Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

पंढरपूर चैत्रवारी: बाळूमामांच्या मेंढरांनी पालखी के चारों ओर रिंगण रचा

SMSarfaraj Musa
Mar 28, 2026 02:46:51
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
बाळूमामांच्या मेंढरांनी बागडेबाबांच्या पालखीभोवती रिंगण घातले. सांगलीच्या गोंधळेवाडी येथून पंढरपूरसाठी निघालेल्या चैत्रवारी दरम्यान मेंढरांचा रिंगण सोहळा पार पडला आहे. पंढरपुरकडे मार्गस्थ होताना श्री संत बाळूमामांच्या मेंढरांनी श्री संत बागडेबाबांच्या पालखीभोवती रिंगण घातला. टाळ-मृदुंगाचा निनाद, विठ्ठल नामस्मरणाचा गजर यामुळे हा मेंढरांचा रिंगण डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही चैत्रवारी पायी दिंडी पंढपुरकडे निघाली आहे. सागवानी आकर्षक रथात पालखी सह शेकडो विठ्ठल भक्त या चैत्रवारीत सहभागी झाले आहेत. बाळूमामांच्या मेंढरांच्या रिंगण सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होतं.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Mar 28, 2026 05:46:11
Bhandara, Maharashtra:जिल्हा परिषदेत निधी वाटप करताना बैठकीत ठरलेल्या निकषांचे पालन न झाल्याने वाद निर्माण झाला आहे. अनेक सदस्यांना अपेक्षित निधी न मिळाल्याने नाराजी पसरली असून महायुतीच्या जिल्हा परिषद सदस्यांवरच अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांनाही निधीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ फेंडर यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून जिल्हा परिषद इमारतीतच आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून संबंधित प्रकरणात लवकर तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 28, 2026 05:45:16
Mumbai, Maharashtra:या टीम इंडिया मध्ये नक्की कोण आहे. टीम इंडिया हा राष्ट्रीय विचार आहे आपले पंतप्रधान राष्ट्रीय विचार करतात का ? त्यांचं कडे टीम आहे का ? हम दो हमारे दो संकट काळात राजकीय मतभेद विसरून सत्ताधारी विरोधक एकत्र येतात यायला पाहिजे. सरकारने टीम इंडिया ढोंग करू नये. यावर संसदेत चर्चा होणं गरजेच होत पण झालं नाही देशातला विरोधी पक्ष या काळात देशाच्या बाजूने आहे. ऑपरेशन सिंदूर मागे घेतलं ट्रम्प ने सांगितलं ते केलं नक्कीच केला पाहिजे. लोकांना दहशती खाली ठेवून काही उपयोग नाही. आपल्या कडे इंधन असेल तर देशाच्या पंतप्रधान सांगितलं तर आपण विश्वास ठेवला पाहिजे. भारत इराण संबंध मुळे गॅस आणि इंधनाचा साठा आहे असं चित्र दिसत आहे. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय... प्रकरण अत्यंत गंभीर... एकट्या चाकणकर आहेत का ? स्वतः दीपक केसरकर म्हणतात मीच का ? 40 आमदार जात होते. 40 आमदार कोण हे मुख्यमंत्री जाहीर केलं पाहिजे. खरात यांना विमान सेवा देणार कोण ? ते दिल्लीत जाऊन काय करायचे हे समोर आलं पाहिजे. तो पंचमहाभूता पैकी एक असावा. त्याला राज्य मान्यता दिली फडणवीसांच्या मंत्रिमंडळात अशी अनेक लोक आहे. जैन समुदायासाठी एक मंत्री विशेष व्यवस्था करत असतील तर बोलण गरजेच नाही. टीम महाराष्ट्र तयार करून प्रमुख विरोधी पक्ष सोबत घेऊन राज्यावरच संकट दूर करण्यासाठी टीम तयार करावी त्यासाठी विरोधीपक्ष नेत्याची निवड केली पाहिजे. ते मुख्यमंत्र्यांनी करावी. किरीट सोमय्याच्या व्हिडिओची सत्यता पडताळणार अजून पडताळत आहे. विरोधकांच्या बाबतीत आधी फाशी म चौकशी.. इथे फक्त चौकशी आप 12 लाख वोट काटो मगर जितेगी ममता दीदी...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 28, 2026 05:34:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल टंचाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना, या परिस्थितीचा गैरफायदा घेत पेट्रोलचोर सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. सातारा परिसरातील दीपनगर येथील सिल्व्हर इस्टेट अपार्टमेंटमध्ये गुरुवारी मध्यरात्री दुचाकींमधून पेट्रोल चोरीची धक्कादायक घटना घडली. भरवस्तीत असलेल्या या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींच्या पेट्रोल नळ्या कापून अज्ञात चोरट्यांनी इंधनावर डल्ला मारला. सकाळी कामावर जाण्यासाठी घाईत असलेल्या रहिवाशांनी गाड्या सुरू करण्याचा प्रयत्न केला असता गाड्या सुरू होत नसल्याचे लक्षात आले. काहींनी मेकॅनिकला बोलावले, तर काहींनी टाकी तपासली. मात्र गाडीच्या खालच्या बाजूला पेट्रोलच्या नळ्या कापलेल्या आढळल्याने चोरीचा प्रकार उघड झाला. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तीन अज्ञात तरुणांनी ही चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मात्र तक्रारदार पुढे न आल्यामुळे अद्याप या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
253
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 28, 2026 05:32:10
323
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 28, 2026 05:31:34
402
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 28, 2026 05:30:37
Pandharpur, Maharashtra:करमाळा शहरात भरदिवसा एका महिला गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून पळून जाणाऱ्या सराईत गुन्हेगाराला करमाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ३५ हजार ८२८ रुपये किमतीचे १० ग्रॅम ७८० मिली वजनाचे सोन्याचे गंठण जप्त केले आहे. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास चक्र फिरवला. परिसरातील CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे प्रकटीकरण पथकाने लखन उर्फ फिरोज अजिन शेख (रा. नेवासा फाटा, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरी गेलेले सोने जप्त करण्यात आले आहे.
