Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

Wardha में भाजप विधायक के चारों ओर महिलाओं का घेराव; आरोपाकारे राजनीतिक کھیل

MAMILIND ANDE
Dec 26, 2025 04:01:43
Wardha, Maharashtra
वर्धा ब्रेकिंग - वर्ध्यात भाजप आमदार यांना महिलांनी भर रस्त्यात घेरले - वर्ध्याच्या आर्वी शहरातील शिवाजी चौक येथे महिलांचा घेराव - महिला प्रतिनिधींचा काही कारण नसताना अश्लील भाषेत शिवीगाळ केली - एक मोठा जाणकार नेता जो भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधित्व करतो त्याने केलं-केचे -आमदार दादाराव केचे यांचा आरोप -माझा अपमान कसा होईल या भावनेतूनच हे षडयंत्र रचलं -माझा राजकीय वजन वाढू नये त्या माध्यमातून अंतर्गत षडयंत्र आहे अँकर- वर्ध्याच्या आर्वी शहरात आमदार दादाराव केचे यांना काल भाजपच्या महिलांनी भररस्त्यात घेरले.. काही लोकांचा महिला प्रतिनिधींचा काही कारण नसताना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्याचं काम एक मोठा जाणकार नेता जो भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधित्व करतो आहे त्या नेत्यांच्या माध्यमातून या तीन-चार महिलांचा पराभव झाला मोठा उपद्र म्हणजे सारिका लोखंडे च्या संदर्भात मोठा रोज होता मतदारांच्या भेटीकाटीने दलित वार्ड जो आहे माता गाणी समाजाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी फिरणं सुद्धा कठीण झालो होतो अशा त्यांचा पराभव झाला मनीषा पाहुणे या नवीनच नवीनच उमेदवार दिले गेले आमच्या गिरी मॅडम उपाध्यक्ष होते त्यांचा दावा होता वेळेवर त्यांचा एबी फॉर्म त्यांचा दाबून ठेवण्यात आला आणि मॅडम शुभांगी उघडे प्रभाग क्रमांक तीन मध्ये उमेदवारी दिली होती वेळेवरच उमेदवारी दुसऱ्या वार्डातून दिली गेली म्हणून त्यांचा पराभव झाला लक्ष्मी घाटचे कोणतेही राजकीय नसतं निदान उमेदवार दिला मला त्यांनी वार्डात बोलावलंच नाही तर मी जाणार कसा जाधव उमेदवारांनी मला बोलावलं मी त्यांच्यासाठी गेलो घराघरापर्यंत गेलो सगळे उमेदवार निवडून सुद्धा आणले त्या भावनेतूनच कारण नसताना काहीतरी मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून राजकारण करते आहे एकाचे दोन सांगून माझा अपमान कसा होईल या भावनेतूनच हे षडयंत्र रचलं अश्लील प्रकारे शिवीगाळ करून असा कांगावा करून एक प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला काल त्या लोकांची मी सारिका लोखंडे मनीषा बावणे शुभांगी देवगडे यांनी लक्ष्मी घटना से पंकज लोखंडे रवी गाडगे अशा लोकांचा काल मी रिपोर्ट सुद्धा दिला आहे माझ्यावर प्रति हल्ला करण्याचं षडयंत्र रचले गेलेत त्या माध्यमातूनच तो प्रकार अशा पद्धतीने घडला आहे माझा राजकीय वजन वाढू नये त्या माध्यमातून अंतर्गत षडयंत्र आहे असा आरोप दादारावकेचे यांनी केला आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 26, 2025 05:17:04
kolhapur, Maharashtra:नागपूर *नागपुरात काँग्रेस पक्षाने महापालिकेच्या १५१ पैकी बहुतांशी जागांवर उमेदवारांचे नाव निश्चित केल्याची माहिती आहे... नागपुरात विधानसभेचे सहा मतदारसंघ असून नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर या एका मतदारसंघातील प्रभागांसाठीचे नाव वगळता इतर पाचही विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या प्रभागांमध्ये काँग्रेसने आपल्या उमेदवारांचे नाव निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती आहे..* या सर्व जागांसाठी एक किंवा दोनच इच्छुकांचे नाव काँग्रेसकडे होते.. काल मुंबईत झालेल्या बैठकीत उत्तर नागपूर वगळता इतर सर्व पाचही विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या प्रभागांची नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.... * दरम्यान काँग्रेसची नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच शिवसेना ठाकरे गटासोबत बोलणी सुरू आहे... * सध्या तरी काँग्रेसने सर्व जागांवर आपले नाव निश्चित करणे सुरू केले आहे.. * आज आणि उद्या मित्र पक्षांसोबत होणाऱ्या बोलणीनंतर जेवढ्या जागा मित्र पक्षांना देण्यासाठी काँग्रेस तयार होईल.. * त्यानंतर काँग्रेस कडून उर्वरित जागांसाठीचे नाव निश्चित करून जाहीर केले जाईल.. * दरम्यान उत्तर नागपूर मधील प्रभागांवर काँग्रेस पक्षाकडून नितीन राऊत यांच्याशी बोलणी करून नाव निश्चित केले जाणार आहे.. (काल मुंबईत झालेल्या बैठकीत काही कारणास्तव नितीन राऊत उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे उत्तर नागपूरचे नाव निश्चित होऊ शकले नसल्याची माहिती आहे..)
