Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

रिसोड पुलिस ने MD ड्रग और गांजा के साथ दो आरोपियों को गिरफ्तार किया

GMGANESH MOHALE
Nov 03, 2025 04:31:43
Washim, Maharashtra
अँकर: रिसोड शहर में पोलिसों ने धडक कारवाई में MD ड्रग, गांजा और 500 रुपय की बनावट नोटों का साठा जप्त किया। गोपनीय जानकारी के आधार पर पोलिसों ने TS 09 FV 6027 नंबर की कार पर सापळा रचकर तपासणी की। इस मौके पर 60 ग्राम MD ड्रग, 2 किलो गांजा और 378 बनावट नोट मिले। इस मामले में पोलिसों ने दो संदिग्धों को ताब्यात लिया और कुल 17 लाख 39 हजार रुपये मुल्जुम सामग्री बताई गयी। आगे की जांच रिसोड पुलिस कर रही है।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Nov 03, 2025 11:08:05
Nanded, Maharashtra:अचानक आलेल्या पावसामुळे धबधब्याला पाणी येऊन सात जण अडकले. तिथे असलेल्या एका होमगार्डच्या जवानाने आणि स्थानिकांनी मानवी साखळी करून या सातही जणांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील काल सायंकाळची ही घटना आहे. माहूर तालुक्यातील शेख फरीद येथे दर्गा आहे. डोंगर कपारीत असलेल्या या दर्जाच्या ठिकाणी नैसर्गिक धबधबा आहे. काल काही पर्यटक या ठिकाणी आले होते. अचानक आलेल्या पावसामुळे धबधबा ओसंडून वाहू लागला. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे सात जण पाण्याच्या पलीकडील बाजूस अडकले होते. एक महिला, तीन मुली आणि तीन पुरुष असे सात जन अडकले होते. मानवी साखळीच्या साह्याने या सर्वांना सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 03, 2025 10:25:25
Nagpur, Maharashtra:नागपूर - - पंचनामे करणारे अधिकारीच उठले शेतकऱ्यांच्या जीवावर - शेतीचे पंचनामे करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी करण्याचा ऑडिओ viral - शासकीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांत फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप वायरल - व्हायरल ॲाडीओ क्लिपची zee २४ तास ’पुष्टी करत नाही - शेतकऱ्याला मिळालेल्या अनुदानातून केली पैशाची मागणी - नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील पेठमुक्तापूर येथील प्रकार - पैशाच्या आधारे नुकसानीचे पंचनामे. - ग्राम पंचायत मधील कर्मचाऱ्याच्या मार्फत पैशांची मागणी. - शेतकऱ्यांनी गट विकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे केली तक्रार. - शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानात मोठा घोळ असल्याचा आरोप.. ग्रामसेविकेच्या नावाने पैसे मागत असल्याचा ऑडिओ क्लिप व्हायरल
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 03, 2025 10:16:39
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मोंथा चक्रीवादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडणीला आलेला कापूस पावसामुळे भिजून खाली पडत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात धान, कापूस, सोयाबीन, तूर खरीप पिके घेतली जातात. आधीच सोयाबीनच्या पिकाचे नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना आता कापसाच्याही नुकसानीचा फटका बसला आहे. भिजलेल्या कापसाला बाजारात फारसा दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत sापडले आहेत. शासनाने याची गंभीर दखल घेत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि कर्जमाफीची तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 03, 2025 10:03:52
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 03, 2025 10:01:52
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली फ्लॅश संगली डिजिटल बोर्ड जत मध्ये डिजिटल वॉर! गोपीचंद पडळकर यांच्या डिजिटल फलक फाडल्यानंतर, शहरात जयंत पाटलांच्या विरोधात विडंबनात्मक डिजिटल फलक झळकले. जत शहरात आमदार जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातलं संघर्ष आणखी वाढणार आहे. जत शहरामध्ये साखर कारखाना परत द्या अश्या आशयाचे फलक जयंत पाटलांच्या नावाचे विडंबनात्मक फलक शहरात लावण्यात आले आहेत. अज्ञातांकडून रातोरात भला मोठा डिजिटल फलक जत शहरातल्या चौकात लावण्यात आला आहे. यात जयंत राव तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बर का, असा मजकूर लिहित जयंत पाटील यांच्याबरोबर विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांचे कार्टून देखील बनवण्यात आले आहेत. काल जत शहरातले गोपीचंद पडळकर यांचे डिजिटल फलक फाडण्याचा प्रकार घडला होता. यानंतर रातोरात जयंत पाटलांच्या विरोधातले डिजिटल फलक जत शहरांमध्ये लावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी जॉईनचे पाटील यांच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या नावावर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा डिजिटल फलक झळकण्यात आला होता. त्यामुळे हा डिजिटल वॉर आणखी वाढणार असल्याअंश शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 03, 2025 09:37:18
Pune, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने अनेक भागात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे... श्रीगोंदा तालुक्यात संततधार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे...मोठ्या कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यासमोर नष्ट होत असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे...शेतकऱ्यांनी मशागत आणि टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी केलेला एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्चही निघणार नाही असं शेतकऱ्यांच म्हणणं आहे.. श्रीगोंदा तालुक्यातील टोमॅटो पिकाच्या नुकसानी बाबत हंगेवाडी येथील चांगदेव जगताप या शेतकऱ्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 03, 2025 09:34:07
Palghar, Maharashtra:अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं असतानाच पालघर मध्ये सरकारकडून एका शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान फसल पिक योजनेतून या शेतकऱ्याला फक्त दोन रुपये तीस पैसे मिळाले असून यामुळे या शेतकऱ्याकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. वाडा तालुक्यातील सिल्लोत्तर येथील मधुकर बाबुराव पाटील या शेतकऱ्याच्या नावावर अकरा एकर जागा असून नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या बँक खात्यात सरकारकडून दोन रुपये तीस पैसे जमा करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री फसल योजनेतून हे पैसे जमा झाल्याचा मेसेज मधुकर पाटील यांना आल्यानंतर रक्कम बघून त्यांना धक्काच बसला. अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतानाच शेतकऱ्यांकडून सरकारकडे मदतीची अपेक्षा केली जाते अशातच दोन रुपये मदत देऊन सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याची भावना व्यक्त करण्यात येतोय.
0
comment0
Report
Advertisement
Back to top