Back
बच्चू कडूने बँक व्यवस्थापकाला सुनावले, शेतकऱ्यांची तक्रार ऐकली!
SRSHRIKANT RAUT
FollowJul 08, 2025 18:01:44
Yavatmal, Maharashtra
Anchor : बच्चू कडू यांनी सातबारा कोरा पदयात्रेदरम्यान यवतमाळ च्या लोही येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मैनेजरला चांगलेच सुनावले. लोही गावात बच्चू कडू यांच्या पद यात्रेचे आगमन होतात. तेथील शेतकऱ्यांनी कडू यांचे स्वागत केले. यावेळी शेतकऱ्यांनी गावातील स्टेट बँकेतून पिळवणूक होत असल्याची तक्रार केली. कोणत्याही कामासाठी CSC सेंटरला पाठवणे, खाते होल्डवर टाकणे, शासनाच्या अनुदानाचे पैसे कापणे ईत्यादी तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. त्यामुळे बच्चु कडु यांनी बँकेच्या व्यवस्थापकाला बोलावून सर्वांसमक्ष झापले.
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 09, 2025 01:02:41Ambernath, Maharashtra:
चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्याची लाखोंची रोकड लंपास
सीसीटीव्हीच्या आधारे लावला आरोपीचा शोध
Ulh threat
Anchor उल्हासनगरात एका व्यापाऱ्याला दुचाकीवरून लिप्ट मागण्याच्या बहाण्याने चाकूचा धाक दाखवून सुमारे चार लाखाची रोकड लुटल्याची घटना घडलीय, या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीचे आधारे सराईत गुन्हेगार सुरज परगणे याला बेड्या ठोकल्या आहेत, तसेच या गुन्ह्यात वापरलेला चाकु, दुचाकी तसेच गुन्हा करताना परिधान केलेली हुडी आणि गुन्हयातील चोरी केलेल्या रक्कमेपैकी 21 हजार 500 रुपये रोख रक्कम आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. त्याचा साथीदार अवि घोरपडे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
चंद्रशेखर भुयार उल्हासनगर
12
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 09, 2025 01:02:28Ambernath, Maharashtra:
बदलापूर नगरपालिकेच्या सर्व शाळांना ISO मानांकन
पालिकेच्या शाळांमध्ये दिलं जातं डिजिटल शिक्षण
सर्वच्या सर्व शाळांमधले प्रवेश फुल
Anchor- बदलापूर नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व 20 शाळांना ISO मानांकन मिळालय. या सर्व शाळांमध्ये डिजिटल शिक्षण दिलं जातय. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या वर्षी सर्व शाळांमध्ये प्रवेश फुल झाले आहेत. गांधी चौकातील शाळा क्रमांक 1 ची केंद्राच्या पीएमश्री मध्ये म्हणजेच प्रधानमंत्री स्कूल्स फॉर राइजिंग इंडियासाठी निवड झालीये. या शाळेला जिल्हास्तरावरील 11 लाखांचा पहिला पुरस्कारही प्राप्त झालाय.
मराठी माध्यमांच्या शाळांकडे विशेष करून सरकारी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलापूर नगरपालिकेनं पूर्णपणे बदलून टाकलाय. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा वाढता प्रभाव आणि काळाची गरज लक्षात घेऊन बदलापूर नगरपालिकेनं आपल्या सर्व शाळांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. या शाळांमध्ये मुलांना डिजिटल स्वरूपात शिक्षण दिलं जातं. अद्ययावत सोयीसुविधा आणि ISO मानांकनासाठी लागणारे सर्व निकष या शाळांनी पूर्ण केले आहेत.
Byte - सुरेखा राऊत, मुख्याध्यापिका, शाळा क्रमांक 1, बदलापूर नगरपालिका
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
13
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 09, 2025 01:02:05Ambernath, Maharashtra:
बदलापूर रेल्वे स्थानकावर बसविण्यात येणारे सरकते जिने जुने
ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न
Bdl escalator
Anchor बदलापूर रेल्वे स्थानकावर सध्या विकासकामे जोऱ्यात सुरू आहेत. यात लिफ्ट, सरकते जिने आणि इतर सुविधा उभारल्या जात आहेत, मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरील मुंबई दिशेकडे बसवण्यात येणारे सरकते जिने ( escalator) हे जुने आणि वापरलेले असल्याच सामोर आले आहे. हे सरकते जिने बसवण्याचं काम सध्या सुरू असून सदर जिने हे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर निळ्या प्लस्टिक मध्ये झाकून ठेवण्यात आले आहेत , मात्र हे सरकते जिने अनेक ठिकाणी गंजले असून त्यावर धूळ बसली आहे ते आधीही कुठेतरी वापरण्यात आले असून कुठून तरी काढून आणून येथे लावण्यासाठी आणले असल्याच दिसत आहे , त्यामुळे अशा प्रकारचे जुने सरकतेने बदलापूर रेल्वे स्थानकावर बसवू नये अशी प्रवाशांची मागणी आहे. धक्कादायक म्हणजे नवीन जिने बसवण्याचा ठेका असताना अश्या प्रकारे जुने सरकते जिने लावून ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न नाही ना असा सवाल विचारला जातोय .
