Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

तेल्हारा के पानी शुद्धीकरण प्रकल्प के विरोध में किसानों ने आंदोलन की चेतावनी दी

JJJAYESH JAGAD
Jan 26, 2026 03:01:45
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात बाळापुर 69 खेडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या बांधकामाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.वारी भैरवगड परिसरात सुरू असलेले हे बांधकाम तत्काळ थांबवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.या संदर्भात शेतकऱ्यांनी तेल्हारा तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. 4 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार या प्रकल्पाला स्पष्ट स्थगिती असतानाही नियमबाह्य पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच कोणताही ग्रामपंचायत ठराव अथवा परवानगी न घेता तृतीय पक्ष कंपनीकडून हे बांधकाम करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.या प्रकल्पामुळे वान धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या सिंचन हक्कांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Jan 26, 2026 05:18:06
Washim, Maharashtra:वाशिम: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी ९.१५ वाजता वाशिम पोलिस कवायत मैदानावर राज्याचे कृषी व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन पार पडले. राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलिस दलाने सलामी दिली व परेडची पाहणी करण्यात आली.या सोहळ्याला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्यासह विविध अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, वीरमाता-वीरपत्नी,स्वातंत्र्यसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा देत विकासकामांचा आढावा घेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव केला.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Jan 26, 2026 05:05:55
Dhule, Maharashtra:देश के 77वें गणतंत्र दिवस के मुख्य शासकीय ध्वजारोहण समारोह नंदुरबार पुलिस कवायत मैदान पर सम्पन्न हुआ, योगेश कदम के हस्ते ध्वजारोहण किया गया। योगेश कदम को मंत्री पद मिलने के बाद पहली बार ध्वजारोहण करने का सम्मान मिला है। राज्य की पुलिस दल सक्षम है और राज्य सरकार की तरफ से जनकल्याणकारी योजनाएं चलाई जा रही हैं ताकि हर व्यक्ति को योजनाओं के लाभ मिलें। आने वाले समय में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के माध्यम से कल्याणकारी योजनाएं चलती रहेंगी। ध्वजारोहण के बाद पुलिस दल ने राष्ट्रध्वज को सलामी दी। कार्यक्रम में जिले के राजनीतिक और सामाजिक क्षेत्र के मान्यवर और स्वतंत्रता सेनानी के परिवार उपस्थित थे।
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Jan 26, 2026 05:04:40
Dhule, Maharashtra:Anchor - धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जायकुमार रावल यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहण संपन्न झाला. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सगळी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्य भाग्यश्री विसपुते पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पथसंंचालन करत राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. या पतसंंचालनामध्ये पोलीस दला बरोबर एनसीसी तसेच स्काऊट गाईडचे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी बालविवाह रोखण्यासाठी उपस्थितांना शपथ दिली. उपस्थितांना संबोधन करताना राज्याचे पणन मंत्री जायकुमार रावल यांनी सरकारने जिल्ह्यातील सर्वच घटकांसाठी रबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनाचा जिल्ह्यात देण्यात आलेल्या लाभाची माहिती उपस्थित त्यांनी दिली.शासनाची प्रत्येक योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहणार असून, शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 26, 2026 05:04:24
Akola, Maharashtra:भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभाचे आयोजन अकोल्यातील लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे उत्साहात करण्यात आले. या समारंभात राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले.यावेळी राष्ट्रध्वज वंदनानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच अकोलेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभादरम्यान पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विशेष वाहनातून परेडमध्ये सहभागी असलेल्या पथकांचे अवलोकन केले. यावेळी परेड कमांडर म्हणून आयपीएस अधिकारी ईशानी आनंद उपस्थित होत्या.देशभक्तीपर वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांमध्ये उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण केली.आकाश फुंडकर यांनी यावळी देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Jan 26, 2026 04:35:06
Beed, Maharashtra:अनेकदा तुम्ही पतीकडून पत्नीला मारहाण तिला घराबाहेर काढून दिल्याच्या बातम्या पाहिल्या असतील... मात्र बीडमधून एक वेगळी बातमी समोर येतेय बायको नांदत नाही, पोलिसांनी माझा संसार बसून द्यावा या अनोख्या मागणीसाठी एक तरुण गेल्या पाच वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. आता पुन्हा सहाव्यांदा हा तरुण बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीवर चढून आत्महत्याचा इशारा दिला आहे. आज प्रजासत्ताक दिन है.. याच निमित्ताने या तरुणाने पुन्हा एकदा एक अनोख आंदोलन सुरू केलंय.. सहाव्यांदा आंदोलन सुरू असल्याने पोलिसांच्या ही डोकेदुखीत मोठी वाढ झाली आहे. नितीन उबळे असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान इमारतीवरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांकडून शर्यतीचे प्रयत्न सुरू झाले आहेत..
