Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423203

मालेगांव गैस सिलेंडर विस्फोट: गिरफ्तार दो आरोपी, CCTV फुटेज सामने

VNVishal Nagesh More
Jan 27, 2026 12:23:03
Malegaon, Maharashtra
मालेगांव नाइट्रोजन गैस सिलेंडर विस्फोट मामला – दो लोगों की गिरफ्तारी. कल सुबह गणतंत्र दिवस की फुगे फोड़ते समय विस्फोट. विस्फोट में फुगे लेने के लिए रुकने वाले पांच घायल. विस्फोट से क्षेत्र में हड़कंप मचा. फुगे विक्रेताओं को गिरफ्तार किया गया. आगे की जांच पुलिस कर रही है. सिलेंडर विस्फोट के बाद शहर में फुगे विक्रेताओं की कड़ी जांच शुरू. विस्फोट घटना CCTV में कैद. भयावह घटना.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Jan 27, 2026 14:02:37
Akola, Maharashtra:अकोल्याच्या शासकीय हमीभाव केंद्रावर सोयाबीन विकून वर्ष उलटूनही पैसे न मिळाल्याने अनेक शेतकरी हताश झाले आहेत. या गंभीर प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील झाडेगाव येथील शेतकरी बाबुराव शिवशंकर माळी यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी निवेदन देत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. बाबुराव माळी यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील आंदुरा येथील नाफेड केंद्रावर सोयाबीन विक्री केली होती. मात्र एक वर्ष पूर्ण होऊनही माळी यांच्या खात्यावर अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही. विशेष म्हणजे, सोयाबीन विक्रीच्या सर्व अधिकृत पावत्या माळी यांच्याकडे उपलब्ध आहेत. काही दिवसांपूर्वी याच संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर आंदुरा येथील संबंधित ॲग्रो प्रोड्युसर कंपनीवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, कारवाई होऊनही माळी यांच्यासह एकाही शेतकऱ्याला अद्याप पैसे मिळालेले नाहीत. सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने शेतकरी अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा देत आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून शेतकऱ्यांची थकीत रक्कम तातडीने अदा करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Jan 27, 2026 13:51:00
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी गुरुवारी 6 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे... ही निवड प्रक्रिया नाशिक, धुळे, जळगावसह राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये एकाच दिवशी पार पडणार आहे... या विशेष सभेसाठी विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे... अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी AP ने 27 तर भाजपने 25 जागांवर विजय मिळवला आहे...महापौर आणि उपमहापौर निवडीकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले असून, या सभेत कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Jan 27, 2026 13:48:21
Latur, Maharashtra:निलंगा तालुक्यात तींंबळा जिल्हा परिषद गटात अपहरणाच्या आरोपानंतर राजकीय उलथापालथ झाली. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अंजली सुनिल चौधरी यांच्या अपहरणाचा आरोप काँग्रेसकडून लातूर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अंजली चौधरी पोलीस बंदोबस्तात समोर आल्या आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला. या घडामोडींमुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. दरम्यान या गटात भाजप आणि अपक्ष असे दोनच उमेदवार उरले असून, अपक्ष उमेदवार हा भाजपचा पर्यायी उमेदवार म्हणून भरलेला होता. मात्र ऐनवेळी तो उमेदवार फॉर्म न काढता अचानक गायब झाल्याने त्याचा अर्ज तसाच कायम राहिला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 27, 2026 13:45:13
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर महापालिकेत एमआयएमच्या गट नेतेपदी वाहिदा बानो शेख यांची निवड सोलापूर महापालיקेत एमआयएमच्या गट नेतेपदी वाहिदा बानो शेख यांची निवड सोलापूर महापालालकेत एमआयएमचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत भाजप नंतर एमआयएम सोलापुरात दुसरा मोठा पक्ष असणार आहे त्यामुळे एमआयएमचा गटनेता कोण असेल याची चर्चा सर्वत्र होती अखेर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सोलापूर महापालिकेच्या एमआयएमच्या गटनेते पदी वाहिदा बानो शेख यांची निवड झाल्याचे जाहीर केलं आहे वाहिदा बानो शेख ह्या दुसऱ्यांदा एमआयएमच्या तिकिटावर सोलापूर महापालिकेत विजयी झाल्या आहेत
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Jan 27, 2026 13:33:56
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jan 27, 2026 13:18:52
