Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची घोषणा, वसंतराव नाईकांचा मोठा फरक!

SRSHRIKANT RAUT
Jul 29, 2025 16:31:12
Yavatmal, Maharashtra
Anchorगहुली येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृती स्थळावर त्यांनी शेतकऱ्यांची चिंतन सभा घेतली. यावेळी पुढील आंदोलनाची घोषणा त्यांनी केली. फिरता गणपतीचे विसर्जन कुठे करायचे हे नंतर घोषित करू असेही त्यांनी सांगितले. 28 जणांच्या हत्या झाल्यानंतर सिंदूर यात्रा काढली गेली पण सहा लाख शेतकरी महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसल्या गेले, त्याचे काही वाटत नाही. एकीकडे शेतकऱ्यांसाठी फाशी घेऊ असे म्हणणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आहेत तर दुसरीकडे फासावर जाणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता नसणारे मुख्यमंत्री असा मोठा फरक सध्या दिसत आहे. वसंतरावांनी आणलेली हरितक्रांती ते शेतकरी आत्महत्या हा प्रवास थांबला पाहिजे यासाठी सरकार चिंतन मंथन करेल अशी अपेक्षा बच्चू कडुनी व्यक्त केली. बाईट : बच्चू कडू VO 2 : आंध्र प्रदेशात रमीवर बंदी येऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. सचिन तेंडुलकर व हीरो हीरोइन रमी च्या जाहिराती करतात, रमी सारख्या खेळातून 9000 कोटी रुपये टॅक्स मिळाला असे सांगणाऱ्या सरकारला लाज वाटली पाहिजे, कारण एक लाख कोटी रुपये रमीच्या खिशात गेले, शेतकऱ्यांचे पैसे शेतीतूनही लुटायचे आणि खेळातूनही लुटायचे हा धंदा बंद करा, लाखो तरुणांना उध्वस्त करून हा कर्जमाफी करत असेल तर हे निषेधार्ह आहे. बाईट : बच्चू कडू
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Jul 30, 2025 05:01:25
Kalyan, Maharashtra:
कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढली. Anc..कल्याणचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुजरात,मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश येथून भाज्यांची आवक वाढल्याने दर कमी झालेले आहेत मात्र पावसामुळे ग्राहक कमी असल्याने बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडे माल पडून आहे. vo...महाराष्ट्र मध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेती होत नाही त्यामुळे काही दिवसापूर्वी भाज्यांचे भाव गगनाला भिडले होते मात्र गेल्या आठवड्यापासून कल्याणच्या ए पी एम सी मार्केटमध्ये मध्य प्रदेश गुजरात,उत्तर प्रदेश,येथून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाज्याचे दर कमी झाले असले तरी ग्राहक कमी आहे त्यामुळे भाजी विक्रेत्यांचे माल पडून आहेत त्यामुळे व्यापारी चितेत आहे.
2
Report
TTTUSHAR TAPASE
Jul 30, 2025 04:33:41
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_MOPED_FIRE कराड-कराड शहरातील एका सिग्नलवर चालक चालवत असलेल्या इलेक्ट्रिक बाइकने अचानक पेट घेतला. कराड शहरातील कृष्णा नाका येथे असलेल्या सिग्नलवर ही घटना घडली असून बाईक पेटल्यानंतर लोकांची मोठी तारांबळ उडाली. सुदैवाने चालकाने सावधानता बाळगत बाईक उभी करून पळ काढल्याने जीवित हानी टळली आहे. मात्र बाईक आगीत जळून पूर्ण खाक झाली. कराड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने बाईकला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत ही मोपेड जळून खाक झाली होती.
