Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अंतरराष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर महिलाओं की पहल से सुरक्षित राष्ट्र

JJJAYESH JAGAD
Mar 08, 2026 10:02:19
Akola, Maharashtra
Anchor : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “सक्षम महिला – सुरक्षित राष्ट्र” या ब्रीदवाक्याखाली हा कार्यक्रम पार पडला. अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत महिला अधिकारीांनी पुढाकार घेत हा उपक्रम आयोजित केला होता. महिलांच्या सन्मान, सक्षमीकरण आणि सुरक्षित वाहतूक संस्कृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांवर कुटुंबासोबत समाजाचीही मोठी जबाबदारी असते, त्यामुळे सुरक्षित वाहन संस्कृती निर्माण करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. उपस्थित महिलांना रस्ता सुरक्षा नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कारदेखील करण्यात आला. यावेळी वाहन चालवणाऱ्या काही महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमातून महिलांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Mar 09, 2026 01:46:13
Akola, Maharashtra:ICC पुरुष टी20 विश्व कप के अंतिम मुकाबले में भारत ने शानदार जीत दर्ज कर इतिहास रचा है. गुजरात के अहमदाबाद में हुए फाइनल मुकाबले में भारतीय टीम ने न्यूजीलैंड पर जोरदार जीत हासिल कर लगातार दूसरी बार टी-20 विश्व कप के नाम दर्ज किया. भारत ने 96 रन से न्यूजीलैंड को हराकर ऐतिहासिक प्रदर्शन किया. भारतीय गेंदबाजों ने न्यूजीलैंड के बल्लेबाजों को सिर्फ 159 रन पर रोककर जीत सुनिश्चित की. इस शानदार विजय के बाद देशभर में क्रिकेट प्रेमियों में जश्न का माहौल है. इसके अलावा, आकोला जिले के मूर्तिजापूर शहर में भी टीम इंडिया की जीत के बाद क्रिकेट प्रेमियों ने बड़ा जश्न मनाया. शहर के जयस्तंभ चौक मित्र मंडल के द्वारा फुल स्क्रीन पर फाइनल मैच देखने की व्यवस्था की गई थी. भारत का सामना देखने के लिए सैकड़ों क्रिकेट प्रेमी यहां बड़े उत्साह के साथ जुटे थे. मुकाबले के आख़िरी क्षणों में भारत के विजय के स्पष्ट होते ही जयस्तंभ चौक क्षेत्र में आनंद की एक ही धारा दौड़ पड़ी. क्रिकेट प्रेमियों ने आतिशबाजी और घोषणाबाजी के साथ टीम इंडिया की जीत का आनंद मनाया. इस मौके पर बीजेपी विधायक हरिष पिंपळे तथा मूर्तिजापूर नगर परिषद के नगराध्यक्ष हर्षल साबले भी मौजूद रहे और क्रिकेट प्रेमियों के साथ खुशी व्यक्त की. ढोल-ताशाओं की गूंज और आतिशबाजी के बीच भारत की ऐतिहासिक जीत का उत्सव मनाया गया. टीम इंडिया की ये जीत देशभर में आनंद का वातावरण लेकर आई और क्रिकेट प्रेमियों में भारी उत्साह दिखा.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 09, 2026 01:45:34
Wardha, Maharashtra:हिंगणघाटात ऑटोमोबाईल दुरुस्ती दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान हिंगणघाट शहरातील कैलास सांयकार यांच्या सांयकार ऑटोमोबाइल्स या ऑटोमोबाइल दुरुस्ती दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील वाहन दुरुस्तीचे साहित्य, उपकरणे व इतर सामग्री जळून खाक झाली. या आगीने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेदरम्यान 112 चे पेट्रोलिंग पथक गस्त घालत असताना आग त्यांच्या निदर्शनास आली. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. दुकानदाराच्या मागील भागात अज्ञात व्यक्तीने कचरा पेटविल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, आग पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 09, 2026 01:30:15
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर :भर रस्त्यावर पार्किंग, केवळ दुचाकीवर कारवाई, चारचाकी वाहनांवर कारवाई नाही,महापालिकेचे दुर्लक्ष अँकर : ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरची ओळख आता 'वाहतूक कोंडीचे शहर' अशी होऊ लागली आहे. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंगची कोणतीही शिस्त उरलेली नाही. महापालिका मुख्यालय ते रोशन गेट या 50 फुटी रस्त्यावर बेशिस्त पार्किंगमुळे केवळ  मोठ्या रुग्णालयासमोरही थेट रस्त्यावरच वाहने उभी असल्याने गंभीर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही तासं तास अडकून पडावे लागत आहे. -दुटप्पी कारवाईने नागरिक संतप्त रस्त्यावर लावलेल्या दुचाकी उचलून नेण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांची पथके तत्पर दिसतात. मात्र, - ही कारवाई केवळ दुचाकीस्वारांपुरतीच मर्यादित असल्याचा आरोप नागरिक - करत आहेत. रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवत नाही. यामुळे चारचाकी चालकांना पोलिसांचा धाक उरलेला नसून दुर्लक्षामुळे मोठ्या गाड्यांचे मालक वाटेल तेथे पार्किंग करत आहेत.
