Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

Satara के शिरवळ में 7 घंटे में अपहरणकांड सुलझा: 5 आरोपी गिरफ्तार

TTTUSHAR TAPASE
Sept 24, 2025 04:17:46
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_SHIRVAL_POLICE सातारा - शिरवळ येथे तीन अज्ञात इसमांनी भरत वाघमारे यांचे अपहरण करून स्विफ्ट डिझायर कारमधून पळ काढला असल्याची माहिती शिरवळ पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने तीन तपास पथके तयार करून शोध मोहीम राबवली.डोंगराळ भागात रात्रीपासून सुरू असलेल्या शोधानंतर केवळ सात तासांत अपहृतासह आरोपींना गाठण्यात पोलिसांना यश आले. अपहरण प्रकरणात नंदकुमार शिगटे याच्यासह एकूण पाच आरोपींना अटक करून वापरलेली स्विफ्ट कार आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Sept 24, 2025 07:34:43
Solapur, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण मुद्दे काही गावांना मी आता भेटी दिल्या आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणची पूर्ण एक वसाहत पाण्याखाली बुडाली होती. 22 लोकांना NDRF ने रेस्क्यू केलं होतं NDRF ने चांगल्या प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन राबवले राज्य सरकारच्या वतीने आम्ही तातडीने मदत सुरू केली आहे राज्य सरकारने 2000 कोटी रुपये रिलीज केली आहे शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांना आम्ही मदत करणार आहोत कोणत्याही अधिकचे निकष न लावता निकष स्थितील करून नागरिक केंद्रित मदत करणार आहोत नियमावर बोट ठेवून मदत डावली जाणार नाही दिवाळीची पूर्वी आम्ही सर्वांना मदत करणार आहोत ओला दुष्काळ ही बोली भाषेतील टर्म आहे .. पण त्याहीपेक्षा जास्त आम्ही मदत शेतकऱ्यांना करणार आहोत. आता पहिल्यांदा तातडीची मदत हा पहिल्यांदा महत्त्वाचा विषय आहे.. केंद्र सरकार देखील मदत करणार आहे एन डी आर एफ मध्ये काही ऍडव्हान्स पैसे केंद्राने दिले आहेत. त्यांच्या नॉर्मनुसार जे बसतात त्यांना मदत देऊ.. जे बसत नाहीत त्यांना आम्ही मदत देऊ. कॅचमेंट एरिया सोडून पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवटून गेली त्यांना देखील आम्ही मदत करू..
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 24, 2025 07:34:26
Wardha, Maharashtra:वर्धा SLUG- 2309_WARDHA_DRAGANFRUIT मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या युवकाने  ड्रॅगन फ्रुट ची शेती करत कमवाले लाखो रुपये अँकर : मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून दिले आहे वर्ध्याच्या आर्वी येथील एका होतकरू युवकाने. मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे उच्च शिक्षण घेतल्यानंतर ही छोट्याशा पगाराच्या चौकटीत न राहता स्वतःच शेतीमध्ये नियोजन बद्ध काम करत तो लाखो रुपये कमवत आहे. व्हीवो- तुषार नंदनवार ह्या युवकाने पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळे करून दाखवले आहे.त्याने सततच्या नापिकी ला कंटाळून काहीतरी वेगळे करत आपल्या अर्धा एकर शेतीत ड्रॅगन फ्रुट लावत एक अनोखा प्रयोग केला.आनी तो यशस्वी सुद्धा केला.आज त्याने 5000 नवीन झाडांची लागवड केली असुन येणाऱ्या काळात त्याची कमाई लाखोंच्या घरात असणार आहे बाईट- तुषार नंदनवार,शेतकरी
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 24, 2025 07:31:57
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_DamGate Feed on - 2C --------------------------- Anchor - जायकवाडीसह इतर धारणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पुर आला आहे. नांदेड जिल्हयात सद्या पाऊस नाही तरी परभणी आणि वरच्या भागात अतिवृष्टी झाल्याने गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढली आहे. मोठया प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले. त्यातून 1 लाख 25 हजार क्युसेस इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तब्बल 25 वर्षानंतर 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीला पुर आला असून धोक्याची पातळी ओलांडली जाण्याची शक्यता आहे. त्यामूळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुरामुळे नांदेड शहराची मुख्य स्मशानाभूमी असलेली गोवर्धन घाट शांतिधाम स्मशानाभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. सिडको येथील स्मशानाभूमीत अंत्यसंस्कार करावेत असे आवाहन महापालिकेने केले आहे. --------------------
