Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401208

वसईत पुन्हा कोसळला धोकादायक गटारावरील स्लॅब! तुम्हाला माहिती आहे का?

PTPRATHAMESH TAWADE
Sept 07, 2025 06:34:44
Vasai-Virar, Maharashtra
Date-7sep2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI SLAB Feed send by 2c Type-AV Slug- वसईत पुन्हा कोसळला धोकादायक गटारावरील स्लॅब कृष्णा टाऊनशिप परिसरातील घटना गटारावर बनवले होते लहान मुलांसाठी गार्डन सुदैवाने जिवीतहानी नाही, मोठी दुर्घटना होता होता वाचली अँकर - वसई विरार शहरात धोकादायक इमारतींचा मुद्दा ताजा असताना शुक्रवारी सायंकाळी वसई पश्चिमेतील कृष्णा टाऊनशिप परिसरातील गटारावरील अनेक वर्षे जुना स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. वसई पश्चिम भागात कृष्णा टाऊनशिप परिसर आहे. या भागातून महापालिकेचे गटार गेले आहे. दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव अशा विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत होते. यासाठी काही वर्षांपूर्वी महापालिकेकडून या गटारावर स्लॅब टाकण्यात आला होता. त्यानंतर या स्लॅबवर लहान मुलांसाठी खेळणी, बसण्यासाठी बाक बसवून छोटसे उद्यान तयार करण्यात आले होते. मागील दोन दिवसांपासून शहरात सातत्याने पाऊस सुरू आहे. या भर पावसातच शुक्रवारी संध्याकाळी या स्लॅबचा मधला भाग कोसळला आणि त्यावरची खेळणीही नाल्यात पडली. सुदैवाने, त्यावेळी या परिसरात कुणीही नसल्याने जीवितहानी टळली. स्लॅबच्या लोखंडी सळ्या गंजल्यामुळे नाल्यावरील स्लॅब कमकुवत झाला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शहरात सातत्याने स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे धोकादायक स्लॅबचा मुद्दा चर्चेत आला आहे.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Sept 08, 2025 03:01:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn sillod kidnap av photo attached सिल्लोडमध्ये लव्ह स्टोरीचे बिंग फुटू नये म्हणून विद्यार्थ्यांचे अपहरण करियर अकॅडमीच्या संचालकासह चौघांना अटक ANC : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये हिंदवी करिअर अकॅडमीच्या संचालकाचे प्रेम प्रकरण उघड होऊ नये यासाठी संचालकाने एकाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. अमोल गजानन मख असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून याप्रकरणी अकॅडमीचा संचालक दशरथ जाधव, कृष्णा जगताप, गणेश चव्हाण आणि प्रवीण राठोड अशी आरोपींची नावे आहेत. जाधव यांचे अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडले. त्यांनी अमोलच्या मदतीने तिच्याशी ओळख करून घेतली होती. अमोलकडे या प्रेमप्रकरणाचे व्हॉइस रेकॉर्डिंग व इतर पुरावे होते. त्यामुळे बिंग फुटेल या भीतीने जाधवने हा अपहरणाचा कट रचला होता. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 08, 2025 03:01:09
Kolhapur, Maharashtra:
Kop Sound FIR Feed:- File Anc:- कोल्हापुरात तब्बल 23 तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक सार्वजनिक मंडळानी ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे शहरातील तब्बल 41 मंडळांवर पोलिसांनी खटले दाखल केलेत.. विसर्जन मिरवणुकीत 41 मंडळांनी मोठ्याने साऊंड सिस्टिम लावल्याने भक्तांना कानठाळ्या बसून हृदयाची धडधड वाढली होती, त्यामुळे पोलिसांनी आवाजाचे नमुने घेऊन सार्वजनिक मंडळांवर ध्वनी प्रदूषण उल्लंघनाचे गुन्हे दाखल केले आहेत, त्यामुळे पदाधिकारी आणि साऊंड सिस्टिम मालकांना हे प्रकरण भोवणारे आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 08, 2025 03:00:15
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_aropi_arest मोबाईल चोराला अटक अँकर नाशिक शहरात रस्त्यावर चालत असणाऱ्या व्यक्तींचे दुचाकी वर येऊन मोबाईल इस्कॉन येणाऱ्या चोरट्याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली... या संशयताकडून तीन मोबाईल आणि एक दुचाकी असा एक लाख पंधरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे... गणेश पाटील असं अटक केलेल्या संशयीता च नाव आहे.. हा संशयित रस्त्यावर चालत असणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी वर येऊन मोबाईल हिसकावून पळ काढत होता.... याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता... मुंबई नाका पोलीस याबाबत तपास करत असताना गोपनीय माहिती च्या आधारे या संशयताला महामार्ग बस स्थानकाच्या परिसरात अटक करण्यात आली आहे....
