Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

Odisha से वृद्ध आजीबाई को महाराष्ट्र लाने सांगली जिला परिषद के अधिकारी की मदद

SMSarfaraj Musa
Dec 10, 2025 11:20:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारयांची संवेदनशीलता ओडिसातल्या आजीबाईंना पुन्हा सुखरूप आणले. अँकर - सांगलीमध्ये जिल्हा परिषदेच्यावतीने मानवी हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या माध्यमातून ओडिसा इथून एका वृद्ध आजीबाईला सुखरूपपणे महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील असणाऱ्या विजया जाधव या ओडीसामध्ये निराधार वावरत असल्याची बाब तेथील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याशी संपर्क साधला, त्यानंतर नरवाडे यांनी प्रशासनाच्या माध्यमातून वृद्ध विजयाबाई साळुंखे यांना सुखरूपपणे महाराष्ट्रात आणला असून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठवण्यात येणार आहे,तत्पूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने आजीबाईंच्या सत्कार करण्यात आला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Dec 10, 2025 11:31:08
Pandharpur, Maharashtra:सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात जागा वाटपावरून चर्चा फिस्टलेली होती. त्यामुळे सांगोल्यात हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळाली. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली. न्यायालय आदेशाने प्रभाग क्रमांक 1 आणि 11 मधील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली होती. आज येथील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या पत्नी सुजाता केदार यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज शिवसेना उमेदवाराने मागे घेतला, तर शिवसेना महिला तालुका अध्यक्ष राणी माने यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज भाजप शेकाप प्रणित सांगोला शहर विकास आघाडीच्या उमेदवाराने मागे घेतला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेला निकाल जाहीर होण्याआधी एक एक जागा मिळाली त्यामुळे सांगोल्यात आता भाजप शिवसेना मधील राजकीय वाद संपला आहे. दोन्ही विजयी उमेदवारांनी एकत्र येत माजी आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयात जल्लोष केला.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 10, 2025 11:02:44
Kalyan, Maharashtra:केडीएमसी बीपीसीएलच्या माध्यमातून मांडा टिटवाळ्यात उभे राहणार घनदाट जंगल 30 हजार देशी वृक्षांची मियावाकी पद्धतीने लागवड पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात होणार 20 हजार वृक्ष लागवड एकीकडे नाशिकच्या तपोवनमधील प्रस्तावित वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे कल्याणजवळील टिटवाळ्यात मात्र तब्बल 50 हजार देशी झाडांचे घनदाट जंगल उभे राहण्याच्या दृष्टीने सुरुवात झाली आहे. केडीएमसी आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल) च्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील 30 हजार देशी वृक्षांची मियावाकी पद्धतीने लागवडीच्या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल बीपीसीएलचे पर्यावरण विभागाचे महाव्यवस्थापक अतुल व्यवहारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 10, 2025 10:56:27
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या वतीने नागपूर विभागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी १३ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात पहिल्यांदाच विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भामरागड, आहीरी, देवरी, भंडारा आणि चिमूर या नऊ प्रकल्पांतील तब्बल ३५,००० आदिवासी विद्यार्थी सहभागी होणार असून, आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत. स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल यांसारख्या सांघिक खेळांसह १०० मी., २०० मी., ४०० मी., १००० मीटर आणि ५००० मीटर दौड, रिले, गोळाफेक, थाळीफेक, लांबउडी, उंचउडी अशा अथलेटिक स्पर्धांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसोबत प्रकल्पातील क्रीडा समन्वयक, शिक्षक, संघ व्यवस्थापक आणि मिळून ३०० कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागीय स्तरावर आपल्या प्रतिकृती सादर करण्यासाठी विशेष मंच उपलब्ध करून दिला जाणार आहे. या स्पर्धेदरम्यान दर दिवशी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 10, 2025 10:45:43
Kolhapur, Maharashtra:स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आल. या आंदोलनासाठी गडहिंग्ज तालुक्यातील शेतकरी सोयाबीनची पोती घेऊन प्रांत कार्यालयावर दाखल झाले. दोन महिने मागणी करूनही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्य सरकारकडे सोयाबीन खरेदी करण्यास प्रस्ताव दाखल करूनही मान्यता देण्यात आली नसल्याने संतप्त शेतक-यांनी प्रांत कार्यालयावर सोयाबीन पोती विक्री करण्यास आणले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले..