5
Report
MKManoj Kulkarni
Jul 30, 2025 04:32:31
Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबई महापालिकेत कचरा वाहतुकीत मोठा गैर प्रकार होत असल्याचा आरोप मनसे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे.सहा हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे.यावर मुंबई पालक आयुक्त भूषण गगराणि यांची २४ जुलै रोजी पत्र देऊन भेटीची वेळ मागितली होती परंतु अजूनही भूषण गगराणी यांनी भेटीची वेळ दिली नाही संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा स्मरण पत्र देऊन भेटीची वेळ मागितली आहे मुंबई महापालिकेच्या वतीने कचरा वाहतुकीसाठी जे टेंडर काढण्यात येणार आहे त्यात मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता जर पालिका आयुक्तांनी भेट दिली नाही तर त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता तर मंगळवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली आणि त्यानंतर राज ठाकरे यांची भेट सुद्धा त्यांच्या निवासस्थानी घेतली होती.  मनोज कुळकर्णी 
9
Report
SKSACHIN KASABE
Jul 30, 2025 04:18:55
Pandharpur, Maharashtra:
30072025 slug - PPR_BYTE_ON_AVHAD file 01 ---- Anchor - जितेंद्र आव्हाड के मंदिर की काकड आरती बंद करणे के बयान का विठ्ठल भक्त ने विरोध किया है ये वोट की राजनीति के लिए चला रहा है ऐसी बात श्रद्धालूने की है --- byte 1 अजय म्हात्रे byte 2 रजनीश दुबे
13
Report
MMMahendrakumar Mudholkar
Jul 30, 2025 04:16:06
Beed, Maharashtra:
बीड: शिरूर कासार तालुक्यात जंगली डुकरांचा हैदोस, पिकांचे मोठे नुकसान... Anc- बीडच्या शिरूर कासार तालुक्यात जंगली डुकरांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता आणखीन एक नवे संकट उभे टाकले आहे. हिवरसिंगा येथील शेतकरी रामेश्वर शिंदे यांच्या शेतातील एक एकरवरील ऊस डुकरांनी अक्षरशः फस्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाने डुकराचे बंदोबस्त करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
10
Report
VKVISHAL KAROLE
Jul 30, 2025 04:15:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn accident av photo attached छत्रपती संभाजीनगरमध्ये कंटेनरमधील लोखंडी खांब अंगावर पडल्याने वृद्धाचा मृत्यू Anc.. जालन्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खुल्या कंटेनरचे टायर अचानक फुटले. त्यामुळे नियंत्रण सुटलेल्या कंटेनरमधील लोखंडी खांब खाली पडले, खांब अंगावर पडून एक वृद्धाचा मृत्यू झाला, हा अपघात छत्रपती संभाजीनगर मधील कचनेर बिडकीन मार्गावर घडला. गणपत दादा बेटुदे असे मृताचे नाव आहे. दादाराव बेटुदे घरासमोरील ओट्यावर बसले होते. त्या वेळी जालन्याहून पुण्याच्या दिशेने लोखंडी खांब घेऊन जाणारा खुला कंटेनर कचनेर परिसरात आला. समोरील टायर फुटल्याने चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले.त्यामुळे कंटेनरमधील लोखंडी खांब रस्त्यावर व बेटुदे यांच्या अंगावर पडले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. आणि नंतर मृत्यू झाला...
10
Report
SMSATISH MOHITE
Jul 30, 2025 04:01:32
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Gutkha Feed on - 2C -------------------------- Anchor - गुटखा बंदीसाठी एका सामाजिक कार्यकर्त्याने अनोखे आंदोलन सुरु केले आहे. गुटख्याच्या पुड्यांचे कपडे घालून या सामाजिक कार्यकर्त्याने पायी यात्रा काढली. नांदेड जिल्हयातील देगलूर शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होते असा आकाश कोकने यांचा आरोप आहे. तेलंगना आणि कर्नाटक मार्गे देगलूर शहरातून नांदेड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी होते. गुटखा बंदीसाठी अनेकवेळा तक्रारी करुन कारवाई होत नसल्याने आकाश कोकणे यांनी गुटख्यांच्या पुड्याचा ड्रेस घालून निपाणी सावरगाव येथून पायी यात्रा काढली. गुटखा बंदीच्या मागणीसाठी त्यांनी देगलूर शहरात उपजिल्हाधिकारी कार्यालय समोर त्यांनी आमरण उपोषण सरू केले आहे. ---------------
13
Report
TTTUSHAR TAPASE
Jul 30, 2025 04:01:24
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 5 FILES SLUG NAME -SAT_SURYA_DOG सातारा - सातारा पोलीस दलाची शान आणि गोल्ड मेडेलिस्ट श्वान सूर्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सूर्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण पोलीस दलात आणि सातारकरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सूर्याचे पार्थिव पोलीस मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. यावेळी सातारा पोलीस दलासह अनेक सातारकरांनी साश्रू नयनांनी सूर्याला अखेरचा निरोप दिला. पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून सूर्याला श्रद्धांजली वाहिली. पोलीस दलाकडून सूर्याला मानवंदनाही देण्यात आली. झारखंडमधील रांची येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात श्वान सूर्याने एक्सप्लोसिव्ह युनिटमध्ये सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्र पोलीस आणि सातारा पोलीस दलाचे नाव उंचावले होते. देशभरातील ४४ संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत सातारा जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच सूर्याने सुवर्णपदक पटकावले होते. सूर्याच्या निधनाने सातारा जिल्हा पोलीस दलात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
14
Report
MMMahendrakumar Mudholkar
Jul 30, 2025 04:00:55
Beed, Maharashtra:
बीड: बीड आणि माजलगाव शहराची तहान भागवणाऱ्या माजलगाव धरणात 16% टक्के पाणीसाठा, वर्षभराचा पिण्याचा प्रश्न तूर्तास मिटला; दमदार पावसाची अपेक्षा कायम..! Anc : बीड जिल्ह्यात यावर्षी जून आणि जुलै महिन्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील छोटी मोठी धरणे अद्यापही पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. बीड आणि माजलगाव शहराची तहान भागवणारे जिल्ह्यातील सर्वात मोठे माजलगाव धरण आहे. मात्र ते अद्याप जुलै महिन्यात फक्त 16% टक्के भरले असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मे महिन्यात याच धरणात केवळ 2.48 टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक होता. मात्र दीड महिन्याच्या कालावधीत झालेल्या पावसाने हे धरण 16 टक्के भरले आहे..गतवर्षी हेच धरण जुलै महिन्या मध्ये 80 %टक्के भरले होते. सध्या तरी पाणी साठा पिण्यासाठी उपयुक्त असला तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे. बाईट - गणेश धापुकडे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
10
Report
GMGANESH MOHALE
Jul 30, 2025 04:00:44
Washim, Maharashtra:
वाशिम: File:3007ZT_WSM_GAMBLING_POLICE_RAID रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर : वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पिंपरी फॉरेस्ट परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमच्या पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली.या धाडीत तब्बल ८ लाख ५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त मुद्देमालामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकली, चारचाकी वाहन आणि पत्त्यांचा संच यांचा समावेश आहे.
