Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

मनोज जरांगे के आरोप पर काँचन साळवी की प्रतिक्रिया: दलित मुद्दों पर सियासी पेचदार हालात

MMMahendrakumar Mudholkar
Nov 11, 2025 05:22:41
Beed, Maharashtra
मनोज जरांगे यांनी आरोप केलेल्या कांचन साळवी याची प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री असल्यापासून माझे आणि मुंडे साहेबांचे संबंध आहेत. मी सामाजिक प्रश्नासाठी त्यांना नेहमी भेटतो. असाच एक प्रसंग आम्ही त्या दिवशी भेटलो. त्या भेटण्याचा संदर्भ शर्यंतराचं नाव घेऊन त्यांनी लावला. शरियंताचा संबंधांचा माझा काही संबंध नाही. एक दलित म्हणून माझं नाव यात अप्रोच केलं जातंय. जी काही चौकशी असेल त्या चौकशीला मी आज देखील समोर जायला तयार आहे. गरडचा आणि माझा अर्थार्थी संबंध नाही. मी म्हणतोय त्याचीही चौकशी करा आणि माझी ही चौकशी करा. यात अमोल खुणे हे माझ्या जवळच्या मित्राचे नातेवाईक आहेत. त्यामुळे माझे आणि त्यांची ओळख झाली. त्यांच्यामार्फत गरड हा मुंडे साहेबांना भेटला. ज्यावेळी आम्ही रेस्ट हाऊसला भेटलो होतो त्यावेळेस गरडला धक्का बसला. आम्हालाही आश्चर्य वाटलं जोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं गरड हा कोण आहे. अमोल खून यांनी सांगितलं गरड हा जरांगे पाटलांच्या घरातला माणूस आहे. आम्हाला धक्का बसला की हा इथे कसा काय. मग आमच्या लक्षात आलं काहीतरी षडयंत्र चालू आहे.. धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात काहीतरी षडयंत्र सुरू आहे.. त्याच्यानंतर आम्ही तेथून निघून आलो. त्यानंतर अमोल खुणेच्या माध्यमातून गरड नी मला भेटण्याचा प्रयत्न केला. मुंडे साहेबांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. काही तुम्हाला रेकॉर्डिंग द्यायचे आहेत त्यामुळे मला वारंवार पैशाची मागणी केली. मी प्रत्येक वेळेस त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला उडवा उडवीची उत्तर दिली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Nov 11, 2025 07:19:41
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 11, 2025 07:17:09
Jalna, Maharashtra:जालना : धावेडी गावात शेतकरी दांपत्याने आपल्या प्रिय गायीला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला आहे. गायीच्या अंत्यविधीला वाजंत्री लावण्यात आली आणि बैलगाडीतून तिची अंत्ययात्रा काढली गेली. अँकर: जालना तालुक्यातील धावेडी गावात एका शेतकरी दांपत्याने आपल्या प्रिय गायीला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला आहे. या गायीच्या अंत्यविधीला वाजंत्री लावण्यात आली आणि बैलगाडीतून तिची अंत्ययात्रा काढण्यात आली. परिसरात हा अनोखा आणि हृदयस्पर्शी सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात नवविवाहित तरुणीला लग्न झाल्यानंतर आंदण म्हणून गाय देण्याची परंपरा आहे. धावेडी गावातील साबळे कुटुंबालाही विवाहावेळी अशीच एक गाय "भाग्यलक्ष्मी" म्हणून मिळाली होती. या गाईच्या दूध आणि गोऱ्हे विक्रीतून साबळे कुटुंबाने स्वतःचं नशीब बदललं. एका गायीपासून सुरू झालेली वाटचाल आज 17 म्हशी विकत घेण्यापर्यंत पोहोचली आहे. घरात समृद्धी, आनंद आणि सुख आणणाऱ्या या भाग्यलक्ष्मी गायीचं वृद्धापकाळाने निधन झालं. तेव्हा साबळे दांपत्याने तिच्यावरील कृतज्ञता व्यक्त करत एखाद्या सौभाग्यवती स्त्रीच्या सन्मानाप्रमाणे तिचा अंत्यविधी केला. या गायीला नव्या कोऱ्या साडी-चोळीने सजवण्यात आलं, ओटी भरली गेली, आणि वाजन्त्रीच्या सुरात भावपूर्ण वातावरणात बैलगाडीतून तिची अंत्ययात्रा काढून शेतातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गायीचं हे अंतिम दर्शन पाहताना ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ही घटना माणूस आणि जनावरामधील नातं किती घट्ट असतं याचं जिवंत उदाहरण ठरली आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 11, 2025 06:47:18
Akola, Maharashtra:अनेक वर्षांपासून कागदोपत्री अडकलेल्या अकोल्यातील शिवणी विमानतळ विस्तार प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. राज्य सरकारने धावपट्टी विस्तारासाठी तब्बल ₹२०८.७६ कोटींच्या खर्चास प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरी दिली आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय ३० ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याचे मुख्य secretary यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेषाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या शिवणी विमानतळाची धावपट्टी १४०० मीटर आहे. मात्र, वाणिज्यिक उड्डाणांसाठी किमान १८०० मीटर धावपट्टी आवश्यक असल्याने येथे नियमित विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. प्रस्तावित योजनेनुसार २२.