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
13
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 09, 2025 01:01:45Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
अपडेट - स्क्रिप्ट
ब्रेकिंग
Sng_succied_issue
स्लग - धक्कादायक,दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, घटनेनंतर पीडित मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..
अँकर - सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणी मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली असून घटनेनंतर संशयितांकडुन होणाऱ्या छळाला कंटाळून पीडित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार देखील घडला आहे.या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी नराधमांवर कारवाईच्या मागणीसाठी थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवल,तर या घटने प्रकरणी संतप्त ग्रामस्थांकडून एका संशयित आरोपीला बेदम मारहाण देखील करण्यात आला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच या घटनेचा निषेध म्हणून करगणी गाव बंद ठेवण्यात आलं होतं.दरम्यान या घटने प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रमुख संशयीत आरोपी राजू गेंड याला अटक करण्यात आले आहे,पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ काढत,चौघांकडुन मुलीचा मानसिक आणि लैंगिक छळ करण्यात येत होता, त्यामुळेच मुलीने आत्महत्या केले असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.दरम्यान आटपाडी पोलीस अधिक तपास करत आहे.
बाईट - सोमनाथ सरगर - मृत मुलीचे काका,करगणी.
बाईट - महेश सरगर - ग्रामस्थ - करगणी,आटपाडी.
बाईट - राजीव केंद्रे - पोलीस उपनिरीक्षक - आटपाडी.
14
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 09, 2025 01:01:31Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील कर्मचारी धडकणार विधान भवनावर,14 जुलै रोजी काढणार धडक छत्री मोर्चा..
अँकर - राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी येत्या 14 जुलै रोजी मुंबईत विधानभवनावर धडक छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे.युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या
36 जिल्ह्यातील प्रमुखांच्या उपस्थित सांगलीत पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकारकडून 6 आणि 5 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता,मात्र सदर कालावधी आता संपल्याने राज्यातल्या एक लाख 34 हजार कर्मचाऱ्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी सरकारसोबत आरपारचा संघर्ष करण्याचा निर्णय प्रशिक्षण योजनेचे राज्य नेते बालाजी पाटील-चाकूरकर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे.युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचारयांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातल्या कर्मचाऱ्यांना घेऊन 14 जुलै रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनावर धडक छत्री मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
बाईट - तुकारामबाबा महाराज - पश्चिम महाराष्ट्र प्रमुख -युवा प्रशिक्षण योजना.
बाईट - बालाजी पाटील-चाकूरकर - नेते-युवा कार्य प्रशिक्षण योजना.
13
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 09, 2025 01:01:03Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - नशेसाठी वापर होणाऱ्या गोळ्यांचा साठा जप्त, 1 लाख 72 हजारांचा मुद्देमालसह तिघांना अटक..
अँकर - सांगलीच्या मिरजेमध्ये महात्मा गांधी चौकी पोलिसांनी छापा टाकत,नशेसाठी वापर होणाऱ्या गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत,तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणारया न्यूट्रोसन टेन ( nitrosun 10 ) नावाच्या 928 गोळयासह 1 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिरज शहरातल्या कुपवाड एमआयडीसी रोडवर गोळ्या विक्रीसाठी आलेल्या संशयितांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्याकडे नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या आढळून आल्या,बाजारात उपलब्ध असणाऱ्या किमती पेक्षा अधिक दराने या गोळ्यांची विक्री नशा करण्यासाठी होत,असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.
बाईट - संदीप शिंदे - पोलीस निरीक्षक , महात्मा गांधी चौकी,मिरज.
13
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 09, 2025 01:00:53Deola, Maharashtra:
झी 24 तास च्या बातमीचा इम्पॅक्ट.....
झी 24 तास वर बातमी झळकताच वासोळ येथील जिल्हा परिषद शाळेचा परिसर झाला स्वच्छ.....
