Back
अकोला: अकोट-हिवरखेड सड़क निर्माण गुणवत्ता पर आरोप, मुरूम के बजाय मिट्टी, वृक्ष कटाई चिंता
JJJAYESH JAGAD
Dec 17, 2025 02:49:53
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील अकोट ते हिवरखेड या सुमारे अडीचशे कोटी रुपयांहून अधिक बजेटच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. खंडाळा व हिवरखेड येथील नागरिकांनी याबाबत आवाज उठवत थेट रस्त्यावर जाऊन सुरू असलेल्या कामातील त्रुटींचा पाढा वाचला.यावेळी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना घटनास्थळी बोलावून नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. रस्त्याच्या कामात मुरूमऐवजी काळी व पांढरी माती सर्रास वापरली जात असल्याचे निदर्शनास आणून देत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, केवळ थातूरमातूर देखावा वगळता कोणत्याही ठोस सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचाही आरोप करण्यात आला. या रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. मात्र, त्या बदल्यात नवीन वृक्षमाल्याची लागवड या मार्गावर कुठेही दिसून येत नसल्याने पर्यावरणप्रेमींनीही चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणात संबंधित कंत्राटदार, एमएसआरडीसीचे अधिकारी तसेच शासकीय-प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी नेमकी कोणती पावले उचलतात, याकडे आता जनतेचे लक्ष लागून आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowDec 17, 2025 05:19:220
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 05:17:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 05:15:130
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 17, 2025 05:04:180
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 17, 2025 04:56:480
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 17, 2025 04:51:360
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 17, 2025 04:50:570
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 17, 2025 04:50:410
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 17, 2025 04:50:040
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 17, 2025 04:19:580
Report
AKAMAR KANE
FollowDec 17, 2025 04:17:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 17, 2025 04:17:290
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 17, 2025 04:07:340
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 17, 2025 04:06:480
Report
AKAMAR KANE
FollowDec 17, 2025 04:05:280
Report