Back
CIDCO होम्स योजना: Navi Mumbai में 16,876 घरों के लिए विस्तार की घोषणा
SNSWATI NAIK
Feb 27, 2026 16:01:01
Navi Mumbai, Maharashtra
Anchor- सिडको महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या १६,८७६ सदनिकांच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये” गृहनिर्माण योजनेत पर्याय निवडीसाठी दि. १९ मार्च२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेस नागरिकांकडून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून तसेच अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये” या योजनेंतर्गत नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी १६,८७६ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेत अनामत रक्कमेचा भरणा करण्यासाठीची अंतिम तारीख 19 मार्च २०२६ तर आपले पसंतीचे पर्याय निवडण्यासाठीची अंतिम तारीख १९ मार्च २०२६ आहे. सदर योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी www.cidcohomes.com या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन सिडको तर्फे करण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 27, 2026 14:45:180
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 27, 2026 14:17:100
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 27, 2026 14:16:540
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 27, 2026 13:54:090
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 27, 2026 13:24:190
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 11:49:250
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 27, 2026 11:47:240
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 27, 2026 11:33:570
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 27, 2026 11:07:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 27, 2026 11:06:110
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 27, 2026 11:00:190
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 27, 2026 10:46:180
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 27, 2026 10:09:430
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 27, 2026 10:09:160
Report
