Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

संभाजी मगर महापालिका के हर्सल तालाब के पास BOT वॉटर पार्क योजना में देरी

VKVISHAL KAROLE
Oct 12, 2025 03:02:32
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
लाखो पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संभाजी मगर महापालिकेने मागील वर्षी पुढाकार घेतला होता. हर्सल तलावाच्या बाजूला ४ एकर जागेवर बीओटी तत्त्वावर वॉटर पार्क उभारण्यास नोव्हेंबर २०२४ मध्ये मंजुरी दिली होती. २०२५ मध्ये हा प्रकल्प उभा राहील, अशी घोषणा केली होती. मात्र, या प्रस्तावाला पाहिजे तशी गती बीओटी विभागाकडून मिळाली नाही. हसूल तलाव परिसरात वॉटर पार्क उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. जांभूळबन येथे चार एकर जागेत वॉटर पार्क विकसित करण्यास मंजुरी दिली. कार्यालय, वाहनतळ, जलशुद्धीकरण प्लांट, स्टोअर रूम, चेंजिंग रूम यासह अत्यावश्यक सुविधा कंत्राटदाराने उपलब्ध करून द्याव्या असेही ठरले मात्र हे सगळं कागदावरच राहिले याबाबत सध्या तरी कुणीही उत्तर द्यायला तयार नाही...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Oct 12, 2025 05:17:19
Washim, Maharashtra:वाशिम: अंदाल / अँकर: [हटा दिया गया] जिल्हा जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.पिकं नष्ट झाली, शेतं पाण्यात बुडाली आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचं सोनं मातीमोल झालं.जिल्हाभरातून शेतकऱ्यांचा आक्रोश उसळला.सरकारकडे वारंवार मागण्या,आंदोलने, निवेदने दिली गेली अखेर या सर्व प्रयत्नांना यश आलं आहे.आंदोलनाच्या लाटेनंतर शासनाने परिस्थितीची गंभीर दखल घेत वाशिम, मानोरा, कारंजा, रिसोड, मालेगाव आणि मंगरुळपीर या सहा तालुक्यांना ‘रिलिफ पॅकेज’ अंतर्गत अतिवृष्टीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी ९ ऑक्टोबर रोजी जारी झालेल्या शासन निर्णयात फक्त तीन तालुके वाशिम, मानोरा आणि कारंजा यांनाच या यादीत स्थान देण्यात आलं होतं.मात्र,अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला होता त्या रिसोड,मालेगाव आणि मंगरुळपीर तालुके वगळल्याने जिल्हाभरात तीव्र नाराजी पसरली होती.त्यानंतर शेतकऱ्यासह विविध पक्ष व संघटनांनी आंदोलने करीत आक्रोश व्यक्त केला होता. हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथाची बातमी झी 24तास ने दाखवल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर शासनाने नव्याने आदेश काढत जिल्ह्यातील सर्व सहा तालुके अतिवृष्टीग्रस्त घोषित केले.या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून समाधानाचे सूर उमटले आहेत.अतिवृष्टीच्या पाण्यात हरवलेल्या आशा आता थोड्याफार प्रमाणात पुन्हा उजळू लागल्या आहेत.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 12, 2025 05:01:43
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 12, 2025 04:48:46
Washim, Maharashtra:वाशिम जिल्हा परिषद व पंचायत समित्यां裡्या निवडणुकांतील ओबीसी आरक्षणाबाबतचा संभ्रम अखेर दूर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या निर्णयानुसार वाशिम जिल्हा परिषदेत ५२ पैकी १४ जागा, तर पंचायत समित्यांमध्ये १०४ पैकी २८ जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव राहतील. तसेच अनुसूचित जमातींसाठी (एसटी) एक जागा वाढून एकूण ४ जागा, आणि अनुसूचित जातींसाठी (एससी) ११ जागा राखीव राहतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होऊ नये, अशी अट कायम ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ रोजी दिलेल्या परवानगीनंतर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणाची अंतिम निश्चिती करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उद्या पार पडणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांसह राजकीय पक्षांच्या नजरा उद्याच्या आरक्षणा सोडतीकडे लागल्या आहेत.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 12, 2025 04:19:54
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ येथील आयटीआय समोर असलेल्या स्पीड ब्रेकरवर रात्री अकरा वाजताच्या sुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत दोघांचा मृत्यू झाला. मृत तरुणांची नावे पवन हमकारे (वय 23) आणि प्रणव बोरक्ले (वय 17) अशी असून ते मुरलीधर नगरचे रहिवासी आहेत. घटनेनंतर रुग्णालयात उशिरा पोहोचल्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त करत पोलिसांसोबत गोंधळ घातला. अंबरनाथ आयटीआय समोर कल्याण–बदलापूर महामार्गावर असलेला स्पीड ब्रेकर नीट दिसत नसल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती.
