाली यावेळी आम्ही माघार घेणार नाही - काही वेळा कधी कधी चार पावलं माघारी घ्यावं लागतं मला व माझ्या समाजाला कोणी आडमूठ म्हणू नये म्हणून आम्ही सरकारला तीन वर्षाचा वेळ दिला एवढा वेळ देशात कोणीही दिला नाही - सहा महिन्यात सगे सोयऱ्याची अधिसूचना काढण्याची ग्वाही दिली होती तिथं आमची फसवणूक झाली, आमची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे. - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची टीका *- ऑन मराठा समाज फसवणूक :* - आमचची मागणी ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षणाची होती. ओबीसी आरक्षण हवे असेल तर 2012 चा कायदा बदलावा लागतो. - 2012 ला ओबीसी आरक्षणाचा कायदा लॉक केला जर आम्हाला ओबीसी आरक्षण द्यायचे असेल तर त्यात बदल करावा लागेल - जे 75 वर्षात झालेले नाही तो लॉक मराठ्यांनी एका दिवसात तोडून दाखवला. *- जर सगेसोयऱ्याचे आरक्षण टिकणार नसेल तर भुजबळ त्याला विरोध का करत आहेत.* - सगेसोयरे आरक्षणाला विरोध करण्यासाठी 100 ते 150 जणांची टोळी होती. त्यांनीच याला हरकती घेतल्या. - सगेसोयरे हा कायदा टिकणारा असून विशेष मगासवर्ग, प्रवर्गांसाठी असून ज्या जाती ओबीसीत येतात त्यांच्या सर्वांच्या सगेसोयऱ्यांसाठी हा कायदा उपयोगी होणार आहे. - सग्यासोयाऱ्यांचा कायदा हा मी एकट्याने केलेला नसून यामध्ये कायज्ञाचे आणि घटनेचे अभ्यासक आणि आमचे मराठा समन्वयक होते. - बाकी कोणाला काय म्हणायचे आहे म्हणू द्या माझ्या समाजाचा माझ्यावर विश्वास आहे. *- ऑन भुजबळ आणि हाके समांतर आंदोलन :* - त्यांनी माझे नाव घेतल्याशिवाय मी नाव घेत नाही. - समांतर आंदोलन हे पहिल्यापासूनच आमच्या पाठीवर गोंदलेले आहे - आम्ही काय मागायला लागलो की कोणीतरी मधेच उठतो पण आम्ही त्याला महत्व देत नाही. - ऑन मुंबई आंदोलन :* - लोक शहरात गेल्यावर शहर बंद पडत नसतं तर ते सुरू राहतं. शहराला शोभा येते. - माणसं शहरात नाही गेली तर नुसती कुत्रीच दिसतील. - मुंबई आमचीच आहे त्यामुळे तिथे जायला आम्हाला रोग आला नाही. - आमच्या न्यायासाठी आम्ही राजधानीत चाललो आहे. - मुंबई ही न्याय देणारी भूमी आहे आणि आम्ही तिथे जाऊन न्याय घेणार आहोत. - मी सरकारी निमंत्रणाची वाट नाही पाहत. *- ऑन मुंबई ईशारा:* *- 27 ऑगस्टच्या आधी अंमल बजावणी झाली तर ठीक अन्यथा मी नंतर कोणत्याही मंत्र्याचे ऐकणार नाही.* - सगळ्याच पक्षातील नेत्यांना आवाहन की लेकरांच्या भवितव्यासाठी मुंबईला चला. - मराठ्यांच्या विजयासाठी आणि गरिबांच्या भल्यासाठी मुंबईकडे चला. - तुम्ही सर्वजण एकच दिवस या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आमची. *- ऑन फडणवीस :* - आंतरवाली सराटी या ठिकाणी जेव्हा मारहाण झाली त्यावेळेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. इतका प्राणघातक आणि क्रूर हल्ला आमच्या माय- माउलीवरती महाराष्ट्र मध्ये कधीच झाला नाही. माय माऊलींचे रक्त सांडताना आम्ही डोळ्याने बघितलं. श्रीमंताची आई म्हणजे आई आणि आम्हा गरिबांची आई म्हणजे आई वाटत नाही. असा भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला मान्य नाही. लहान लहान लेकरांवरती गोळ्या झाडल्या.गोळ्या संपल्यानंतर दांडक्याने मारहाण केली. अनेक माय माऊलींचे डोके फुटले, हा रक्त महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. आजही तुम्ही अंतरवाली सराटी या ठिकाणी आल्यानंतरने अनेक म्हातारी लोक पलंगावरती दिसतील.यामध्ये कुणाचे गुडघे फुटलेत तर कुणाच्या शरीरामध्ये गोळ्या घुसल्या आहेत. लीलावतीच्या डॉक्टरांना देखील या गोळ्या निघाल्या नाहीत. *देवेंद्र फडणवीस हे काय आमचे शत्रू नाहीत दुश्मन नाहीत वैरी देखील नाहीत, पण जेव्हापासून हल्ला केलाय तेव्हापासून ते आमच्या मनातून उतरले आहेत.* आदिलशाहीच्या काळात देखील असा हल्ला झाला नसेल , पण अंतरवलीच्या किंकाळ्या ऐकला असता तर तुम्ही बेशुद्ध पडला असता. पण आता नाटकं करायची नाहीत, सरकारने पुन्हा अशा भानगडीत पडायचं नाही. तुमच्यामुळे तुमचा (राज्य सरकारचा) कार्यक्रम होणार म्हणजे होणार. पण तुमच्यामुळे मोदी सरकारचा देखील बट्ट्याबोळ होईल. तुम्ही आमच्या माय- माऊलींवरती टाकलात आता काठी देखील लावायची नाही. ऑन मंगेश ससाने ज्याचं नाव मला माहित नाही त्याचे प्रश्न मला विचारता. ऑन कायदा आणि सुव्यवस्था त्याच्यावर मी आता बोलणार नाही पण मुंबईला जाताना एकाही पोराच्या मध्ये पडायचं नाही. जर असं केला तर राज्यातला आम्ही पानंद रस्ता सोडणार नाही. पोलिसांच्या बळावर मराठ्यांवरती अन्याय-अत्याचार करायचे बंद करा. कोट्यावधी लोक आम्ही शांतपणे जाऊन शांतपणे आलो मुंबईला. आम्ही समाजाला देखील आव्हान करतोय शांतपणे जाऊन शांतपणे या आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आमची. दगडफेक जाळफोळ करण्याची काहीही एक गरज नाही. असे करणाऱ्याला पोलिसांना पकडून द्या. पण मात्र सरकारने नाटकं केली तर त्यांना जड जाईल. Byte : मनोज जरांगे-पाटील (मराठा आरक्षण आंदोलक)
