Back
चंद्रकांत खैरे: गणेश उत्सवाच्या आधी आमचं सरकार येईल!
NMNITESH MAHAJAN
Aug 27, 2025 07:36:05
Jalna, Maharashtra
FEED NAmE : 2708ZT_CSN_KHAIRE_BYTE(1 fiLE)
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमचं सरकार लवकरच येईल असे चंद्रकांत खैरे यांचे वक्तव्य
पुढील गणेशोत्सवापर्यंत आमचं उद्धव ठाकरे यांचे सरकार येईल असे खैरे यांचे संकेत
लवकरच आमच सरकार येईल असे खैरे यांचे संकेत
बाईट : चंद्रकांत खैरे
9
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 27, 2025 09:34:41Raigad, Maharashtra:
स्लग – रायगडच्या साले गावचा अनोखा गणेशोत्सव , एकाही घरात गणपतीची प्रतिष्ठापना नाही , तरीही साजरा होतो गणेशोत्सव .......... तलावातून निघते पालखी मिरवणूक ...... एक गाव एक गणपतीची वर्षानुवर्षांची परंपरा .......
अँकर – सर्वत्र सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. कोकणातील घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे. परंतु रायगडच्या माणगाव तालुक्यातील साले गावातील एकाही घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जात नाही तरीदेखील इथं गणेशोत्सव साजरा केला जातो. अनेक वर्षांची ही परंपरा ग्रामस्थांनी आजही जपली आहे. यंदाही हा उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.जवळपास सव्वाशे उंबरयांच्या या गावातील एकाही घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केला जात नाही .गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील सर्व ग्रामस्थ गावातील मंदिरात जमतात . तिथून वाजत गाजत गणपतीची पालखी निघते . मंदिराच्या शेजारीच असलेल्या गंगातलावातून या पालखीची वाजतगाजत मिरवणूक निघते . गावातील हा आगळावेगळा गणेशोत्सव नेमका कधी आणि कसा सुरू झाला हे आजच्या पिढीलाही माहिती नाही . गावात घरोघरी या पालखीचं आगमन होतं. गणरायाची मनोभावे पूजा केली जाते. त्यानंतर पुन्हा मंदिरात या पालखी मिरवणूकीची सांगता होते.घरोघरी गणरायाचं आगमन होत नसलं तरी एक दिवसाच्या या उत्सवासाठी गावात मुंबईकर चाकरमानी, माहेरवाशिणी हमखास हजेरी लावतात. केवळ गावातीलच लोक नाही तर पंचक्रोशीतील भाविकही हा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून येतात.
बाईट 1 – ग्रामस्थ
बाईट 2 – ग्रामस्थ महिला
वॉक थ्रू - या आगळ्या वेगळ्या उत्सवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी.
वॉक थ्रू
2
Report
KPKAILAS PURI
FollowAug 27, 2025 09:30:28Pimpri-Chinchwad, Maharashtra:
pimpri sonali
kailas puri Pune 27-8-25
feed by 2c
Anchor - दरवर्षीप्रमाणे मोठ्या थाटामाटात सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी देखील गणपतीबाप्पाच आगमन झाल आहे पर्यावरण पूरक अशा गणपती बाप्पाच्या मूर्तीची निर्मिती सोनालीने स्वतः केली आहे,ह्या वर्षी गणपती बाप्पा साठी पर्यावरण पूरक अशी सजावट देखील करण्यात आली आहे,यावर्षी वेगळा गणपती साकारण्यात आला आहे चार डोळे,दोन सोंड,आणि हत्ती मधून गणपती प्रकट होत आहेत अशा पद्धतीसाचा गणपती बाप्पा साकारण्यात आला आहे.नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हावा ही गणराया चरणी प्रार्थना सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने केलीय...
बाईट - सोनाली कुलकर्णी
0
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 27, 2025 09:30:15Pandharpur, Maharashtra:
27082025
slug - PPR_VITTHAL_GANESH
FILE 01
-----
Anchor - आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मंगलप्रसंगी समितीचे लेखाधिकारी श्री. मुकेश अनेचा यांच्या हस्ते गणेश पूजन व स्थापना विधी संपन्न झाला.
गणेश पूजनावेळी समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, तसेच मंदिरे समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार व धार्मिक वातावरणात हा सोहळा पार पडला.
समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या या पावन पर्वानिमित्त सर्व भाविक, नागरिक आणि भक्त मंडळींना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. श्री गणरायांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती व समृद्धी नांदो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
गणेशोत्सव काळात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजन केले आहे.
