Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

चौथीतल्या आरुषीने शाळेच्या दुरवस्थेवर पत्र लिहून दिली आवाज!

AAABHISHEK ADEPPA
Jul 28, 2025 05:01:12
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - जिल्हा परिषदेच्या शाळेची झाली दुरावस्था, चांगल्या सुविधेसाठी चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची मुख्याध्यापक आणि सरपंचांना पत्राद्वारे मागणी Anc : बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची झालेली अवस्था चौथी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. तालुक्यातील तडवळे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे इयत्ता चौथी शिकणाऱ्या आरुषीने सरपंच आणि ग्रामसेवकांना पत्र लिहून व्यथा मांडल्या आहेत. तळवळे गावच्या जिल्हा परिषद शाळेत 44 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षिका असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. जिल्हा परिषद असणाऱ्या भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे आरुषणी आपल्या पत्राच्या माध्यमातून पोटतिडकीने अनेक समस्यांची जाणीव करून दिली आहे.. इयत्ता चौथी मध्ये शिकणारी चिमुकली आरुषी किरण पवार रोज न चुकता शाळेत येते. मात्र शाळेत आल्यानंतर सुविधांचा वनवा दिसून येतो. जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत दुरवस्था झाली आहे. वाऱ्यामुळे हालणारे पत्रे अशा अनेक समस्यांचा उल्लेख केला आहे. शाळेच्या आवारामध्ये पिण्याचा पाण्याची सोय नसणे.ज्या वयात पत्रलेखन शिकायचे त्या वयात पत्राद्वारेच समस्या मांडायची जबाबदारी ही चिमुकली पार पाडत आहे.... तालुक्यातील प्रत्येक गावातील असणारी प्राथमिक शाळेची इमारतीची निगा राखण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग किंवा ग्रामपंचायतीची आहे. मात्र जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत विभागांनी या न त्या कारणावरून बोट दाखवून आपली जबाबदारी झटकताना दिसून येतात. शाळा बंद पडू नयेत म्हणून ग्रामस्थांनी आपले आद्य कर्तव्य समजून पुढे येणे गरजेचे आहे तरच सर्वसामान्य आणि गोरगरिबांचे शिक्षण सक्षमपणे पूर्ण करता येऊ शकेल. Byte : आरुषी किरण पवार, विद्यार्थिनी Byte : ग्रामस्थ Byte : पालक
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Jul 28, 2025 10:47:44
Kolhapur, Maharashtra:
महिलेनं पतीला सोडचिठ्ठी द्यावी, म्हणून केला अघोरी प्रकार,कोल्हापूर जिल्ह्यातील कुर मधल्या स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा कहर. कोल्हापूर ( प्रताप नाईक ) कोल्हापुरात अंधश्रद्धेमुळे स्मशानभूमीत केल्या जाणाऱ्या अघोरी प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळेच पुरोगामी म्हणून असणारी जिल्ह्याची ओळख आता पुसट होताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील कुर परिसरात स्मशानभूमीमध्ये एक अघोरी प्रकार उघडकीस आलाय. एका महिलेने आपल्या पतीपासून ‘सोडचिठ्ठी’ देऊन वेगळं व्हावं आणि आणखी तिघांचे आयुष्य ‘उद्वस्त’ होण्यासाठी हा अघोरी प्रकार केला गेल्याचा संशय आहे. भुदरगड तालुक्यातील कुर गावात एका नागरिकाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत तयारी सुरू होती. काही मंडळी साफसफाईसाठी स्मशानभूमीत गेले असता त्यांना बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल आणि हाताने लिहिलेला कागद मिळून आला. त्यावेळी तिथं मिळून आलेला कागद उघडून वाचला असता, त्यावर एका महिलेचं नाव नमूद करून "सोडचिठ्ठी द्यावी" असा मजकूर होता. त्याचबरोबर आणखी तिघांची नावं लिहून "त्यांच्या आयुष्याची भट्टी लागवी म्हणजेच वाट लावावी असेही लिहिलं होतं. दरम्यान अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
2
Report
PPPRAFULLA PAWAR
Jul 28, 2025 10:45:17
Raigad, Maharashtra:
स्लग - कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक ..... जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने ....... कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी ..... अँकर - कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालाय. कोकाटे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. विधिमंडळात जुगार खेळणारे कोकाटे यांच्या सारखे कृषी मंत्री शेतकऱ्यांना एक दिवस डावावर लावतील त्यामुळे तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. बाईट - रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Jul 28, 2025 10:32:57