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 08, 2025 02:46:31
Kolhapur, Maharashtra:
Kop Mahadik On Gokul Feed:- File Anc:- कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा उद्या होणार आहे. या सभेमध्ये विरोधी संचालिका शौमिका महाडिक ह्या सत्ताधारी व्यासपीठावर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेली चार वर्षे या ना त्या कारणाने गोकुळच्या कारभारावर विरोधी संचालिका शौमिका महाडिक ह्या गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जाब विचारत होत्या, पण मधल्या काळात गोकुळ चेअरमन निवडणुकीत महायुतीचे अध्यक्ष म्हणून मंत्री हसन मुश्रीफ याचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली, त्यामुळे महायुती म्हणून विरोधी संचालिका शौमिका महाडिक ह्या उद्या होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत व्यासपीठावर दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, दरम्यान शौमिका महाडिक यांनी आज पत्रकार बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
4
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 08, 2025 02:46:18
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 0809_BHA_AAROPI_ACTION FILE - 2 VIDEO भंडाऱ्यातील दुहेरी हत्याकांडातील चारही आरोपींवर अखेर मोक्का..... पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती..... संघटित गुन्हेगारीविरुद्ध 2023 नंतरची दुसरी कारवाई...... तर 11 आरोपी तडीपार ANCHOR :- भंडारा शहरात सुमारे 25 दिवसांपूर्वी घडलेल्या टिंकू खान दुहेरी हत्याकांडात अटक केलेल्या चारही आरोपींवर अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी या कारवाईचे संकेत दिले होते. मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाबा मस्तनशाह वॉर्ड, भंडारा येथील साहिल शाकीर शेख (23) व त्याचा भाऊ फैजान शाकीर शेख (25) यांच्यासह या खून प्रकरणात सहभागी असलेला प्रीतम विलास मेश्राम (33, नांदोरा) आणि आयुष मुन्ना दहीवाले (19, ठाणे, पेट्रोल पंप) यांचा समावेश आहे. तर 11 आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ही कारवाई करणे गरजेचे असल्याचं पोलीस अधिक्षक यांनी सांगितले आहे... BYTE :- नुरुल हसन, जिल्हा पोलिस अधीक्षक
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 08, 2025 02:46:09
Lasalgaon, Maharashtra:
अँकर :- पंजाबमध्ये आलेल्या भीषण पुराच्या संकटात आता लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. तब्बल 40 टन कांदा ज्याची बाजारमूल्य पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे हा पंजाबमधील पूरग्रस्तांना पाठवण्यात आला नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनी एकत्र येत समाजकार्याचा आदर्श घालून दिला आहे पूरग्रस्त पंजाबकरांसाठी तब्बल 40 टन कांद्याचे योगदान देण्यात आले आहे या कांद्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये हुन अधिक आहे लासलगाव येथून हा कांदा थेट 1600 किलोमीटर पंजाबला रवाना करण्यात आला वाहतूक खर्चाची जबाबदारी मनमाड येथील गुरुद्वारा गुप्तसर साहेब व पंजाबी शीख बांधवांनी घेतली आहे यासाठी दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे व्यापारी आणि सिख बांधवांच्या या उपक्रमामुळे 'मानवतेचे नाते' अधिक दृढ झाले आहे पूरग्रस्तांना मदतीचा हात देताना महाराष्ट्र–पंजाब या दोन्ही राज्यांतील सामाजिक ऐक्याचं दर्शन घडत आहे लासलगाव कांदा व्यापाऱ्यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे बाईट :- प्रवीण कदम (पदाधिकारी, लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशन )
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 08, 2025 02:46:01
Raigad, Maharashtra:
स्लग - क्षत्रिय मराठा को-ऑप क्रेडिट सोसायटीची महाड शाखा सुरू ....... मंत्री भरत गोगावले आणि प्रविण दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन ......... अँकर - मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप क्रेडिट सोसायटीची शाखा महाडमध्ये सुरू झाली आहे . मंत्री भरत गोगावले आणि आ. प्रविण दरेकर यांच्या हस्ते फित कापुन हा शुभारंभ करण्यात आला. मुंबईमध्ये सुरु झालेल्या या पतसंस्थेची रायगड जिल्ह्यातील ही दुसरी शाखा आहे. या संस्थांच्या माध्यमातुन शेतकऱ्याला मदत होईल, नोकरी करण्यासाठी चाकरमानी पुण्यामुंबईत जातो, तो न जात नोकऱ्या देणारा होईल, यासाठी प्रयत्न राहणार असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. बाईट - प्रविण दरेकर
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 08, 2025 02:45:52
Nashik, Maharashtra:
Nsk_trimbak Feed by 2C Anchor चंद्रग्रहणाच्या निमित्ताने त्रंबकेश्वर मंदिर हे रात्री ग्रहण काळामध्ये उघडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे रविवारच्या निमित्ताने अनेक भाविकांना दर्शन घेता आले. याग्रहण काळात पूजाविधी करून महाधिदेवांची पालखी काढण्यात आली. Byte कैलास घुले विश्वस्त
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 08, 2025 02:45:44
Kolhapur, Maharashtra:
Kop Gokul Sabha Feed:- File Anc:- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची सर्वसाधारण सभा उद्या 9 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या सभेसाठी सभासदांकडून विविध विषयांवरील लेखी प्रश्न दाखल झाले आहेत. गोकुळ दूध संस्थेने संघाच्या वार्षिक अहवालात दिलेल्या हिशोबा संदर्भात सभासदांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दूध संकलन, म्हैस दुधातील वाढ, सौर प्रकल्पातून झालेली बचत, वाहतूक खर्च आणि शासनाच्या चाचणी अहवालातील ताशेरे या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी संघाकडे लेखी मागणी केली आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भात नेमकं सत्ताधारी कशाप्रकारे उत्तर देतात यावरच गोकुळची सर्वसाधारण सभा कशी चालणार हे स्पष्ट होणार आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 08, 2025 02:31:20
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara Slug - 0809_BHA_ACCIDENT FILE - 2 IMAGE भरधाव कारची ई-रिक्षाला धडक... 9 महिला मजूर जखमी... साकोली जवळील महामार्गावरील घटना Anchor : शेतात निंदणाचे काम आटोपून निघालेल्या महिला मजुरांच्या ई-रिक्षाला भरधाव कारने धडक दिली. त्यात ९ महिला मजुर जखमी झाले. सदर अपघात काल सायंकाळी साकोली जवळ महामार्गावर घडला. मोहघाटा येथील महिला मजुर हे साकोली शेतशिवारात पोद्दार शाळेजवळ एका शेतात निंदणाच्या कामाला आले होते. दिवसभर काम आटोपून सायंकाळी गावाकडे ई-रिक्षाने निघाल्या. त्यावेळी नागपुरकडे जाणारी कारने ई-रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षामधील चालकासह ९ महिला मजुर जखमी झाले. अपघात घडताच नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना भंडाऱ्याला हलविण्यातआले आहे.
2
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 08, 2025 01:30:31
Ambernath, Maharashtra:
वॉटर सप्लायच्या व्हॉल्व्ह वर पडून गाईचा मृत्यू जीवन प्राधिकरण विभागाचा अनागोंदी कारभार   सुरक्षा जाळी नसल्याने घडली दुर्दैवी घटना Amb cow accident Anchor अंबरनाथ मध्ये जीवन प्राधिकरण विभागाच्या अनागोंदी कारभांमुळे एका गाईचा मृत्यू झाला आहे. जावसई परिसरातील महादेव नगर मधील रस्त्याच्या बाजूला जीवन प्राधिकरण विभागाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह आहे , या व्हॉल्व्ह भोवती कुठलीही संरक्षक जाळी नसून त्या बाजूला तीन ते चार फूट खोल खड्डा आहे.  रात्रीच्या सुमारास एक गाईंचा कळप या रस्त्यावरून जात असताना अचानक गाईचा तोल जाऊन  व्हॉल्व्हच्या खड्ड्यात पडली तो  व्हॉल्व्ह तिच्या पोटात घुसला त्यामुळे या गाईचा तडफडून मृत्यू झाला, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या अनागोंदी कारभारणामुळे या गाईचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे, या उघड्या व्हॉल्व्ह मुळे अजून कोणती दुर्दैवी घटना घडू शकते असा नागरिकांचे म्हणणे आहे. चंद्रशेखर भुयार ,अंबरनाथ
7
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 07, 2025 18:00:39
Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळ्यात इरशाद जहांगीरदार यांनी 'एमआयएम' पक्षात प्रवेश करणार आहेत. यां पक्ष प्रवेशामुळे स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. शहरातील समाजसेवक आणि समाजवादी पक्षाचे नेते इरशाद जहांगीरदार यांनी अखेर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख खासदार असुद्दिन ओवेसी यांची भेट घेतली आहे. तसेच पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची भेट घेत, ऑक्टोबर महिन्यामध्ये धुळ्यात जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचं जहागीरदार यांनी सांगितले आहे. नुकत्या पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये धुळे शहर मतदार संघामधून इर्शाद जागीदार उमेदवार होते. समाजवादी पक्षाकडून त्यांनी उमेदवारी केली होती. पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव स्वतः त्यांच्या पक्षप्रवेशासाठी धुळ्यात आले होते. शहरातील उच्चशिक्षित राजकारणी म्हणून इर्षात जहागीरदार यांच्याकडे पाहिले जाते. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जहागीरदार यांच्या नेतृत्वाचा फायदा एम आय एम होणार आहे. प्रशांत परदेशी, धुळे.
