Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410401

मावल में आतिशबाजी से गन्ने के खेत जलकर खाक, किसानों को बड़ा नुकसान

CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 22, 2025 05:01:35
Pune, Maharashtra
दिवाळीचा सण साजरा करताना नागरिक आनंदात मग्न असताना, मावळ तालुक्यातील कासारसाई परिसरात मात्र दुर्दैवी प्रकार घडला आहे. फटाक्यांच्या आतिशबाजीमुळे शेतकऱ्याच्या शेतातील उसाने पेट घेऊन जळून खाक झाला. या आगीत शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ऊसाचे मोठे क्षेत्र जळून गेले होते. कृषी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Oct 22, 2025 16:10:51
Shirdi, Maharashtra:शरद पवार गटाला अहिल्यानगरमध्ये मोठा राजकीय धक्का बसणार ; खंदा समर्थक पवारांची साथ सोडणार..? शरद पवारांचे अकोले येथील खंदे समर्थक अमित भांगरे भाजप नेते तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या भेटीला... राष्ट्रवादीचे अमित भांगरे भाजपात जाणार..? आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने भांगरे कुटुंबीयांनी घेतली विखे पाटलांची भेट... राष्ट्रवादीच्या सुनीता भांगरे , मुलगा अमित भांगरे आणि भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात घेतली भेट... अनुसूचित जमातीसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव झाल्याने हालचालींना वेग... अमित भांगरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवकचे जिल्हाध्यक्ष... अमित भांगरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढवली होती विधानसभा निवडणूक...
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 22, 2025 15:19:24
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 22, 2025 15:02:39
Dhule, Maharashtra:नंदुरबार शहरात आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. वादळ वाऱ्यासह नंदुरबार शहरात आणि परिसरात पावसाबने एन दिवाळीत दैना केली. नंदुरबारात होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच परतीच्या पावसामुळे हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे तर त्यातच पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पीक कापणीवर आलेले आहेत त्यामुळे होत असलेल्या या पावसामुळे या पिकांना मोठा फटका बसणार आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेला नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील नागरिक एकाच वेळेस उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यात या तीनही ऋतूनचा अनुभव घेत आहेत.
2
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 22, 2025 14:09:53
Pandharpur, Maharashtra:सावळें सुंदर रूप मनोहर! दीपावली पाडवा निमित्त आज श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेस हिरेजडित सुवर्ण अलंकारांनी सुशोभित करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली बलीप्रतिपदा / दिवाळी पाडवा या पवित्र दिवशी दुपारी पोशाखावेळी पारंपरिक पद्धतीने श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान केले श्री विठ्ठलास आज परिधान केलेले अलंकार : सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेट्या, हिऱ्याची कंगन, मोत्याची कंठी, मोत्याचा तुरा, शिरपेच, मत्स्य जोड, तोडे, हिऱ्याचा कंबरपट्टा, मोर मंडोळी, तुळशीची माळ, अष्टपैलू मन्याची कंठी, बाजीराव कंठी, नवरत्नाचा हार, तसेच सोन्याचे पितांबर. श्री रुक्मिणी मातेस आज परिधान केलेले अलंकार : मुकुट, मोठी नथ, कर्णफुले जोड, मत्स्य जोड, हातसर, शिंदे हार, नवरत्नाचा हार, चिंचपेटी, पाचूची गरसोळी, खड्याच्या पाटल्या, सूर्य, चंद्र, मद्रासी कंठा, दशावतारी हार, हार, बिंदी, बाजीराव गरसोळी, मास पट्टा, तारामंडल, तोडे, रूळ, सोन्याचा करंडा, साखळी, बाजूबंद जोड, खड्याची वेणी, सोन्याची साडी तसेच छत्र-छामर.
1
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 22, 2025 14:09:29
1
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 22, 2025 12:30:46
Bhandara, Maharashtra:भंडारा जिलेतील जांभोरा (पालोरा) येथे गोवर्धन पूजेची अनोखी प्रथा पाहायला मिळते. मागील 150 वर्षांपासून परतेकी कुटुंबाच्या प्रमुखाच्या अंगावरून गावातील पूर्ण गोधन सोडले जाते. परंतु, आजवर त्या गुरख्याला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा झाल्याचा प्रकार घडला नाही हे विशेष.... आधल्या दिवशी रात्रीला ढाल जागणे कार्यक्रम गुरख्याच्या वतीने गाईंच्या मालकाच्या घरी जाऊन बोजरा मागितली जाते व त्या घरातील सुहासिनी कडून त्या ढालीचे पूजन केले जाते. व गावातील कोणत्याही जनावरांवर कोणत्याही प्रकारे रोगराई येऊ नये म्हणून ग्रामदेवतेला साकडे घातले जाते. अशाप्रकारे दरवर्षी ही परंपरा कायम ठेवली जाते यंदाही हा कार्यक्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडला परिसरातील नागरिकांनी एकाच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top