Back
केंद्र सरकारचा ट्रॅक्टर नियम: शेतकऱ्यांचे खिसे होणार लुटले!
PNPratap Naik1
Aug 11, 2025 08:17:27
Kolhapur, Maharashtra
Kop Tractor Black Box PKG
Feed :- 2C
Anc :- : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेमुळे देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालक संतप्त झालेत.या अधिसूचनेत ट्रॅक्टरसाठी जीपीएस ब्लॅक बॉक्ससारखी उपकरणे सक्तीने बसवण्याची तरतूद आहे. त्यामुळे ही अधिसूचना म्हणजे थेट शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा असल्याचा आरोप केला जातोय..
GFX In
देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा नवा तुघलकी अधिसूचना.
शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी जीपीएस ब्लॅक बॉक्ससारखी उपकरणे सक्तीने बसवण्याची तरतूद
ही अधिसूचना म्हणजे थेट शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा
ट्रॅक्टर मालकांवर 30 हजार रुपयांहून अधिकचा अतिरिक्त आर्थिक बसणार - विरोधी पक्ष
केंद्र सरकारच्या तुघलकी अधिसूचनेमुळे शेतकरी संतप्त.
GFX Out
VO 1:- केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेमुळे देशभरातील शेतकरी संतप्त झालेत. विरोधी पक्षाने देखील या संदर्भात आवाज उठवला आहे. या अधिसूचनेनुसार 'हॉलेज ट्रॅक्टर'साठी जिपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस, प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये एआयएस-140 प्रमाणित लोकेशन ट्रॅकर बसवणे बंधनकारक केले आहे. ब्लॅक बॉक्स, अपघाताची नोंद ठेवण्यासाठी 'इव्हेंट डेटा रेकॉर्डर' अनिवार्य केले आहे. ट्रॉलीसाठी नवे महागडे मेकॅनिकल कपलिंग व इलेक्ट्रिकल कनेक्टर बंधनकारक केली आहे, त्यामुळे या नव्या नियमांमुळे ट्रॅक्टर मालकांवर 30 हजाराहून अधिक रुपयाचा अतिरिक्त आर्थिक बोजा बसेल असं बोलले जातंय. ग्रामीण भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी ही तांत्रिक साधने पूर्णतः अनावश्यक आहेत.. त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय.
Byte :- आमदार सतेज पाटील
VO 2:- शेती करणाऱ्या ट्रॅक्टरवर हवाई प्रवासासारखी तंत्रज्ञाने कशाला? असा सवाल शेतकऱ्यांनी देखील उपस्थित केलाय. शेतीमध्ये फक्त 10 ते 15 किमी वेगाने वापरला जाणारा ट्रॅक्टर कुठल्या अपघाताचे रेकॉर्ड ठेवणार? शहरात बसलेले अधिकारी हे नियम तयार करताना शेतकऱ्याचे वास्तव विसरत आहेत त्याकडे केंद्र सरकारने लक्ष घालावे त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Byte :- विश्वास बालेघाट, शेतकरी
Byte :- बंडु पाटील,शेतकरी
VO 3:- सरकारने 18 ऑगस्ट 2025 पर्यंत या अधिसूचनेवर हरकती नोंदवण्याची मुदत दिली आहे, त्यामुळे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सर्व शेतकरी, ट्रॅक्टर मालक आणि शेतकरी संघटनांनी केंद्राकडे हरकती पाठवण्याचे आवाहन केले. इतकंच न्हवे तर सरकारने ‘हॉलेज ट्रॅक्टर’ची व्याख्या स्पष्ट करून शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरना या नियमांतून वगळावे किंवा ही अधिसूचना तात्काळ रद्द करावी,” अशी मागणी केलीय. एकीकडे शेतकऱ्यांना आधीच महागाई, निसर्गाचा लहरीपणा आणि उत्पादन खर्चात वाढ यांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी हे नवे नियम त्यांना आणखी अडचणीत टाकणारे असल्याने केंद्राने हा नवा अध्यादेश रद्द करावा अशी मागणी देशातील शेतकरी करत आहेत...
