Back
लासलगावमध्ये भाईचाऱ्याचं अनोखं उदाहरण: ईद-ए-मिलाद आणि गणेश विसर्जन एकत्र!
SKSudarshan Khillare
Aug 30, 2025 03:02:00
Lasalgaon, Maharashtra
अँकर :- लासलगाव शहरात यंदा भाईचाऱ्याचं अनोखं उदाहरण पाहायला मिळतंय. ईद-ए-मिलाद आणि गणेश विसर्जन या दोन महत्त्वाच्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत एक वेगळा निर्णय घेतला आहे. यंदा ईद-ए-मिलाद ५ सप्टेंबरला आणि गणेश विसर्जन ६ सप्टेंबरला आहे. शहरातील सामाजिक शांतता अबाधित राहावी, दोन्ही समाजातील भाईचारा टिकून राहावा यासाठी मुस्लिम पंच कमिटीने निर्णय घेतला आहे की ईद-ए-मिलादचा जुलूस हा गणेश विसर्जनानंतर म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी काढण्यात येईल. याचबरोबर पैगंबर जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी हरित सेनेच्या सहकार्यातून वृक्षारोपण व इतर सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
बाईट – तन्वीर शेख, अध्यक्ष मुस्लिम पंच कमिटी
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowAug 30, 2025 08:47:23Pune, Maharashtra:
शरद पवार ऑन आरक्षण
पॉइंटर
शरद पवार
सामाजिक ऐक्य अडचणीत येते की असा प्रश्न निर्माण झाला आहे....
महाराष्ट्रासाठी आरक्षण हे काय नवीन नाही राजर्षी शाहू महाराज यांनी मागास समाजासाठी आरक्षणाची गरज लक्षात घेऊन 50 टक्के आरक्षण दिले...
सध्या आरक्षणावरून वादावादी सुरू झालेली पाहायला मिळते हा वाद समाजामध्ये कटूता निर्माण करते की काय अशी चिंता आहे...
सध्या मराठा विरुद्ध ओबीसी अशी चर्चा सुरू झाली आहे या दोन्ही समाजामध्ये खूप अडचणी आणि मागासलेपण आहे हाल सहन करणारा खूप मोठा वर्ग आहे आणि प्रगतीत वाढ हवी असेल तर त्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे....
मराठा समाजातील मोठा वर्ग शेती करणारा आहे मात्र शेतीतूनही प्रगती होत नसल्याने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हा पर्याय आहे...
मात्र हे करत असताना दोन समाजामध्ये कटुता वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे...
यासाठी काही धोरणात्मक निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेण्याचे गरज आहे....
आरक्षण देण्यासंबंधी सुप्रीम कोर्टाचे काही निकष आहेत त्यानुसार 50%,52% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही मात्र तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिलय आणि ते आरक्षण सुप्रीम कोर्टात देखील टिकल...
केंद्र सरकारने याच्यामध्ये निर्णय घ्यावा लागतो वेळप्रसंगी घटनेमध्ये बदल करून संसदेमध्ये असे निर्णय घ्यावे लागणार आहेत
4
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 30, 2025 08:19:092
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 30, 2025 08:17:28Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_MukhedRain
Feed on - 2C
----------------------------
Anchor - नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले. गुरुवारी मुखेडमध्ये अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे कोट्या येथील तलाव फुटला. या तलावाचे पाणी मुखेड शहरातील फुलेनगर वस्तीमध्ये शिरले होते. अंदाजे 150 घरात पाणी गेले होते. या घरातील 250 लोकाना नगर प्रशासन आणि नागरीकाच्या मदतीने तात्काळ मुखेड येथील जिल्हा परिषद शाळा व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले.