1
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 12, 2025 04:03:28
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 12, 2025 03:49:19
Latur, Maharashtra:अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीमध्ये बाधित शेतकऱ्यांना जितकी शासनाकडून मदत करण्यात येणार आहे तितकीच मदत औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. १,२०० कुटुंंबांना सव्वा कोटी रुपयांची थेट मदत ही आता जाहीर करण्यात आली आहे. ही मदत १५ ऑक्टोबर रोजी धनादेश आणि अन्नधान्याच्या पॅकेट्सच्या रूपात वितरित करण्यात येणार आहे. शासकीय मदतीबरोबरच ही स्वतंत्र मदत दिली जाईल, ज्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळावा आहे. याच संदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 12, 2025 03:15:16
Nashik, Maharashtra:मनपात मतदार याद्यांचे काम सुरू आगामी महापालिका निवडणुकीची तयारी नाशिक महापालिका प्रशासनाने सुरू केलीये... सोमवारी अंतिम प्रभाग रचना तयार झाल्यानंतर प्रशासनाने मतदार याद्यांकडे तयार करण्याच्या कामात लक्ष घातले असून, मतदार याद्या डाऊनलोड करण्यास सुरुवात झालीये... सदर प्रक्रिया दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे. प्रभाग रचना जाहीर करताना प्रशासनाने ९१ हरकती फेटाळून लावल्या होत्या....शहरातील ३१ प्रभागांमधून १२२ नगरसेवक महापालिकेवर निवडून जाणार आहे. राज्य शासनाने नाशिक पालिकेची प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच कायम ठेवली आहे. त्यानुसार २९ प्रभागांत चार तर २ प्रभागांत तीन सदस्यीय निवडून जाणार आहेत. महापालिका प्रशासनाकडून ११ जूनपासून प्रभाग रचनेचे काम हाती घेतले होते.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 12, 2025 03:04:21
Nashik, Maharashtra:कुंभमेळा प्राधिकरणासाठी ७६ पदांना मिळाली मान्यता अँकर नाशिक-त्रयंबकेश्वर येथे २०२७ में होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय...कुंभमेळा प्राधिकरणाच्या कामकाजासाठी महाराष्ट्र शासनाने एकूण ७६ पदांच्या निर्मितीला मान्यता दिली आहे. त्यापैकी ५२ पदे नियमित असतील तर २४ पदे मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत.राज्य मंत्रिमंडळाने ६ मे २०२५ रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. प्राधिकरणाला आवश्यक ते अधिकारी व कर्मचारी नेमण्याचा अधिकार देण्यात आले आहे...या तरतुदीनुसार शासनाने सिंहस्थ कुंभमेळा आयोजन आणि अंमलबजावणी कालावधी संपेपर्यंत वरील ७६ पदांच्या निर्मितीला मान्यता दिलीये..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 12, 2025 03:04:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये सुरू असलेल्या अवैध उत्खननावर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या प्राथमिक सुनावणीत जिल्हाधिकारी, पर्यटन विभाग राज्य शासन, पुरातत्त्व विभाग केंद्र शासनाचे महासंचालक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अधीक्षक पुरातत्त्व विभाग छत्रपती संभाजीनगर व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना नोटीस बजावण्याचे आदेश देत प्रतिवादी करण्यात आले आहे. लेणी परिसरातील ३८.६० हेक्टर जागेवर अवैध उत्खनन झाल्याचे याचिकेत नमूद केले आहे. संभाजीनगरच्या लेणींची सहाव्या ते आठव्या शतकादरम्यान निर्मिती झाली. राष्ट्रीय स्मारकात त्याचा अंतर्भाव केला आहे. लेणी परिसरातील गट क्र. २९ मध्ये ३८.६० हेक्टरचा अंतर्भाव केला आहे. येथील जागेत अनधिकृतपणे मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. रोज शेकडो ट्रॅक्टर्स अवैध उत्खनन केले जात आल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणू देण्यात आले आहे…
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 12, 2025 03:02:46
Nashik, Maharashtra:नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडीत काढून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी सातपूर पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असून, सातपूर परिसरातील तब्बल ६० टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलीये....सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या निर्देशानुसार सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक यांच्या पथकाने श्रीराम चौक, पपया नर्सरी, अशोकनगर, कार्बन नाका, प्रबुद्धनगर, आदी परिसरांत धडक मोहीम राबवून परिसरात विनाकारण फिरणाऱ्या संशयित, टवाळखोरांवर कारवाई करण्यात आलीये....अशोकनगर भागात नाकाबंदी करून जवळपास १०० ते १२५ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top