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Mar 09, 2026 01:16:43
Karjat, Maharashtra:कर्जत उपजिल्हा रुग्णालयाबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांची नेमणूक असतानाही ते प्रत्यक्षात दुसरीकडे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांचा पगार कर्जत रुग्णालयातूनच दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुळ्यात, कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूतीतज्ञ डॉ. रामदास तरपेवाड यांना २०२३ साली उसनवारी तत्वावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र ते आजही माणगाव येथेच कार्यरत असून कर्जत रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्जत तालुका हा आदिवासी आणि ग्रामीण भाग असल्याने अनेक गरोदर महिलांची प्रसूती सरकारी रुग्णालयातच होते. मात्र गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी तज्ञ डॉक्टर नसल्याने महिलांना खोपोली, उल्हासनगर किंवा खासगी रुग्णालयात हलवावे लागत असल्याने त्यांच्या आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, याबाबत भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी रुग्णालय प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर निशाणा साधत कर्जतच्या महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 09, 2026 01:16:23
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | लहान मुलांच्या लसींचा तुटवडा, पालकांमध्ये चिंता छत्रपती संभाजीनगरमधील महापालिकाेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसींचा साठा संपुष्टात आल्याने लसीकरण सेवांवर परिणाम झाला आहे. शहरातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मागील दहा ते पंधरा दिवसांपासून लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुलांचे लसीकरण करण्यासाठी आलेल्या पालकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. शहरात महापालिकेची एकूण 39 प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात दर महिन्याला साधारण 100 ते 150 युनिट लसींची आवश्यकता असते. मात्र, सध्या लसींचा पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे अनेक केंद्रांमध्ये लसीकरण पुढे ढकलले जात असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत बालकांना डीपीटी, आयपीव्ही, रोटा तसेच इतर महत्त्वाच्या लसी दिल्या जातात. यातील काही लसींचा साठा कमी झाल्यामुळे नियमित लसीकरणाच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. परिणामी पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 09, 2026 01:01:25
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 08, 2026 17:16:11
Navi Mumbai, Maharashtra: भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई मनपाने महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात रुग्णालयाच्या मुद्द्यावरून सभागृह नेते सागर नाईक यांच्यासह महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवकांना भावनिक आवाहन केलेय. विरोधाला विरोध करू नका रुग्णालय हातातून जाऊ देऊ नका आपल्या आपसातील भांडणाचा लाभ दुसऱ्याला होऊ देऊ नका असा सल्ला यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी दिलाय. यासोबतच साडे आठ एकर खेळाचं मैदान कोणी देईल का असा सवाल उपस्थित करत सिडको 1, 2 एकर देऊन बाकीचा प्लॉट विकेल म्हणजे मी सांभाळून ठेवलेला प्लॉट देखिल तुम्हाला मिळणार नाही. मी दोहरी पायांनी अपंग असताना दिल्लीवाऱ्या करून सर्व परवानग्या आणल्या असून माझी तुम्हा सगळ्यांना साथ आहे फक्त बघण्याचा चष्मा बदला सगळं काही बदलेल असे भावनिक आवाहन आमदार मंदा म्हत्रे यांनी केलेय.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 08, 2026 14:47:09
0
comment0
Report
UPUmesh Parab
Mar 08, 2026 14:32:49
Oros, Maharashtra:आज 8 मार्च महिला दिनापासून सुरू झालेल्या जल महोत्सव येत्या 22 मार्च जागतिक जल दिनापर्यंत सुरू राहणार आहे. कुर्ली येथील आयोजित कार्यक्रमात जल कुंभाची मिरवणूक, जलकुंभ पूजन आदी कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्र्यांसमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. जल जीवन मिशनमध्ये महाराष्ट्र नंबर एक वर आहे. येत्या सहा महिन्यात महाराष्ट्रात शुध्द पेयजल प्रत्येक घरात पोहोचवणार आहोत. एकही घर यापासून वंचित राहणार नाही. जल जीवन मिशनची यशस्विता इतकी आहे की इतर देशदेखील आता त्याचे अनुसरण करू लागले आहेत. अशा शब्दात जल जीवन मिशन बाबत गौरव उद्गार केंद्रीय रेल्वे तथा जल आपूर्ति राज्यमंत्री व्हि. सोमण्णा यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील कुर्ली गावामध्ये जल महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी देखील मोदी सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी तब्बल 1 लाख 17 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. मोदीजी नेहमी रेल्वे रस्ते आणि पाणी योजनांना अग्रक्रम देतात. मोदीजींचे काम, व्हिजन विकसित भारत 2047 आपण पाहतो आहोत आणि यातून झालेला विकास केवळ महाराष्ट्र, कर्नाटक किंवा दक्षिण भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात दृष्टीस पडत आहे, असे ते पुढे म्हणाले.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 08, 2026 14:15:53
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विठूरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर ” अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग ” या अभंगाची प्रचिती आली. वसंतोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रंगपंचमी. वसंत पंचमी पासून रंगपंचमी पर्यंत दररोज विठूरायाला पांढऱ्या पोशाखावर गुलाल टाकून पूजा केली जाते. सलग महिनाभर हा दिनक्रम सुरु असतो. या उत्सवाची सांगता रंगपंचमीला होते. रंगपंचमी दिवशी दुपारी 4.30 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपुजा केली देवाच्या अंगावर केशरयुक्त रंग व गुलाल टाकण्यात आला. नंतर डफाची पुजा करुन नामदेव पायरी- तुकाराम भवन - पश्चिम द्वार - चौफाळा - पश्चिम द्वार - व्हीआयपी गेट - नामदेव पायरी अशी मंदिर प्रदक्षिणा करून डफाची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. सदर मिरवणुकीमध्ये रंगाची उधळण करून व मानकऱ्यांना प्रसाद देवून वसंतोत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी उत्साहात मंदीर समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
0
comment0
Report

AKAMAR KANE
Mar 08, 2026 14:01:50
Nagpur, Maharashtra:
0
comment0
Report
Advertisement
Back to top