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 24, 2025 07:30:39
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आपली लायकी त्या संविधानात, संभाजी भिडेंचे उद्विग्न विधान ! अँकर - जगात 187 देश आहेत, आपली लायकी काय,तर आपली लायकी त्या संविधानात,आणि पोटात मुरड आल्या प्रमाणे विद्वान लोक बोलतात संविधान,अरे कसलं संविधान बोलता ? अश्या शब्दात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी संविधाना बाबत उद्विग्नात व्यक्त केली आहे.तसेच 1300 वर्ष मुस्लिम,युरोपियनांच्या पारतंत्र्यात एखादा जीव खितपत पडलेल्या लोकांचा देश असून ज्यांना लाज वाटत नाही, ज्यांना पारतंत्र्याची गुलामीची लाज वाटत नसलेला निर्लज्ज लोकांचा देश आहे.आम्हाला फक्त स्वराज्य , स्वातंत्र्य नको आहे,हिंदवी स्वातंत्र्य हवे आहे,असे विधान देखील संभाजी भिडे यांनी केले आहे, ते सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौड प्रसंगी बोलत होते. साऊंड बाईट - संभाजी भिडे गुरुजी - संस्थापक अध्यक्ष - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 24, 2025 07:05:37
Dhule, Maharashtra:ANCHOR - नंदुरबार शहरात १६ सप्टेंबर रोजी दोन युवकांमधील वादातून झालेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थान नंदुरबार शहर बंदचे हाक देण्यात आले होती. या बंदला सर्वव्यापी प्रतिसाद मिळाला. नंदुरबार शहरातील व्यापारी संस्था कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. सूर्यकांत मराठे आणि जय वळवी यांच्यात झालेल्या वादातून जयेश वळवी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्व आदिवासी संघटना आणि आदिवासी समाज आक्रमक झाल्या आहेत. जय वळवी यांच्या खुनातील आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आज नंदुरबार शहर बंद ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व संघटना व आदिवासी बांधवांनी या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सर्व आदिवासी संघटना आणि बांधवांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला. आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खाजगी आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. बंद आणि मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 24, 2025 06:50:36
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2409ZT_JALNA_TOPE(4 FILES) जालना : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांच्याकडूनही नुकसान पाहणी जुलै ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या यादीतून जालना जिल्हा वगळला-टोपे नेर,विरेगाव मंडळात ढगफुटी होऊनही मंडळ मदतीतून वगळले हेक्टरी 50 हजार मदत द्या मदतीकडे सरकारचे दुर्लक्ष,10 आणि 15 हजार मदत चालणार नाही दुष्काळाचे स्थायी आदेश लागू करा अँकर :राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांच्याकडूनही नुकसान पाहणी करण्यात आली आहे.जालना तालुक्यातील विरेगाव भागात पाहणी केली.यावेळी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.दरम्यान जुलै ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या यादीतून जालना जिल्हा वगळला असल्याचा आरोप टोपे यांनी केला आहे.पंचनामे न करता सरसकट 10 ते 15 हजारांची हेक्टरी मदत न देता हेक्टरी 50 हजारांची मदत शेतकऱ्यांना द्या अशी मागणी टोपे यांनी केली आहे बाईट राजेश टोपे
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 24, 2025 06:06:55
Nagpur, Maharashtra: 2c ला व्हिडिओ जोडले आहे ------ अतिवृष्टीमुळे आलेल्या बुरशी रोगामुळे संत्रा व मोसंबी पिकाचे मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. तसेच सोयाबीनवर येलो मोजक रोगामुळे पीक पूर्णपणे उध्वस्त होत आहे. स्वतः बांधावर जाऊन अनिल देशमुख यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. परंतु संत्रा व मोसंबीच्या फळगळीचे तसेच येलो मोजकमुळे होत असलेल्या सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले नाही. नुकसान होऊनही पंचनामे करण्याचे कोणतेही आदेश नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी अनील देशमुख यांनी केलीय.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 24, 2025 06:05:39
