Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

शिरपूर तालुक्यात कार में आग: एक व्यक्ति की मौत; गुजरात से आए होने की आशंका

PPPRASHANT PARDESHI
Dec 17, 2025 04:03:11
Dhule, Maharashtra
शिरपूर तालुक्यात एक कारला आग लागून एका व्यक्तीचा कारमध्ये जळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लोकवस्तीचा परिसर असलेल्या भागात पहाटेच्या सुमारास कारसह एकाची आगीत मृत्यू झाला असून, ही घटना शिरपूर तालुक्यातील खामखेडा ते टेकवाडे गावादरम्यानची घडली आहे. कारसह कारमध्ये बसलेल्या एकाची आगीत जळून मृत्यू झाला असून, हा व्यक्ती कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. ही गाडी गुजरात पासिंगची असून, हा व्यक्ती गुजरात कडून आल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी शिरपूर पोलिस दाखल झाले असून, हा अपघात आहे की घातपात? याची चौकशी पोलीस करीत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Dec 17, 2025 05:31:58
Solapur, Maharashtra:solapur ब्रेकिंग - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा देखील स्वबळावर निवडणूक लढण्याकडे कल, घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी 122 अर्ज दाखल - राष्ट्रवादी काँग्रेस AP पक्षाकडे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे 122 अर्ज दाखल - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोलापुर महानगरपालिकेसाठी आपकी बार 75 पारचा नारा देण्यात आला आहे - महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून सोलापुरात स्वबळावर तयारी सुरू - माजी महापौर आणि उपमहापौरासह पाच माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीकडे मागितला उमेदवारी अर्ज - सोलापुर महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने कसली कंबर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 17, 2025 05:19:22
Akola, Maharashtra:निवडणुका जाहीर होताच संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून, प्रचारादरम्यान मतदारांची दिशाभूल करणारा गैरप्रचार केला जात असल्याचा आरोप भाजपचे माजी महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांनी केला आहे. आम्ही निवडून आलो नाही तर ‘लाडकी बहीण’ योजना बंद केली जाईल, असा प्रचार काही संभाव्य उमेदवारांकडून सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अशोक ओळंबे यांना मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती. सध्या भाजपच्या अनेक आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या वतीने ‘नागरिक संवाद मंच’चे आयोजन करण्यात आले आहे. या मंचाच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना व तक्रारींसाठी एक पेटी ठेवण्यात आली आहे. याच सूचनापेटीत एका नागरिकाने ‘लाडकी बहीण’ योजना आम्ही निवडून आलो नाही तर बंद केली जाईल, असा प्रचार सुरू असल्याची तक्रार नोंदवली. यावर प्रतिक्रिया देताना अशोक कोळंबे यांनी असा गैरप्रचार तात्काळ थांबवावा, तसेच मतदारांची दिशाभूल करू नये, असे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 17, 2025 05:04:18
Bhandara, Maharashtra:वीस तारखेला तुमच्या वर्गात गडबड झाली तर.....कटोगे तो फसोगे.... भंडाऱ्यात प्रचार सभेदरम्यान आमदार परिणय फुके यांचे वक्तव्य... या भागात पाणीपुरवठा योजना पूर्ण करायची आहे..... शुद्ध पाणी चांगले रस्ते, गार्डन पाहिजेेत..... विकास झालं पाहिजे तर हे केंद्रात मोदीजींचींं..... राज्यात फडणवीसांच..... तुमच्या भंडाऱ्यातही मधुराताईच निवडून येणार..... आणि चुकून जर तुमच्या वार्डात 20 तारखेला गडबड झाली तर.... कटोगे तो फसोगे..... तुम्ही प्रीती ताईला निवडून द्या तुमच्या वॉर्डाच्या चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही..... माझी गॅरंटी आहे.... यांनी काम नाही केलं तर मी स्वतः येऊन काम करणार....जर हे काम आम्ही करू शकलो नाही तर पुढच्या वेळेस तुमच्याकडे मतदान मागायला येणार नाही.....