0
Report
AKAMAR KANE
FollowAug 27, 2025 09:18:17kolhapur, Maharashtra:
Ngp Bawankule Family
live u ने फीड पाठवले( बावनकुळे यांच्या पत्नी, मुलगी आणि सून यांचा चौपाल)
----////+
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे शाडू मातीची मूर्ती बसवण्यात आली... महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण सजावट ही इको फ्रेंडली करण्यात आली आहे... गणरायाची ही संपूर्ण सजावट बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती, पुत्री पायल आणि स्नुषा अनुष्का यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
-----
बाईट --- ज्योती बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी
पायल बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुत्री
--- अनुष्का बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्नुषा
4
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 27, 2025 09:18:12Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - आमदार सदाभाऊ खोत यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन..
अँकर - आमदार सदाभाऊ खोत यांच्या सांगलीतील इस्लामपूर येथील निवासस्थानी आज गणरायाचे उत्साहात आगमन झाले. मोठ्या भक्तीभावाने खोत कुटुंबियांनी लाडक्या बाप्पांचे स्वागत केले.गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सदाभाऊ खोतयांच्या घरी गणरायाचे आगमन झाले. यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते
गणरायाचे पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
3
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 27, 2025 09:18:04Raigad, Maharashtra:
स्लग - मंत्री आदिती तटकरेंनी बनवले बाप्पांसाठी खास मोदक....
अँकर - राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात कितीही मोठी उंची गाठली तरी आपल्या लाडक्या गणरायांवरती असलेली श्रद्धा ,भक्ती कायम जपली जाते. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी देखील त्यांच्या निवासस्थानी बाप्पांचे जल्लोषात स्वागत करत पूजा ,अर्चा आरती केली इतकेच नाही तर आपल्या लाडक्या बाप्पासाठी त्यांनी स्वयंपाक घराचा ताबा घेत बाप्पांच्या आवडीचे मोदक देखील बनवले.
4
Report
AKAMAR KANE
FollowAug 27, 2025 09:17:53kolhapur, Maharashtra:
Ngp Bawankule ganpati
ngp bawankule aarti
यामध्ये आरती आणि बाईट आहे
------------------
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी बाप्पा पा विराजमान झाले आहे... बावनकुळे कुटुंबाने बाप्पाची आरती आणि पूजा केली...( त्यानंतर त्यांचा बाईट झाला )
--------
नागपूर -
बाईट - चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री
- यावर्षीही आमच्याकडे गणरायाची स्थापना झाली,पुढचे दहा दिवस आराधना करणार, सर्वांचे जीवन मंगलमय राहू दे अशी प्रार्थना केली
- यावर्षी शेतकाऱ्यांचे जे नुकसान झालाय,अतिवृष्टीमुळे वाईट परिस्थिती आली आहे,त्यांचाही जीवनात समृद्धी येऊ दे अशी प्रार्थना केली आहे
- सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे हे वातावरण असेच राहू द्या
On जरांगे पाटील आंदोलन -
- आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे,हिंदू समाज प्रत्येक गल्ली बोळात गणेश उत्सव साजरा करतात,मुंबई आणि कोकणात साजरा करतात
- गणेश उत्सवानंतर आंदोलन करता आलं असतं, ज्या राजकीय पक्षांनी समर्थन दिलं आहे त्यांनी विचार करायला पाहिजे
- हिंदूच्या सर्वात मोठ्या उत्सवात गालबोट लागू नये याची काळजी घ्यायला पाहिजे
On उद्धव - राज ठाकरे -
- उद्धव ठाकरे राज साहेबांकडे गेले असतील तर गणेशोत्सव कुटुंबात सादर करणे याला राजकीय दिवस मानू नये, कुटुंब एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात
On ऑपरेशन सिंदूर देखावा -
- जो पराक्रम करून दाखवला, पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त करून दाखवले, गणेशोत्सव निमित्ताने सर्व समाजातील लोक एकत्र येतात, ऑपरेशन सिंदूर च्या प्रतिकृती लावल्या असतील तर चांगली गोष्ट आहे ,सैनिकांचे काम तरुण पिढीला कळेल
On अतिवृष्टी मदत -
