Back
सुप्रिया सुळे ने इंदापुर थाना पहुंचकर अधिकारी से बातचीत और आंदोलन की मांग की
JMJAVED MULANI
Oct 07, 2025 10:20:59
Baramati, Maharashtra
पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी सुप्रिया सुळे यांनी इंदापूर पोलीस ठाणे भेट दिली. पोलीस ठाण्यातूनच लावला पोलीस अधीक्षकांना फोन. इंदापूर पोलीस निरीक्षकाच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू आहे. इंदापूर मध्ये आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने 22 सप्टेंबरपासून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या विरोधात तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज या प्रकरणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट इंदापूर पोलीस ठाणे गाठलं. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत यासह इतर तक्रारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर आंदोलकांनी मांडल्या. कार्यकर्त्यांचं गार्हाणं ऐकून घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातूनच खासदार सुळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना फोन लावला. कार्यकर्त्यांनी माझ्यापुढे तक्रारी मांडल्या आहेत. मी असं म्हणत नाही की त्यांनी बरोबर असेल पण तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांच एकदा ऐकून घ्या त्यांच्याशी बोला, त्यांना भेटीचा वेळ द्या आणि मग तुम्हाला योग्य वाटतोय तो निर्णय करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. यावर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या कार्यकर्त्यांना परवाच्या दिवशी भेटीची भेट दिली आहे. इंदापूर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, वाळू उपसा, गुटखा विक्री असे विविध बेकायदा धंदे सुरू आहेत. तसेच, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तत्काळ सेवेतून निलंबित करावे अशी मागणी या आंदोलकांची आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowOct 07, 2025 12:04:300
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 07, 2025 11:50:000
Report
ABATISH BHOIR
FollowOct 07, 2025 11:49:402
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 07, 2025 11:46:330
Report
JMJAVED MULANI
FollowOct 07, 2025 11:37:430
Report
ABATISH BHOIR
FollowOct 07, 2025 11:26:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 07, 2025 11:25:310
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 07, 2025 11:19:572
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 07, 2025 11:19:420
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 07, 2025 11:12:080
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 07, 2025 11:11:300
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 07, 2025 11:11:190
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 07, 2025 11:10:380
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 07, 2025 11:09:260
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 07, 2025 11:07:460
Report