Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में शांतिपूर्ण मतदान, स्ट्रॉंगरूम सुरक्षा कड़ी, 65% मतदान दर्ज

GMGANESH MOHALE
Dec 05, 2025 03:31:23
Washim, Maharashtra
वाशिम जिले के रिसोड, मंगरूळपीर, कारंजा ये तीन नगरपरिषद और मालेगांव नगर पंचायत के लिए 2 दिसंबर को शांतिपूर्ण मतदान हुआ। चार नगराध्यक्ष पदों के लिए 27 और 90 नगरसेवक पदों के लिए 374 उम्मीदवार दौड़ में थे। जिले के 178 केंद्रों पर कुल 65% मतदान दर्ज हुआ। मतदान के बाद सभी EVM मशीनें 21 दिसंबर की मतगणना तक स्ट्रॉंगरूम में सुरक्षित रखी गईं, SRPF तुकड़ी, पुलिस अधिकारी और 24 घंटे CCTV सुरक्षा कड़ाकट बंदोबस्त किया गया। स्ट्रॉंग रूम परिसर में अनधिकृत चाल-चलन पर रोक है। 20 दिसंबर को वाशिम नगरपालिका तथा रिसोड नगरपरिषद के प्रभाग 5-B और 10-A में मतदान होंगे। इन चुनावों की मतगणना 21 दिसंबर को होगी। स्ट्रॉंग रूम के बाहर की स्थिति का आकलन हमारे प्रतिनिधि गणेश मोहळे ने किया।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Dec 05, 2025 04:07:59
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - ऑपरेशन साहित्य चोरणाऱ्या तीन महिलांना अटक केली,पाच लाखांचे ऑपरेशन साहित्य जप्त. अँकर - वैद्यकीय साहित्यांची चोरी करणाऱ्या तिघा महिलांना सांगली पोलिसांनी अटक केले आहे.त्यांच्याकडून पाच लाखांचं ऑपरेशन साहित्य जप्त करण्यात आले आहे.पुण्यातील एक कंपनीचे 28 नोव्हेंबर रोजी सांगलीतून एका टेम्पो मध्ये असणारे सुमारे 5 लाख किंमतीचे वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणारे साहित्य चोरी करण्यात आल्याचा प्रकार घडला होता,या प्रकरणी शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलिसांनी तपास करत शहरातल्या सम्राट व्यायाम मंडळ येथे छापा टाकून चोरी झालेले साहित्य जप्त करत साहित्य चोरणारया महिलांना अटक केली आहे.
55
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 05, 2025 03:49:19
Ratnagiri, Maharashtra:नऊ महिन्याची चिमुरडी ‘रडणं’ विसरून ‘पोहणं’ शिकली. रत्नागिरीची वेदा सरफरे सर्वात लहान हिंदुस्तानी जलतरणपटू इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद बाळाचे पाय पाळण्यात दिसतात पण या चिमुरडीचे पाय नवव्या महिन्यातच पाण्यात दिसले तेही पोहताना.नऊ महिन्याची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरूवात करणाऱ्या वेदा परेश सरफरे हिचा प्रवास अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत पोहचला आहे.१०० मीटरचे अंतर १० मिनिटे आणि ८ सेंकदात पूर्ण करत वेदा हिंदुस्तानातील सर्वात लहान जलतरण पटू बनली आहे. नऊ महिन्याची हि चिमुरडी खरं तर तिचं ते रडण्याचं वय पण ती त्या वयात रडणं विसरून पोहणं शिकतं होती.वेदाचा मोठा भाऊ शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो.तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे.रूद्रला घेऊन त्याची आई पायल सरफरे शासकीय जलतरण तलावावर येत होती त्यावेळी तिच्या कंबरेवर बसून वेदा हे जलतरण तलावातील पोहणं पहायची.एक दिवस प्रशिक्षक महेश मिलके यांनी वेदाला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडली नाही तर पाण्यावर हातपाय मारून तिने पाण्याशी दोस्तीच केली.हळूहळू ती पोहायला लागली.जलतरण तलावाच्या कठड्यावरून पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून येतो.