--------------------
3
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 30, 2025 08:03:52Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Rain
File:01
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्याच्या अनेक भागात आज दुपारच्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या असून अचानक पडलेल्या या पावसामुळे नागरिकांची उकड्याणे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळालाय.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
2
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 30, 2025 08:03:26Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Rescue
Feed on - 2C
--------------------------
Anchor - नदीला आलेल्या पुरात वाहून जाताना एका व्यक्तीने झाडाला पकडून आपला जीव वाचवला. प्रशासनाला माहिती मिळताच बोटमधून या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील टाकळी येथील ही घटना आहे. मन्याड नदीच्या पुरामध्ये वझरगा येथील मारोती कोकणे वाहून गेले होते. वाहून जाताना सुदैवाने एका झाडाच्या फांदीला पकडून ते झाडावर चढले. झाडावर व्यक्ती असल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी बोटसह पथकाला रवाना केले. बोटीमधून या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
-------------------
7
Report
AKAMAR KANE
FollowAug 30, 2025 08:03:06kolhapur, Maharashtra:
नागपूर
Ngp Fukey on Bhosale
live u ने फीड पाठवले
-------------
आमदार परिणय फुके ऑन मुधोजी राजे भोसले
-- मी मुधोजी राजे भोसले यांच्या मागणीचे स्वागत करतो आणि आभार मानतो
--मराठ्यांची मागणी मुधीजी राजे यांनी मांडली
--मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण हवे आहे..
3
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 30, 2025 08:03:01Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3008ZT_CHP_POWER_DROP
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 2 संच बंद, वीज निर्मितीत घट, कोळसा हाताळणारी यंत्रणा नादुरुस्त झाल्याने रखडली निर्मिती
अँकर:--चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे सद्यस्थितीत 2920 MW स्थापीत क्षमता असलेले वीज निर्मिती केंद्र असुन या केंद्रातील 210 MW क्षमतेचे 2 संच बंद झाले आहेत. या केंद्रात एकूण 500 MW चे 5 संच आणि 210 MW चे 2 संच आहेत. येथील संच क्र 3 आणि 4 मधून 39 वर्षांपासून अविरतपणे वीज निर्मिती चालू आहे. काही तांत्रिक कारणामुळे संच क्रं.3 आणि 4 च्या कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री खाली पडण्याची घटना घडली आहे. या घटनेचे नेमके कारण जाणून घेण्याकरिता समिती गठीत करुन चौकशी व सखोल तपासणी करण्यात येणार आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी अथवा कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या घटनेमुळे संच क्र. ३ येथील वीज निर्मिती थांबलेली असुन संच क्र. ४ चे वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे काम आधीच चालु होते. ही घटना घडल्यानंतर दुरुस्तीसाठी चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे पावले उचलली गेली असुन हे काम लवकरात लवकर पुर्ण करुन संच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे वीज केंद्र प्रशासनाने म्हटले आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
4
Report
AKAMAR KANE
FollowAug 30, 2025 07:17:36kolhapur, Maharashtra:
Ngp OBC Fukey
live u ने फीड पाठवले
-----
राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून भाजप आमदार परिणय फुके यांना मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले आहे.... परिणय फुके मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे... ओबीसी आंदोलनाला फुके यांनी पाठिंबा देताना महाविकास आघाडीवरील टीका केली आहे... फुके यांच्यासोबत याबाबत 121 केलाय
बाईट
आ परिणय फुके
6
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 30, 2025 07:06:00Washim, Maharashtra:
वाशिम :
File:3008ZT_WSM_DAM_5DOORS_OPEN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम
अँकर:वाशीमच्या कारंजा व मानोरा तालुक्यात मागील दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येऊन जल प्रकल्पातील जल साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.कारंजा तालुक्यातील अडाण मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी ८१.४६ टक्क्यांवर पोहोचली असून आजची पातळी ३८१.२० मीटर इतकी नोंदली गेली आहे. प्रकल्प परिसरात आज १३ मिमी पाऊस झाला असून आतापर्यंतच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान ६३५ मिमी इतके झाले आहे.सध्या प्रकल्पातील पाच गेट प्रत्येकी ३० सेंमीने उघडण्यात आली आहेत.यामधून १६५.४९ घनमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग अडाण नदीत सुरू आहे.