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 17, 2025 04:56:48
Amravati, Maharashtra:महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आमची युती होणार नाही; अजितदादाच्या राष्ट्रवादीला भाजप कुठेच सोबत घेत नाही आमदार रवी राणा यांचा दावा महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजला असून प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे. असं असलं तरी युती आघाडीचा अजूनही ठरत नाही त्यामुळे कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे. अशातच आमदार रवी राणा यांच्या एका वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून अजित पवारांना भाजप कुठेही सोबत घेणार नसल्यास रवी राणा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अमरावती महानगरपालिकेत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती असणार असल्याचा मोठा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. अमरावती महानगरपालिकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत आमची युती होणार नाही अजित दादांच्या राष्ट्रवादीला भाजप कुठेच सोबत घेत नाही भाजप व आमची सुद्धा इच्छा नाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत युती करायची नाही अमरावती महानगरपालिकेत भाजपचा महापौर आम्हाला करायचा आहे. भाजप, एकनाथ शिंदेची सेना आणि युवा स्वाभिमान एकत्र म्हणून लढले पाहिजे असं काल पालकमंत्र्याच्या कोअर कमिटी बैठकीमध्ये ठरलं तसंच मुख्यमंत्र्यांनी देखील असं सांगितलं आहे. उद्या भाजप शिवसेना शिंदे सेना आणि युवा स्वाभिमान आम्ही तिघे एकत्र बसू प्रत्येक जागेवर चर्चा करू आणी जो विनिंग कँडेड राहील त्याला जागा सोडू असेही राणा म्हणाले आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 17, 2025 04:51:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई व स्वर्गीय पतंगराव कदमांच्या तैल चित्राचं कोल्हापूर खंडपीठाच्या न्यायमूर्तिंच्या हस्ते अनावरण.. या दृष्टीने काम केले पाहिजे असा मतं कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्तीं मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केला आहे. सांगलीतील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये स्वर्गीय पतंगराव कदम आणि निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या तैलचित्र लावण्यात आले आहेत, या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्तीं ए.बी कडेठाणकर, न्यायमूर्ती एसी.बी चपळगावकर, न्यायमूर्ती शिवकुमार दिघे, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तैलचित्रांचे अनावरण पार पडलं. या प्रसंगी आमदार विश्वजीत कदम यांच्यासह कदम कुटुंबीय देखील उपस्थित होते. कोल्हापूर खंडपीठाची निर्मिती केल्याबद्दल भूषण गवई आणि सांगली जिल्हा न्यायालयाची इमारत उभी केल्याबद्दल पतंगराव कदम यांचा तैलचित्र सांगली जिल्हा न्यायालयामध्ये लावण्यात आले आहे. साउंड बाईट - मंगेश कर्णिक - न्यायधिषा - कोल्हापूर खंडपीठा.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 17, 2025 04:50:57
Beed, Maharashtra:बीड:मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण; जिल्ह्यात 32 हजार मोकाट कुत्रे तर एकट्या बीड शहरात दहा हजार कुत्र्यांची संख्या, मोकाट कुत्र्यांमुळे नागरीक दहशतीत मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी बीड नगरपरिषदेने पुढाकार घेतलाय. बीड शहरासह जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण होत आहे. तर मोकाट कुत्र्यांचा सांभाळ करण्यासाठी कायमस्वरूपी फीडिंग सेंटरही प्रस्तावित करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, रहिवासी संकुल यांची बैठक घेऊन याबाबत उपाययोजना केल्या जाणार आहेत. 2019 साली झालेल्या पशुगणनेनुसार बीड जिल्ह्यात 31912 भटके कुत्री आणि 2541 भटकी जनावरे होती. तर 2024 साली जी पशु गणना झाली त्यानुसार अंदाजे एकट्या बीड शहरात दहा हजाराहून अधिक मोकाट कुत्र्यांची संख्या आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 17, 2025 04:50:41
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वानोजा परिसरासह जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. हवामानातील अचानक बदल तसेच इतर नैसर्गिक कारणांमुळे यावर्षी संत्रा झाडांना अपेक्षित बहर न आल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे संपूर्ण उत्पादन हातातून गेले आहे. वर्षानुवर्षे कष्ट घेऊन उभ्या केलेल्या संत्रा बागा अशा परिस्थितीत अडचणीत सापडल्या असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्पादन पूर्णतः नष्ट झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक ओझे वाढले असून कर्जफेडीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पंचनामा व सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य व तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 17, 2025 04:19:58
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 17, 2025 04:17:42
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 17, 2025 04:17:29
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ पालकमंत्री संजय राठोड प्रचार सभांचा धुरळा उडवीत आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या भाजपची उमेदवार आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून काँग्रेसची उमेदवार आहे त्यामुळे आता शिवसेनेच्या उमेदवार तेजस्विनी चांदेकर यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी कंबर कसली आहे, दररोज सहा ते सात सभा ते घेत आहेत. नगरपरिषदेसाठी निधी भरपूर मिळाला मात्र अमृत पाणीपुरवठा योजनेचे काय झाले असा प्रश्न उपस्थित करीत ते भाजपावर टीकास्त्र सोडत आहे. आपल्याला नगरमालक हवा की नगरसेवक असाही प्रश्न पालकमंत्री संजय राठोड उपस्थित करीत आहे. बाईट : संजय राठोड़ : पालकमंत्री
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 17, 2025 04:07:34
Parbhani, Maharashtra:अँकर- राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आता सर्वच राजकीय पक्ष निवडणूकच्या कामाला लागले आहेत. परभणीत ही नाराज असलेले माजी महापौर तथा शहरप्रमुख प्रताप देशमुख सर्व रुसवे फुगवे सोडून निवडणुकीच्या कामाला लागलेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इच्छुकांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. परभणी महानगरपालिका कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिली असून येथे राष्ट्रवादीच्या विचारांचे मत आहेत. आमची 65 जागांवर लढण्याची तयारी असून आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत,पण पक्ष जी भूमिका घेईल त्याप्रमाणे आम्ही लढू,पण महापौर मात्र राष्ट्रवादीचाच बनऊ असा निर्धार यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख यांनी व्यक्त केलाय. बाईट- प्रताप देशमुख- माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
0
comment0
Report
Advertisement
Back to top