27
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 05, 2025 03:47:51
Washim, Maharashtra:अँकर:वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथे श्री संत भायजी महाराज यांच्या यात्रा महोत्सवाची 151 वर्षांची परंपरा यंदाही मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडली. प्रभू श्रीराम आणि भरत यांच्या भेटीचा ऐतिहासिक सोहळा तसेच रावण–कुंभकर्ण दहनाची परंपरा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या यात्रा महोत्सवात काल भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आज पहाटे पाच वाजता रामचंद्र–भरत भेटीचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडला. भेटीनंतर रावण आणि कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. ग्रामीण भागातील सर्वात जुनी धार्मिक परंपरा म्हणून तऱ्हाळा यात्रेकडे पाहिले जाते. या उत्सवाचे हे 151 वे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत समुदायात भक्तीभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
20
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 05, 2025 03:32:29
Nanded, Maharashtra:नांदेड शहरातील वसरणी परिसरात रोहित मंडले या 23 वर्षीय तरुणाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. रस्त्यालगत असलेल्या उच्चदाब वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्याला शॉक लागला. खांबावरील तारा खाली लोंबकळत असल्याने हा अपघात घडला. मागील वर्षीच रोहितचा विवाह झाला होता. त्याची पत्नी सध्या गरोदर आहे. वेदनादायी बाब म्हणजे यापूर्वीच एका अपघातात रोहितचा मोठ्या भावाचा मृत्यु झालाय. आता घरात कमवणारा एकही सदस्य उरलेला नाही. वृद्ध आई-वडील आणि गरोदर पत्नी अशी परिस्थिती असून आता हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. मृत रोहितच्या पत्नीला महावितरण कंपनीमध्ये नोकरी द्यावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येतेय. या घटनेने नांदेड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
76
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 05, 2025 03:32:10
Dhule, Maharashtra:धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्या अडचणी सापडला आहे. कापसाचे दर हंगाम सुरू झाल्यापासून साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल च्या दरम्यान असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका या कमी दराचा बसत आहे. सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत मात्र त्या ठिकाणी असलेल्या जाचक अटींचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मनमानी पद्धतीने सीसीआय केंद्र चालवले जात असल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळताना दिसू देत नाही. त्यामुळे नायलाज म्हणून शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांकडे आपला कापूस विकत आहेत. व्यापारी कापूस खरेदी करत असताना पड्या भावात खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान होत आहे. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे कापसाचे उत्पन्न कमी झालेले आहे. त्यात कापसाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसत आहे. शासनाने सीसीआय केंद्रांवर निगराणी करावी तसंच नियम शिथिल करावेत अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेले आहे.
130
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 05, 2025 03:16:48
169
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 05, 2025 03:00:38
Bhandara, Maharashtra:नागपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने गोंदिया के उप परिवहन कार्यालय में पश्चिम बंगाल से खरीदी गई जेसीबी वाहन के पंजीकरण के लिए आए शिकायतकर्ता से 70 हजार रुपये रिश्वत की मांग करने वाले दो आरोपियों को गिरफ्तार किया। आरोपियों में राजेश केसकर (53), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (अतिरिक्त प्रभार), और एक निजी व्यक्ति राजेश माहेश्वरी (57), निवासी रामनगर शामिल हैं। गोंदिया उप परिवहन कार्यालय के सामने पश्चिम बंगाल से खरीदी गई जेसीबी वाहन की पंजीकरण प्रक्रिया के दौरान शिकायतकर्ता को रिश्वत देने के लिए प्रेरित किया गया था; शिकायतकर्ता ने रिश्वत देने से इनकार किया और लाचलुचपत विभाग को सूचना दी। सापळा-rk कारवाई के बाद दोनों को गिरफ्तार किया गया है।
142
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 05, 2025 02:50:56
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यातील आधारभूत किंमत हमीभाव केंद्रे बारदाना नसल्याने गेली चार दिवसापासून बंद. जिल्ह्यात नाफेड आणि पणन मंडळाकडून 51 सोयाबीन हमीभाव केंद्रे करण्यात आली होती सुरू. मात्र 1 डिसेंबरपासून बारदान नसल्याने हमीभाव केंद्र पडली ओस. जिल्ह्यात एकूण 16797 शेतकऱ्यांनी नोंदणी केली, 1748 शेतकऱ्यांच्या 37 हजार 324 क्विंटल सोयाबीनची खरेदीया केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत झाली. प्रति क्विंटल 5 हजार या 328 भावाने 19 कोटी 88 लाख रुपयांची सोयाबीनची खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळावा या उद्देशाने सुरू केलेले हमीभाव केंद्रे बारदान अभावी बंद असल्याने व्यापाऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय
158
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 05, 2025 02:50:36
Dhule, Maharashtra:आमचोर - सारंखेडा घोडेबाजार पहिल्याच दिवशी महागड्या घोड्यांची खरेदी विक्री झाली. घोडे बाजारात प्रचंड तेजी दिसून येत असून, पहिल्याच दिवशी 40 लाखाची उलाढाल झाली. जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंखेडा घोडेबाजाराला सुरुवात झाली असून घोडेबाजारात पहिल्याच दिवशी खरेदी विक्रीचा उच्चांक गाठला गेला आहे. या बाजारात पहिल्याच दिवशी अकरा लाख रुपये किमतीला एका घोड्याची विक्री झाला. यावर्षी आतापर्यंत 2500 पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत. अजून पाच दिवसात घोडेबाजारात साडेतीन हजार घोड्यांचा टप्पा पार होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकूणच घोडेबाजारात प्रचंड तेजी पाहण्यास मिळणार आहे.
151
comment0
Report
Advertisement
Back to top