9
Report
SNSWATI NAIK
FollowAug 30, 2025 07:05:45Navi Mumbai, Maharashtra:
story slug - सुविधा मिळाव्यात म्हणून रास्ता रोको
नवी मुंबई के मराठा आंदोलको का रास्ता रोको
ftp slug - nm vashi rasta roko
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor -
नवी मुंबईत मराठा आंदोलन आक्रमक झाले असून,मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला होता वाशी रेल्वे स्थानकाला जाणार अंतर्गत रस्ता अडवला होता पोलिसांच्या मद्यस्थि नंतर हा रस्ता रोको मागे घेण्यात आला
gf -
----
9
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 30, 2025 07:00:41Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shikrapur Traffic Police
File:01
Rep: Hemant Chapude(Shikrapur)
Anc :पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर चाकण चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी स्वतः रस्त्यावरती उतरून भोंग्यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी नियंत्रीत करताना पाहायला मिळाला आहे यामुळे प्रवासी व नागरिकांना हा त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्कतेच्या भूमिकेत पाहायला मिळतंय
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिक्रापुर पुणे
5
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 30, 2025 07:00:29Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_DAM_DOOR
निम्न तेरणा प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले, 3816 क्युसेकने विसर्ग
पाण्याची आवक वाढल्याने दुसऱ्यांदा दरवाजे उघडण्याची
Anc: धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील माकणी इथं असलेल्या निम्न तेरणा प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत पाण्याची आवक वाढल्याने दरवाजे उघडण्यात आले असून 3816 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा दरवाजे उघडण्यात आले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास यामध्ये वाढ केली जाऊ शकते.
7
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 30, 2025 06:48:30Ratnagiri, Maharashtra:
Anchor - रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुवारबाव गावचे रहिवासी असलेल्या वर्तक कुटुंबीयांनी पडझड होत असलेल्या शाळांचा मुद्दा घरगुती बाप्पाच्या समोर देखाव्यातून साकारला आहे. एक विद्यार्थी पडझड होणाऱ्या शाळेबाबत बाप्पाला साकडं घालतोय असा हा देखावा आहे. घरगुती बापा समोर देखावा तयार करण्याची ही परंपरा मागच्या अनेक वर्षांपासून वर्तक कुटुंबीयांनी जपली आहे. दरवर्षी ते विविध प्रकारचे देखावे साकारतात.
बाईट - शुभम वर्तक, रत्नागिरी
लोकेशन - कुवारबाव, रत्नागिरी
13
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 30, 2025 06:48:20Raigad, Maharashtra:
स्लग - सर्वांनाच लागले गौराईच्या आगमनाचे वेध ........ कोकणात गौरीच्या ओवशाला सुपाना मान ...... पूर्वा नक्षत्रात गौरीपूजन असल्याने सुपांना मोठी मागणी ........ गणेशोत्सवात बुरुड समाजाला व्यावसायीक संधी ..........
अँकर - गणेशोत्सव कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन केल्यानंतर आता सर्वांनाच वेध लागलेत ते गौराईच्या आगमनाचे. विशेषतः महिलांना गौराईच्या आगमनाची ओढ असते. उद्या रविवारी गौराईंचे आगमन होईल. दोन दिवस तिचे आगमन, कोड कौतुक आणि पुजनाचे असतात. कोकणात गौराई पुजनाला ओवसा असं म्हटल जातं. यासाठी बांबुपासून बनवलेले सुप आणि सुपली याचा वापर केला जातो. यामुळे सुपे बनवणाऱ्या बुरुड समाजाला चांगले उत्पन्न मिळते. या वर्षी गौरीपुजन पूर्वा नक्षत्रात येत असल्याने नवविवाहितांचे ओवसे होणार आहेत. त्यामुळे मोठी सुपे आणि छोट्या सुपलीला अधिक मागणी आहे. एक सूप 200 ते 250 रुपयांना विकले जाते. बांबूच्या वस्तूंची जागा आता प्लास्टिकच्या वस्तूंनी घेतली आहे. तरीदेखील सणावाराला बांबूच्या वस्तुनाच मान असतो. गणपती कारखानदारांप्रमाणे बुरुड आळ्यांमध्ये सुपे बनवण्याचे काम जून महिन्यापासूनच सुरू होते.
बाईट - गणेश सोंडकर
बाईट - सुप्रिया मोरे
8
Report
AKAMAR KANE
FollowAug 30, 2025 06:32:05kolhapur, Maharashtra:
Ngp OBC Andolan
live u ने फीड पाठवले
---------------
नागपूर
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सुरू झाले आहे... भाजपा नेते आमदार आशिष देशमुख यांनी पाठिंबा देण्यासाठी पोहोचले असून मंडपात बसले आहे... ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आजपासून हे साखळी उपोषण सुरू केल्याचं ओबीसी महासंघ अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले. तर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे हा जरांगे पाटील यांचा बालकहट्ट असल्याची टीका भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी केलीय... यावेळी बबनराव तायवाडे आणि आमदार आशिष देशमुख यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
.----
बाईट
बबनराव तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी महासंघ
आ आशिष देशमुख, भाजप नेते
12
Report