२४ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार असून त्यामुळे धावपट्टीची लांबी १८०० मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून विमानतळाचा विस्तार केवळ फाइलपुरता मर्यादित होता. जिल्हा प्रशासनाने चार वेळा राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवूनही महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी आणि विमानतळ प्राधिकरणाकडून ठोस कारवाई झालेली नव्हती. २०२४-२५ च्या राज्य अर्थसंकल्पात अकोला विमानतळासाठी निधी न दिल्याने हा प्रकल्प मागे पडला होता. दरम्यान, अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून ३१ मार्च २०२५पासून नियमित उड्डाणे सुरू झाल्याने अकोलेकरांमध्ये नाराजी होती. आता विशेषाधिकार समितीच्या मंजुरीमुळे शिवणी विमानतळाच्या विस्ताराला गती मिळणार असून अकोल्यातून थेट हवाई प्रवासाचे स्वप्न साकार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पासाठी अकोल्याचे भाजपचे खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्र आणि राज्यस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. तसेच काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी देखील स्वतंत्ररीत्या प्रयत्न केल्याने आता या विषयावर श्रेयवादाचे राजकारण देखील रंगू लागले आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 11, 2025 06:45:52
Pune, Maharashtra:दिल्लीमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण देशात सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने देखील अलर्ट जारी केला असून, देहूरोड पोलिस ठाण्याच्यावतीने घातपात विरोधी पथक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५, होमगार्ड पथक, तसेच पुणे शहर आणि रेल्वे पोलिस दलाचा समावेश असलेले सुमारे ३५० ते ४०० पोलिस अधिकारी व कर्मचारी या सुरक्षा व्यवस्थेत तैनात आहेत. यावेळी पोलीस अधिकारी मंदिर परिसरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि शिस्त राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे।
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 11, 2025 06:34:54
Pandharpur, Maharashtra:दिल्ली येथील बॉम्बस्फोट घटनेनंतर पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात पोलिसांनी हाय अलर्ट दिला आहे. आज सकाळपासूनच विठळ मंदिर परिसरात पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे येथे दररोज हजारो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विठ्ठल मंदिर परिसरामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर बंदूकधारी पोलीसांची सुरक्षा देण्यात आली आहे. याबरोबरच मंदिर परिसरातील सगळे रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. मंदिर परिसरातून सुरक्षेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 11, 2025 06:32:18
Nagpur, Maharashtra:नागपूर महानगरपालिकेच्या सार्वजनरिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आरक्षण सोडत थोड्याच वेळात रेशमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच सर्वसाधारण महिला या वर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्याची सोडत काढण्यात येणार आहे. या संदर्भात आरक्षणाबाबतच्या हरकती व सूचना मागविण्याचा कार्यक्रम महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आला आहे. 17 नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दुपारी 3.00 वाजेपर्यंत हरकती व सूचना सादर करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 11, 2025 06:31:23
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 11, 2025 06:31:05
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रातील डोनाळा आणि सिरसी बिटाच्या जंगलात गेल्या दोन महिन्यांपासून दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणीला तिच्या ثلاث बछड्यांसह जेरबंद करण्यात वनविभागाला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईमुळे स्थानिक शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सध्या तालुक्यात धान कापणीचा हंगाम सुरू असल्याने, जंगलाजवळील गवर्ला आणि इतर गावांमधील शेतकऱ्यांनी वाघांच्या दहशतीमुळे वनविभागाकडे त्यांना तात्काळ पकडण्याची जोरदार मागणी केली होती. या मागणीनुसार, वनविभागाच्या पथकाने ९ नोव्हेंबरपासून वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी, ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पथकाने पिंजऱ्याच्या मदतीने दोन बछड्यांना यशस्वीरीत्या जेरबंद केले. यानंतर पथकाने संपूर्ण रात्र वाघिणीच्या शोधात काढली. दुसऱ्या दिवशी, १० नोव्हंबर (सोमवार) रोजी दुपारी तिसऱ्या बछड्याला पकडण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये, अखेरीस ती वाघीणही पिंजऱ्यात अडकली. अशा प्रकारे, तीन बछड्यांसह वाघिणीला जेरबंद करून वनविभागाच्या पथकाने महत्त्वपूर्ण Yश मिळवले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 11, 2025 06:23:48
Nagpur, Maharashtra:नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आरक्षण सोडत थोड्याच वेळात रेशमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच सर्वसाधारण महिला या वर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्याची सोडत काढण्यात येणार आहे. या संदर्भात आरक्षणाबाबतच्या हरकती व सूचना मागविण्याचा कार्यक्रम महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आला आहे. 17 नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दुपारी 3.00 वाजेपर्यंत हरकती व सूचना सादर करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 11, 2025 06:17:19
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 11, 2025 05:22:52
0
comment0
Report
Advertisement
Back to top