Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर महापालिका चुनाव: महाविकास आघाडी नहीं बने तो स्वबळ पर लड़ने की तैयारियाँ

VBVAIBHAV BALKUNDE
Dec 28, 2025 10:35:06
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज स्किप्ट ::- लातूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी नाही झाल्यास स्वबळावर लढण्याची आमची तयारी .... शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री विनायकराव पाटील यांची माहिती... AC::- लातूर महापालिका निवडणुकीला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जाण्याची आमची भूमिका आहे... मात्र, जर महाविकास आघाडी नाही झाली तर, स्वबळावर या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी लातुरात दिली... दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी करण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू असून, याशिवाय मनसे आणि वंचित बहुजन आघाडीशीही युतीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Dec 28, 2025 12:19:47
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 28, 2025 11:51:27
Washim, Maharashtra:शिरपूर येथील जैन मंदिरातील दिगंबर पुजाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शिरपूर पोलीस ठाण्यावर सिद्धांत सागर महाराज यांच्या नेतृत्वात दिगंबर समाजा कडून इशारा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. शिरपूर येथील चार ते पाच गावगुंडांनी मंदिरातील दिगंबर पंथीय पुजाऱ्यांवर २५ डिसेंबर रोजी हल्ला केल्याची घटना घडली होती. वारंवार अन्याय होऊनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवकारवाई होत नसल्याचा आरोप दिगंबर पंथीयांकडून करण्यात आलाय. तर या घटने संदर्भात जखमींचे जबाब घेतले असून त्यांनी आम्ही ठीक झाल्यावर पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल करू अशी माहिती दिल्यानं केवळ स्टेशन डायरीला नोंद करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्याची कारवाई करू असं पोलिसांकडून सांगण्यात आलय
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 28, 2025 11:16:05
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 28, 2025 10:51:30
Nanded, Maharashtra:नांदेड महापालालिकेत महायुती आणि महाविकास आघाडीचे त्रांगडे कायम आहे. केवळ बैठका आणि चर्चा सुरू असून त्याबाट कुठलाही निष्कर्ष अजूनही निघालेला नाही. भाजप शिवसेनेच्या अनेक बैठक आणि चर्चा झाल्या पण त्यातून युती बाबत कुठलाही निर्णय झाला नाही. चर्चा सुरु असून मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती होईल असे संकेत राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले. भाजपकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही त्यामुळे तो विषय संपल्यात जमा आहे असे चिखलीकर म्हणाले. शिवसेनेसोबत सकारात्मक चर्चा झाली असून एक-दोन दिवसात युतीबाबत निर्णय होईल असे चिखलीकर म्हणाले. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मध्येही आघाडीबाबत चर्चा झालीये. चर्चेतून मार्ग निघाला नसला तरी एक दोन दिवसात निर्णय होईल असे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी सांगीतले. त्यामुळे युती आणि आघाडीबाबत चर्चा सुरु असल्या तरी अजून कुठलाही निर्णय स्थानिक स्तरावर झालेला नाही. सर्वच पक्ष वेट अँड वॉच च्या भूमिकेत दिसत आहेत.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 28, 2025 10:17:00
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - महायुती बाबत अस्पष्टता,राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गट आघाडीकरून लढण्याच्या हालचाली. अँकर - सांगली महापालिका निवडणुकीमध्ये महायुती होणार की नाही,याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.अंतर्गत गटबाजीमुळे उमेदवारांच्या यादीवरून भाजपात संघर्ष सुरू आहे.त्यामुळे भाजपाने महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे पक्षाबरोबर युतीच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली नाही,मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने पक्षातल्या इन्कमिंगमुळे स्वबळाचा नारा दिलाय,तर शिवसेना शिंदे पक्षाची काय करायचे,अशी स्थिती झाली आहे.त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने माहितीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्याात.शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांची भेटी घेण्यात आल्या असून आघाडी बाबत प्राथमिक बैठक देखील पार पडली आहे.त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची आघाडी होण्याची शक्यता नाकारता
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 28, 2025 10:15:54
Gadchiroli, Maharashtra:टायटल: बदलत्या गडचिरोलीचे बदलते स्वरूप, नक्षल दहशत संपुष्टात येताना गडचिरोली महोत्सवाचा जल्लोष, चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा यांचे श्रवणीय गझल गायन अँकर: गडचिरोलीत सध्या जिल्हा महोत्सव सुरू आहे. याच महोत्सवात चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे खुमासदार गझल सादर करून जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा यांनी उपस्थितांची मने जिंकली. महोत्सवात अनेक मराठी सेलेब्रिटीनी आपापली कला सादर केली. मात्र आयएएस अधिकाऱ्यांत लपलेला एक गायक मात्र सर्वांना भारावून गेला. नक्षल दहशत संपुष्टात येताना गडचिरोली महोत्सवाचा जल्लोष सुखावणारा होता मात्र त्याहून अधिक म्हणजे बदलत्या गडचिरोलीचे मोहक स्वरूप दर्शविणारा होता. -----अविष्यांत पांडा यांनी गायलेली गझल--- आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
comment0
Report
Advertisement
Back to top