Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में अचानक भारी बारिश से दिवाली बाजारों में उथल-पुथल; किसानों की चिंता बढ़ी

GMGANESH MOHALE
Oct 21, 2025 13:21:51
Washim, Maharashtra
वाशिम जिल्ह्यातील मानोरा,मंगरूळपीर मालेगाव,वाशिम व रिसोड या तालुक्यात काही भागात आज अचानक वादळ-वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली,तर वाशिम शहरात जोरदार पावसाची नोंद झाली.दिवाळी निमित्ताने सजलेल्या बाजारपेठा, फुलांची दुकाने, मिठाईचे स्टॉल तसेच फटाक्यांच्या गाड्यांवर या अवकाळी पावसामुळे गडबड उडाली.सणासुदीच्या खरेदीच्या काळात आलेल्या या हवामानातील बदलामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघेही अडचणीत आले.अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारातील फुलं, मिठाई आणि इतर वस्तूंना नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील शेतकरी वर्गावरही या पावसाचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अतिवृष्टीतून थोडक्यात वाचलेले सोयाबीन कापणीचं काम सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे पुन्हा नुकसान होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.हवामान विभागाने पुढील काही तासांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला असून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Oct 21, 2025 17:00:14
Nala Sopara, Maharashtra:नालासोपाऱ्यात चप्पल च्या दुकानांना भीषण आग लागलेल्या आगीत तीन ते चार दुकाने जळून खाक आगीमुळे स्टेशन परिसरात मोठी वाहतूक कोंडी अँकर - नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातील साई बाजारातील चप्पल विक्री करणाऱ्या ३ ते ४ दुकानांना आज भीषण आग लागली. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीच्या धुरामुळे स्टेशन परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र पालिकेच्या अग्निशमन दलाने वेळेत धाव घेत आग नियंत्रणात आणली. या परिसरातील दुकानांना यापूर्वीही आग लागली होती आणि पालिकेने कारवाईदेखील केली होती, तरीही दुकाने पुन्हा सुरू करण्यात आली होती. ऐन दिवाळीत झालेल्या या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 21, 2025 16:46:10
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज पाडव्याच्या पूर्वसंध्येला लातूर शहर अक्षरशः उजळून निघालं आहे. दिवाळीच्या या मंगल क्षणी संपूर्ण शहरात रोषणाईचा सोहळा सुरू झाला आहे. गंजगोलाईसह प्रमुख चौक, रस्ते आणि बाजारपेठा दिव्यांच्या आणि लाईट्सच्या प्रकाशाने सजल्या आहेत. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या स्वागतासाठी नागरिकांनी घरोघरी दिवे प्रज्वलित करत शहराला एक नवीच झळाळी दिली आहे. ड्रोनच्या सहाय्याने ZEE 24 TAAS च्या प्रेक्षकांसाठी खास लातूरच्या लकी गहेरवार यांनी टिपलेली हे मनमोहक दृश्यं..... ५ किलोमीटर परिसरातील १० प्रमुख चौकांची झगमगती रोषणाईने न्हालेलं हे लखलखतं लातूर, दिवाळीच्या आनंदात थिरकतंय....
5
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 21, 2025 14:47:34
Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिम अनुपम नगर परिसरात घरावर झाड उडल्याने तीन घरांचे नुकसान, दोन जखमी! सायंकाळी नंतर सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड कोसळल्याची घटना या घटनेत तीन घरांचे मोठे नुकसान झाले असून दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, रस्त्यावर आलेला झाडाचा भाग हटवण्यात आला आहे. मात्र परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून, घरावर पडलेलं झाड उद्या सकाळपर्यंत पूर्णपणे हटवले जाईल, अशी माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली आहे.दरम्यान, परिसरात भीतीचे वातावरण असून, तीन कुटुंब दिवाळीच्या दिवशीच रस्त्यावर आलेली दिसत आहेत.
