Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

मुकुंदवाड़ी में चेन स्नैचिंग: दो चोरों ने गले का मंगळसूत्र छीना, CCTV कैद

VKVISHAL KAROLE
Mar 26, 2026 02:46:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरातील मुकुंदवाडी परिसरात शतपावली करणाऱ्या महिलांना लक्ष्य करत मंगळसूत्र हिसकावण्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी रस्त्यावर चालणाऱ्या दोन महिलांपैकी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र क्षणार्धात हिसकावले. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरीला गेलेले मंगळसूत्र अंदाजे १९ ग्रॅम वजनाचे असून त्याची किंमत सुमारे १ लाख २८ हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Mar 26, 2026 03:50:17
Shirdi, Maharashtra:शिर्डीत रामनवमी उत्सवाचा उत्साह दिसून येतोय.. साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदीयाळी दिसुन येत आहे.. साईंनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.. उत्सवासाठी साईबाबा मंदिरावर विद्युत् रोसनाई तसेच साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय.. तर साई मूर्तीला देखील कोट्यवधींच्या सुवर्ण आभूषणे परिधान करण्यात आली आहेत.. काकड आरती नंतर साईबाबांच्या मुर्तीला भाविकांनी विविध ठिकाणांहून आणलेल्या जलाने अभिषेक घालण्यात येऊन साईंच मंगलस्नान पार पडल.. जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे यासाठी साई समाधी मंदिर आज रात्रभर खुल राहणार आहे.. आज दुपारी 12 वाजता साईमंदिरासमोर रामजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे ...हजारो भाविकांनी राम जन्माच मोठया भक्तीभावाने स्वागत करताय... दुपारी 4 वाजता भगव्या आणि हिरव्या ध्वजाची निशाण मिरवणुक निघेल आणि सोन्याच्या रथात गावातुन प्रभु रामचंद्राची आणि साईंच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात येईल. शिर्डीत साजऱ्या होणाऱ्या रामनवमी उत्सवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
814
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 26, 2026 03:47:33
Nashik, Maharashtra:नाशिक * भोंदू अशोक खरात प्रकरण * अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड * १५ ऑक्टोबर २०१२ रोजी शस्त्र परवाना मंजूर * १ जानेवारी २०२४ रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद * चौकशीत खरातच्या फार्महाऊसवरून २१ काडतुसे जप्त * त्यापैकी ५ काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू * राज्यभर गाजत असलेल्या प्रकरणात दररोज नवे खुलासे * गेल्या सात दिवसांच्या तपासात शस्त्र बाळगल्याची माहिती समोर * काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला? — तपास यंत्रणांचा शोध सुरू * शस्त्र परवान्यासाठी खरातने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता * जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती * भोंदू बाबा खराब होता परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू..
539
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 26, 2026 03:24:39
1015
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 26, 2026 03:21:44
1071
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 26, 2026 03:18:52
Kolhapur, Maharashtra:महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे उपचार सुरू असताना निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. गेल्या महिन्याभरापासून कोल्हापुरातील ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. निमोनिया सदृश्य आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली होती आणि अखेर त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रातील इतिहास संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी विशेषतः मराठा इतिहास, शिवकालीन अभ्यास आणि कोल्हापूरच्या इतिहासावर अत्यंत मोलाचे संशोधन केले होते. मराठा इतिहासाच्या सखोल अभ्यासासाठी ते ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ, मराठा साम्राज्याची स्थापना आणि प्रशासन व्यवस्था या विषयांवर त्यांनी प्रमाणाधारित संशोधन मांडले. त्यांच्या अभ्यासामुळे अनेक ऐतिहासिक बाबींना वैज्ञानिक दृष्टीकोन प्राप्त झाला. त्यांची संशोधन पद्धत अत्यंत शास्त्रीय आणि पुराव्यांवर आधारित होती. मूळ दस्तऐवजांचा अभ्यास, पत्रव्यवहार, शिलालेख आणि बखरींच्या आधारे त्यांनी ऐतिहासिक घटनांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले. त्यांनी मराठा इतिहासाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला तसेच स्थानिक इतिहास मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य केले. डॉ. पवार यांनी संशोधनाधारित इतिहास लेखनाची परंपरा मजबूत केली आणि अनेक तरुण संशोधकांना प्रेरणा दिली. एका अर्थाने ते केवळ इतिहासकार नव्हते, तर इतिहास जिवंत ठेवणारे संशोधक होते, त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक व इतिहास क्षेत्रावर शोककळा पसरली असून आहे. सध्या डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे पार्थिव कोल्हापूरातील आर के नगर इथल्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव साने गुरुजी वसाहती मधील शिवतेज या बंगल्यावर ठेवले जाईल. त्यानंतर कोल्हापूर शहरातून त्यांचे अंत्ययात्रा काढून पंचगंगा स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल.
895
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 26, 2026 03:18:18
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणीच्या सर्व पूजा साठीचे आरक्षण पूर्ण झाले. 20 देशातून भाविकांनी समितीच्या संकेत स्थळाला दिली भेट, विठोबाचा डंका सात समुद्र पार\n\nश्री विठ्ठल रुक्मिणीच्या एक एप्रिल ते 31 जुलै 2026 या काळात सण उत्सव आणि गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या विठोबा रुक्मिणीच्या पाद्यपूजा महानैवेद्य तुळशी अर्जुन पूजा या पूजांची नोंदणी भाविकांनी मंदिर समितीच्या संकेतस्थळावर केली सर्व पूजांची नोंदणी ही पूर्ण झाली आहे. यामध्ये विठ्ठल नित्य पूजा 148 रुक्मिणी नित्य पूजा 150, पाद्यपूजा 354,तुळशी अर्जुन पूजा 1040, महानैवेद्य सहभाग योजना 145 अशा पूजन् साठी भाविकांनी नोंदणी केली आहे\n\nऑनलाइन प्रणालीमुळे मंदिर समितीच्या संकेतस्थळा ला अमेरिका ,इंग्लंड ,यु ए ई ,जर्मनी, कॅनडा, नायजेरिया, सिंगापूर ,ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, नेपाळ, हंगेरी ,नॉर्वे, कांगो, फ्रान्स, कुवेत,स्वीडन, चीन, श्रीलंका या देशातील भाविकांनी भेट दिली आहे.
1027
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 26, 2026 03:17:28
976
comment0
Report
Advertisement
Back to top