14
Report
SKShubham Koli
Aug 06, 2025 10:00:26
Thane, Maharashtra:
31 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन 10ऑगस्टला 'मॅरेथॉन ठाण्याची…उर्जा तरुणाईची 'मध्ये मोठया संख्येने नागरिकांनी सहभाग घ्यावा – अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द् असलेली 31 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन यावर्षी 10 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. यंदाही स्पर्धेत टाईम टेक्नॉलॉजीचा वापर 21 किमी पुरूष व महिला तसेच 18 वर्षावरील 10 किमीच्या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा 'मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची' या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपट्टूंसह जवळपास 25 हजारांहून अधिक धावपट्टू धावतील असा विश्वास आहे. या स्पर्धेत महापालिका अधिकारी व कर्मचारी, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्‍या पत्रकारांसह जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी आज झालेल्या पत्रकार ‍ परिषदेत केले.
13
Report
SKShubham Koli
Aug 06, 2025 09:48:27
Thane, Maharashtra:
*मंत्री अशोक वुईके byte pointers* *ऑन बिरसा मुंडा जयंती* * भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती उत्सव निमित्त आम्ही वर्ष भर बिरसा मुंडा यांचा जनजाती गौरव वर्ष साजरा करत असल्यामुळे वेगवेळ्या जिल्ह्यात विभागात आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती , युवक युवतींमधील सुप्त गुण यांना व्यासपीठावर आणून इतिहास कायम राहिला पाहिजे जिवंत राहिला पाहिजे हा उद्देश आहे * बिरसा मुंडा यांची जयंती १५ नोव्हेंबर ल आहे त्या निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे * आदिवासींसाठी युद्धपातळीवर सुरू आहे * आदिवासी मंत्री म्हणून मी स्वतः प्रवास करेन आपण दिलेल्या सूचनांचे पालन करेन *ऑन येऊर अनधिकृत बांधकाम* * चौकशी करण्याचे सांगतो *ऑन विवि पॅट* * मी दोन दिवसांपासून बाहेर होतो टीव्ही पहिला नाही
12
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 06, 2025 09:47:29
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज ‌.... स्किप्ट ::- लातूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी... पिकांना जिवदान..... लातूर जिल्ह्यात वरुणराजाची दमदार एंट्री... शहरासह ग्रामीण भागात अर्धा तासापासून पावसाची बॅटींग सुरू... AC ::- लातूर जिल्ह्यात अखेर वरुणराजाची दमदार हजेरी लावली आहे... लातूर शहरासह ग्रामीण भागात गेल्या अर्धा तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे... गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पावसामुळे पल्लवित झाल्या आहेत. विशेषत पावसाअभावी पिकं करपून जात असतानाच हा पाऊस सुरु झाल्याने पिकांना जिवदान मिळालं आहे...लातूर शहरातही मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय...
13
Report
SMSarfaraj Musa
Aug 06, 2025 09:46:25
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - गोवंश हत्या बंदीसह विविध मागण्यांसाठी कुरेशी समाजाचा मूक मोर्चा. अँकर - गोवंश हत्या बंदी कायदा व वन कायदया विरोधात सांगलीमध्ये कुरेशी समाजाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये कुरेशी समाजासह चर्मकार समाजबांधव व व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.गोवंश हत्या बंदी कायद्याच्या आडून हिंदुत्ववादी संघटनांकडून मारहाण आणि त्रास देण्याचा प्रकार वाढत चाललाय,तो बंद व्हाव्हा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. बाईट - रघुनाथदादा पाटील - नेते - शेतकरी संघटना.
13
Report
Advertisement
Back to top