Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदाराचा पुत्र भाजपमध्ये प्रवेश!

ADANIRUDHA DAWALE
Aug 17, 2025 03:31:34
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_VARUD_BJP फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 वरुड–मोर्शी मतदार संघात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदाराच्या पुत्राचा बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश अँकर :– विदर्भात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचे वरूड–मोर्शी मतदारसंघाचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी काल बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे हे अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते गेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रम ठाकरे यांना महाविकास आघाडने उमेदवारी न दिल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विक्रम ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. अखेर काल विक्रम ठाकरे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Aug 17, 2025 05:49:17
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1708ZT_CHP_MONSOON_TOUR_1_2 ( 2 file sent on 2C) टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील  हिंडगवरे समूहाने पुन्हा केले  मान्सून ट्रेकचे आयोजन, जिवती तालुक्यातील जंगुबाई गुहा व भीमलकुंड धबधब्याचा घेतला रोमांचकारी अनुभव अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील माणिकगड डोंगरात ‘हिंडगवरे’ समूहाने यावर्षीही मान्सून ट्रेकचे आयोजन केले. १६ जणांचा समुह आणि तीन गाड्यांनी हा ट्रेक केला. पहिल्या दिवशी जंगुबाईच्या निसर्गनिर्मित गुहेच्या दिशेने, स्थानिकांच्या मदतीने दगड आणि पाण्याने भरलेली नदी चढत पार केली. जंगुबाई ही आदिवासी गोंड-कोलाम समाजाचे श्रद्धास्थान असून तिची मूर्ती प्रतिकात्मक असते. नदी व गुहा त्यांच्या दृष्टीने पवित्र मानली जाते. दुसऱ्या दिवशी २००-२५० फुटांवरून कोसळणाऱ्या भीमलकुंड धबधब्याचे उलट्या दिशेने ट्रेकिंग करत मुखाजवळील प्रवाहाचा थरार अनुभवला. मग सदस्यांनी धबधब्याखाली उतरण्याचा थरारक अनुभव घेतला. हा ट्रेक धार्मिक, ऐतिहासिक आणि साहसी ठरला.  बाईट १) प्रशांत बोराडे, सदस्य, हिंडगवरे समूह आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 17, 2025 05:48:14
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1708ZT_NANDED_DHABDHABA(1 FILE) नांदेड :पैनगंगा नदीला पूर , सहस्त्रकुंड धबधब्याला रौद्र रूप अँकर - गेल्या दोन दिवसापासुन सूरू असेलल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आला .. पैंनगंगा नदीला प पूर आल्याने नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याला रौद्र रूप आले ..नांदेड जिल्हयातील इसलापुर येथील सहस्त्रकुंड धबधब्याला रौद्र रूप प्राप्त झाले .. किनवट तालुक्यात इस्लापुर इथे नांदेड - यवतमाळ सिमेवर हा धबधबा आहे ...सध्या नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे पैनगंगा नदीला पुर आला ... त्यामुळे सहस्रकुंड धबधब्याचे असे विक्राळ दृश्य आज सकाळपासून पाहायला मिळाले .. धबधबा पाहण्यासाठी ईथे पर्यटक गर्दी करत आहेत ..
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 17, 2025 05:47:39
Ratnagiri, Maharashtra:
जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी खेड जगबुडी नदी धोका पातळीच्या वर खेड शहराला पुराच्या पाण्याचा धोका वाढला आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवर जगबुडी किनारपट्टीच्या गावांना सतर्कतेचा इशारा
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 17, 2025 05:47:31
Washim, Maharashtra:
वाशिम: File:1708ZT_WSM_KATEPURNA_BRIDGE रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.नागपूर–संभाजीनगर महामार्गावरील काटेपूर्णा नदीवरील जीर्ण पूल पाण्याखाली गेल्यामुळे रात्रीपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.काही वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे.दरम्यान,जऊळका पोलीस काटेपूर्णा नदीवरील पुलावर कडेकोट बंदोबस्त ठेवून सतत पहारा देत आहेत.तसेच पिंप्रीजवळ उतावली नदी दुथडी भरून वाहत असून,पुराचे पाणी थेट महामार्गावर आल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 17, 2025 05:45:31
Pandharpur, Maharashtra:
