Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

ग्रहण के कारण वेरुल के श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर दोपहर 3 से 7 बजे दर्शन बंद

VKVISHAL KAROLE
Mar 02, 2026 02:16:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर मंगळवारी खग्रास चंद्रग्रहणामुळे दुपारी तीनपासून सायंकाळी सातपर्यंत दर्शनासाठी बंद राहील. ग्रहणाच्या कालखंडात मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याची परंपरा असल्याने मंदिर प्रशासनाने दर्शनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे दुपारी ३:०० ते ७:०० या वेळेत भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश किंवा दर्शन घेता येणार नाही. दरम्यान, ग्रहण सुटल्यानंतर सायंकाळी ६:४७ ते ७:०० वाजेपर्यंत मंदिराची स्वच्छता व विशेष शुद्धीकरण पूजा केली जाईल असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले असेल...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Mar 02, 2026 03:47:20
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 03:46:00
Washim, Maharashtra:अँकर:होळी व धुलीवदंन सणाच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरातील बाजारपेठ गजबजली असून पांढऱ्या शुभ्र बत्ताश्यांच्या गाठींना विशेष मागणी वाढली आहे. विविध आकार आणि पॅकिंगमध्ये बत्ताशे विक्रीसाठी उपलब्ध असून सध्या त्यांना किलोमागे १५० ते २०० रुपये दर मिळत आहे. साखरेच्या दरवाढीचा किंमतीवर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी खरेदीवर त्याचा विशेष परिणाम दिसून येत नाही. होळीच्या दिवशी एकमेकांना बत्ताश्यांच्या गाठी देण्याची परंपरा विशेषतः ग्रामीण भागात कायम आहे. लहान मुलांना भेट म्हणून या गाठी दिल्या जातात. तसेच काही कुटुंबांत गाठी गुढी पाडव्यापर्यंत जपून ठेवून गुढीला बांधण्याची प्रथा पाळली जाते. त्यामुळे बाजारात सणासुदीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 03:30:46
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 03:16:55
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 02, 2026 03:04:58
Amravati, Maharashtra:नियमित सफाई कामगार द्या अन्यथा उलटे टांगून मारू; साफसफाईच्या मुद्द्यांवरून भाजपाचे नगरसेवक ऋषिकेश देशमुख आक्रमक अँकर :- अमरावती महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शहरातील स्वच्छते विषयी विशेष सभा चांगली गाजली असून स्वच्छतेच्या मुद्द्यावर नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलं धारेवर धरत शहरातील स्वच्छते विषयी जाब विचारला आहे. नवसारी प्रभागाचे नवनिर्वाचित नगरसेवक ऋषिकेश देशमुख हे स्वच्छतेच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले असून प्रशासनातील अधिकारी हे पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप त्यांनी गेल्या आहे. मी पाच अतिरिक्त सफाई कामगारांची मागणी केली होती मात्र ती अजून पर्यंत पूर्ण करण्यात आली नसून त्याविषयी मला उत्तरही देण्यात आला नाही त्यामुळे मला आत्ताच्या आत्ता पाच सफाई कामगार उपलब्ध करून द्यावे अन्यथा जे सफाई कामगार कामावर येतात त्यांना उलटे टांगून मारू असा इशारा भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांनी दिला आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 02, 2026 03:03:44
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 02, 2026 03:03:30
Shirur, Maharashtra:विद्यार्थ्यांना पैशाचे महत्त्व व व्यवहारज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून समजावे या उद्देशाने शिरूर तालुक्यातील चांडोह येथील जिल्हा परिषद शाळेकडून आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या परिसरात आठवडी बाजार तसेच ‘खाऊ गल्ली’चे विविध स्टॉल उभारून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः नियोजन करून वस्तू विक्री, व्यवहार, हिशोब व ग्राहकांशी संवाद अशी जबाबदारी सांभाळली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, नियोजन कौशल्य व आर्थिक मूल्यांची जाणीव निर्माण झाली. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून कौतुक होत आहे.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top