Back
हैदराबाद गजट के बाद कुणबी प्रमाणपत्र का नया फॉर्मूला सामने
VKVISHAL KAROLE
Sept 10, 2025 03:20:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn reservation issue av
हैदराबाद गॅझेट काढल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र नक्की कसे देणार याबाबत चर्चा सुरू होती याबाबत आता राज्य सरकारने मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत कार्यपद्धती निश्चित केलेली आहे त्यानुसार आता तातडीने काम सुरू करा असा राज्य सरकारने संबंधित यंत्रणांना सांगितला आहे याबाबत स्थापन केलेली तीन सदस्यांची कमिटी स्थानिक चौकशी अहवाल सुद्धा दाखल करणारे त्याचा प्रोफार्मा सुद्धा सरकारने जाहीर केलेला आहे ...
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची कार्यपद्धती...हैद्राबाद गॅजेट अनुसार...
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक 02.09.2025 अन्वये पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांना सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे.
समिती सदस्य
- 1. ग्राम महसूल अधिकारी
2. ग्रामपंचायत अधिकारी
3. सहाय्य कृषी अधिकारी
1. शासन निर्णय दिनांक 02/09/2025 अन्वये नागरीक कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी खालील कागदपत्रासह तहसिल कार्यालयातील शासन निर्णय दिनांक 25/01/2024 अन्वये गठीत केलेल्या तालुकास्तरी समितीकडे अर्ज सादर करतील.
1...अर्जदार हा मराठा समाजातील भुधारक, भूमीहिन, शेतमजुर किंवा बटईने शेती करत असलेल्या जमीनीची मालकी असल्याचा पुरावा सादर करेल.
2... वरील अ प्रमाणे पुराव नसल्यास त्यांनी 13 ऑक्टोबर, 1967 पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करेल.
3..अर्जदाराच्या गावातील/कुळातील नातेसंबधातिल व्यक्तींना कुणती जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व अर्जदार यांनी, त्यांचे नातेसबंधातील / कुळातील असुन कुणबो असल्याचे संबधीत नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र सादर करेल.
4...अर्जदाराकडे अर्जाच्या पृष्ठत असणारे इतर पुरावे सादर करु शकतील.
* असा अर्ज तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झाल्यानंतर तालुका स्तरीय समिती अर्जदार यांचे अर्जाची छाननी करील व शासन निर्णय दिनांक 02/09/2025 अन्वये गावपातळीवर गठीत समितीस चौकशीसाठी पाठविल.
* गाव पातळीवर गठीत स्थानिक समिती अर्जदार यांची गावातील वयस्कर जेष्ठ, पोलिस पाटील अशा नागरीकासमक्ष चौकशी करुन अहवाल तालुकास्तरीय समितीकडे सादर करील.
** तालुकास्तरीय समिती, गाव पातळीवर गठीत समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालाचे अवलोकन करुन सदर अर्जावर शिफारस करील व त्यानुसार अर्जदाराच्या अर्जावर विहित कार्यपध्दतीने सक्षम प्राधिकारी यांच्या मार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात यईल.
15
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:30:390
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 08:21:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:412
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:570
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:48:523
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:47:165
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 07:46:121
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:45:492
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 07:45:130
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 07:30:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 07:24:212
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:23:344
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 07:20:413
Report