Back
अकोला महापालिका चुनाव: भाजपा के भीतर नाराजगी से मोर्चाबंदी बन सकती है
JJJAYESH JAGAD
Dec 17, 2025 03:31:09
Akola, Maharashtra
अकोला महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवार वेगाने कामाला लागले आहेत. मात्र, अकोल्यात या निवडणुकीआधी भाजपसमोर अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचे मोठे आव्हान उभे ठाकल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले, तब्बल ३० वर्षे नगरसेवक राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते हरीश अलीमचंदानी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याचप्रमाणे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक ओळंबे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून भाजपविरोधात निवडणूक लढवली. या दोन्ही उमेदवारांमुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फटका भाजपला बसत पराभव स्वीकारावा लागला.या पराभаванंतर भाजपने पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत अनेक आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला.आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप या निष्कासित कार्यकर्त्यांचा विचार करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या सर्व नाराज आजी-माजी नगरसेवकांनी एकत्र येत ‘नागरिक संवाद मंच’ची स्थापना केली आहे.या मंचाच्या माध्यमातून आयोजित संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले तर या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या सूचना भेटीत नागरिकांनी लिखित स्वरूपात आपल्या सूचनाही मांडल्या.आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवक कसा असावा, नागरिकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, तसेच शहराच्या विकासाबाबत कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य द्यावे, यावर नागरिकांनी आपली मते मोकळेपणाने मांडली. या संवाद मंचातून अप्रत्यक्षपणे भाजपला थेट आव्हान देण्यात आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.या शक्तिप्रदर्शनानंतर ‘विकास आघाडी’च्या नावाने भाजपविरोधात एकत्रित मोर्चेबांधणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “नाराजांची एक मूठ” जर प्रत्यक्षात आकाराला आली, तर भाजपची डोकेदुखी निश्चितच वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.दरम्यान, भाजप या नव्या आव्हानाकडे कशा प्रकारे पाहते आणि पक्षापासून नाराज झालेल्या या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी कोणती रणनीती आखते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.आगामी महापालिका निवडणुकीत अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची नांदी या घडामोडींमधून दिसून येत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowDec 17, 2025 05:33:080
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 17, 2025 05:31:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 17, 2025 05:19:220
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 05:17:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 05:15:130
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 17, 2025 05:04:180
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 17, 2025 04:56:480
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 17, 2025 04:51:360
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 17, 2025 04:50:570
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 17, 2025 04:50:410
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 17, 2025 04:50:040
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 17, 2025 04:19:580
Report
AKAMAR KANE
FollowDec 17, 2025 04:17:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 17, 2025 04:17:290
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 17, 2025 04:07:340
Report