Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला के होटल व्यवसायी को व्यावसायिक LPG सिलेंडर नहीं मिलने से चूलियां जलाने को मजबूर

JJJAYESH JAGAD
Mar 26, 2026 01:30:33
Akola, Maharashtra
मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी गॅसच्या वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र शासन यांच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग ने १३ मार्च २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील व्यावसायिक एलपीजी गॅसच्या वापराचे प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर २० मार्च रोजी पुन्हा एक नवीन आदेश काढण्यात आला. या आदेशात काही क्षेत्रांना एलपीजी गॅस पुरवठ्याला परवानगी देण्यात आली असली तरी खाद्य आणि हॉटेल व्यवसायिकांना अद्यापही यात समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे या निर्णयामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या आदेशानुसार अनेक संस्था तसेच सार्वजनिक सेवांना १०० टक्के गॅस पुरवठा प्राधान्याने करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर काही शासकीय उपहारगृहे आणि तत्सम सेवांना ७० टक्के गॅस पुरवठा करण्यात येणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दुसरा आदेश काढल्यानंतरही खाद्य आणि हॉटेल व्यवसायिकांचा यात समावेश करण्यात आलेला नाही.या निर्णयामुळे अकोला शहरातील अनेक हॉटेल आणि खाद्य व्यवसायिकांना आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. शहरातील अनेक हॉटेल्समध्ये गॅसऐवजी लाकडी चुलीवर स्वयंपाक सुरू करण्यात आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयाचा पुन्हा विचार करून नवीन आदेश काढावा आणि हॉटेल व खाद्य व्यवसायिकांना व्यावसायिक एलपीजी सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 26, 2026 02:46:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरातील मुकुंदवाडी परिसरात शतपावली करणाऱ्या महिलांना लक्ष्य करत मंगळसूत्र हिसकावण्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी रस्त्यावर चालणाऱ्या दोन महिलांपैकी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र क्षणार्धात हिसकावले. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरीला गेलेले मंगळसूत्र अंदाजे १९ ग्रॅम वजनाचे असून त्याची किंमत सुमारे १ लाख २८ हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 26, 2026 02:46:38
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 26, 2026 02:34:27
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पश्चिमी देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल मिळणार नाही अशा वेगवेगळ्या अफवा छत्रपती संभाजीनगर मध्ये पसरल्या , रात्री लागकीच नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली . जवळपास सर्वच पंपांवर अर्ध्या किलोमीटर पेक्षा जास्त रांगा रात्री पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांना देखील बंदोबस्तासाठी यावे लागले, पेट्रोल पंपावर पुरेसा स्टॉक उपलब्ध आहे मात्र नागरिकांनी गर्दी केल्यामुळे अडचणी वाढतील आणि हा स्टॉक लवकर संपेल, अशी माहिती पेट्रोल पंप मालकांनी दिली... तर ऑइल कंपन्यांनी आता ऍडव्हान्स पेमेंट घ्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे अनेक पेट्रोल पंप वर टँकर येऊ शकले नाही त्यामुळेही काही पंप कोरडे पडले अशी ही माहिती पेट्रोल पंप संघटनेने दिली आहे मात्र यावर गुरुवारी तोडगा निघेल असंही सांगितलं जातंय, मात्र नागरिकांनी बुधवारी संध्याकाळपासूनच पेट्रोल पंपावर गर्दी केल्याने अनेक पेट्रोल पंप कोरडे पडलेत...
469
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 26, 2026 02:31:37
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोलची टंचाई असल्याचे चुकीचे चित्र उभे केले जात आहे. मात्र टंचाई नसली तरी काही जण एकाच वेळी येऊन १०० लिटर पेट्रोल मागत आहेत. काही जण कॅनमध्ये, बॉटल मध्ये पेट्रोल मागत आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुणालाही कॅनमध्ये किंवा बॉटल मध्ये पेट्रोल देऊ नये, अशा सूचना पेट्रोल पंप मालकांना दिल्या गेल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ विकास मीना यांनी सांगितले. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. जिल्ह्यात ८२० केएल पेट्रोल आणि ११७० केएल डिझेलचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांनी पेट्रोलपंपावर अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मिना यांनी केले.