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 26, 2025 04:49:33
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - चेकपोस्ट पास करण्यासाठी अडीच हजाराची लाच घेताना आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षकासह खासगी व्यक्ती अँटी करप्शन ब्युरोच्या ताब्यात पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहनचे मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ आणि खासगी व्यक्ती अमोल अप्पासाहेब पाटील अटकेत असलेल्या आरोपीचे नावे आहेत. तक्रारदार हे गुजरात ते चेन्नई या मार्गावर ट्रेलर चालवतात. नांदणी चेकपोस्ट ओलांडण्यासाठी अधिकारी नेहमी २ हजार रुपयांची मागणी करतात असा आरोप करत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर सापळा रचत गाडी चेक पोस्ट पास करण्यासाठी अडीच हजार रुपये घेताना या दोन्ही आरोपीना जालना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 26, 2025 04:46:50
Amravati, Maharashtra:चांदुर रेल्वेच्या נवनिर्वाचित नगराध्यक्षाचा ऑटो यूनियन तर्फे भव्य सत्कार; ऑटो यूनियनचा सत्कार स्विकारण्यासाठी थेट पोहचल्या ऑटो रिक्षाने चांदुर रेल्वेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियंका निलेश विश्वकर्मा ऑटो यूनियनचा सत्कार स्विकारण्यासाठी थेट ऑटो रिक्षाने पोहचल्या आहे त्यामुळे त्यांच्या साधेपणाचे सर्वत्र चर्चा होत आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तसेच त्यांचे पती निलेश विश्वकर्मा यांनी ऑटो रिक्षाच सारथ्य केलं आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा यांचा ऑटो रिक्षाने जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अतितटीच्या लढतीत प्रियंका विश्वकर्मा या नगराध्यक्ष म्हणून झाल्या विजयी
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 26, 2025 04:46:38
Dhule, Maharashtra:धुळे शहर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या पायाखालची जमीन सरकल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार फारुक शहा यांनी केलेला आहे. धुळे शहराची निवडणूक भाजपला हलव्यासारखे वाटत होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक मैदानात उतरल्यानंतर भाजपाच्या पायाखालची जमीन सरकल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती होणार नाही असंच एकंदरीत चित्र दिसून येत आहे. माजी आमदार शहा यांनी भाजपाला चांगलंच डिवाचले आहे. भाजपा मला घाबरत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. निवडणुकीमध्ये 51 जागा निवडून येतील असा दावा फारुक शहा यांनी केल्यामुळे निवडणूकाची रंगत वाढली आहे. या आरोप आणि दाव्यांवर भाजप काय प्रतिक्रिया देत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 26, 2025 04:46:19
Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील सिंधफणा पब्लिक स्कूलमध्ये दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच प्रयोगशीलता वाढावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन झाले होते. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील प्रयोग सादर करून आपली कल्पकता दाखवली. एकूण २५ विद्यार्थी निर्मित प्रयोग या प्रदर्शनात सहभागी झाले होते. प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची संधी मिळाली. विविध प्रयोगांद्वारे वैज्ञानिक माहिती प्रभावीपणे मांडण्यात आली. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास मोठ्या प्रमाणावर भेट दिली.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 26, 2025 04:37:40