- राज्य सरकार आहेत त्याप्रमाणे केंद्र सरकार राज्य सरकार मदत करता पंचनामे जवळपास झाले आहेत, अमरावतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे अपलोड झाले आहेत, लवकरच मदतीची कारवाई सरकार करत आहे, मुख्यमंत्री यांनी परवाच कॅबिनेटमध्ये आम्हा सर्व पालकमंत्र्यांना यासंबंधीची दखल घेण्यात सांगितले आहे
On नझुल जमीन -
- कोकणात वेंगुर्ल्याला गणेशोत्सवानिमित्त आम्ही शासन निर्णय जाहीर केला, गवळी कोड्याचा फ्रीहोल्ड झालेला आहे तसेच नागपूर आणि अमरावती सरकारी जागेवर लोक राहतात त्यांना अजून जागेवर आहे ते कायदेशीर करण्याकरता नझुल च्या जागेवर बसलेल्या घरांना त्याच्या जागेचे मालकी पट्टे देण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढ दिली आहे
- नागपूर आणि अमरावती विभागात सरकारी जागेवर अजून च्या जागेवर पट्टे असतील त्यांना पट्टे वाटप करणार, गणेशोत्सवाच्या दिवशी मुख्यमंत्री आणि सरकारने हा निर्णय घेतला आहे
On जरांगे फडणवीस टीका -
- मागच्याही वेळी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी जे आंदोलन केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हा त्यांनी फडणवीस यांच्यात नावाने कल्लोळ केला आणि आता इथे फडणवीस यांच्याच नावाने कल्लोळ करत आहेत
- मराठा आरक्षणाला ज्यांनी दिलं त्या प्रकारे केला जातो ते जनतेला मान्य नाही
- ज्याप्रमाणे निवडणुकीत आम्हाला 51% मत दिली त्यानंतर फडणवीस यांची लोकप्रियता आहे हे सिद्ध झालं ज्याप्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलल्या जाते ते योग्य नाही, व्यक्तिगत जीवनात जे आरोप करतात महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
- on महसूल विभाग -
- नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस 17 सप्टेंबर पासून ते महात्मा गांधी यांच्या दोन ऑक्टोबर जयंती पर्यंत पंधरा दिवस आम्ही महासुली सप्ताह साजरा करतो आहे
- या पंधरवड्यात महाराजस्व अभियान आम्ही येतोय
On ओबीसी आरक्षण -
- ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी कोणाचीही ना नाही, आमच्या सरकार काम करत आहे, 18 पगड जाती ओबीसी समाज या आरक्षण त्यांच्याकडे आहे जे सुप्रीम कोर्टाने राजकीय आरक्षण कायम ठेवला आहे ते आरक्षण ओबीसी समाजाला मिळाला पाहिजे
- त्यासोबतच मराठा समाजाने आरक्षण मिळाला पाहिजे यासाठी सरकारची भूमिका आहे आणि त्या निमित्ताने सरकार पुढे जात आहे
- on आरएसएस -
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष आहे हे संपूर्ण भारतीय आणि हिंदू समाजाकरिता आमच्या राष्ट्राकरिता राष्ट्र प्रथम हे हाती घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थापना झाली होती या संपूर्ण वर्षात कार्यक्रम आयोजित केले आहे
- माझी मुलगी सून आणि पत्नी यांनी गणपतीची सजावट केलेली आहे, गवताच्या पानाफुलांची जिवंत सजावट इको फ्रेंडली करण्याचा प्रयत्न केलेला आहे
-
5
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 27, 2025 09:01:34Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सांगलीत श्री गणपती पंचायतन संस्थांच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना - पुढील पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन.
अँकर - तब्बल 183 वर्षाची परंपरा असणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थांच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.सांगली गणपती संस्थानाचे विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत शाही गणपतीची आरती करण्यात आली.शाही लवाजाम्यांसह पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.गेल्या 183 वर्षापासून सांगलीमध्ये पटवर्धन घराण्याकडून शाही गणपती बसवण्याची परंपरा आहे. पुढील पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जातात. पाचव्या दिवशी पटवर्धन घराण्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीत सांगलीतून रथोत्सवाच्या माध्यमातून शाही मिरवणुकीने सरकारी गणपतीचे विसर्जन केलं जातं.
बाईट - श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन - अध्यक्ष, गणपती पंचायतन ,सांगली.