प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowAug 11, 2025 10:20:11Mumbai, Maharashtra:
ब्रेक
भांडुप मध्ये सोनापूर विभागात प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग
आजूबाजूच्या परिसरात देखील मोठी प्लास्टिकचे गोडाऊन
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 11, 2025 10:19:02Raigad, Maharashtra:
स्लग – शिवसेना ठाकरे गटाची जिल्हाधिकारी काया्रलयावर धडक ....... वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन .........
अँकर – राज्याच्या मंत्रीमंडळातील वादग्रस्त आणि भ्रष्ट मंत्रयांच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वादग्रस्त मंत्री आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रीमंडळातून वगळावे, वोटचोरी प्रकरणी निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई करावी, लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. पोलीसांनी लावलेले बॅरीगेटस तोडून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सरसावले. तिथं मात्र पोलीसांनी त्यांना रोखून धरले.
1
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 11, 2025 10:17:23Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - पश्चिम महाराष्ट्राच्या सहकाराची वाईट अवस्था,आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता - प्रवीण दरेकर.
अँकर - पश्चिम महाराष्ट्राचा विकास सहकाराच्या जोरावर झाला,मात्र आज या सहकार क्षेत्राची वाईट अवस्था झाली आहे, त्यामुळे सहकार क्षेत्राचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे,असे विधान भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे.सहकारी साखर कारखान्यांचे खाजगी साखर कारखाने झाले,इतर संस्था चालवणे अडचणीचे बनले आहे,त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या सहकार क्षेत्राचे वाईट अवस्था झाली आहे.शरद पवारांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थितीत सहकार क्षेत्राबाबत चिंता व्यक्त केली होती, त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्राबाबत
काय उपाययोजना केल्या पाहिजेत,यावर लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे मत देखील आमदार दरेकर यांनी व्यक्त केले आहे,सांगलीच्या वाघवाडी येथे पार पडलेल्या दूध उत्पादक शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते
साउंड बाईट - प्रवीण दरेकर - आमदार - भाजपा.
1
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 11, 2025 10:16:44Pandharpur, Maharashtra:
11082025
slug - PPR_POLICE_SANDTRUCK
file 01
----
Anchor - पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा आयशर कंपनीचा ट्रक जप्त केला आहे.
मौजे आंबे गावच्या हद्दीतून अवैध रित्या वाळू वाहतूक करणारा ट्रक जप्त केला. 5 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
4
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 11, 2025 10:16:14Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव:
DHARA_VIKHE
जल संपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवारावर जोरदार टीका
ज्येष्ठ नेत्यांची त्यांची ज्येष्ठता सोडून दिली आहे, वयाने ज्येष्ठता येत नाही
मतपेट्यांचं काम राज्यात होत होत, निवडणुका होत्या तेव्हा शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात निवडणुकीत धांदली केली
मलाही लोक सांगतात पवारांनी कशा पद्धतीने निवडणुका फिरवल्या, राधाकृष्ण विखे पाटलांचा पवारांवर हल्लाबोल
मत पेट्या कशा तयार व्हायच्या, कशा बदलल्या गेल्या, बदलणाऱ्या अधिकाऱ्यांना कशी बक्षीस दिली हे लोकांनी मला सांगितलं
त्यांनी पूर्वीच्या काळी भानगडी केल्या त्यामुळे त्यांना वाटतं आता प्रत्येक निवडणुकीत भानगडीत होतात
धाराशिव दौरावर असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा तुळजापुरातून शरद पवारांवर हल्लाबोल
Byte- राधाकृष्ण विखे पाटील
1
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 11, 2025 10:06:00Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1108ZT_CHP_UBT_PROTEST
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपुरात शिवसेना उबाठाच्या वतीने जन आक्रोश आंदोलन
अँकर:-- चंद्रपुरात आज शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने महायुती सरकार विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सामील झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारवर भ्रष्ट मंत्र्यांचा बचाव करण्याचा आरोप केला. सरकारमधील संजय शिरसाठ, योगेश कदम आणि माणिकराव कोकाटे यासारख्या मंत्र्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. अशा मंत्र्यांमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसत असून यामुळे राज्य अधोगतीकडे जात असल्याचा देखील शिवसैनिकांनी आरोप केला.
