Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Hingoli431513

हिंगोली में 15 ग्रामपंचायतों के लिए स्वतंत्र कार्यालय बनाने के लिए 3.15 करोड़ मंजूर

GMGajanan MAchindar
Mar 08, 2026 02:48:59
Hingoli, Maharashtra
हिंगोली जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे यासाठी तीन कोटी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधी योजना हाती घेतली आहे यातून जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींना निधी मंजूर करून दिला आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Mar 08, 2026 04:18:15
Junnar, Pune, Maharashtra:युद्धाचा मोठा फटका शेतकऱ्यांसोबत निर्यातदारांना बसला असून आखाती देशात निर्यातीसाठी पाठवलेला शेतीमाला समुद्र लाईन मध्ये अडकून पडलाय तर दुसरीकडे शिपिंग लाईन कंपन्यांनीही यावर अधिकचा वॉर सर चार्ज लावला आहे त्यामुळे निर्यांतदारांसोबत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परिणामी निर्णायक लाइन ची इकोसिस्टम संकटात सापडलीय, भविष्यात हा याचा मोठा तोटा शेतकऱ्यांसोबत निर्यातदारांना सहन करावा लागणार आहे,या युद्धामुळे आजच्या स्थितीला भारतातील जवळपास सर्वच कोल्ड स्टोरेज आता पूर्ण क्षमतेने भरल्याने नवीन शेतीमाला च्या निर्यातावर ही याचा मोठा परिणाम झाला असून बाजारपेठेत हि सर्व शेतीमालाचे दर गडगडल्याने शेतकय्रांना लाखों रूपयांचा तोटा सहन करावा लागतोय... या सर्व परिस्थितीचा आढावा घेत निर्यातदार आशिष हांडे आणि फार्मा प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष गणेश वाघ यांच्याशी संवाद साधलाय आमच प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 08, 2026 04:03:06
Washim, Maharashtra:टरबूजाची लागवड केली आहे.सध्या टरबूज पीक काढणीला आले आहे.मात्र ठोक बाजारात व्यापारी केवळ ८ ते १० रुपये किलो दर देत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे त्यांनी थेट ग्राहकांना टरबूज विक्री करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.सुरेश काळबांडे यांनी डिसेंबर महिन्यात टरबूज लागवड केली होती.सध्या या शेतातून सुमारे २०० क्विंटल उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.बाजार समितीत कमी दर मिळत असल्याने त्यांनी वाशिम–अकोला महामार्गालगत शेतातच टरबूज विक्री सुरू करण्यात आली असून येथे १५ ते २५ रुपये किलो दर मिळत आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांना विक्री करण्यापेक्षा थेट विक्रीतून शेतकऱ्यांना अधिक फायदा होत आहे.प्रवासी व नागरिक मोठ्या प्रमाणात टरबूज खरेदी करत असून या पिकातून चांगला नफा मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 08, 2026 04:01:33
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - राज्यसभेच्या नूतन खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची सोलापुरात घोड्यावरून मिरवणूक काढत करण्यात आला जल्लोष - राज्यसभेच्या नूतन खासदारपदी प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचे सोलापुरात जल्लोषात स्वागत - डॉ. ज्योती वाघमारे यांनी पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती म्हणूनच सोलापुरातील पत्रकार संघटनेच्या वतीने घोड्यावरून मिरवणूक काढत करण्यात आला जल्लोष - छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत वाजत गाजत काढण्यात आली मिरवणूक - एका महिला पत्रकाराने खासदारकीपर्यंत झेप घेतल्याने डॉ. ज्योती वाघमारेंचा पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 08, 2026 04:00:32
Pandharpur, Maharashtra:PPR_POLICE_ACTION Anchor - पंढरपूर शहरामध्ये ट्रक चालकास मारहाण केले प्रकरणी गांभीर्याने दखल घेत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. दिनांक 03/03/2026 रोजी पंढरपूर शहरामध्ये मंगळवेढा नाका याठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी एका ट्रक चालकास मारहाण केल्याची घटना घडली होती. सदर बाबीचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला होता. या घटनेबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चौकशी केली असता संबंधित दोन पोलीस अंमलदार यांनी कर्तव्यावर असताना बेशिस्त वर्तन केल्याचं निष्पन्न झाल्याने विजय कांबळे, रविकांत वाघमारे या वाहतूक पोलिसांवर सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधित दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 08, 2026 03:55:05