Parbhani, Maharashtra:
अँकर- दुधना नदीला पुर येऊन खराब झालेल्या पिकचे पंचनामे तीन दिवस उलटून ही न झाल्याने परभणी तालुक्यातील धार, मटकराळा, दुर्डी, मुरुंबा व नदीकाठी असलेल्या इतर गावातील सोयाबीन व मुगाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तीन दिवस उलटले तरीही अद्याप जिल्हा प्रशासनावतीने पंचनाम्याची कार्यवाही करण्यात आली नाही. तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी या मागणीचे निवेदन घेऊन मटकराळा, धार, दुरडी व मुरुंबा येथील शेतकऱ्यांसह पुराने बाधित झालेले मूग व सोयाबीनचे सडलेले धान घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले असता जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, सर्व उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार मीटिंगमध्ये असल्याने एकही अधिकारी निवेदन घेण्यासाठी उपलब्ध नव्हते. निवेदन घेण्यासाठी कुठलाच वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्याने नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त झाले व शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्या त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच सोबत आनलेले सडके सोयाबीन व मुगाचे धान फेकून जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बाईट- शिवलिंग बोधने- जिल्हाध्यक्ष,प्रहार,जनशक्ती पक्ष
2
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 28, 2025 10:01:44
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2807ZT_JALNA_WAGHMARE(7 FILES) जालना | सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेंचा मुंबईचा स्टंट ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची जरांगेंवर टीका जरांगेंनी सेटलमेंट करून स्वतःचं घर भरू नये- वाघमारे जरांगेंसोबत पाच टक्केपण समाज राहिला नाहीये जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण देता येत नाही अँकर- सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेंचा मुंबईचा स्टंट असल्याची टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलीये. जरांगे २९ आॅगस्टला मुंबईत मोर्चा नेण्यार आहेत. मात्र जरांगेंनी मागच्या सारखं सेटलमेंट करुन स्वतः चं घर भरू नये. जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण देता येत. त्यांनी आधी संविधानाचा अभ्यास करावा. असैविधानिक मागणी करून जातीवाद पसरवण्याचं काम जरांगेंनी करू नये असं नवनाथ वाघमारे यांनी म्हंटलं आहे. बाईट- नवनाथ वाघमारे, ओबीसी आंदोलक
8
Report
PPPRAFULLA PAWAR
Jul 28, 2025 10:01:38
Raigad, Maharashtra:
स्लग - सुनील तटकरे निवडून यावेत ही मातोश्रीची इच्छा .....सुनील तटकरे यांना नेहमीच मातोश्रीचा आशीर्वाद ...... आमदार महेंद्र थोरवे यांचा मोठा गौप्यस्फोट ....... अँकर - शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे निवडून यावेत आणि अनंत गीते निवडून येऊ नयेत अशीच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची इच्छा होती असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं आहे. तटकरे यांना नेहमीच मातोश्रीचा आशीर्वाद राहिला आहे. तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदार संघात शिवसेनेचा डमी उमेदवार असायचा. शिवसेनेचे तीन आमदार असतानाही आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देण्यात आलं. या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून आम्ही बाजूला झालो असंही थोरवे म्हणाले. बाईट - महेंद्र थोरवे
8
Report
SGSagar Gaikwad
Jul 28, 2025 10:01:21
Nashik, Maharashtra:
Feed send by mozo Reporter-sagar gaikwad Slug-nsk_godavari_wkt दोन दिवस झालेल्या पावसामुळे गोदावरी नदी पांढरे पातळीत वाढ.. पहिला श्रावण सोमवार निमित्त रामकुंडावर भाविकांची गर्दी अँकर गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची रिप रिप सुरू आहे... यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळते आहे... रामकुंड परिसरात गोदावरी नदी पाणी पातळी मध्ये वाढ होतात ना पाहायला मिळत आहे... आज श्रावण मासातला पहिला श्रावण सोमवार असल्याकारणामुळे रामकुंड परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते... ज्या ठिकाणी धार्मिक विधी पार पडतो त्या ठिकाणी देखील पाणी साचल्याच पाहायला मिळते... पावसाचा ओघ असा सुरू राहिला तर गोदावरी नदी पाणी पातळीत वाढवण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचा आवाहन देखील प्रशासन केला आहे... रामकुंड परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
6
Report
AKAMAR KANE
Jul 28, 2025 10:01:15
kolhapur, Maharashtra:
Ngp parinay fukey 121 live u ने फीड पाठवले ( भंडाऱ्यावरूनही फीड आल आहे) ------ भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये नाना पटोले यांच्या पॅनलचा दारुण पराभव झालाय. तर महायुतीची सहकार पॅनलचा विजय झाला असून तेरा उमेदवार निवडून आले आहेत. तर नाना पटोळे यांच्या परिवर्तन शेतकरी पॅनल मधून फक्त तीन उमेदवार निवडून आले. त्यामुळे नाना पटोले यांना स्वतःच्या जिल्ह्यातच पराभवाच्या सामना करावे लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.... दरम्यान या विजयानंतर भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी -------- बाईट .आ परिणय फुके
12
Report
PNPratap Naik1
Jul 28, 2025 09:45:59
Kolhapur, Maharashtra:
Kolhapur Breaking रूपाली चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग रूपाली चाकणकर यांची रोहिणी खडसे यांच्यावर टीका स्वतःवर प्रसंग ओढवला तर वेळ कळते का यांनी आपल्या राजकारणासाठी अनेक पीडीतांचे भांडवल केले आहे, त्यातून त्यांनी राजकीय पोळी भाजून घेतली न्यायप्रविष्ठ प्रकरणात परिणय फुके सह अन्य प्रकरणांचं भांडवल केलं यांना न्यायप्रविष्ठ ही बाब ही कळते की नाही हा प्रश्नच आहे पुणे प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करत आहेत त्यांना तपास करू द्या रोहिणी खडसे कशाची पाठराखण करत आहेत हे अख्खा महाराष्ट्र बघत आहे हनी ट्रॅप बाबत महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार आलेली नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकरणात लक्ष घातलेला आहे
7
Report
HCHEMANT CHAPUDE
Jul 28, 2025 09:45:54
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Ranjangaon Vinayak Chaturthi File:01 Rep: Hemant Chapude(Ranjangaon) Anc: आज विनायक चतुर्थी आणि श्रावणातील पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त अष्टविनायक महागणपती रांजणगाव येथे लाडक्या बापाचा मंदिर गाभार आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला असून लाडक्या बाप्पाला 1001 मोसंबीचा महानैवद्य दाखवण्यात आला विनायक चतुर्थी निमित्त मोठ्या संख्येने भाविक भक्तानी दर्शनासाठी गर्दी केली होती... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया रांजणगाव पुणे,..
7
Report
ABATISH BHOIR
Jul 28, 2025 09:45:46
Kalyan, Maharashtra:
तरुणानी स्वखर्चातून बुजवला रोडवर खड्डा. खड्यामुळे अनके अपघात होत असल्याने तरुणांचा पुढाकार. Anc : कल्याण पूर्व चक्कीनाका परिसरातील अमेय रुग्णालयासमोर पावसामुळे रस्स्यावर भला मोठा खड्डा पडल्याने वाहनांना व रुग्ण रुग्णालय मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही केडीएमसीचे दुर्लक्ष करून सुद्धा खड्डा भरला नसल्याने चक्की नाका परिसरातील तरुणांनी पुढाकार घेत स्वखर्चातून बुजवला खड्डा,व्हिडियो व्हायरल,
11
Report
AKAMAR KANE
Jul 28, 2025 09:36:29
Wardha, Maharashtra:
नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, - विदर्भ विभागाने आज प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मेळावा ठेवला होता. तयारीच्या निमित्याने काम करण्यात आलं.... - जिथे शक्य आहे तिथं महायुती म्हणून लढू जिथे शक्य होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करू... On रायगड पदाधिकारी यांचं पत्र... - मैत्रीपूर्ण लढत हा नियम नाही, महायुती नियम आहे, हा नियम मैत्रीपूर्ण लढत हा अपवाद आहे..काही ठिकाणी होईल काही ठिकाणी होणार नाही. On जबरदस्तीने पक्ष प्रवेश - काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत त्या लक्षात आले आहेत... शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नजरेस आणून देत आहे. On ठाकरे बंधू - कोण कोणासोबत युती करताय, मुंबईच्या जनतेने मनात ठरवला आहे...कोणासोबत लढायचं हे पुढच्या काळात स्पष्ट होईल.... हे एकत्रित आले किंवा वेगळे लढले तरी महापौर हा महायुतीचाच होईल. On कदम रामदास कदम आमचे मित्र आहे.. ते रागाच्या भरात बरंच काही बोलत असतात. सगळ्या गोष्टी सिरीयस घेता येत नाही। On लाडकी बहीण 26 लाख अपात्र - महिला व बाल विकास खात्यात 26 लाख असे अकाउंट मिळाले आहे, जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाही. त्यात पुरुष देखील आहे, दुसऱ्या योजना लाभ घेणाऱ्या देखील आहे, वेगवेगळ्या निकषात न बसणारे, खाते आहे. आता सगळे खाते हे तात्पुरते सस्पेंड केलेले आहे. सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल. वरील बाबी सत्य असल्यास ते अकाउंट बंद केले जातील. On गोटलरनट्याल पक्षप्रवेश - या संदर्भात भाजपने कोणाचा प्रवेश असेल तर रवींद्र चव्हाण बोलतील.. नंतर ते मला सांगतात - यात नवीन काही नाही एअर स्ट्राईकवरती प्रश्न उपस्थित करत होते..त्यामुळे जनतेने यांच्यावर प्रश्नचिन्ह लावले आहे, या मानसिकतेचा काहीच करता येत नाही. On उबठा राज्यपाल तक्रार - एक नरेटीव तयार करण्याचं काम सुरू आहे..काही प्रकरणात चुका आहेत, काही बोलणं झालेल आहे. सरकारच्या विरोधात कोणी फेक नेरेटिव्ह केला तरी कोणाच्या तक्रारी आहे, कोण बोलत आहे याच्याकडे लोक बघत असतात.. On मिशन सिंदूर विरोधक चर्चा. विरोधकांना मिशन सिंधुदुर्ग चर्चा करायची नाही. कारण या भारतीय सैन्याने पाकिस्तान धडा शिकवला आहे, सगळं सत्य समोर आला आहे... एक युद्धाचे नीती असते. चर्चा करण्यात त्यांची हिम्मत नाही. On रेव्ह पार्टी - रेव पार्टी संदर्भात चर्चा करणे सातत्याने कारवाई करण्याचे काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. मुंबई पोलिसांनी दुसऱ्या राज्यात जाऊन कारवाई केली आहे. रक्षा कारखाना पकडलेला यात मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. On निवडणूक आयोग रिविजन - स्पेशल इंटेनसिव्ह रिव्हिजन झाला पाहिजे, मतदाता सूची मध्ये सूची नसल्यामुळे मागील वीस वर्षात अनेक नाव आहे... जे जिवंत नाही पत्ता सोडून गेले, तरी नाव आहे, इंटेन्सिव्ह रिव्हिजन झालाच पाहिजे. 2012 मध्ये मी यासाठी हायकोर्ट मध्ये गेलो. निवडणूक आयोगाचे आभार आहे. On खडसे कारवाई राजकीय द्वेष - यावर मी फार काही बोलणार नाही, पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सगळे त्या ठिकाणचे पुरावे पोलिसांना मिळालेले आहे. व्हिडिओ शूटिंग झाली आहे. अपारमेंट कोणाच्या नावाने ते बुक झाले आहे, अनेक पुरावे आहे, माझ्यासाठी हा प्रश्न राजकीय नाही, गुन्हा घडला आहे... On rss मोहन भागवत भारत - जर आम्ही भारत म्हटलं तर चांगलं होईल आम्ही त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. देशात अनेक असे देश आहे ज्यांचे नाव एक, जुना नाव आहे, एक ऐतिहासिक स्वरूपातून मिळालेल्या नाव आहे... मोंहनजी यांनी काही वाद केलेला नाही आणि विवाद होण्याचं काही कारण नाही. On गांधीवादी जिल्ह्यात अर्बन नक्षलवाद - मागील काळात जिथे जिथे गांधी जिल्ह्यात कार्यक्रम झाले त्या ठिकाणी अशा संघटनांचे कार्यक्रम झाले ज्या पोलीसच्या रेकॉर्डवर अर्बन माओवादी कारवायांमध्ये आहे सेवाग्राम गांधी आश्रम हे सर्वांसाठी खुले आहे त्यावर बंधन टाकण्याचा आवश्यक नाही. अशाच संस्थेत जागेचा वापर चुकीच्या कार्यासाठी होत असेल तर ते योग्य नाही, त्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. On कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अर्बन गांधी.. - तर त्यांनी जे मान्य केलं ते अर्बन गांधीवादी आहे, चांगलं आहे, आम्ही अर्बन गांधीवादी आहे, रूरल गांधीवादी आहे, आम्ही सगळ्या प्रकारे गांधीवादी यावर आम्हाला गांधीवाद मान्य आहे. On सुधीर मुनगंटीवार. - काही लोकांचे निययोजित कार्यक्रम होते, त्यामुळे दौरा असल्यामुळे आम्ही ते येऊ शकले नाही त्यांनी कळवलं होतं कोणी नाराज नाही आहे.... On अमित शाह आष्टीकर शुभेच्छा. - मी पण काल उद्धव ठाकरे यांना जाहीरपणे शुभेच्छा दिल्या... यात राजकारणाचा काही संबंध नाही.
