Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना महापालिका चुनाव: भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी की युति तैयार, 65 सीटों पर दांव

NMNITESH MAHAJAN
Dec 25, 2025 02:17:27
Jalna, Maharashtra
जालना : युतीसाठी भाजपचे गोरंटयाल 40,शिवसेनेचे खोतकर 35 तर राष्ट्रवादीचे चव्हाण 5 जागांवर आडून जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ६५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी प्रमुख राजकीय पक्षांमधील युतीचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम इच्छुक उमेदवारांवर आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होत आहे. दरम्यान, भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील युतीबाबत बैठका सुरू आहेत. भाजपचे कैलास गोरंट्याल 40, शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर 35, तर राष्ट्रवादीचे अरविंद चव्हाण हेसुद्धा 5 जागांवर आडून आहेत. दुसरीकडे 20 दिवसांवर मतदान प्रक्रिया येऊन ठेपली आहे. युतीबाबत घोषणा नसल्याने मतदार संभ्रमात पडलेले दिसतायत. भाजपचे लोकप्रतिनिधी युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यावा, अशी भूमिका घेत आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी भाजपवर निर्णयाची जबाबदारी ढकलताना दिसत आहेत.दरम्यान युती न झाल्यास स्वबळावर निवडणुक लढवण्याची तयारी या पक्षांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Dec 25, 2025 04:00:30
Nashik, Maharashtra:जन्म दाखल्यासाठी ४ हजारांची लाच घेताना महापालिकेचा सफाई कर्मचारी व खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात जन्म दाखला काढून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नाशिक महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी व एका खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कैलास मधुकर साळवे आणि हरिष दिवाकर पत्की यांचा समावेश आहे. तक्रारदार यांच्या विवाहित मावस बहिणीचा जन्म दाखला उपलब्ध नसल्याने नाशिकरोड महापालिकेत चौकशी करण्यात आली होती. संबंधित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर खासगी एजंट हरिष पत्की याने महापालिकेतील ओळखीचा गैरफायदा घेत ५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ४ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. एसीबी नाशिक पथकाने सापळा रचून खासगी एजंटला ४ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याने महापालिकेतील कर्मचारी कैलास साळवे याच्याशी फोनवर संपर्क साधून लाच स्वीकारल्याची माहिती दिली. या संभाषणातून लाच मागणी व स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला...
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 25, 2025 04:00:11
Shirur, Maharashtra:वाघोली पुणे शेकोटीभोवती रंगू लागल्या निवडणुकीच्या गप्पा ANC....थंडीचा तडाका मोठ्या प्रमाणात वाढल्याने पहाटे व रात्री तापमानात लक्षणीय घट जाणवत आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपडे तसेच शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. वाघोली आव्हाळवाडी परिसरात तरुणांसह ज्येष्ठ नागरिक शेकोटीभोवती जमून थंडीवर मात करत असून याचवेळी सध्या सुरू असलेल्या निवडणूक व राजकीय घडामोडींवर चर्चाही रंगताना पाहायला मिळत आहेत. थंडीने वातावरण गारठले असले तरी शेकोटीभोवत्त्याच्या गप्पांमुळे परिसरात आपुलकीची उब निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया वाघोली पुणे
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 25, 2025 03:46:13
Nashik, Maharashtra:नाशिकच्या वाडीवऱ्हे जवळ मृत बिबट्या आढळला मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट.... अँकर नाशिक जिल्ह्यातील वाडिवर्हे परिसरात एक मृत बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी ही बाब लक्षात येताच तात्काळ वनविभागाला माहिती दिली.वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता बिबट्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्यापही गूढ कायम आहे.बिबट्याचा मृत्यू आजारामुळे, विषबाधेमुळे की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, वाडीवर्हे परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या वावराच्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 25, 2025 03:34:12
Nashik, Maharashtra:शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून सायबर भामट्यांकडून ५८ लाखांची फसवणूक.... अँकर नाशिकमध्ये शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १५ ते २० टक्के मासिक नफ्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी दोन तक्रारदारांची मिळून सुमारे ५८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. अज्ञात आरोपींनी व्हॉट्सअप कॉल आणि मेसेजद्वारे तक्रारदारांशी संपर्क साधत फॉरेक्स व शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे भासवले. त्यानंतर एपीके लिंक पाठवून ‘फॉरेक्स मसनजी’ नावाचे बनावट ट्रेडिंग अप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. या अपद्वारे ट्रेडिंग सुरू असल्याचा भास निर्माण करत पहिल्या तक्रारदाराकडून सुमारे २७ लाख ९४ हजार ७४ रुपये, तर दुसऱ्या तक्रारदाराकडून २९ लाख ८८ हजार रुपये गुंतवणूक करून घेण्यात आली. मात्र नंतर पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात विविध बँक खाते, वॉलेट खाते व मोबाईल क्रमांकधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 25, 2025 03:32:58