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्हा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या सराव प्रश्नावलीत 'उच्च जातीचे नाव काय'? असा संतापजनक प्रश्न विचारणाऱ्या ठाणे येथील रेव्होएज्युकेशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला चार लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रश्नावरून शिक्षण वर्तुळात वादंग उठल्यानंतर कंपनीने माफीनामा सादर केला होता मात्र हा खुलासा समाधानकारक नसल्याने, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी कंपनीला चार लाख रुपयांचा दंड थोठावला. स्पर्धा परीक्षेसह शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढवा यासाठी टार्गेट पीक ॲप उपक्रम सुरू केला होता. या परीक्षेतील प्रश्नावलीत हा आक्षेपार्ह प्रश्न विचारला गेला. आता यापुढे असा वादग्रस्त प्रकार घडू नये करिता परीक्षा प्रश्नावलीच्या तपासणीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 26, 2025 04:35:50
Satara, Maharashtra:सातारा - फलटण येथे झालेल्या भाजपच्या नगरपालिका निवडणूकी विजयी सभेत मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे यांना पुन्हा एकदा शकुनी मामा म्हणत काय होता तू काय झाला तू...असा कसा शकुनी मामा बरबाद झाला तू... अशी खोचक टीका केली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर देखील टीका केली आहे. दाढीवर हात फिरवत कोणतरी या ठिकाणी आलं आणि इथे दहशत शिवसेनेत चालत नाही असं बोलले होते. त्यांना मला सांगायचे आहे दहशत आम्हाला पण चालत नाही आणि आम्हाला पण दाढी आहे असं सांगत आमच्या नादाला लागायचे नाही असा इशारा देखील जयकुमार गोरे यांनी दिलाय. बाईट - मंत्री जयकुमार गोरे विओ 2 - माझी घाणेरडी प्रतिमा तयार करताना देखील फलटण माझ्यासोबत राहील आणि ज्या मास्टर माईंड ने हे सगळं केलं त्या मास्टरमाईंडला तुम्ही पुण्याला पाठवण्याचं काम केलं अशी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे स्टेज बाईट - रणजीत सिंह नाईक निंबाळकर
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 26, 2025 04:24:51
Washim, Maharashtra:वाशिम: जानेवारी महिन्यात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. प्रशासकीय कामकाज तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांची प्रतीक्षा असल्याने या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अनिश्चिततेमुळे निवडणुकीची तयारी करणाऱ्या गावागावातील इच्छुकउमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान,येत्या जानेवारी महिन्यात वाशिम जिल्ह्यातील तब्बल १६३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे.वेळीच निवडणुका न झाल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाण्याचे संकेत मिळत असून,याबाबत अधिकृत निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 26, 2025 04:22:11
Beed, Maharashtra:बीड: माजलगाव तालुक्यात शॉर्ट सर्किटमुळे ऊस शेताला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान Anc - माजलगाव तालुक्यातील लोणगाव शिवारात शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याच्या ऊस शेताला भीषण आग लागल्याची घटना घडली. ज्ञानेश्वर कोळसे या शेतकऱ्याच्या सुमारे दोन एकर क्षेत्रातील ऊस पिकाला आग लागून अर्ध्याहून अधिक ऊस जळून खाक झाला आहे. आग लागल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी तात्काळ आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीची तीव्रता वाढल्याने जेसीबीच्या साह्यानेही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर आग नियंत्रणात आली. या आगीत शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, उभे पीक जळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top