Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423203

मालेगांव आझाद नगर में लाखों के घरफोड़ों के 40 के करीब बदमाश गिरफ्तार

VNVishal Nagesh More
Dec 25, 2025 01:46:02
Malegaon, Maharashtra
- तब्बल 40 च्या आसपास गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद - मालेगावातील घरफोडी प्रकरणात पोलिसांनी केला जेरबंद मालेगाव आझाद नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत लाखोंची घरफोडी झाली असल्याच्या कारणावरून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 4 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल व घरफोडी करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. यातील कलीम नाना या संशयित आरोपीवर तब्बल 40 च्या आसपास गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या पोलिस पुढील कारवाई करीत आहेत。
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Dec 25, 2025 03:30:58
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 03:30:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर भाजपच्या कोअर कमिटीने बुधवारी वरिष्ठांच्या आदेशानुसार चार तास महायुती करण्यावर काथ्याकूट केला. दोन पावले आम्ही मागे आलो आहोत. दोन पाऊल त्यांना मागे यावे लागेल, अशी प्रतिक्रिया ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिली त्यामुळं महायुती साठी आता मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येतेय... शिंदसेनेच्या नेत्यांसोबत गुरुवारी दुपारनंतर जागा वाटपाबाबत चर्चा होईल, त्यानंतर महायुती करायची की नाही याचा निर्णय होणार आहे. वरिष्ठ पातळीवरून सुरू असलेल्या फोनमुळे बुधवारी ऐनवेळेवर कोअर कमिटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन चिंतन केले. शिंदेसेनेसोबत जाताना फरपट होऊ नये, दोन्ही बाजूंनी मतविभाजन होणार नाही, याची काळजी घ्यावी. यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 25, 2025 03:18:12
Washim, Maharashtra:कारंजा येथे रात्री १० वाजताच्या सुमारास bhiषण अपघात झाला. रिलायन्स पेट्रोल पंपासमोर बोलेरो पिकअप आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हरिश हेडा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हरिश हेडा दुचाकीवरून जात असताना बोलेरो पिकअपने त्यांना धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. नगर परिषद निवडणुकीत हरिश हेडाच्या पत्नीने नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती. निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसांत ही दुर्दैवी घटना घडल्याने मनसे कार्यकर्ते, समर्थक आणि परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 03:16:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:माजी आमदार अनिल गोटे याना औरंगाबाद खंडपीठाने दणका दिलाय... तक्रारदार, गुंतवणूकदार किंवा बँकेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य नसल्यामुळे 'कायदेशीर अधिकार नसताना' याचिका दाखल करून न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालविल्याबद्दल माजी आ. अनिल गोटे यांनी जनहित याचिका दाखल करताना अनामत म्हणून जमा केलेले एक लाख रुपये जप्त करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. त्या अनामत रकमेपैकी प्रत्येकी ५० हजार रुपये अनुक्रमे नांदेड येथील माता अनुसया शासकीय महिला राज्यगृह आणि आर्वी येथील भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान या संस्थांना देण्याचे आदेशीत करण्यात आले आहे... याचिका केवळ तपास यंत्रणा आणि आरोपींवर दबाव टाकण्यासाठी दाखल केल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 25, 2025 03:05:42
Dhule, Maharashtra:सप्तपुडा जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात पारंपरिक पद्धतीने भगर काढणीला सुरुवात झाली आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये भगर अर्थात मोरबंटी या पारंपरिक धान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात लागवड केली जाणाऱ्या भगर पिकाची कापणी सध्या वेगाने सुरू असून, अनेक ठिकाणी आजही शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साहाय्याने मळणी करून भगर काढताना दिसत आहेत. सातपुडा परिसर हा राज्यातील भगर उत्पादनाचे प्रमुख केंद्र मानला जातो. येथील आदिवासी शेतकरी पिढ्यानपिढ्या भगर लागवड करत असून, रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने हे पीक घेतले जाते. त्यामुळे सातपुड्यातील भगरला विशेष दर्जा प्राप्त झाला असून देशभरातून या सेंद्रिय भगरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेषतः उपवासाच्या काळात सातपुड्यातील भगर बाजारात मोठ्या प्रमाणात पाठवली जाते. मात्र, यावर्षी अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा फटका भगर उत्पादनाला बसला आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले असून, उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तरीही प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी मेहनतीने काढणी आणि मळणीचे काम पूर्ण करत आहेत.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 25, 2025 03:05:28