Pune, Maharashtra:रिपोर्टर- लैलेश बारगजे स्लग:- पावसामुळे रस्ते पूल वाहून गेल्याने ग्रामीण भागात ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास फीड2C anc- अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागाला पावसाने चांगलेच झोडपले असून अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत त्यामुळे गावांचा संपर्क तुटला असून गावातील नागरिकांना गावाबाहेर जाण्यासाठी धोकादायक प्रवास करून गावाबाहेर पडावे लागत आहेत शेवगाव तालुक्यातील प्रभू वाडगाव या गावाला मुख्य मार्गावरून जोडणारा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्यामुळे गावातील वयोवृध्द ग्रामस्थांना पाण्यातूनच मार्ग काढून जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे. तर बऱ्याच गावातील शाळकरी मुलांना देखील मुसळधार पावसामुळे रस्तेच वाहून गेल्यामुळे छोट्या ओढ्यातूनही शाळेकडे जाणं अशक्य झाला आहे प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याचे काम व पुलाचे काम करून तात्पुरता वाहतुकीसाठी रस्ता करून द्यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत बाईट:- शाळकरी विद्यार्थी
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 24, 2025 05:50:12
Buldhana, Maharashtra:मोठी बातमी FIR COPY जोडलेली आहे अपार्टमेंटच्या बेकायदेशीर बांधकामाला 'क्लिन चीट' देणाऱ्या सरपंच-सचिवांवर ४२० चे गुन्हे दाखल ! Anchor- भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाचा बुरखा फाडणारी एक खळबळजनक घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे. नियम आणि कायद्याला पायदळी तुडवून एका आलिशान अपार्टमेंटच्या बेकायदेशीर बांधकामाला ओके म्हणणाऱ्या तत्कालीन सरपंच उषा खैवान आणि सचिव माणिक शेळके यांच्यावर आता थेट कायदेशीर कारवाईचे आदेश धडकले आहेत. सन 2010 ते 2015 या कालावधीमध्ये...महाराष्ट्र ग्रामपंचायत बांधकाम नियमांची उघडपणे पायमल्ली करून, ही नियमबाह्य परवानगी देण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. नमूद अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, या प्रकरणातील गैरव्यवहार स्पष्ट झाला आहे. त्यामुळेच पोलिसांनी तत्कालीन सरपंच उषा खैवान आणि ग्रामसेवक माणिक शेळके या दोघांवर थेट कलम 420 आणि 468 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 24, 2025 05:46:22
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... AC ::- लातूर जिल्ह्यातील मागील आठ दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे... हजारो हेक्टरवरील पिकांमध्ये पाणी साचलंय... हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय... आणि त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यांत आता अश्रूंचे डोह साचले आहेत... जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली तेरणा नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे... औसा–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उजनी गावाजवळील नदीवरील उड्डाणपुल आणि परिसरात परसलेला तेरणेचा पूर... ZEE 24 TAAS च्या प्रेक्षकांसाठी लातूरचे लकी गहीरवार यांनी ड्रोन कॅमेराद्वारे टिपलेली ही exclusive दृश्यं आहेत... दरम्यान... आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत... ते दुपारी २ वाजता उजनी येथे पुरग्रस्त भागाची पाहणी करणार असून... त्यानंतर निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथेही ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 24, 2025 05:16:38
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2409ZT_JALNA_BHARNE_BYTES(FEED SEND BY FACEBOOK LIVE LINK) जालना: दत्ता भरणे नुकसान पाहणी बाईट (लाईव्ह लिंक मधून बाईट घेणे) दहा दिवसांत दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत दिली जाईल दत्तात्रेय भरणे यांची मोठी माहिती जालना जिल्ह्यात 2 लाख 54 लाख हेक्टर नुकसान झालंय- भरणे जालन्यात 6 लाख 35 हजार एकर नुकसान राज्यात 80 लाख एकर नुकसान झालं आहे तुमच्या तालुक्यातील गावातील एकही गुंठ्याचा पंचनामा राहणार नाही- दत्तात्रेय भरणे तुमचा रोष असणं साहाजिक आहे पण तुम्ही काळजी करू नका जिल्ह्यातलं नुकसान भरपाई दिली जाईल अतिवृष्टीमुळं नुकसान झालं, शासन शंभर टक्के सोबत आहे अँकर- येणार्या दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत दिली जाईल अशी मोठी दिलासा देणारी माहिती कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिलीये..कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे दुष्काळ पाहणी केलीये.. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.. जालना जिल्ह्यात 6 लाख 35 हजार एकर वर शेतकर्यांचं नुकसान झालंय तर राज्यात 80 लाख एकर वर नुकसान झाल्याचं भरणे यांनी सांगितलंय.. त्याचबरोबर राज्यात सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील.. एकाही गुंठ्याचा पंचनामा राहणार नाही.. सर्वांना शासनाकून मदत दिली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी शेतकर्यांना दिलंय.. बाईट- दत्तात्रेय भरणे, कृषी मंत्री