4
Report
AKAMAR KANE
FollowAug 27, 2025 09:01:24kolhapur, Maharashtra:
Ngp Patole ganpati
live u ने फीड पाठवले
-------
काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या कडेही गणरायाची स्थापना झाली... त्यांच्या मोठे बंधू यांच्या निवासस्थानी पटवली कुटुंबाचा गणरायाची स्थापना झाली
------
बाईट--- नाना पटोले,
नागपूर -
बाईट - नाना पटोले,काँग्रेस नेते
- सर्व जनतेला गणेश स्थापनेच्या शुभेच्छा देतो, विघ्नहर्ता सुखकर्ता असं गणपतीला मानतो, माझ्या महाराष्ट्राला सगळ्यांना सुखी आणि समृद्धी देईल, हा महाराष्ट्र पुढे जावा असा आशीर्वाद गणेशजींच्या चरणी करतो
- राज्य आणि केंद्र सरकारला सद्बुद्धी प्राप्त होवो अशी प्रार्थना गणेशा चरणी केली आहे
On डॉ मोहन भागवत -
- प्रत्येक संघटनेला आपले ध्येय सांगण्याचे अधिकार आहेत,पण त्याची प्रॉपर अंमलबजावणी झाली पाहिजे, ज्या पद्धतीने बोललं जातं त्या पद्धतीने झालं पाहिजे एवढेच प्रतिक्रिया मी देऊ शकतो
4
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 27, 2025 08:52:37Akola, Maharashtra:
Anchor : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या निवासस्थानी श्री गणेशाची मूर्ती स्थापून गणेशोत्सवाची सुरुवात केली..पारंपरिक वाद्य, टाळ-मृदंग आणि भजनांच्या गजरात गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली..यानंतर विधिवत पूजाअर्चा करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी आमदार मिटकरी यांनी प्रार्थना करताना देशभरातील शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावं अशी मागणी श्रींच्या चरणी केली. तसेच वराह जयंती साजरी करणाऱ्यांना श्री गणेश सद्बुद्धी देवो, असेही ते म्हणाले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मिटकरी यांच्या निवासस्थानी भक्तीभाव आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
3
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 27, 2025 08:52:28Dhule, Maharashtra:
Anchor - नंदुरबार शहरातील प्रथम मानाच्या दादा गणपतीची स्थापना झाली, त्यानंतर शहरातील अन्य मानाच्या गणपतीची स्थापना झाली. यावेळेस गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. शहरातील मानाचे दादा आणि बाबा गणपती असून, या गणपतीची स्थापना प्रथम झाली. दादा गणपतीला १४३ वर्षाचे परंपरा आहे तर, बाबा गणपतीला १४१ वर्षाचे परंपरा लाभलेले आहे. दादा गणपती १८८२ साली स्थापन स्थापना झाली होती तर बाबा गणपतीची १८८३ साली स्थापना झाली आहे. शहरातील मानाचे दादा आणि बाबा गणपती साठी मोठा शिंगार केला जात असतो, दादा आणि बाबा गणपती हे नवसाला पावणारे म्हणून गणपती बाप्पाची ओळख आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा आणि महाराष्ट्रसह शेजारील असलेल्या गुजरात, मध्य प्रदेश राज्यातून भाविक मोठ्या भक्ती भावाने दर्शनासाठी येत असतात. आपल्या मनोकामना मांगत असतात. विशेष म्हणजे शहरातील मानाचे गणपती भाविकांच्या मनोकामना देखील पूर्ण करत असल्याचे भाविक सांगतात.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
2
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 27, 2025 08:52:19Dhule, Maharashtra:
ANCHOR - राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या रावल गढीवर श्रीमंत राजा गणपतीची स्थापना करण्यात आली. दोंडाईचा शहरातील त्यांच्या गढीवर बाप्पांचे आगमन झाले. यां बाप्पाला अनेक दशकांची परंपरा असून, दोंडाईचा येथील रावल गढी वर श्रीमंत राजा गणपतीची स्थापना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आली. गढी चे राजपुरोहित नगरदेवळेकर यांनी विधिवत पूजन व मंत्रोपचाराने पूजन केले.
प्रशांत परदेशी, धुळे.
1
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowAug 27, 2025 08:51:54Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_RANA_BYTE एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
हिंदूच्या सणाला विघ्न नको आणि जरांगेंनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा; मनोज जरांगेच्या आंदोलनावर नवनीत राणा यांची टीका
अँकर :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहे. यावर माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली. हिंदूच्या सणाला विघ्न नको आणि जरांगेंनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. न्यायालयावर सर्वांचा विश्वास आहे न्यायालयाच पालन सर्वांनी केलं पाहिजे. हिंदूंचे सण आहे ते महाराष्ट्रात खूप उत्साहाने साजरे केले जातात. आणी मुंबईमध्ये पूर्ण देशाचे लोक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात या ठिकाणी खूप गर्दी उत्साह असते. त्यामुळे ते अकरा दिवस सोडून परत ती मागणी रोडवर आणू शकतात मला असं वाटते 11 दिवस आपले सण आहे यामध्ये कुठले प्रकारे विघ्न न टाकतांना अकरा दिवसानंतर मागणी करू शकता असा सल्ला नवनीत राणा यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला तर कोण हिंदुत्ववादी आहे हे कोणी ठरू शकत नाही. हिंदूच्या सणाला विघ्न आल नाही पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
बाईट :- नवनीत राणा, माजी खासदार
3
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 27, 2025 08:31:40Raigad, Maharashtra:
स्लग - खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना ..... तटकरे कुटुंबीयांनी केली गणरायाची आराधना .......... सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ..... मुंबई गोवा महामार्ग लवकर होऊ दे ..... गणराया चरणी प्रार्थना .....