13
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 28, 2025 09:31:20
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2807ZT_JALNA_MSRTDC_PKG(17FILES) जालना | प्रवाशांच्या तिकीटात हेराफेरी करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या 68 वाहकांना 200 किलोमीटर दूर बदल्यांची शिक्षा प्रवाशांच्या तिकिटात करत होते हेराफेरी (पॅकेज) अँकर | राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटात हेराफेरी करून परिवहन महामंडळाला चुना लावणाऱ्या जालन्यातील 68 बस वाहकांना दोषी ठरवण्यात येऊन या वाचकांची जालना,छत्रपती संभाजीनगर विभागाबाहेर 200 किलोमीटर बदलीची शिक्षा करण्यात आली आहे.ही शिक्षा बस वाहकांना का करण्यात आली.? आणि हे वाहक तिकीटात हेराफेरी कशी करायचे बघूया या वरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ :०१:राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटात एसटी वाहक हेराफेरी करत असल्याचा प्रकार जालन्यात समोर आला आहे. परिवहन महामंडळाच्या दक्षता आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या दीर्घ चौकशीत आणि तपासणीत हा प्रकार समोर आलाय.तिकिटात हेराफेरी करून परिवहन महामंडळाला चुना लावणाऱ्या जालन्यातील या 68 बस वाहकांची विभागाबाहेर 200 किलोमीटर बदलीची शिक्षा वरिष्ठ पातळीवरून करण्यात आली आहे.या वाहकांकडून प्रवाशांच्या तिकीटात कशी हेराफेरी केली जात होती हे बघूया ग्राफिक्स | बदली करण्यात आलेले 68 वाहक हे दक्षता पथकाची नजर चुकवून प्रवाशांच्या तिकीटात हेराफेरी करत होते.उदाहरणार्थ एखादा प्रवासी जालन्याहुन छत्रपती संभाजीनगरकडे बसने प्रवास करत असेल तर त्या प्रवाशाला जालन्याहुन प्रवासाचं तिकीट न देता बदनापूर येथून छत्रपती संभाजीनगरचं तिकीट दिलं जात होतं.मात्र भांडं जालना ते छत्रपती संभाजीनगरचंच वाहकांकडून वसूल करण्यात येत होतं.मात्र प्रवाशाचं तिकीट हे बदनापूर ते छत्रपती संभाजीनगरचंच काढल्यानं परिवहन महामंडळाला तेवढंच भाडं मिळायचं. मात्र तोच प्रवासी जालन्याहुन बसलेला असल्यानं जालना ते बदनापूर हे भांडं वाहकाच्या खिशात पडायचं.ही तिकीटात होणारी हेराफेरी दक्षता पथक ज्या मार्गावर आहे तिथे न करता ज्या मार्गावर दक्षता पथक नाही त्या मार्गावर केली जायची.दक्षता पथक ज्या मार्गावर आहे त्याची माहिती वाहकांकडून व्हॉट्स अँप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांना दिली जात होती.या ग्रुपवर दक्षता पथक ज्या मार्गावर असेल त्यांचे फोटो देखील वाहकांकडून शेअर केले जात होते.या ग्रूपमध्ये अनेक वाहक असल्याचं आढळून आल्याचं तपासात समोर आल्यानंतर परिवहन महामंडळाच्या 68 वाहकांना थेट जालना आणि छत्रपती संभाजीनगर विभाग सोडून 200 किलोमीटर दूर असलेल्या विभागात बदलीची शिक्षा देण्यात आलीय. ग्राफिक्स आऊट बाईट :कल्पेश सोळंकी,सुरक्षा आणि दक्षता अधिकारी,राज्य परिवहन महामंडळ,जालना व्हिओ : ०२: विशेष म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून हा प्रकार सुरू होता.पण जिल्ह्यातील अंबड बस स्थानकात दक्षता पथकाचे अधिकारी गेलेले असताना बसचा एक वाहक त्याच्या मोबाईल मध्ये दक्षता पथकाचे फोटो काढताना दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांना आढळून आला आणि या प्रकरणाचं गौडबंगाल समोर आलं. पथकाच्या अधिकाऱ्यांनी फोटो काढणाऱ्या वाहकाच्या मोबाईलमधील व्हॉट्स अँप ग्रुपचे स्क्रिन शॉट मिळवले.दक्षता पथकाने त्याची गोपनीय चौकशी सुरू केली.त्यात तिकीटात हेराफेरी करणाऱ्या बस  वाहकांचा व्हॉट्स अँप ग्रुप आढळून आला.या ग्रुपवरून दक्षता पथकाच्या लोकेशनबाबतची माहिती वाहक एकमेकांना देत असल्याचं निष्पन्न झालंय. बाईट :०२:कल्पेश सोळंकी,सुरक्षा आणि दक्षता अधिकारी,राज्य परिवहन महामंडळ,जालना व्हिओ :०३:जालना ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रोजची संख्या ही हजारोंच्या संख्येत आहे.मात्र दररोज शेकडो गाड्या जाऊनही परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर परीणाम होत होता.आता परिवहन महामंडळाच्या दक्षता आणि सुरक्षा विभागाच्या या कारवाईनं दोषी वाहकांच्या  पायाखालची वाळू सरकली असणार हे निश्चित नितेश महाजन ,झी-२४ तास,जालना