अँकर :- देवळा तालुक्यातील वासोळ या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य मुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याची बातमी झी 24 दिनांक 5 जुलै रोजी दाखवण्यात आली होती या बातमीची दखल प्रशासनाने तात्काळ घेत शाळेच्या आवारात साफसफाई करून रस्त्यावरील चिखल देखील हटवला आहे यामुळे येथील नागरिकांनी झी 24 तास चे आभार मानते आहे.
*सोबत दिनांक 5 जुलै च्या बातमीची क्लिप देखील दिलेली आहे *
बाईट :- प्रशांत गिरासे , स्थानिक ग्रामस्थ वासोळ, देवळा
14
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 09, 2025 01:00:28Yeola, Maharashtra:
अँकर :- नाशिकच्या येवला,निफाड,सिन्नर,चांदवड या तालुक्यांमध्ये पावसाची संतधार सुरू असून यामुळे शेतात पाणी साचल्याने शेतीची कामे खोळंबली आहे.
सततच्या पावसामुळे कोळपणी,खुरपणी पिकांना खत देणे, औषध फवारणी या सारखी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या असून पाऊस थांबल्यास या कामांना वेग येणार आहे.
11
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 08, 2025 17:33:06Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 0807ZT_GAD_BUS_FLOOD_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी रस्त्यावर एक एसटी आणि एक लक्झरी बस पुराच्या पाण्यात अडकली , गाढवी नदीचे पाणी वाढल्याने ठाणेगाव या गावाच्या आधी दोन्ही बसमधील सुमारे 80 प्रवासी अडकले, प्रशासनाने माहिती मिळताच तातडीने प्रवाशांपर्यंत पोहोचत दिल्ली मदत, सर्व प्रवासी सुरक्षित
अँकर:-- एकीकडे गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातील पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत होत आहे. यामुळे खालच्या भागात गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या सर्वच नद्यांना पूर आलाय. पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. नागपूरहून गडचिरोलीकडे येणाऱ्या एक एसटी आणि एक लक्झरी अशा 2 बस पाणी पातळी वाढल्याची माहिती नसल्याने ठाणेगाव येथे पुराच्या पाण्यात अडकल्या आहेत. गाढवी नदीचे पाणी वाढल्याने या दोन्ही बसेस ठाणेगाव परिसरात अडकल्या आहेत. हा गडचिरोलीला येणारा मुख्य महामार्ग आहे. दरम्यान याची माहिती मिळाल्यानंतर आरमोरी येथून पोलीस निरीक्षक स्वतः हायवा वाहनात बसून प्रवाशांपर्यंत पोहोचले आहेत. ठाणेगाव येथे नागरिकांच्या निवास भोजनाची व्यवस्था प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे. सर्वच प्रवासी सुरक्षित असून पाण्याचा प्रवाह वाहता नसला तरी रात्रीची वेळ असल्याने प्रशासनाने सर्वच खबरदारी घेत प्रवाशांना मदत पोहोचविली आहे.
बाईट १) उषा चौधरी, तहसीलदात, आरमोरी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
14
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 08, 2025 17:32:54Kalyan, Maharashtra:
माणुसकीला काळीमा फासणारी डोंबिवलीतील घटना...
डोंबिवलीत आजारी बापाला ट्रस्टकडे सोपवून बेपत्ता झालेल्या मुलाचा मानपाडा पोलिस शोध घेत आहेत..
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये वयोवृद्धवर उपचार सुरु..
Anchor – माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. आजारी आणि वयोवृद्ध बापाला ट्रस्टकडे सोडून स्वतः बेपत्ता झालेल्या मुलाचा सध्या मानपाडा पोलीस शोध घेत आहेत. ही घटना डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे .
vo..प्रेमराज कुमार (वय अंदाजे ७० वर्षे) असे या वृद्धाचे नाव असून त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना एका सामाजिक ट्रस्टमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, या वृद्धाची स्थिती अत्यंत दयनीय होती – त्यांना ना अन्न दिले जात होते, ना पाणी. त्यांची कोणतीही जबाबदारी न घेता त्यांचा मुलगा त्यांना तेथे सोडून गेला होता.जेव्हा ट्रस्टच्या कर्मचार्यांनी चार दिवस वृद्धाच्या सिंग यांच्या प्रकृतीकडे लक्ष दिले मात्र मुनगा चार दिवस आलाच नाही तेव्हा त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. मानपाडा पोलिसांनी त्वरित पुढाकार घेत प्रेमराज कुमार यांना केडीएमसीच्या शात्रीनगर रुग्णालयात दाखल केले सिंग मात्र यांची प्राकृतिक खालवल्याने सिंग यांना सायन रुग्णालयात दाखल केले गेले तर पुन्हा शात्रीनगर रुग्णालय दाखल केले असून त्यांच्या वर सध्या उपचार सुरू आहेत.या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून जन्मदात्या बापाला पोटचा मुलगा सोडून गेल्याने सर्वत्र हळद व्यक्त केली जात आहे मानपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संबंधित मुलाचा शोध सुरू आहे. मुलावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
byte.. सुहास हेमाडे
सहायक पोलीस आयुक्त डोंबिवली
byte..डॉ योगेश चौधरी
के डी एम सी रुग्णालय
14
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 08, 2025 17:00:53Kalyan, Maharashtra:
कल्याण खडकपाडा पोलिसांची दमदार कामगिरी
कल्याण जलदगती न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
विनयभंगप्रकरणी आरोपीला ३५ दिवसांत शिक्षा
१ वर्ष सक्त कारावास व पाच हजार रुपये दंड..