अँकर - राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील निवासस्थानी गणरायांचे आगमन झाले मंत्री आदिती तटकरे,माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या सह सर्व कुटुंबीय उपस्थित होते.मंत्रोच्चार व बाप्पांच्या जयघोषात तटकरे कुटुंबीय रंगले होते सर्वांनी आरती करत मनोभावे पूजा केली.
पुढील वर्षांत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुसज्ज करण्याचा संकल्प खासदार सुनील तटकरे यांनी केला तर मंत्री आदिती तटकरे यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या
बाईट - सुनील तटकरे, खासदार
बाईट - आदिती तटकरे , मंत्री
2
Report
ABATISH BHOIR
FollowAug 27, 2025 08:31:30Kalyan, Maharashtra:
डोंबिवली माणकोली उड्डाण पूल चार दिवस वाहतुकी साठी पूर्णपणे बंद! ...
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दीड दिवस, पाच, गौरी विसर्जन व अनंत चतुर्थीला माणकोली पुलावरून वाहनांना नो एंट्री...
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग जाहीर “नियम पाळा, सहकार्य करा” – डोंबिवलीकरांना वाहतूक पोलिसांचे आवाहन
गेल्या अनेक वर्षांपासून डोंबिवलीचे गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठागाव रेतीबंदर खाडी किनाऱ्यावरील गणेशघाटाला प्राधान्य देतात. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी इथे प्रचंड गर्दी होते. डोंबिवली शहर परिसरातील गणेश भक्त रेतीबंदर चौक, रेतीबंदर रेल्वे फाटक, आणि माणकोली उड्डाण पूल या मार्गाने पायी किंवा वाहनांनी विसर्जनासाठी जातात.मात्र, माणकोली पूल सुरू झाल्यापासून मुंबई, ठाणे आणि भिवंडी परिसरातील अनेक प्रवासी या मार्गाचा वापर करत आहेत. त्यामुळे रेतीबंदर रेल्वे फाटक, उमेशनगर, पंडित दीनदयाळ रस्ता आणि माणकोली पूल परिसर नेहमीच गजबजलेला असतो. गणेश विसर्जनाच्या गर्दीमध्ये आणखी वाहने आल्यास अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊ शकते, हे लक्षात घेऊन वाहतूक विभागाने २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर या चार दिवशी माणकोली पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहतुकीतील महत्त्वाचे बदल आणि पर्यायी मार्ग:
ठाणे-मुंबईकडून येणारी वाहने: मुंबई-नाशिक महामार्गावरून माणकोली पुलाकडे येणाऱ्या वाहनांना नारपोली हद्दीतील अंजुर दिवेगाव, लोढा धाम, माणकोली येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने अंजुरफाटा, भिवंडी बाह्यवळण रस्त्याने पुढे जातील.
कल्याण-अंबरनाथकडून येणारी वाहने: कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबईहून माणकोली पुलाकडे जाणाऱ्या वाहनांना पत्रीपूल, टाटा नाका, सुयोग हॉटेल, डीएनएस बँक सोनारपाडा, मानपाडा चौक, घरडा सर्कल येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने दुर्गाडी आणि गांधारे पुलावरून इच्छित स्थळी जातील.
ठाकुर्ली-डोंबिवलीकडून येणारी वाहने: ठाकुर्ली पूल आणि कोपर पुलावरून येणाऱ्या वाहनांना या पुलांवर प्रवेश बंद असेल. या वाहनांना दुर्गाडी पूल आणि गांधारे पुलाचा वापर करावा लागेल.
डोंबिवलीतून मोठागावकडे जाणारी वाहने: रेतीबंदर रेल्वे फाटकमार्गे मोठागाव माणकोलीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असेल. त्यांनी पत्रीपूल आणि दुर्गाडी चौकातून पुढे जावे.
हे बदल गणेशोत्सवादरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी घेण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे
Byte राजेश सावंत प्रभा क्षेत्र अधिकारी
1
Report