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Jan 26, 2026 04:18:10
Nashik, Maharashtra:बाल्कनीतून कोसळून सात वर्षांचा मुलाचा मृत्यू अँकर नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील नरहरीनगरमध्ये असलेल्या शिवगंगा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील एका सदनिकेच्या बाल्कनीमधून सात वर्षांचा चिमुकला काल खेळताना थेट पडलेल्या खाली कोसळल्याने मृत्यू झालाय...कियांश प्रफुल्ल बेदाडे असे मृत्युमुखी चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना दुपारी साडेचार वाजेच्या sुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे...रविवारची सुटी असल्याने कियांश आपल्या राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीत खेळत होता. खेळण्याच्या नादात त्याचा अचानक बाल्कनीतून तोल गेला आणि तो खाली पार्किंगमध्ये कोसळला. यामुळे त्याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकल्याला तातडीने त्याच्या चولىत्याने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा जागीच मृत्यू झालेला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून कियांशला मृत घोषित केले. बेदाडे कुटुंबीयांचा कियांश सर्वात लहान मुलगा होता. या अपार्टमेंटमध्ये हे कुटुंब दोन ते तीन महिन्यांपूर्वीच राहण्यासाठी आले होते. कियांशचे वडील हे नोकरीनिमित्त मनमाड येथे वास्तव्यास असतात. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली होती, तसेच इंदिरानगर पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद केलीये...
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Jan 26, 2026 03:17:30
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेत महापौर और उपमहापौर निवडी की प्रक्रिया 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेशानुसार 5 फेब्रुवारी रोजी महापौर निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली असून या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची नियुक्ती करण्यात आलेय. याच पाश्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक हे 3 फेब्रुवारी रोजी सर्व नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून या बैठकीत महापौर पदाचे नाव जाहीर करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जातेय. विजयी नगरसेवकांच्या जन आशिर्वाद आणि आभार सोहळ्या दरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भात सुतोवाच दिलेत。
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 26, 2026 02:45:45
Akola, Maharashtra:अकोला शहरात एमआयएमचे माजि खासदार इम्तियाज जलील यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाच्या वतीने गांधी चौक येथे तीव্র आंदोलन करण्यात आले. मुंब्रा येथे “महाराष्ट्र हिरवा करणार” असे वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केला आहे.या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान झाल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी जलील यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून जोरदार निषेध नोंदवला. “इम्तियाज जलील यांच्या सात पिढ्या जरी आल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही,” असा घणाघात आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी इम्तियाज जलील यांना समज देत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 26, 2026 02:30:40
Akola, Maharashtra:वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने १२ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन रविवारी अकोल्यात थाटात पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या प्रा. विजयाताई मारोतकर होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी राष्ट्रसंतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवून त्यांना कृतिशील बनवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रसंतांचे विचार हे जनसामान्यांच्या भाषेत मांडलेले तत्त्वज्ञान असून विज्ञानवादी दृष्टिकोनातून मानवकल्याणासाठी त्यांनी साहित्यनिर्मिती केल्याचे प्रा. मारोतकर यांनी सांगितले. ग्रामगीतेचा केवळ पारायण न करता तिच्या विचारांनुसार प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. संमेलनाचे उद्घाटन आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या हस्ते झाले.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 26, 2026 02:30:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर  शहरात हवामानाचा लपंडाव सुरू आहे, आज उद्या सकाळी शहरवासीयांना दाट धुक्याचा सामना करावा लागणार आहे, तर मंगळवारी शहरात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील.बकिमान तापमान १६ अंश सेल्सियस. तर कमाल तापमान २९ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. शहराच्या काही भागात हलका पाऊस किंवा रिमझिम पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे तापमानात किंचित घट होऊन पारा २८ अंश सेल्सियसपर्यंत खाली येऊ शकतो. मात्र, हा पावसाळी प्रभाव केवळ एक दिवसापुरताच मर्यादित असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून शहर परिसरात किमान तापमानात वाढ होत असून, पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान १६ ते १७ अंशावर जाऊन तापमान वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे。
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 26, 2026 02:18:27
0
comment0
Report
Advertisement
Back to top