बाईट १) प्रशांत कदम, जिल्हा संपर्क प्रमुख
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
5
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 11, 2025 10:05:36Dhule, Maharashtra:
Anchor- महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयापासून शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी महायुतीतील मंत्र्यांच्या प्रतिमेला शेण फासून निषेध करण्यात आला. महायुती सरकार भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी उध्दव ठाकरे गटाने केला आहे. रम्मि , हनीट्रॅप आणि इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे महायुतीतील मंत्री वादाच्या भोवऱ्यात असून या मंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी संतप्त शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली.
Byte- अशोक धात्रक, संपर्क प्रमुख
प्रशांत परदेशी, धुळे.
6
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 11, 2025 09:47:20Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर अपघात
गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर पलटी
लांजा जवळच्या वेरळ घाटातील घटना
वेरळ घाटामध्ये एकरी वाहतूक सुरू
घटना स्थळी पोलीस दाखल
ब्लॅक स्पॉट अशी वेरळ घाटाची ओळख
वारंवार अपघात होत असल्याने प्रवास वर्गात नाराजी
वाहतूक पोलीस घटनास्थळी
6
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 11, 2025 09:36:57Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1108ZT_WSM_SWEEPER_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : वाशिम नगरपरिषद अंतर्गत घंटागाडी व ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलन करणारे सुमारे ९० कंत्राटी सफाई कामगार व वाहनचालक कचरा संकलनासाठी कामगार गेली १० ते २० वर्षे कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. अनेक वर्षाच्या सेवेनंतरदेखील, २५ जुलै रोजी नव्या टेंडर प्रक्रियेनंतर वाशिम विधानसभेचे आमदार श्याम खोडे यांच्या नातेवाईक असलेल्या कंत्राटदाराने जुने कामगार कमी करून नवे कामगार नेमले.आणि जुन्या कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आणली असा आरोप करत,ऐन सणासुदीच्या काळातच उदरनिर्वाहाचे संकट ओढविल्याने, सफाई कामगार संघटनेच्या वतीनं या सर्वांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी आज पासून वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न साखळी उपोषण सुरू केले आहे.
बाईट:राहुल ढोके,कंत्राटी कामगार,वाशिम.
10
Report
KJKunal Jamdade
FollowAug 11, 2025 09:34:41Shirdi, Maharashtra:
Anc - राहाता शहरातील शिवाजी चौकात आज ठाकरे गटाच्या वतीने सरकारविरोधात जोरदार जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..."भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्या , सरकार हाय हाय अशा घोषणा यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिल्या...
V/O - राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून सतत भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होत आहेत, तरीही कलंकित मंत्र्यांना वाचवले जात आहे. जनतेच्या पैशांचा गैरवापर होत असून शेतकरी, बेरोजगार, आणि सामान्य नागरिकांच्या अडचणींकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत असुन जोपर्यंत भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारची आंदोलने राज्यभर सुरू राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला..
बाईट - गणेश सोमवंशी ( भगवा शर्ट )
बाईट - अमोल गायके ( दाढी व पांढरा शर्ट )
बाईट - सोमनाथ गोरे
11
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 11, 2025 09:31:28Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - निवडणूक आयोग विरोधातील आंदोलन म्हणजे राहुल गांधी आणि विरोधी पक्षांची नौटंकी - प्रवीण दरेकर.