Amravati, Maharashtra:भाजप आमदार प्रवीण तायडे यांना न्यायालयाची नोटीस; Shetkari आंदोलनादरम्यान शिवीगाळ केल्याचा आरोप, सहा एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश अँकर :- अमरावती जिल्ह्यात शेतकरी आंदोलन दरम्यान झालेल्या शिवीगाळ प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता शेतकरी आंदोलन गोपाल भालेराव यांनी आमदार प्रवीण तायडे यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीची न्यायालयाने दखल घेतली आहे. भर सभेत गोपाल भालेराव व शेतकऱ्यांना भाजपा आमदार प्रवीण तायडे यांनी अश्लील शिवीगाळ केली होती या विरोधात गोपाल भालेराव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली मात्र पोलिसांनी गुन्हा न दाखल केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली याप्रकरणी आमदार प्रवीण तायडे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे सहा एप्रिल रोजी आमदार प्रवीण तायडे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश आहे असून चांदूर बाजार तालुक्यातील 11 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा लाभ देण्याच्या मुद्द्यावर शेतकरी आंदोलन गोपाल भालेराव यांनी डफली बजाव आंदोलन केलं होतं त्यानंतर आमदार प्रवीण तायडे यांनी भालेराव यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 08, 2026 03:47:44
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 08, 2026 03:32:05
Ahilyanagar, Maharashtra: 'नारी तू नारायणी' महिला म्हणजे स्वतः एक शक्ती आहे तुम्ही ठरवलं तर ती कुठलीही दिव्य काम करू शकते, मनामध्ये आत्मविश्वास असल्यास तिच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही हेच पाहायला मिळाला आहे अहिल्यानगर येथील रूपाली खिच्ची यांच्यामध्ये शारीरिक व्यंगावर मात करून स्वावलंबी होण्याच्या जिद्दीतून शहराजवळ असलेल्या केडगाव येथील रुपाली खिच्ची यांनी मेहंदी कलेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रूपाली यांना जन्मापासूनच एक हात नाही असं असलं तरी त्या घरातील सगळी कामे स्वतः करतात स्वयंपाकापासून ते घरातील छोट्या-मोठ्या कामांसाठी त्या कोणाचीही मदत घेत नाहीत स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आपल्याकडे असलेल्या एकाच हाताने आपण काहीतरी करण्याची जिद्द मनात कायम होती. 1998 मध्ये मेहंदी शिकण्याचा विचार केला मात्र मेहंदी क्लास मध्ये देखील सुरुवातीला प्रवेश मिळाला नाही मग स्वतः एका हाताने मेहंदी काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र खचून न जाता त्यांनी या कलेत नैपुण्य मिळवल. आता 25 वर्षांहून अधिक काळापासून त्या अतिशय सुंदर मेहंदी काढतात त्यांनी काढलेल्या मेंदीची चर्चा केवळ गावातच नाही तर दूर दूर हाऊ लागली. जिद्दीने सुरू केलेल्या व्यवसायातून चांगलं उत्पन्नही मिळू लागलं यातून त्यांनी बहिणीचे लग्न देखील केले. हा व्यवसाय त्यांनी अनेक गरजू मुलींना देखील शिकवला त्यांना स्वावलंबी केलं आता केडगावच नाही तर नगर शहर आणि दूर दूर वरून त्यांच्याकडे मेंदी काढण्यासाठी नववधू आणि हौशी महिला येतात रूपाली यांनी आपल्या जिद्दीने स्वतःची ओळख निर्माण केली आणि स्वावलंबी झाल्या आहेत त्यांच्या जिद्दीला सलाम
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 08, 2026 03:31:04
Washim, Maharashtra:आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या कौटुंबिक मतभेदांमुळे अनेक वृद्ध आई-वडील आपल्या मुलांकडून दुर्लक्षित होत आहेत. काहीजण तर अक्षरशःरस्त्यावर येतात. पण याच समाजात काही अशी माणसं आहेत जी परक्यांनाही आपल्या आई-वडिलांप्रमाणे जपतात. अशीच एक संवेदनशील कथा आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील प्रांजली पाध्ये यांची. ह्या आहेत प्रांजली पाध्ये यांनी चक्क 50 निराधार वृद्धांना आपल्या मायेच्या छत्राखाली आश्रय दिला आहे. त्यांनी वाशिम च्या मालेगाव येथे सुरू केलेल्या “माऊली वृद्धाश्रमात” आज अनेक वृद्धांना घर, माया आणि आपलेपण मिळाले आहे. पण या समाजसेवेच्या मागे त्यांचं स्वतःचंही एक वेदनादायी वास्तव आहे. कोरोना काळात प्रांजली यांच्या दोन्ही किडन्यांना गंभीर दुर्धर आजार झालं होता. डॉक्टरांनी त्यांना काही दिवसच आयुष्य उरल्याचं सांगितलं होतं. आयुष्याचा शेवट जवळ आला आहे असं वाटत असतानाही त्यांनी हार मानली नाही. नियतीने मात्र त्यांच्या हातून काहीतरी मोठं कार्य घडवायचं ठरवलं होतं. आपल्या समाजसेवेच्या जिद्दीमुळे त्यांनी या आजारावर मात केली आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली. त्या दिवसापासून प्रांजली यांनी एक ठाम निर्णय घेतला “हे आयुष्य समाजाने दिलं आहे, ते समाजासाठीच खर्च करायचं.” याच विचारातून त्यांनी एका छोट्याशा जागेत माऊली वृद्धाश्रमाची स्थापना केली. बाईट: प्रांजली पाध्ये, संचलिका माऊली अनाथ वृद्धाश्रम मालेगाव. सुरुवातीला एक-दोन