Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411018

पिंपरी चिंचवड़ भाजपा में प्रवेश की चर्चा, महेश लांडगे की भूमिका पर सस्पेंस

KPKAILAS PURI
Dec 20, 2025 14:16:43
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी चिंचवड मध्ये भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षासह सर्वच पक्षांना धक्का देत भाजपने अनेक प्रमुख नेत्यांचे प्रवेश पक्षात करून घेतले. भाजप मधल्या इनकमिंगची ही सुरुवात असून अनेक दिग्गज नेते भाजपामध्ये येणार असल्याचं आमदार महेश लांडगे यांनी म्हटल. भाजपामध्ये होत असलेल्या या प्रवेशासाठी आमदार महेश लांडगे यांचीच महत्वपूर्ण भूमिका असल्याने शहरात अजित दादा वर्सेस महेश दादा अशी लढाई सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यावर मात्र महेश लांडगे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. एकूणच भाजप प्रवेश आणि पुढे होणाऱ्या प्रवेशात संदर्भात आमदार महेश लांडगे यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Dec 20, 2025 15:02:14
Chendhare, Alibag, Maharashtra:जिल्हा परिषद, पंचायत समितीबाबत वेट अँड वॉच रायगडात महायुती बाबत सुनील सुनील तटकरे यांची भूमिका योग्य वेळी योग्य निर्णय. राज्यातील महापालिका निवडणुकीत महायुती व्हावी असं म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुती बाबत फारसे अनुकूल दिसत नाहीत. याबाबत वेट अँड वॉच एवढंच ते म्हणाले. नगर पालिका निवडणुकांचे निकाल लागायचे आहेत. महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे ते संपलं की सगळं तुम्हाला समजेल. योग्य वेळी अचूक निर्णय असं राष्ट्रवादी काँग्रेसचं ब्रीदवाक्य असल्याचं ते म्हणाले.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 20, 2025 14:45:53
Nashik, Maharashtra:नाशिक नगरपरिषद मतमोजणी एकूण 11 ठिकाणी होणार मतमोजणी (त्र्सटाणा इगतपुरी पिंपळगाव ओझर मनमाड नांदगाव सिन्नर त्र्यंबकेश्वर येवला चांदवड भगूर) लक्षवेधक नगरपरिषद त्र्यंबकेश्वर .. नगरपरिषद निवडणूक यांचा प्रचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरातून केला आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि भाजपने उमेदवार कैलास घुले यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती या ठिकाणी शिंदे शिवसेने च्या त्रिवेणी तुंगार यांनी जोरदार लढत दिली आहे भगूर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मस्थान असलेली ही नगरी गेल्या तीन दशकापासून ठाकरे शिवसेनेच्या ताब्यात होती त्यानंतर पहिल्यांदाच शिंदे शिवसेनेची निवडणूक होत आहे. उपनेते विजय करंजकर यांच्या सुविनय पत्नी अनिता करंजकर या निवडणूक लढवत आहे त्यांना अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या प्रेरणा बलकवडे यांनी सर्व पक्षांचे मोट उभारता काटेकी टक्कर दिली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही इथे सभा घेऊन निवडणूक रंगतदार बनवली होती येवला छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात यंदा येवला नगर परिषदेचे निवडणूक पार पडली नेहमीच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठरलेली ही नगरपरिषद यावेळेस कोणाच्या ताब्यात जाते याकडे लक्ष लागले आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला पराभूत करण्यासाठी शिंदे सेना आणि शरद पवार गटाची अनोखी युती येथे पाहायला मिळाली सिन्नर माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील ही निवडणूक ही निवडणूक यावेळी भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत माणिकराव कोकाठे यांना शह देण्याचा प्रयत्न केला याच नगर परिषदेच्या प्रचारात माणिकरावांनी भाजप हा बाटलेला पक्ष आहे असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे संपूर्ण राज्यात इथे कोण निवडून येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 20, 2025 14:45:42
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 20, 2025 14:31:03
Junnar, Pune, Maharashtra:अबब 85 जंबो कढई आमटी, 100 क्विंटल धान्यापासून बनवलेल्या लाखो भाकरी अशा आमटी भाकरीच्या प्रसिद्ध असलेल्या जुन्नर तालुक्यातील आणे येथील श्री रंगदास स्वामी महाराजांचा यात्रा उत्सव सुरू झाला असून 138 वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रा उत्सव काळात लाखो भाविक दर्शन घेऊन येथील आमटी भाकरी महाप्रसादाचा आस्वाद घेतात 500 लिटरच्या 85 जंबो कडया या आमटी भाकरीचं खास वैशिष्ट्य असून पुढील दहा वर्षांचं या महाप्रसादाच्या मसाल्यांच अन्नदात्यांच बुकिंग हि आधीच झालंय त्यामुळे प्रसिद्ध असलेल्या यात्रा उत्सवासाठी वर्षानुवर्ष भाविकांची रीघ वाढत चाललीय या अनोख्या यात्रा उत्सवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुतडे यांनी...
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 20, 2025 14:16:17
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 20, 2025 13:11:04
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 20, 2025 13:06:31
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. शिवसेनेच्या कोर कमिटी कडून सर्व 111 विभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या आहेत. दिवसभरात तब्बल 800 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून तिकीट कोणाला द्यायचे यासाठी मोठी कसोटी लागणार आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपा या दोन्ही पक्षाकडे 800 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असल्याने युतीची शक्यता धूसर असली तरी वरिष्ठ निर्णय घेतील त्याप्रमाणे कार्यकर्ते काम करतील अशी प्रतिक्रिया संपर्क प्रमुख अंकुश कदम यांनी व्यक्त केलेय.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 20, 2025 13:06:03
Kalyan, Maharashtra:कल्याण उल्हासनगरला जोडणारा उड्डाणंपुल आज रात्री बारा वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद. कल्याण पूर्व पश्चिम उल्हासनगरला जोडणारा वालधुनी उड्डाणंपुल आज रात्री 20 डिसेंबर पासून ते 10 जानेवारी विस दिवस डांबरीकरण आणि बेअरिंग रिप्लेसमेंट एक्सपांशन जॉईंट (Bearing Replacement Expansion Joint) चे काम करण्यात येणार असल्याने उड्डाणंपुल संपूर्णतः वाहतुकीसाठी बंद करणार आहे या उड्डाणंपुल चे काम केडीएमसी कडून हाती घेण्यात आले आहे उल्हासनगर ला जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून शहाड मार्गे वळवण्यात आले आहे तसेच वालधूनीला जाण्यासाठी कल्याण पूर्वेतून धर्मवीर आनंद दिघे उड्डाणंपुल येथून जाता येईल असे अधिसूचना ठाणे वाहतूक विभागाकडून काढण्यात आल्या आहेत.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 20, 2025 13:02:55
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 20, 2025 12:50:49
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये बोगस मतदार मतदानासाठी आल्याचा आक्षेप घेतला गेल्याने गोंधळ निर्माण झाला. काँग्रेस व शिवसेना उबाठा च्या उमेदवारांनी बोगस मतदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामीण भागातील सात ते आठ व्यक्ती आधार कार्ड घेऊन डायाभाई पटेल शाळेतील मतदार केंद्रावर पोहोचले असता त्यांच्या संशयास्पद हालचालींवरून उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडे आधार कार्ड आढळून आले, आम्हाला मतदानासाठी या ठिकाणी आणले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलيسांनी संबंधितांची विचारपूस सुरू केली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top