Nashik, Maharashtra:त्र्यंबकेश्वरमध्ये गावठी कट्टा बाळगत दहशत माजवणाऱ्या संशयिताला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे...गुप्त बातमीच्या आधारे सापळा रचून संशयित देवराम संतु सोनवणे याला अटक करण्यात आली. त्याच्या झडतीदरम्यान एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक मोटारसायकल आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विनापरवाना घातक अग्नीशस्त्र बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार अवैध व्यवसायांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 25, 2025 03:31:32
Satara, Maharashtra:सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली अभयारण्यात निसर्गमुक्त करण्यात आलेली 'तारा' वाघीण पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यात असलेल्या माईंगडेवाडी गावाजवळ आढळून आली. माईंगडेवाडी येथील मुक्कामी एसटी मार्गस्थ होत असताना रस्त्याजवळच्या झुडूपातून ही वाघीण अचानक रस्त्यावर आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक वाघ समोर आल्यामुळे रस्त्यातून प्रवास करणाऱ्या इतर चालकांनीही वाहने रस्त्यातच थांबवली. रस्ता ओलांडून ही वाघीण नजीकच्या गवताळ भागात निघून गेली. 'तारा' वाघीणीचा हा मुक्त संचार पर्यावरण प्रेमींसाठी दिलासादायक असून परिसरातील ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 25, 2025 03:30:58
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 03:30:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर भाजपच्या कोअर कमिटीने बुधवारी वरिष्ठांच्या आदेशानुसार चार तास महायुती करण्यावर काथ्याकूट केला. दोन पावले आम्ही मागे आलो आहोत. दोन पाऊल त्यांना मागे यावे लागेल, अशी प्रतिक्रिया ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिली त्यामुळं महायुती साठी आता मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येतेय... शिंदसेनेच्या नेत्यांसोबत गुरुवारी दुपारनंतर जागा वाटपाबाबत चर्चा होईल, त्यानंतर महायुती करायची की नाही याचा निर्णय होणार आहे. वरिष्ठ पातळीवरून सुरू असलेल्या फोनमुळे बुधवारी ऐनवेळेवर कोअर कमिटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन चिंतन केले. शिंदेसेनेसोबत जाताना फरपट होऊ नये, दोन्ही बाजूंनी मतविभाजन होणार नाही, याची काळजी घ्यावी. यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 25, 2025 03:18:12
Washim, Maharashtra:कारंजा येथे रात्री १० वाजताच्या सुमारास bhiषण अपघात झाला. रिलायन्स पेट्रोल पंपासमोर बोलेरो पिकअप आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हरिश हेडा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हरिश हेडा दुचाकीवरून जात असताना बोलेरो पिकअपने त्यांना धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. नगर परिषद निवडणुकीत हरिश हेडाच्या पत्नीने नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती. निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसांत ही दुर्दैवी घटना घडल्याने मनसे कार्यकर्ते, समर्थक आणि परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 25, 2025 03:16:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:माजी आमदार अनिल गोटे याना औरंगाबाद खंडपीठाने दणका दिलाय... तक्रारदार, गुंतवणूकदार किंवा बँकेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य नसल्यामुळे 'कायदेशीर अधिकार नसताना' याचिका दाखल करून न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालविल्याबद्दल माजी आ. अनिल गोटे यांनी जनहित याचिका दाखल करताना अनामत म्हणून जमा केलेले एक लाख रुपये जप्त करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. त्या अनामत रकमेपैकी प्रत्येकी ५० हजार रुपये अनुक्रमे नांदेड येथील माता अनुसया शासकीय महिला राज्यगृह आणि आर्वी येथील भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान या संस्थांना देण्याचे आदेशीत करण्यात आले आहे... याचिका केवळ तपास यंत्रणा आणि आरोपींवर दबाव टाकण्यासाठी दाखल केल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 25, 2025 03:05:42
Dhule, Maharashtra:सप्तपुडा जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात पारंपरिक पद्धतीने भगर काढणीला सुरुवात झाली आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये भगर अर्थात मोरबंटी या पारंपरिक धान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात लागवड केली जाणाऱ्या भगर पिकाची कापणी सध्या वेगाने सुरू असून, अनेक ठिकाणी आजही शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साहाय्याने मळणी करून भगर काढताना दिसत आहेत. सातपुडा परिसर हा राज्यातील भगर उत्पादनाचे प्रमुख केंद्र मानला जातो. येथील आदिवासी शेतकरी पिढ्यानपिढ्या भगर लागवड करत असून, रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने हे पीक घेतले जाते. त्यामुळे सातपुड्यातील भगरला विशेष दर्जा प्राप्त झाला असून देशभरातून या सेंद्रिय भगरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेषतः उपवासाच्या काळात सातपुड्यातील भगर बाजारात मोठ्या प्रमाणात पाठवली जाते. मात्र, यावर्षी अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा फटका भगर उत्पादनाला बसला आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले असून, उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तरीही प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी मेहनतीने काढणी आणि मळणीचे काम पूर्ण करत आहेत.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 25, 2025 03:05:28
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 25, 2025 03:04:17
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top