Shirur, Maharashtra:मंचर/पुणे पारगांव जारकरवाड़ी जिल्हा परिषद गटातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बंडखोर पूजा वळसे पाटील यांनी माघार घेतली; माघारानंतर पूजा वळसे पाटील यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने त्या पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील शिंदे शिवसेनेचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा प्रचार करणार आहेत. येथे अरुण गिरे व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुतणे व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्यात लढत होत असून भाजपचे किरण वाळुंज रिंगणात आहेत. तर घोडेगाव पंचायत समितीमधून ठाकरे शिवसेनेचे बंडखोर नंदकुमार बोऱ्हाडे यांनी माघार घेतली आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Jan 27, 2026 11:23:41
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - माजी खासदार संजयकाका पाटलांच्या सुपुत्राने जिल्हा परिषद निवडणुकीतून घेतली माघार सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक मोठी घडामोडी सांगलीच्या तासगाव मध्ये घडली आहे. तासगाव तालुक्यातील चिंचणी जिल्हा परिषद गटातून माजी खासदार व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजयकाका पाटलांचे पुत्र प्रभाकर पाटलांनी माघार घेतली आहे. प्रभाकर पाटील यांच्याकडून चिंचणी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अपक्ष अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी प्रभाकर पाटलांनी आपले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या ठिकाणी प्रभाकर पाटलांच्या विरोधात त्यांच्याच भावकीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अक्षय पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरलेत, त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने भावकीत वाद निर्माण होऊ नये, यासाठी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याचे संजयकाका पाटील प्रभाकर पाटलांच्याकडून स्पष्ट करण्यात आलाय. प्रभाकर पाटलांच्या अर्ज माघारीमुळे आमदार रोहित पाटलांनी निवडणुकीच्या आधीच प्रभाकर पाटलांना चितपट केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Jan 27, 2026 11:04:05
Pune, Maharashtra:Headline : प्रचाराच्या रणधुमाळीत ताजे ग्रामस्थांचा समस्यांचा पाडा Anchor: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्रचार शिगेला पोहोचला असून कार्ला खडकाळा जिल्हा परिषदेच्या भाजप उमेदवार आशा वायकर आणि खडकाळा पंचायत समितीचे उमेदवार प्रकाश गायकवाड यांच्या प्रचारार्थ ताजे गावात भाजपने शक्तिप्रदर्शन करून कोपरा सभा घेतली.. यादरम्यान ताजे ग्रामस्थांनी उमेदवार यांच्या समोर समस्यांचा पाडा वाचला, मुख्य समस्या, छोटे खड्डेमय रस्ते, कचरा, आणि पिण्याचे पाणी एकीकडे या भागात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात असूनही नागरिकांना पाण्याची समस्या सतावत असून येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा मुक्त गाव करण्याचे आश्वासन भाजपने दिले असले तरी प्रत्यक्षात जेव्हा सर्व नागरी सुविधा येथील नागरिकांना मिळतील तेव्हाच दिलासा मिळणार.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Jan 27, 2026 11:03:45
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 27, 2026 10:49:46
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: अक्कलकोटमध्ये अर्ज मागे घेण्याला काही मिनिटे शिल्लक असताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपला पाठिंबा. अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसने शिवसेना शिंदे गटासोबत युती केल्याने ठाकरेंच्या तालुकाप्रमुखाचा भाजपला पाठिंबा. विशेष म्हणजे तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरेंनी झेडपीचा उमेदवारी अर्ज मागे घेत पदाचा राजीनामा देत भाजपला पाठिंबा दिलाय. महाविकास आघाडीतील काँग्रेसने शिवसेना शिंदे गटासोबत युती केल्याने आम्ही आमचे अर्ज मागे घेत भाजपला पाठिंबा दिला. अक्कलकोट मध्ये काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचा बिमोड करण्यासाठी आम्ही पदाचा राजीनामा देत भाजपला पाठिंबा दिला. काँग्रेसने महाविकास आघाडीच्या विचाराला हारताळ फासल्याने आम्ही अर्ज मागे घेत, पक्षाचा राजीनामा देऊन भाजपला पाठिंबा देतोय. अक्कलकोट मध्ये काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने युती केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झालेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top