178
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 28, 2026 04:45:24
1036
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 28, 2026 04:04:02
1092
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 28, 2026 04:03:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आसेगावात मृत आढळलेल्या महिलेचा खून; पोस्टमॉर्टेम अहवालातून धक्कादायक खुलासा ANC : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माळीवाडा-आसेगाव मार्गावरील पुलाखाली आढळलेल्या अनोळखी वृद्ध महिलेच्या मृत्यूबाबत मोठा खुलेआला झाला आहे. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू वाटणाऱ्या या प्रकरणात आता पोस्टमॉर्टेम अहवालातून हा खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या अहवालात महिलेच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या असून, या मारहाणीमुळेच तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे दौलताबाद पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचे तसेच आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
1063
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 28, 2026 03:50:06
Vasai-Virar, Maharashtra:सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईच्या काळात नालासोपारा पूर्वेतील धानिव परिसरातील गुजरात गॅसच्या CNG पंपावर ग्राहकांकडून जादा पैसे उकळल्याप्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई करत पंप सील केला है. इंधन दरवाढीच्या अफवांचा फायदा घेत वाहनचालकांची लूट सुरू असल्याचे समोर आले आहे. वसईचे पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी छापा टाकून कर्मचाऱ्यांना जादा पैसे घेताना रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान त्यांच्यावर धक्काबुक्की करत घेराव घालण्यात आला होता. या प्रकरणी पंप मालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा पंप कारवाई दरम्यान सील करण्यात आला आहे.
1097
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 28, 2026 03:48:56
1078
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 28, 2026 03:32:38
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातुन जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कारंजा जवळील लोहार परिसरात लोकेशन क्रमांक १९७ भीषण अपघाताची घटना घडली आहे.नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रकचा इंधन पुरवठा करणारा पाइप तुटल्यामुळे तो ट्रक रस्त्यावरच बंद पडला.हा ट्रक १०० किमी वेग मर्यादेच्या मार्गावर उभा राहिल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.सदर घटनेनंतर ट्रक चालकाने समृद्धी महामार्गावरील मदत यंत्रणा व वाहतूक पोलिसांना पहाटे ५ वाजल्यापासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र, दीर्घ वेळ कोणतीही मदत न मिळाल्याने परिस्थिती गंभीर बनली.दरम्यान,मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने बंद पडलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात एका वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला.अपघातामुळे बऱ्याच वेळ वाहतूक खोळंबली होती.घटना घडल्यानंतरही मदत यंत्रणा सुमारे दीड तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने तिच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.या विलंबामुळे एकाचा जीव गेला तसेच इतर वाहनचालकांनाही नाहक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.
1024
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 28, 2026 03:32:15
Amravati, Maharashtra:मेळघाटात जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार; युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्याकडून कामाची पोलखोल. जुना पाण्याच्या टाकीला नवीन दाखवून पैसे काढल्याचा आरोप. अँकर: अमरावतीच्या मेळघाट मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. केवळ कागदोपत्री काम झाल्याचं दाखवून लाखों रुपयांचे बिल लाटल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केला आहे. या संदर्भात राहुल येवले यांनी कामाची पाहणी करत कामाची पोलखोल केली आहे. 2022 मध्ये मेळघाटातील चिलाटी येथे जुन्या पाण्याच्या टाकीला कलर देऊन नवीन दाखवली मात्र आता ती टाकी जीर्ण झाली आहे. तसेच सरवारखेडा येथे पाण्याची टाकी असूनही त्या पाण्याच्या टाकीत एकही दिवस पाणी गेले नाही. तरीही दुसरी नवीन टाकी बांधली आता दोन्ही टाकीत एकही दिवस एकही थेंब पाणी गेलेले नाही. रुईपठारला नवीन टाकी बांधली व डोमी वरून पाईप लाईन टाकून पाणी आणले परंतु नवीन टाकीत एकही थेंब पाणी बांधली तेव्हा पासून गेलेलं नाही. सुमिता येथील जूनीच टाकी नवीन दाखवून पैसे काढ़लेत. हातरू भागातील 20/25 गावानं मध्ये 80% गावातील पाणी पुरवठा बंद आहे. युवक कॉंग्रेस पुराव्या सहित संपूर्ण प्रकार उघड करनार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी व दोषींवर कार्यवाही करण्यात यावी; अन्यथा युवक कॉंग्रेस च्या वतीने टाकिवर चढून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी राहुल येवले यांनी दिला आहे.
986
comment0
Report
Advertisement
Back to top