417
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 26, 2026 02:31:18
Beed, Maharashtra:ANC- बीड तालुक्यातील भाटसांगवी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते बलभीम बोरवडे यांच्यासह त्यांच्या मुल्यावर आणि पुतण्यावर काल रात्री 8 च्या दरम्यान काही जणांनी प्राणघातक हल्ला केला. यात तिघेजण गंभीरित्या जखमी झाले असून बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी भाटसांगवी आणि औरंगपूर या गावातील कामांबाबतची माहिती लेखी माहिती अधिकाराखाली मागवली होती. याचाच राग मला धरून सरपंचाने गुंड घेऊन येत हल्ला केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते बलभीम बोरवडे यांनी केला आहे. या प्रकरणात अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जखमी माहिती अधिकार कार्यकर्ते बलभीम बोरवडे यांनी केली आहे. बाईट- बलभीम बोरवडे (जखमी माहिती अधिकार कार्यकर्ते)
527
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 26, 2026 02:31:02
565
comment0
Report
GMGajanan MAchindar
Mar 26, 2026 02:30:35
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल संपल्याची अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अफवेमुळे घाबरलेल्या नागरिकांनी कॅन आणि बाटल्या घेऊन पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पंपांवर धाव घेतली आहे. कळमनुरी,हिंगोली आणि सेनगाव या भागांतील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांसह कॅनमध्ये इंधन भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र अधिकृत पातळीवर इंधन तुटवड्याची कोणतीही माहिती नसताना केवळ अफवेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये अस आवाहन केलं आहे बाईट -राजकुमार देशमुख पेट्रोल पंप चालक
483
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 26, 2026 02:30:23
Akola, Maharashtra:अकोल्यात रामनवमी शोभायात्रा समिती यांच्या पुढाकाराने शहरात भगवान श्रीरामांच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहात तयारी करण्यात आली आहे. अकोला शहरातील प्रमुख चौक-चौकांमध्ये, बाजारपेठांमध्ये तसेच मुख्य मार्गांवर भगवान श्रीरामांचे आकर्षक होर्डिंग, पताका आणि बॅनर लावण्यात आले आहेत. रंगीबेरंगी आणि सुंदर पताकांनी संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात नटलेले दिसत आहे.या सजावटीमुळे श्रद्धाळूंमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून रामनवमी शोभायात्रेबाबत नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे. समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या भव्य सजावटीमुळे अकोला शहराची शोभा आणखी वाढली आहे.आज श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच सायंकाळी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर येथून शहराच्या मुख्य मार्गांवरून श्रीराम नवमीची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
454
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 26, 2026 01:01:50
Solapur, Maharashtra:सोलापुरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर Ramnawmi निमित्त उभारण्यात आलेल्या मंडपाच्या कमानीवर चढून झेंडा लावत असताना तरुणाचा शॉक लागून जागीच मृत्यू शहरातील स्वागत नगरातील यशवंत सोसायटी परिसरात घडली मन हेलावून टाकणारी घटना केतन रमेश पाटोळे असे मृत तरुणाचे नाव असून तो अवघ्या 24 वर्षांचा असल्याने सर्वत्र हळहळ कमानीवर चढून झेंडा लावत असताना एम एस सी बी च्या विद्युत तारेला झेंड्याचा पाईप स्पर्श झाल्याने घडली घटना नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्वरित शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच केले मयत घोषित रामनवमीच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र शोककळा
1097
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 25, 2026 16:17:51
Shirdi, Maharashtra:कॅप्टन अशोक खरात मामेभाऊ मधुकर गुंजाळ प्रथमच मिडीयासमोर... शिर्डी जवळील काकडी गाव अशोक खरात यांचे आजोळ... पॉईंटर्स - अशोक खरात याला दोन आई... पहिली आई डोंगरगावची तर दुसरी आई आमची आत्या या काकडी गावच्या... आमच्या आत्याच वय 96 वर्ष... आमचा संबंध केवळ कौटूंबिक कार्यक्रमात ... खरात हे खुप कमी वेळी आजोळी यायचे... पहली आई यांना पाच मुले तर दुसरी आई आमची आत्या यांना दोन मुले. ते सर्व कहांडळवाडी येथे राहतात... मिडीयावर ज्या समोर आलय त्याबाबत आम्हाला माहिती नाही...आम्ही हे मिडीयावर पहिल्यांदाच पाहातोय... ज्यावेळी आत्याचे लग्न झाले त्यावेळी सर्व शेतकरी समाज होता त्यामुळे आमच्या आजोबांनी निर्णय घेतला... काकडी मध्ये खरेदी केलेली जमिनयाविषयी आम्हाला कल्पना नव्हती .. झालेल्या प्रकाराबाबत आता SIT चौकशी सुरू , निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे... मधुकर गुंजाळ यांची मागणी
1022
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 25, 2026 12:36:44
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:देवदर्शन करके गावी निघालेल्या भाविकांच्या गाडीचा सांगलीच्या विटा नजीकच्या सुळेवाडी येथे भीषण अपघात झाला. अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींना विटा येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत, दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व जण कवठेमहांकाळ तालुक्यातल्या आरेवाडी यात्रा निमित्ताने देवदर्शन करून विटा मार्गे पुण्याकडे निघाले होते. दरम्यान विजापूर गुहागर महामार्गावरील सुळेवाडीजवळ भरधाव गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या होर्डिंगला गाडी धडकून तीन ते चार वेळा पलटी खाऊन, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातामध्ये गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
1034
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 25, 2026 12:30:30
981
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 25, 2026 12:18:10
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:शेततळयात डूबकर मायलेक की मौत की खबर जत तालुक्यातील डफळापुर में घडली है. सुशीला विट्टप्पा पडोळकर, उम्र 60, और अनिल विट्टप्पा पडोळकर, उम्र 25, दोनों चिकोडी तालुका, कर्नाटक के निवासी थे. डफळापुर के एक शेततळयामध्ये गाई-भैंस पाणी पिण्यास हेतु लुकावणाऱ्या पडोळकर कुटुंबातील पाँच सदस्य शेततळयामध्ये उतरले. आपस में हाथ पकड़ कर पानी निकालते समय एक का तौल बिगड़ गया, जिससे सभी लोग शेततळ्यात डूब गए. अनिल ने कुटुंबातील तीन लोगों को बाहर निकाला, पर माँ दिखाई नहीं दी, फिर वह पानी में गया और माँ ने उसे मजबूती से गले लगाकर दोनों मायलेक के डूब जाने से दुखद मौत हो गई. घटना जत पुलिस थाने में दर्ज हुई है; क्षेत्र में शोक की लहर है.
981
comment0
Report
Advertisement
Back to top