Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

ओवैसी ने फडणवीस पर निशाना साधा, 31 हजार करोड़ के पैकेज पर सवाल

LBLAILESH BARGAJE
Oct 10, 2025 04:50:28
Pune, Maharashtra
अहिल्यानगर येथे झालेल्या MIM च्या सभेत खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार करोडचा पॅकेज जाहीर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. यावर ओवेसी यांनी फडणवीस तुम्ही पंतप्रधान मोदींच्या प्रमाणे मोठमोठ्या बाता मारत आहतं असं म्हटलं असून 31 हजार कोटी मध्ये दहा हजार कोटी NDRF चे येतील पाच सहा हजार कोटी हे खात्याच बजेट असतं. शेतकऱ्यांनी भरलेल्या पिक विम्यातून पैसे येतील असे सगळे 31 हजार करोड होत असताना आपण त्यात काही वेगळं केलं नाही. शेतकऱ्यांची 30 लाख एकर जमीन खराब झाली आहे त्यांना आता कर्जमाफीची गरज आहे, पंतप्रधानांना भेटून शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तुम्ही विरोधी पक्षात असताना हेच म्हणत होता मग आता करा असं ओबीसी यांनी म्हटलं आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Oct 10, 2025 10:53:33
Kalyan, Maharashtra:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारा पथकाची मोठी कारवाई दमनदिव येथून कर चुकून विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्यासह वाहनसह सुमारे 24 लाखांचा साठा जप्त महाराष्ट्रात दारूच्या किंमतीमध्ये भाव वाढ झाल्यानंतर आता दारूतस्करांनी दादरा नगर हवेली दमन देव सह इतर परराज्यातून महाराष्ट्रात कर चुकून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याची तस्करी सुरू केली आहे .अशीच एक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाला मिळाली .या मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने शहापूर येथील विहिगाव खोडाळा रोड परिसरात सापळा रचत 200 बॉक्स विदेशी मध्याचा साठा व एक पिकप टेम्पो असा एकूण 23 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केलं हा मध्यासाठा दादरा नगर हवेली दिव दमण येथून महाराष्ट्रात कर चुकून आणण्यात आला असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब यांनी दिली या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब हे पुढील तपास करत आहेत.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 10, 2025 10:51:06
Parbhani, Maharashtra:अँकर - सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत तूटपुंजी दिल्याचा आरोप करत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव हिंगोली दोन तालुके अतिवृष्टीतून वगळल्याने शेतकरी क्रांतिकारी संघटना आक्रमक झालीय. शेतकऱ्यांनी सरकारने दिलेली आर्थिक मदत गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर आणून फेकून देत पैशांची उधळण करत तुटपुजी मदत नकोय आमची मदत परत घ्या म्हणत सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे..हिंगोली आणि सेनगाव तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली आहेत. पण सेनगाव आणि हिंगोली तालुक्याचा विशेष मदतीचा जीआरमध्ये सहभाग करण्यात आला नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. दिवाळी जवळ असताना सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंची मदत दिल्याने हिंगोलीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. गोरेगाव येथील गजानन कावरखे यांना 2 हेक्टरसाठी केवळ 9 हजार 775 रुपये मिळाल्याने कावरखे आक्रमक झाले होते,त्यांनी सदर पैसे रस्त्यावर फेकून देत शासनाच्या मदतीचा निषेध केला...