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 10, 2025 10:39:13
Pune, Maharashtra:नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील कडाडून विरोध केला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षतोड केली जाणार आहे साधुसंतांच्या निवासासाठी वृक्षतोड करून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मात्र या वृक्षतोडीला सामाजिक स्तरातून विरोध होत आहे या वृक्षतोडाला आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील विरोध केला आहे. वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्य प्राण्यांना देखील जीवदान मिळते. कुंभमेळा हा जरी समाजहिताचा आणि राष्ट्र हिताचा असला तरी त्यासाठी झाड तोडू नयेत... फारच आवश्यक असेल तर छोटी झाड तोडावेत मात्र मोठ्या झाडांना तोडू नये अशी माझी विनंती असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. समाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा नुकताच निधन झाला आहे. या निमित्ताने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी जीवनात कुठल्याही फळाची अपेक्षा केली नाही निष्कलंक काम करणार ह हीच खरी पूजा असते अशा शब्दात अण्णा हजारेंनी बाबा आढाव यांना नाश्रद्धांजली वाहिली. बाबा आडव्यांनी आयुष्यभर जनतेची पूजा केली असं अण्णा हजारेंनी म्हटल आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 10, 2025 10:20:39
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील वाघापूर कमानीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याच्या उद्देशाने वाघापूर ते नागपूर पायी लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. आज हे मोर्चेकरी कोल्हापुरात पोहोचले असून कमानीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव लागत नाही तोपर्यंत गावाकडे परत जाणार नसल्याचा निर्धार वाघापूरच्या आंबेडकरी समाजाने केला आहे. गावातील आंबेडकरी समाजानं प्रशासनाकडे गेली वर्षभर पाठपुरावा केला मात्र कोणताच निर्णय न झाल्याने नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यासाठी हे मोर्चेकरी नागपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 10, 2025 10:20:20
Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांनी उच्छाद मांडला असून अनेकांवर जिवघेणे हल्ले वाढले आहेत.. वनविभागाकडून बिबट्यांची धरपकड सुरू असून आत्तापर्यंत जवळपास 28 बिबटे जेरबंद केलेले आहेत.. 1150 च्या वर बिबटे जिल्ह्यात असून पकडलेल्या बिबट्यांना सांभाळायचे कसे असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.. एकीकडे वनमंत्री गणेश नाईक यांनी एक कोटी रूपयांच्या शेळ्या मेंढ्या बिबट्यांना भक्ष म्हणून देणार असल्याचं जाहीर केलेले असले तरी राज्यभरात पकडलेल्या बिबट्यांना खाद्य देण्यासाठी निधीची कोणतीही तरतूद केलेली नाही.. त्यामुळे वनविभागाला आपत्कालीन निधीतून कशीबशी तरतूद केली जात असून बिबट्यांची उपासमार होत असल्याचं चित्र आहे.. जिल्हा वनविभागाकडून देण्यात आलेले प्रस्तावाला लवकर मंजूरी देणं गरजेचं आहे..
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 10, 2025 10:19:58
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर के CPR अस्पताल में मेडिकल बिलों की फाइल मंजूरी में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार के आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ने लगाए हैं। 8 दिसंबर को किए गए स्टिंग ऑपरेशन में फाइल क्रमांक 3 से पैसे के व्यवहार का हिसाब खोलकर इस फाइल को जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर को सिल कर निष्क्रिय बनाने की बात कही गई है। इस प्रकरण की चौकशी त्रिसदस्यीय समिति से कराने, आर्थिक अपराध अन्वेषण विभाग में प्रकरण दर्ज कराने और माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख के कार्यकाल के सभी व्यवहारों की जांच कराने की मांग शिवसेना उबाठा पार्टी ने जिल्हाधिकाऱ्यांकडे रखी है। इस विषय पर शिवसेना उबाठा के उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे तथा अन्य पदाधिकारी मौजूद थे।
0
comment0
Report
Advertisement
Back to top