17082025 Slug - PPR_SECURITY_HANDGLOVES file 02 -------- Anchor - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गाभाऱ्यात सेवा करणाऱ्या महिला सुरक्षा रक्षकांना आता घालावे लागणार हॅण्ड ग्लोव्हज, समिती कडून सूचना शनिवार रविवार सुट्ट्या आणि श्रावण महिना या मुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे भाविकांचे जलद दर्शन होण्यासाठी महिला सुरक्षा रक्षक भाविकांना पुढे ढकलत असतात. यामुळे भाविकांना त्रास होऊ नये यासाठी आता समितिने विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात काम करणाऱ्या महिलांना हॅण्ड ग्लोव्हज घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. ---- Byte - पृथ्वीराज राऊत, प्रभारी व्यवस्थापक
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 17, 2025 05:30:14
Dhule, Maharashtra:
ANCHOR :- गेल्या महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. उभ्या पिकांना पाण्याची नितांत गरज असून, उत्पन्न धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत, निसर्गाला साद घालण्यासाठी आणि पावसाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रकाशा गावात एक अनोखा प्रयत्न सुरू झाला आहे. गावातील शेतकरी एकत्र येत पावसासाठी पर्जन्ययाग सुरू केला आहे. सद्गुरू तोताराम महाराज मंदिरात तीन दिवसांचे भजन कार्यक्रम आयोजित केल्यानंतर, आता मिरा नगरमध्ये हा विशेष पर्जन्ययाग केला जात आहे. या यागात महिला आणि पुरुष सहभागी झाले आहेत. वडाच्या, लिंबाच्या आणि उंबराच्या फांद्या जाळून धूर केला जातोय आणि त्यात मीठही टाकले जातेय. यामागे अशी श्रद्धा आहे की, हा धूर आकाशात जाऊन ढगांना मिळेल आणि पावसाला अनुकूल वातावरण तयार होईल. सध्याच्या कृषी संकटावर मात करण्यासाठी आणि पावसाला आवाहन करण्यासाठी ग्रामस्थांनी केलेला हा प्रयत्न, त्यांच्या श्रद्धेचे आणि एकजुटीचे प्रतीक मानला जात आहे... BYTE :- हरी पाटील ,शेतकरी ,प्रकाशा प्रशांत परदेशी, नंदुरबार.
2
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 17, 2025 05:17:18
Dhule, Maharashtra:
ANCHOR - नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम असताना मंत्री गिरीश महाजन यांचा धुळ्यातील एका कार्यक्रमात आपणच नाशिक जिल्हाचा पालकमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे. एका दहीहंडीच्या कार्यक्रमाला धुळ्यात हजेरी लावली असताना महाजन यांनी हा दावा केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकचा पालकमंत्री आपण होणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून, शिवसेनेला पुन्हा उत्तर महाराष्ट्रात डावला जाईल अशी चर्चा रंगली आहे. पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या महायुतीतील वाद खरंच मिटला आहे का? असा प्रश्न आता मंत्री गिरीश महाजन यांच्या या दाव्यामुळे उपस्थित होत आहे. byte - गिरीश महाजन, मंत्री प्रशांत परदेशी, धुळे.
9
comment0
Report
UPUmesh Parab
Aug 17, 2025 05:16:19
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग --- तळकोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात रिमझिम तर काही भागात मुसळधार पाऊस पाऊस सतत कोसळत नसला तरी अधून मधून पावसाची मोठी सर ऑरेंज अलर्ट च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेच आवाहन...
7
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 17, 2025 05:02:01
Parbhani, Maharashtra:
अँकर- मागील सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील ओढे नदी नाले तुडुंब वाहत असून पैनगंगा आणि कयाधू नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे पीक पाण्याखाली गेले असून पिकांची मोठी नासाडी होणार आहे. नदी ओढ्या काठच्या शेतांमध्ये पाणी शिरून तेथील पीक आणि शेतीचा जिवंतस्तर ही वाहून गेलाय, त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे... बाईट- राहुल कव्हर- शेतकरी
12
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 17, 2025 05:01:52
Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 11 कृषी सेवा केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे कृषी केंद्र चालक वर्गात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधान व्यक्त केला जात आहे. शिरपूर तालुक्यातील 11 कृषी सेवा केंद्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अखेर कृषी विभागाने कडक कारवाई केली आहे. तालुक्यातील दहा कृषी सेवा केंद्रांचा खत विक्री परवाना 1 महिन्यासाठी निलंबित करण्यात आला असून त्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचा भंग करून संबंधित कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारी विभागाकडे सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांवर तपासणी केली असता नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले. बाईट - संजय पवार तालुका कृषी अधिकारी शिरपूर प्रशांत परदेशी, धुळे.