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 25, 2025 03:04:17
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 03:03:36
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक, नैतिक आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने कडक कार्यपद्धती निश्चित केली आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित कोणतीही गंभीर घटना वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक किंवा समाजमाध्यमातून शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी स्वतःहून तातडीने चौकशी करावी. विद्यार्थ्यांना छडी मारल्यास शारीरिक इजा झाल्यास शिक्षकांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत, विद्याथ्यर्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा किंवा मानसिक छळ पूर्णपणे प्रतिबंधित केला आहे. कान किंवा केस ओढणे, उठा-बशा काढायला लावणे, उन्हात किंवा अंगठे घरून उभे करणे, गुडघ्यावर बसवणे अशा सर्व प्रकारच्या शिक्षांना स्पष्ट मनाई केली आहे. तसेच विद्याथ्यर्थ्यांना शाब्दिक, मानसिक अपमान करणे, नाव ठेवणे, कमी लेखणे, धर्म, भाषा, लिंग, आर्थिक स्थिती, अपंगत्व अथवा शैक्षणिक कामगिरीच्या आधारे भेदभाव करणे देखील योग्य नसल्याचे आदेशात म्हटले आहे, उल्लंघन केल्यास शिक्षकांवर कारवाई होणार आहे..
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 25, 2025 02:52:39
Parbhani, Maharashtra:अँकर-परभणी मनपाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र खरेदीवर इच्छुकांनी भर दिला. मात्र, दुसऱ्या दिवशीही अर्ज सादरीकरणाचा भोपळा मात्र फुटला नाहीये . त्यामुळे दोन दिवसात केवळ अर्ज खरेदीला उमेदवारांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. मनपाच्या प्रभाग समिती ब येथील कार्यालयात दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत नामनिर्नेशन पत्र दिले जात आहेत. हे अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुक उमेदवार येथे येत आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ६५३ नामनिर्देशन पत्राची विक्री झाली होती तर दुसऱ्या दिवशी ५०९ नामनिर्देशन पत्र विक्री झाले होते. परंतु दुसऱ्या दिवशी ही एकाही उमेदवाराचा अर्ज दोन दिवसात दाखल झाला नाहीये.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 02:49:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्य सरकारने तुकडेबंदीचा कायदा रद्द केला. १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वीचेच तुकडे नोंदवण्याचे आदेश ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दिले. तरीही छत्रपति संभाजी नगर जिल्ह्यात नव्या तुकड्यांची सर्रास नोंदणी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. रहिवासी वापर नसलेल्या, शेतजमीन म्हणून नोंद असलेल्या भूखंडांचेही तुकडे पाडले जात आहेत. या प्रकाराची तक्रार पुराव्यासह थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली. त्यामुळे नोंदणी विभागात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात यापूर्वीही बेकायदा तुकड्यांची नोंदणी झाली. दोषींवर कारवाई झाली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचे मनोबल वाढले.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 02:46:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात थंडीचा कडाका आता अधिक तीव्र होणार असून हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी निरभ्र आकाशाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः २६ आणि २७ डिसेंबर रोजी किमान तापमानाचा पारा ११ अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देताना शहरवासीयांना हुडहुडी भरवणारा गारठा अनुभवावा लागेल. बुधवारी  शहराचे कमाल तापमान २८.० अंश सेल्सियस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा १ अंशाने कमी होते. तर किमान तापमान १२.४ अंश इतके राहिले. हवेतील आर्द्रता सायंकाळी ४० टक्क्यांपर्यंत खाली आल्याने कोरडा गारठा वाढला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचे किंवा ढगाळ हवामानाचे कोणतेही संकट नसून हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे.
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top