2
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 21, 2025 14:45:34
Pandharpur, Maharashtra:आज लक्ष्मीपूजन निमित्त पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आले. श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, नाम हिऱ्याचा, मोत्याचा तुरा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, शिरपेच लहान, शिरपेच १० लोलक असलेला, मस्त्य जोड, तुळशीची माळ ३ पदरी, मोहन माळ ५ पदरी, हायकोल, सूर्यकाळ्यांचा हार, तांद्ळया हार ७ पदरी, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, पदकासह लॉकेट, तुळशीची माळ १ पदरी, लक्ष्मी पदक लॉकेट, तोडे जोड, झनक झनक हार, सोन्याचे पैंजण जोड, नवरत्नाचा हार, सोन्याचा पितांबर इ. अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, मोठी नथ, कर्णफुले जोड, जडावाचा तानवड जोड, चंद्र, सूर्य, खड्यांची वेणी, मोत्याचा कंठा, मोत्याचे मंगळसूत्र, मोत्याचा तुरा, खड्याची बिंदी, मण्यां मोत्याच्या पाटल्या जोड, बाजीराव गरसोळी, चिंचपेटी हिरवी, जडावाचे बाजूबंद जोड, नवरत्नाचा हार, तन्मणी मोठा, शिंदे हार ३ पदरी, ठुशी, वाक्या जोड, रूळ जोड, पैंजण जोड, मस्त्य जोड, सोन्याचा करंडा, मासपट्टा इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 21, 2025 14:17:44
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : काल काही महिला पदाधिकाऱ्यांना फोनवरून दम देऊन आंदोलनात काळी साडी घालून येण्याचे सांगितले भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांचा आजच्या आंदोलनावर आरोप आजचे आंदोलन हे स्पॉन्सर होते, त्याचा मी जाहीर निषेध करतो. आज जी भाषणे झाली त्याविरोधात मी पक्षाला पत्र देणार आहे की आंदोलन करणाऱ्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी काल काही महिला पदाधिकाऱ्यांनांना फोनवरून दम देऊन आंदोलनात काळी साडी घालून येण्याचे सांगितले दिलीप माने हे सहकारातील मोठे नेते असून त्यांचा पक्षप्रवेश लवकर झाला पाहिजे. काँग्रेस मुक्त भारत ही भाजपची ही पक्षाची भूमिका आहे त्यामुळे दिलीप माने हे सहकारातील मोठे नेते आहेत यांना विरोध करायचा होता तर त्यांनी प्रदेश कार्यालयात जायचे होते. काल काही कार्यकर्ते माझ्याकडे आले होते त्यांनी मला स्पीकर फोनवर ऐकवले की आजचे आंदोलन कसे स्पॉन्सर होते ते. दिलीप माने यांची स्वतःची एक ताकत आहे. ते स्वतः एक ब्रँड आहे. आज जी भाषणे झाली त्याविरोधात मी पक्षाला पत्र देणार आहे की आंदोलन करणाऱ्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी लोकसभेला 10 हजार लीड होते मग चार महिन्यात विधनासभेला 77 हजार लीड कसे झाले? ज्यांनी आज आरोप केले त्यांचा इतिहास काय आहे? दिलीप माने यांचा पक्ष प्रवेश व्हावा आम्हाला वाटलं होतं आज आलेल्या महिला कार्यकर्त्यांना काळे कपडे घालून येण्यासाठी फोनवरून दम देऊन सांगितले. आजचा स्टंट हा ठरवून केलेला आहे, त्यामुळे याबाबत प्रदेश कार्यालयाकडे तक्रार करणार आहे. घराणेशाही टिकवण्यासाठी हा सगळा स्टंट आहे. आगामी काळात उमेदवार जाहीर झाल्यावर स्पष्ट होईल. त्यामुळे माझी पक्षाकडे विनंती आहे की दिलीप माने यांचा आणि त्यांच्यासोबत येणाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला पाहिजे
1
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 21, 2025 13:47:08
Pune, Maharashtra:अहिल्यानगरला कोरोना काळात चुकीचा रिपोर्ट बनवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर गोपाळ बहुरूपी आणि डॉ सुधीर बोरकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. कोरोना झाल्याचे भासवून 79 वर्षीय वृद्धावर चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाला होता. मृत बबनराव खोकराळे यांच्या मुलगा अशोक खोकराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात पाच डॉक्टरांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 ऑगस्ट ते 23 नोव्हेंबर 2020 या काळात शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला होता. मात्र पाच वर्षांनी न्यायालयाचे आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला माहिती न देता मृतकाच्या अवयवांची तस्करी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा गंभीर आरोप खोकराळे यांच्या कुटुंबीयांनी केला होता. आता याप्रकरणी पुढील सोनवणे 28 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.
4
comment0
Report
MDMahendra Dubey
Oct 21, 2025 13:02:23
Damoh, Madhya Pradesh:प्रसिद्ध गोवर्धन पर्वत पर हुआ पूजन, लोगों को धार्मिक अनुष्ठान के साथ बताई गई पशुपालन विभाग की स्कीम्स.. एंकर/ प्रदेश भर में आज हुए गोवर्धन पूजन के क्रम में दमोह जिले में प्रसिद्ध तीर्थ क्षेत्र जागेश्वरनाथ धाम बांदकपुर के विशाल गोवर्धन पर्वत पर पूजन का आयोजन किया गया। जिला प्रशासन द्वारा आयोजित इस कार्यक्रम में पूर्व मंत्री और दमोह विधायक जयंत मलैया सहित तमाम जनप्रतिनिधियों ने गोवर्धन पूजन किया । इस अवसर पर यहां बनी गौ शाला का निरीक्षण करने के साथ समारोह में पधारे किसानों को पशुपालन विभाग ने विभिन्न योजनाओं को लेकर जानकारी भी दी। विधायक जयंत मलैया ने कहा कि मंदिर ट्रस्ट के सहयोग से चल रही गौ शाला प्रदेश में मिशाल बनेगी वही सरकार जिस तरह गौ संवर्धन को लेकर काम कर रही है वो देश में अलग स्थान बनाएगी。 बाइट/ जयंत मलैया ( पूर्व मंत्री विधायक दमोह) बाइट/ प्रवीण फूलपागरे ( सीईओ जिला पंचायत दमोह)
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top