अँकर - राहुल गांधी आणि विरोधी पक्ष नौटंकी करत आहेत ,अशी टीका भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे. निवडणूक आयोगा च्या विरोधात राहुल गांधींकडून आणि विरोधी पक्षांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनावरून दरेकर यांनी हे टीका केलेली आहे, तसेच जनतेचा जनाधार मिळत नाही,त्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल संभ्रम निर्माण करून येणाऱ्या निवडणुकीत काही हाताला लागतय,का याचा गेम प्लॅन राहुल गांधींकडून करण्यात येत असल्याचा आरोप देखील आमदार दरेकर यांनी केला आहे,तसेच एखाद्या झोपलेल्या माणसाला उठवता येतं पण झोपेच सोंग घेतलेल्या माणसाला कसं उठवायचं,असा टोला देखील दरेकरांनी लगावला आहे.ते सांगलीच्या इस्लामपूर येथे बोलत होते.
बाईट - प्रवीण दरेकर - आमदार,भाजपा.
9
Report
SNSWATI NAIK
FollowAug 11, 2025 09:20:52Navi Mumbai, Maharashtra:
story slug - भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करत शिवसेना ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन.
FTP slug - nm shivsena aandolan
byet- m k madhavi
shots-
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: राज्यातील महायुती सरकार विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून राज्यभर आंदोलनाची हाक दिलेय. महायुती सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटातर्फे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. काही मंत्र्यांच्या कार्यप्रणाली विरोधात सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून अश्या मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेय.
Byte -: एम के मढवी (संपर्कप्रमुख नवी मुंबई)
13
Report
HPHARSHAD PATIL
FollowAug 11, 2025 09:20:42Palghar, Maharashtra:
पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडून वेळेत उपचार न मिळाल्याने एका महिलेचा उपचारांअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . छाया पुरव असं या मृत महिलेच नाव असून त्या मुंबईच्या माहीम कोळीवाडा येथे वास्तव्यास होत्या . मूळच्या सफाळे येथील रहिवासी असलेल्या छाया आपल्या कुटुंबासोबत शनिवारी गावी आल्या होत्या . याच वेळेस सफाळे परिसरात त्यांच्या अंगावर झाड पडून त्या गंभीर जखमी झाल्या . पालघर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारानंतर छाया गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत रेफर करण्यात आलं . मात्र पालघरहून मुंबईकडे निघालेली रुग्णवाहिका विरार ते घोडबंदर यादरम्यान तब्बल चार तास वाहतूक कोंडीत अडकून पडली . चार तासानंतर जखमी छाया पुरव यांना मिरा रोड येथील ऑर्बिट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं . मात्र रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाल्याच ऑर्बिट रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आलं . या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रोजच्या होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात नागरिकांकडून संताप देखील व्यक्त करण्यात येतोय . मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डे मुक्त आणि वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी मागील वर्षी महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या अच्छाड ते मुंबईच्या सीमेवरील दहिसर पर्यंत 620 कोटी रुपयांचा निधी खर्च करून व्हाईट टॅपिंगचं काम पूर्ण करण्यात आलं . मात्र हे काम निकृष्ट दर्जाच झाल असल्याने या महामार्गावर अवघ्या दोन महिन्यातच खड्ड्यांच साम्राज्य पाहायला मिळतंय . त्यामुळे या महामार्गावर रोजच वाहतूक कोंडी होत असून यामुळे वाहन चालक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत . त्यातच वाहतूक कोंडीमुळे छाया पुरव यांचा मृत्यू झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि व्हाईट टायपिंग काम करणाऱ्या ठेकेदारा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आता स्थानिकांकडून होऊ लागली आहे.
11
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 11, 2025 09:20:26Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील कलंकीत मंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नंदुरबारमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. शहरातील दिन दयाळ चौकात शिवसैनिकांनी बॅनरबाजी करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. महाराष्ट्रातील वाचळवीर आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांचा सुळसुळाट झाला असतांना लाचार मुख्यमंत्र्यांना त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेता येत नसल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाने या कलंकीत मंत्र्याच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
BYTE - अरुण चौधरी, आंदोलक
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
9
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 11, 2025 09:18:38Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्हा शिवसेना ( UBT ) तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रातील वादग्रस्त मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी "जन आक्रोश आंदोलन" आयोजित करण्यात आले आहे..या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आलीय..नेमक कशा प्रकारे हे आंदोलन आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी..
14
Report