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 10, 2025 10:50:36
Dhule, Maharashtra:ANCHO R - लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य असलेल्या ई केवायसी प्रक्रियेसाठी नर्मदा काठावरील खर्डी खुर्द (ता. धडगाव) गावातील महिलांना खडतर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये जीवघेणा संघर्ष करण्याची वेळ आली आहे. डोंगरावर चढाई करत इंटरनेटची रेंज जिथे मिळेल तिथे आधार केवायसी करण्याची वेळ आलेली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे याही ठिकाणी नशिबाने साथ दिली तरच केवासी होत आहे. गावात नेटवर्क असूनसुद्धा इंटरनेटची सुविधा अत्यंत कमकुवत असल्याने 'लाडक्या बहिणीं'ना हे काम पूर्ण करण्यासाठी डोंगरावर तासनतास बसावे लागत आहे. एवढं करून ही वाऱ्याची दिशा बदलली तर इंटरनेटची रेंज बंद होत असल्याने पुन्हा दुसऱ्या दिवसाची वाट बघण्याची वेळ या महिलांवर आली आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी ई- केवायसी बंधनकारक केल्यामुळे खर्डी खुर्द येथील महिलांना ही जीवघेणी आणि वेळखाऊ कसरत करावीच लागत आहे. ए केवासी या प्रक्रियेसाठी मोबाईल नेटवर्क व जलद इंटरनेट आवश्यक असते. परंतु गावात चांगली सुविधा नसल्याने महिलांना गाव सोडून नर्मदा काठावरील उंच टेकडीवर जावे लागते. टेकडीवरही नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने अनेक महिला झाडाच्या फांद्यांवर काठीला मोबाईल बांधून ठेवतात, जेणेकरून सिग्नल मिळून ई-केवायसी पूर्ण होईल. एका बाजूला मोबाईल झाडावर व दुसऱ्या बाजूला नेटवर्क मिळण्याची वाट पाहत महिला बसून असतात. BYTE - कल्पेश पावरा, खर्डी ग्रामस्थ.. vo - टेकडीवरही कधी नेटवर्क गायब होते तर कधी सरकारी संकेतस्थळ चालत नाही, अशा तक्रारी महिलांनी केल्या आहेत. जर कधी संकेतस्थळ सुरू झाले तर 'ओटीपी' येत नाही. या समस्येमुळे अनेक महिलांना निराश होऊन परततात. एकंदरीत योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया सुलभकरण्याऐवजी नेटवर्कच्या अडचणीमुळे ती एक मोठी परीक्षाच ठरली आहे. खर्डी खुर्द गावात नेटवर्कची मोठी समस्या आहे. 'लाडकी बहीण'च्या ई- केवायसी साठी आदिवासी महिला सगर वजावटकचा शोध घ्यावा लागत आहे. प्रशासनाने यावर तातडीने मार्ग काढावा. प्रशांत परदेशी, नंदूरबार.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 10, 2025 10:50:19
Dhule, Maharashtra:धुले तालुका पोलिसांनी कारवाई करत इलेक्ट्रिक ॲल्युमिनियम तार चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे. धुळे तालुक्यातील शिरूड परिसरातून ॲल्युमिनियमची तार चोरी करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतला असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 25 ते 35 वर्ष वयोगटातील चोरट्यांची ही टोळी ग्रामीण भागातील शेतातील खांबावरून ॲल्युमिनियमच्या तारांची चोरी करत होती. धुळे तालुक्यातील बोरकुंड भागातील एका शेतकऱ्याच्या शेतात झालेल्या तार चोरीनंतर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी कारवाई करत चोरी झालेली तार, चोरी करण्यासाठी वापरलेली बोलेरो गाडी यासह तब्बल सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 10, 2025 10:46:38
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 10, 2025 10:41:23
Washim, Maharashtra:अँकर :जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, भाजीपाला आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी रिसोड आणि मालेगाव तालुक्यांमध्ये पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार वाशिम, कारंजा आणि मानोरा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून रिसोड, मालेगाव आणि मंगरूळपीर या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांना वगळण्यात आले आहे.या निर्णयाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष दामोधर इंगोले यांनी जिल्हा परिषद कार्यालयाजवळील टॉवरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत या तीन तालुक्यांचा अतिवृष्टी मदत पॅकेजमध्ये समावेश होत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आंदोलन स्थळी पोलीस प्रशासन व अग्निशामक दलाचे टीम पोचली असून आंदोलकाला खाली उतरण्याची विनंती केली जात आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 10, 2025 10:31:55