14
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 17, 2025 05:01:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn kedarnath death av photo attached छत्रपती संभाजीनगरच्या भाविकाचा केदारनाथ येथे दरड कोसळून मृत्यू.. Anc... केदारनाथ यात्रेसाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर येथील 38 वर्षीय भाविकाचा दरड कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परमेश्वर भीमराव खवल असे मृत भाविकाचे नाव आहे. ते एकटेच रेल्वेने यात्रेसाठी गेले होते. यावेळी ते गौरीकुंडाहून एक किलो मीटरचा पायी प्रवास करत असतांना अचानक दरड कोसळली. आणि त्याखाली खवल हे दबले. बचाव पथकाने तत्काळ शोध घेऊन त्यांना बाहेर काढून स्थानिक रुग्णालयात दाखल केले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
10
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 17, 2025 05:01:38
Ambernath, Maharashtra:
डिस्चार्ज झालेला रुग्ण दगावल्याने हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांकडून तोडफोड  उल्हासनगरच्या क्रिटिकेअर हॉस्पिटल येथील घटना हॉस्पिटल विरोधात हलगर्जीपणाचा आरोप संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद Ulh hospital Anchor  उल्हासनगर मधील क्रिटिकेअर रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून तोडफोड करण्यात आलीय ,डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा ठपका ठेवत संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात धिंगाणा घालत तोडफोड केलीय ,ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय,सद्या  घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास पोलीस करत आहे,दरम्यान ५२ वर्षीय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते,आज डिस्चार्ज मिळाल्याने घरी नेल्या नंतर काही तासातच रुग्ण दगावला, नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन धिंगाणा घातला,यावेळी नातेवाईकांनी थेट खुर्ची घेऊन तोडफोड करत नुकसान केलंय चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
13
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Aug 17, 2025 05:01:17
Dhule, Maharashtra:
ANCHOR - नागपंचमी निमीत्ताने नागासमोर केक ठेऊन वाढ दिवस साजरा करत इन्स्टाग्रामवर रिल्स व्हायरल करणाऱ्या सर्पमित्राला वनविभागाच्या पथकाने आता जेरबंद केले आहे. शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील राज वाघ या सर्पमित्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभाग पथकाला माहिती मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे बोराडी प्रादेशिक वनविभागाच्या पथकाने राज वाघ याला ताब्यात घेतले. राज वाघ याने बोराडी येथील एका घरातून नाग रेस्क्यू केला होता.आणि नागपंचमीला त्या नागाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नागासमोर केक ठेऊन नागाला केक खाऊ घालत असल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करत रिल्स व्हायरल केली होता. रिल्स व्हायरल झाल्यानंतर शिरपूर सहायक वन संरक्षक आणि बोराडी प्रादेशिक वनक्षेत्रपाल यांनी रेंज स्टाफ सांगवी व बोराडी यांच्यासह सर्पमित्र राज वाघ या तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करुन जेलबंद करण्यात आले आहे. Byte वनधिकारी,बोराडी शिरपूर प्रशांत परदेशी, धुळे.
11
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 17, 2025 04:48:14
Akola, Maharashtra:
Anchor : वाल्मिकी समाजाचा पवित्र सण गोगा नवमी हा पारंपारिक भारतीय सण मोठ्या उत्साहात अकोल्यात साजरा करण्यात आलाय..दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो... हा सण प्रामुख्याने राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये साजरा केला जातो..या दिवशी लोक आपले घर स्वच्छ करतात आणि नंतर गोगाजीची पूजा करतात..वाल्मिकी समाजाच्या मान्यतेनुसार, गोगा देवाची पूजा श्रावण महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होते, जी 9 दिवस चालते...नवमी तिथीला गोगा देवाची पूजा केली जाते म्हणून याला गोगा नवमी म्हणतात...अकोला शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात गोगा नवमी साजरा केली जात आहेय..भक्त विविध प्रकारच्या रचना करून पालख्या तयार करून याची शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढतात...
12
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 17, 2025 04:48:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn accident help av Feed attached संभाजीनगर - अहिल्यानगर महामार्गावर ईसारवाडी फाट्यावर भीषण अपघात रात्री झाला त्यात 2 तरुण वाहनाखाली दबले होते त्यांना वाचवण्यासाठी प्रवासात असणाऱ्या अंबादास दानवे यांनी मदत केली... पुणे दौऱ्यासाठी जात असलेल्या अंबादास दानवे यांना अहिल्यानगर - संभाजीनगर महामार्गावर भाजीपाला घेऊन जात असलेला टेम्पो माल वाहतुकीच्या ट्रकला धडकेला दिसला. दानवे यांनी तातडीने आपला ताफा थांबवत या दोन शेतकरी मुलांना गाडीच्या बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. तातडीने सूचना करत रुग्णवाहिका व बाहेर काढण्यासाठी पोकलेन बोलवून घेतले.  तात्काळ मदत मिळाल्याने भीषण अपघातात आपल्या गाडीत दबलेल्या या दोन तरुण शेतकरी मुले एका तासाच्या अथक परिश्रमाच्या नंतर बाहेर काढण्यात यश आले.
14
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top