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 24, 2025 05:16:28
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2409ZT_JALNA_PANKAJA(FEED SEND BY FACEBOOK LIVE LINK) .जालना : पंकजा मुंडे नुकसान पाहणी दौरा बाईट(लाईव्ह लिंक मधून बाईट घेणे) परतूर तालुक्यातील गोळेगाव येथे पंकजा मुंडेंकडून दुष्काळ पाहणी गोळेगाव गावचं पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांची मागणी गोदावरी नदीचं पाणी गावात शिरल्यानं पंकजांकडून पाहणी गावांचं पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करेल- पंकजा लोकांची नुकसान बघू द्यावं फोटो काढून काय मिळणार- पंकजा नुकसान भरपाईसाठी शासन कटिबद्ध आहे पंचनामे करावेच लागतील कारण रेकाॅर्ड तयार होणार नाही शेतकर्यांचा आक्रोष आहे आमच्याही मनात आहे पण लोकांच्या पाठीमागे आम्ही आहोत अँकर- जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परतूर तालुक्यातील गोळेगाव येथे दुष्काळ पाहणी केलीये.. गोदावरी नदीला पूर आल्यानं गोळेगाव गावात पाणी शिरलं होतं.. त्यामुळं गावच्या पुनर्वसनाची मागणी ग्रामस्थांनी केली होती.. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गोळेगाव येथे पाहणी केली असून पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे.. त्याचबरोबर पंचनामे करावे लागतील कारण रेकाॅर्ड तयार होणार नाही.. नुकसान भरपाईसाठी शासन कटिबद्ध असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हंटलंय.. बाईट- पंकजा मुंडे, पालकमंत्री जालना
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 24, 2025 05:06:39
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2409ZT_JALNA_FIRE(11 FILES) जालना :महाराष्ट्र राज्य विद्यूत पारेषण कंपनीच्या दोन ट्रान्सफार्मरला भीषण आग; जूना जालना आणि चंदनझीरा परिसरात पाच ते सहा तास वीज पुरवठा खंडीत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अँकर :जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्यूत पारेषण कंपनीच्या दोन ट्रान्सफार्मर युनिटला आज सकाळी साडेसात वा. दरम्यान भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली असून या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीमुळे जुना जालना तसेच चंदनझीरा भागातील वीज पुरवठा पुढील पाच ते सहा तास खंडीत राहणार आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसातच्या सुमारास अग्निशमन कार्यालयाला फोनद्वारे घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान पाण्याचे बंब घेऊन तात्काळ दल घटनास्थळी दाखल झाले. दोन ट्रान्सफार्मरला लागलेली आग भयानक स्वरूपाची नसली तरी ट्रान्सफार्मरमधील ऑईल पेटल्यामुळे आगीची तीव्रता अधिक होती. उष्णता 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक वाढल्यामुळे ती नियंत्रित करण्यासाठी अधिक वेळ लागला. पानपट्टे यांनी सांगितले की, "आग विझवण्यासाठी पाण्यामध्ये लिक्विडचा वापर करण्यात आला असून, प्रक्रियेला वेळ लागत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, सहा.अधिकारी संदिप दराडे, नागेश घुगे,संतोष काळे, राहुल नरवाडे, किशोर सकट, नदीम यांच्यासह सात ते आठ जवानांची टीम घटनास्थळी काम करत आहे. आमच्या दोन बंबांसह जवळपासच्या कंपन्यांकडून पाण्याचे टँकरही तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले, त्यामुळे आग नियंत्रणात आणणे शक्य झाले." औद्योगिक वसाहतीत ही घटना घडल्याने तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आणि स्थानिक कंपन्यांच्या सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान जूना जालन्याचा भाग आणि चंदनझीरा परिसरात पाच ते सहा तास विद्यूत पुरवठा खंडित असणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. बाईट.माधव पानपाट्टे, अग्निशमन अधिकारी
4
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top