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेच्या वतीने एकूण २१ कामांसाठी सुमारे १४ कोटी २२ लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र या निविदा एकत्रित (क्लब) पद्धतीने काढण्यात आल्याने शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप शिवसेना ( UBT ) चे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. शासन नियमांनुसार एकूण कामांच्या ३० टक्के कामे मजूर सहकारी संस्थांना आणि ३० टक्के कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंते यांना देणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय मान्यता असल्याने स्वतंत्र निविदा काढणे आवश्यक आहे. मात्र सर्व कामे एकत्र करून मोठ्या कंत्राटदारांना संधी मिळावी यासाठी निविदा प्रक्रिया राबविल्याचा आरोप होत असून, यामुळे स्पर्धा कमी होऊन शासनाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदर निविदा त्वरित रद्द करून प्रत्येक कामासाठी स्वतंत्र निविदा काढाव्यात, तसेच शासन नियमानुसार टक्केवारीनुसार मजूर व अभियंता संस्थांना कामांचे वाटप करावे, अशी मागणी शिवसेना ( UBT) च्या वतीने करण्यात आली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 10, 2025 10:20:59
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतली पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतली पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट महाविकास आघाडीच्या नेत्यांना निधी मिळत नसल्याची केली तक्रार जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या नेत्यांना मदत दिली जात नाही ही आमची तक्रार आहे. मात्र आम्ही सर्वांना मदत देतो त्यामुळे तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे असे म्हणत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या तक्रारीला उतर दिले दरम्यान भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या नेत्यांनादेखील कसलाच निधी मिळाला नाही.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 10, 2025 10:13:14
Akola, Maharashtra:अकोला-अकोट महामार्गावरील चोहोट्टा बाजार यहाँ रयत शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास रस्ता बंद राहिला असून वाहतूक कोंडी झाली. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सरसकट कर्जमुक्ती, प्रति हेक्टर ५० हजार रुपये आर्थिक मदत, फार्मर आयडीची अٹ रद्द करणे, ओला दुष्काळ जाहीर करणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, तसेच शेती मालावरील जीएसटी रद्द करण्याच्या मागण्या होत्या. मुर्तीजापूर आणि अकोला तालुके नुकसानग्रस्त यादीतून वगळल्याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या तालुक्यांचा समावेश न झाल्यास मुंबई-नागपूर महामार्गावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले असून, रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांच्यासह शेतकरी बांधवांना दहिहंडा पोलिसांनी अटक केली. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 10, 2025 09:32:44
Kolhapur, Maharashtra:विद्यार्थ्यांना मारहाण, मनसे आंदोलन छेडणार Anc- कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या एका होस्टेलमध्ये काही विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना मारत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हातामध्ये बेल्ट, बॅट आणि दांडके घेऊन विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. हे व्हिडिओ व्हायरल होत असतानाच परवा या हॉस्टेलमध्ये झालेल्या मारहाणीत सिद्धीविनायक सनी मोहिते (वय १६, रा. उचगाव) जखमी झाला आहे. पहाटे पाचच्या सुमारास हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. मात्र या प्रकरणानंतर पालक वर्गातून विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचे अनेक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. होस्टेल प्रशासन अथवा पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात अधिकृतरित्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या महिन्यापासूनच कोल्हापूर जिल्ह्यातील आशा अनधिकृत होस्टेल्स विरोधात आवाज उठवला असून आज व्हायरल झालेल्या व्हिडिओ संदर्भात गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासन आणि शाळा प्रशासनाला जाब विचारून तीव्र आंदोलन छेडणार आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 10, 2025 09:18:23
Yavatmal, Maharashtra:एक तीर एक कमान, आदिवासी एक समान असा नारा देत यवतमाळ मध्ये आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती चा आक्रोश क्रांती महामोर्चा धडकला. अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये बंजारा व अन्य कुठल्याही जातींचा समावेश करण्यात येऊ नये अशी मागणी या मोर्चा द्वारे करण्यात आली. बंजारा समाज राज्यभर मोर्चे काढून सरकारवर दबाव आणून आदिवासीच्या आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे त्याला प्रखर विरोध यावेळी करण्यात आला. आदिवासी समाजाचा सहा हजार कोटी रुपयांचा इतरत्र वळविण्यात आलेला निधी व्याजासह परत करावा, आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक भरती तात्काळ करण्यात यावी, बोगस आदिवासींना दिल्या जाणारे सेवा संरक्षण मागे घ्यावे, त्यांना बडतर्फ खऱ्या आदिवासींची नोकर भरती करण्यात यावी, 17 वर्गातील पेसा अंतर्गत नोकर भरती कायमस्वरूपी करावी यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
0
comment0
Report
Advertisement
Back to top