9
Report
KPKAILAS PURI
Jul 28, 2025 09:30:51
Pune, Maharashtra:
pimpri religion kailas puri pune 28-7-25 feed by 2c Anchor -....पिंपरी चिंचवड मध्ये धर्म परिवर्तनाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...! विशेष म्हणजे त्याचे थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलंय...! पिंपरी कॅम्प वैष्णो देवी मंदिरा जवळ अमेरिकन नागरिक स्कॅपलर जेकब हा स्टीवन कदम आणि एका अल्पवयीन मुलासह फिर्यादीला धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकत होता. त्याच वेळी तो हिंदू धर्मावर ही अभद्र टिप्पणी करत होता...! ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास तुला सुख शांती संपत्ती तसेच मानसिक स्वास्थ मिळेल या विश्वात केवळ प्रभू येशूच देव आहे इतर देव आणि धर्म हे केवळ कथा आहेत इतर देवी-देवतांना तुम्ही न मानता येशूला देव माना धर्म परिवर्तन केल्यास आम्ही तुम्हाला भविष्यात आर्थिक सहाय्य करू असे वक्तव्य आरोपी करत होते...! या प्रकरणी पिंपरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आलंय....याच प्रकरणाचा पुढील तपास कसा असणार आहे याबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....! kailas 1 to 1 + vis
11
Report
PPPRAFULLA PAWAR
Jul 28, 2025 09:19:23
Raigad, Maharashtra:
स्लग - सुधाकर घारे यांच्या निवडीने शिवसेनेच्या जखमेवर मीठ ...... घारे यांची निवड शिवसेनेच्या जिव्हारी ...... महायुतीशी बेईमानी केली म्हणून सुनिल तटकरे यांनी त्यांना बक्षीस दिलं...... सुधाकर घारे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर आ. महेंद्र थोरवे यांची टोकदार प्रतिक्रिया अँकर - रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सुधाकर घारे यांच्या निवडीने शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं आहे. ही निवड शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिलीय. घारे यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीशी बेइमानी केली म्हणून त्यांना तटकरे यांनी जिल्हाध्यक्ष पदाची बक्षिसी दिली अशी प्रतिक्रिया आमदार थोरवे यांनी दिली आहे. बाईट - महेंद्र थोरवे, आमदार
13
Report
SKSudarshan Khillare
Jul 28, 2025 09:02:22
Yeola, Maharashtra:
अँकर:- ' आम्ही हिंदू नसून आमचा धर्म आदिवासी आहे' या आदिवासी सरना धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता द्यावी तसेच गुजरात मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील आदिवासी जिल्ह्यांना एकत्र करून स्वतंत्र भिल्ल प्रदेशची निर्मिती करावी यासह लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला पैसा आदिवासी विकास योजनांवर खर्च करावा, आदिवासी बांधवांचे ख्रिश्चन धर्मामध्ये होत असलेले धर्मांतरण थांबवावे या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या एकलव्य आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शेकडो आदिवासी बांधवां सह येवला प्रांतअधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चेकरी सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी..
13
Report
Advertisement
Back to top