Back
ग्रामीण पुलिस ने आठ घंटे में बैंक डकैती के चारों आरोपी गिरफ्तार कर पर्दाफाश किया
VKVISHAL KAROLE
Nov 17, 2025 02:18:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला दगड मारून २५ लाख रुपयांची लूट करणाऱ्या चार आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अटक करून मोठ्या दरोड्याचा पर्दाफाश केला. ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी याटोळीने कट रचून हा गुन्हा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या चार आरोपींपैकी दोघे हे ग्रामपंचायत सदस्यांचे पुत्र असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. दरोड्याचा हा प्लॅन मुख्य आरोपी भारत रूपेकर याने पूर्ण आठ दिवस रेकी करून तयार केला होता. दरोड्याच्या दिवशी रूपेकरने बँकेत जाऊन पैसे जमा करण्याची स्लिप भरली. मात्र, त्याने स्वतःचा नव्हे, तर पत्नीचा मोबाइल नंबर स्लिपवर टाकला होता. रूपेकरच्या स्वतःच्या गावात बँक असतानाही त्याने याच शाखेत व्यवहार का केला, यावरून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व व्यवहारांच्या स्लिप तपासल्या. स्लिपवरील पत्नीच्या नंबरवरून पोलिसांनी रूपेकरला तातडीने ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
बाईट: पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड
146
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowNov 17, 2025 05:30:150
Report
KPKAILAS PURI
FollowNov 17, 2025 05:27:2225
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 17, 2025 05:26:3817
Report
SKShubham Koli
FollowNov 17, 2025 05:26:22117
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 17, 2025 05:24:3949
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 17, 2025 05:24:1382
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 05:23:0928
Report
KPKAILAS PURI
FollowNov 17, 2025 05:20:2736
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 17, 2025 04:50:0322
Report
AKAMAR KANE
FollowNov 17, 2025 04:49:4591
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 17, 2025 04:49:30126
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 17, 2025 04:49:12195
Report
KJKunal Jamdade
FollowNov 17, 2025 04:48:54122
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 04:48:4070
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 17, 2025 04:37:32Dhule, Maharashtra:धुळे में तापमान गिरा; नवंबर में न्यूनतम रिकॉर्ड, ठंड ने जनजीवन प्रभावित
63
Report