वृद्धांना आश्रय देणाऱ्या प्रांजली आज 50 निराधार वृद्धांची लेक बनल्या आहेत. त्या सर्व वृद्धांची सेवा त्या आपल्या आई-वडिलांप्रमाणे करतात. महत्त्वाची बाब म्हणजे इतकं मोठं कार्य करत असतानाही शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. तरीही प्रांजली यांची सेवा अखंड सुरू आहे. आश्रमातील वृद्धही सांगतात की प्रांजली आमच्यासाठी लेकीसारख्या आहेत. आम्हाला इथे आई-वडिलांसारखी माया मिळते. आमचा शेवटही इथेच व्हावा अशी आमची इच्छा आहे. एन्ड व्हिओ : आजच्या स्वार्थी होत चाललेल्या जगात परक्यांच्या अश्रूंना माया देणारी ही महिला खऱ्या अर्थाने ‘सावित्रीची लेक’ ठरते. या महिलांना गरज आहे ती दांशुरांनी समोर येऊन मदतीचा हाथ देऊन बळ देण्याची. या महिला दिनानिमित्त अशा वृद्धांचे आधार बनलेल्या प्रांजली पाध्ये यांच्या कार्याला सलाम.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 08, 2026 03:30:35
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 08, 2026 03:19:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या तिजोरीत यंदा मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून चांगली रक्कम जमा झाली आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच करवसुलीने २०० कोटींचा आकडा पार केला आहे. १ एप्रिल ते २ मार्च या कालावधीत एकूण २०८ कोटी ६४ लाख १० हजार २३ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. आयुक्त जी. श्रीकांत यांनी मार्चअखेरपर्यंत आणखी २०० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मनपाने राबवलेल्या 'शास्ती से आझादी' आणि 'शास्ती से मुक्ती' या योजनांमुळे वसुलीचा टक्का वाढण्यास मदत झाली. या योजनांतर्गत मालमत्ता कराच्या थकबाकीवरील दंडव्याजात अनुक्रमे ९५ टक्के आणि ७५ टक्के इतकी मोठी सूट देण्यात आली होती. झोन पाचअंतर्गत सिडको आणि हडको परिसरातील मालमत्तांची संख्या मोठी आहे. तेथील मालमत्ताधारकांनी 'शास्ती से मुक्ती' योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 08, 2026 03:18:01
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, १८ जानेवारीला छत्रपती  संभाजी नगरात अध्यक्षपदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाने आपला अध्यक्ष स्वबळावर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या भाजपचे संख्याबळ २६ वर पोहोचले आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला ३२ चा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या काही सदस्यांशी गुप्त चर्चा सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. २०१७ मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत त्यांना सत्तेपासून दूर ठेवले होते, त्या इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपने आता सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषेदच्या ६३ जागांपैकी भाजपचे २३ उमेदवार निवडून आले आहेत. २ भाजप पुरस्कृत जिंकले आहेत. २ दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका सदस्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने हे संख्याबळ आता २६ झाले आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी ६ सदस्यांची गरज आहे. हे संख्याबळ जुळवण्यासाठी भाजपने महाविकास आघाडीच्या गोटात शिरकाव करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषतः राष्ट्रवादी आणि उबाठा गटातील काही असंतुष्ट सदस्यांना खेचण्यासाठी भाजपकडून विविध स्तरांवर चर्चा केली जात आहे. २०१७ मध्ये शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. मात्र, घोडेबाजार आणि फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता लक्षात घेता, आगामी काही दिवस जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे ठरणार आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 08, 2026 03:16:44
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजी नगर शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला वेग आला आहे. येत्या १९ मार्च २०२६ पासून जॅкवेलमधून पाणी उपसा सुरू होईल, अशी ग्वाही कंत्राटदार कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिली, गेल्या सुनावणीत न्यायालयाने या योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संबंधित  दुरुस्तीची कामे पुढील १० दिवसांत पूर्ण केली जातील. तसेच १९ मार्चपासून जॅकवेल कार्यान्वित होऊन प्रत्यक्ष पाणी उपसा सुरू केला जाईल. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन १६ मार्च रोजी सकाळी ७ ते १२ या वेळेत जॅकवेल आणि इतर कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top