२५०० रुपये देण्याचे फिर्यादी देणे तर सरकार २५०० रु सरकार जमा
Anchor – कल्याणमध्ये एका विनयभंगप्रकरणी आरोपीला अवघ्या ३५ दिवसांत दोषी ठरवत १ वर्ष सक्त कारावासाची आणि ५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राज्यात इतक्या जलद वेळेत शिक्षा सुनावण्यात आलेला हा पहिला खटला असल्याचा दावा पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केला आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्यात ३ जून रोजी एका महिलेने २९ वर्षीय ओंकार निकाळजे याच्याविरोधात विनयभंग आणि छेडछाडीची तक्रार दाखल केली होती. पोलीसांनी तत्काळ कारवाई करत त्याला त्याच दिवशी अटक केली. जलद तपास पूर्ण करून काही तासांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.या गुन्ह्यातील साक्षी पुरावे तपासून न्यायालयाने आरोपी ओंकार निकाळजे याला बी.एन.एस कलम ७४ अंतर्गत १ वर्ष सक्त कारावासाची शिक्षा तसेच बी.एन.एस कलम ३२९ (३) अंतर्गत १ महिना साध्या करावासाची शिक्षा व ५००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान दंडाच्या रकमेपैकी २५०० रुपये फिर्यादिला तर २५०० रुपये सरकार जमा करण्याचे निर्देश दिले. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता प्रकाश शालिग्राम सपकाळे यांनी कामकाज पाहिले.
Byte :- अतुल झेंडे ( डीसीपी )
14
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 08, 2025 15:31:56Washim, Maharashtra:
वाशिम:
File2:0807ZT_WSM_MNS_TOLL_RADA
WSM_MNS_District_President
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: अकोला -नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव टोल प्लाझावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत टोल प्लाझाची तोडफोड केली. टोल प्लाझावर मूलभूत सुविधा उपलब्ध नसतानाही टोल वसूल केला जात असल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी टोल प्रशासनाकडून प्रवाशांना कोणत्याही सुविधा न देता नियमित टोल आकारण्यात येत असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर कनेरगावपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असून त्याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.सध्या या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.मनसे जिल्हाध्यक्ष कडून सदर घटनेचे समर्थन करीत असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष राजू किडसे यांनी सांगितले.
बाईट:राजू किडसे, मनसे जिल्हाध्यक्ष
15
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 08, 2025 14:30:15Yavatmal, Maharashtra:
Anchor : माजी मंत्री बच्चू कडू यांची 7/12 कोरा कोरा ही पदयात्रा आज यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली असून, मेंढपाळ बांधवांसोबत ते मेंढपाळांच्या वेशभूषेत काठी घोंगडं घेऊन निघाले. लोही येथे त्यांची जाहीर सभा झाली त्यानंतर तरणोळी मार्गे माणकी येथे पोहोचले.
भर पावसात मेंढरं घेऊन ही पदयात्रा निघाली.
यावेळी बच्चू कडू यांनी मेंढपाळांशी संवाद साधला. शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांचे प्रश्न तडीस लावायचे असून सरकारने त्यादृष्टीने धोरण ठरवावे याबाबत त्यांनी धनगर बांधवांना
आवाहन केले.
14
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 08, 2025 14:02:47Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- धस अपघात
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगर- पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नितीन शेळके असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्या चारचाकी वाहनाने या दुचाकीस्वाराला धडक दिली. काल रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान हा अपघात घडला असून या प्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात करण्यात आलाय. दुचाकीस्वार हा जातेगाव फाट्याकडून रास्ता ओलांडत असतांना सागर धस याच्या वाहनाने जोराची धडक यात या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बाईट:- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक अहिल्यानगर
14
Share
Report