9
Report
TTTUSHAR TAPASE
Jul 30, 2025 03:50:04
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 3 FILES SLUG NAME -SAT_JAGMIN_ISSUE सातारा:परळी खोऱ्यात असणाऱ्या दुर्गम जगमीन गावातील ओढ्यावर विद्युत पोल वरून शालेय विद्यार्थ्यांनी प्रवास करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या व्हायरल व्हिडिओ बाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.या गावात तारळी नदीचे उगमस्थान असणाऱ्या ओढ्या पलीकडे विद्यार्थ्यांना कोणताही शाळेसाठी जीवघेणा प्रवास करावा लागत नसून सोशल मीडियावर व्हायरल केलेला व्हिडिओ जाणीवपूर्वक बनवला असल्याचे गटशिक्षणाधिकारी सतीश बुध्दे यांनी स्पष्ट केले आहे.... वास्तविक या ओढ्यावरील पुलाबाबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून निधी मंजूर असून ते काम प्रस्तावित आहे.मात्र संबंधित शाळकरी मुलांना ओढ्यापलीकडे कोणतीही शाळा नसताना जीव धोक्यात घालून त्या विजेच्या पोलवरून चालायला लावणे ही गंभीर बाब असल्याचे गटशिक्षणाधिकारी सतीश बुध्दे यांनी स्पष्ट केले आहे. बाईट:सतीश बुद्धे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती सातारा)
6
Report
HCHEMANT CHAPUDE
Jul 30, 2025 03:49:51
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Wagholi Ganja Action File:02 Rep: Hemant Chapude(Wagholi) Anc: पुणे जिल्ह्याच्या वाघोली येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला जेरबंद करण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 ला यश आल्यास पोलिसांनी 1 ला 83 हजार रूपये किंमतीच नऊ किलो गांजा जप्त केलाय.. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया वाघोली पुणे...
14
Report
SNSWATI NAIK
Jul 30, 2025 03:49:42
Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: शिक्षिकेने दहावीच्या विद्यार्थ्यासोबत अश्लील संभाषण करत अर्धनग्न विडिओ पाठविले, कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. FTP slug - nm women teacher shots- police station reporter- swati naik navi mumbai Anchor -: नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरातील एका खासगी शाळेतील शिक्षिकेचा धक्कादायक कारनामा समोर आलाय. आपल्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेने प्रेमसंबंध प्रस्थापित करत विद्यार्थ्यासोबत इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवरून अश्लील संभाषण करत विद्यार्थ्याला स्वतःचे अर्धनग्न विडिओ पाठविल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. सदर विडिओ विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये सेव्ह असल्याने मोबाईल मधील हे सर्व अश्लील विडिओ पालकांच्या निदर्शनास आल्याने शिक्षिकेचा कारनामा उघड झाला. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलीसांनी 35 वर्षीय शिक्षिकेविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत असून या धक्कादायक प्रकारानंतर पालक वर्गातून संताप व्यक्त करण्यात येतोय. gf- =============
14
Report
SNSWATI NAIK
Jul 30, 2025 03:49:33
Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: रबाळेत 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या, प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय. 25 वर्षीय युवक ने की आत्महत्या ftp slug - nm rabale suited shots- cctv, search operation reporter - swati naik navi mumbai Anchor -: नवी मुंबईतील रबाळे तलावात एका 25 वर्षीय तरुणाने उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. अग्निशमन दलाने तरुणाचा मृतदेह बाहेर काढला असून रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राथमिक माहिती नुसार आत्महत्या करणारा मुलगा मागील काही वर्षापासून एका विवाहित महिलेच्या प्रेमात होता. याच प्रेम प्रकरणातून तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. रबाळे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून आत्महत्या करण्यासाठी तलावात उडी मारताना तरुण सिसीटीव्ही मध्ये कैद झालाय. gf- cctv ==========================
11
Report
MMMahendrakumar Mudholkar
Jul 30, 2025 03:45:56
Beed, Maharashtra:
बीड : अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात, जिल्ह्यात पावसाचा तडाखा, गेवराई तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान Anc : बीड जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावत शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केली आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः गेवराई तालुक्यातील सुरळेगाव परिसरातील कपाशीच्या 95 टक्क्यांहून अधिक पीक पाण्यात गेली आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. परिणामी, आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी आता आणखीन आर्थिक संकटात सापडला आहे.आता तरी सरकारने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
12
Report
Advertisement
Back to top