15
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 07, 2025 17:15:12
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_HALLA सात फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 जुन्या वादातून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये चाकू आणि दगडांनी हल्ला; गणपती विसर्जन सुरू असताना मुख्य चौकातील धक्कादायक प्रकार अँकर :– जुन्या वादातून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये चाकू आणि दगडांनी हल्ला करण्यात आला असून या हल्ल्याप्रकरणी २ आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील बाभळी टी पॉइंटवरील ही घटना असून जुन्या वादातून रजत जाधव यांच्यावर चाकू, तलवार आणि दगडांनी करण्यात हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. शहरात गणपती विसर्जन सुरू असताना मुख्य चौकात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जखमी रजत जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी अकोल्याला हलवण्यात आले आहे.
14
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 07, 2025 16:00:42
Akola, Maharashtra:
Anchor : महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील झालेल्या संभाषणानंतर राजकीय वातावरण चांगला तापला आहे.अंजना कृष्णा प्रकरणावरून निर्माण झालेल्या चर्चेबाबत आमदार मेटकरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मिटकरी म्हणाले की, “विधिमंडळाचा सदस्य म्हणून अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची तपासणी संदर्भात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे मी विनंती केली होती. मात्र ही भूमिका पक्षाची नसून माझी वैयक्तिक होती. अंजना कृष्णा यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण आहेत हे माहीत नसल्यामुळे माझ्या मनात शंका निर्माण झाली आणि चौकशीची मागणी केली. पण यामागे पक्षाची अधिकृत भूमिका नव्हती.”त्यांनी पुढे सांगितलं की, या संदर्भात पक्षावर अनाठायी टीका होत असली तरी ती चुकीची आहे. “ही माझी वैयक्तिक भूमिका होती आणि त्याबद्दल मी दिलगिरीही व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या पक्षातील फालतू लोक केवळ राजकारणासाठी टीका करत आहेत. अजित पवारांमुळे आम्ही गप्प आहे , मात्र योग्य वेळी उत्तर देऊ,” असा इशारा मिटकरी यांनी विरोधकांना दिला. या वक्तव्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आता अधिक चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. Byte : अमोल मिटकरी , आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस ( अ . प )
14
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 07, 2025 15:47:20
Raigad, Maharashtra:
स्लग - लक्ष्मण हाके आधी मुख्यमंत्र्यांचा उदो उदो करत होते ..... मुख्यमंत्र्यांना बॅलन्स भूमिका घ्यावी लागते ...... कोण काय बोलतं यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे समजून घ्या ...... इति प्रवीण दरेकर ......... अँकर - लक्ष्मण हाके यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा उदो उदो करत होते. मुख्यमंत्री कुठल्या समाजाचे नसतात ते सर्व समाजाचे असतात त्यामुले त्यांना बॅलन्स भूमिका घ्यावी लागते असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. आता आम्ही दंडुका हाती घेतलाय आता जबाबदारी सरकारची आहे असा इशारा लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिलायं त्यावर ते बोलत होते. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी घेतलेला हा निर्णय आहे त्यामुळे कोण काय बोलतं यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेतलं पाहिजे असं दरेकर म्हणाले. बाईट - प्रवीण दरेकर
15
comment0
Report
Advertisement
Back to top