Back
कोल्हापूर में महाडिक परिवार एकाकी पड़ गया? चौंकाने वाला खेल PKG
PNPratap Naik1
Sept 10, 2025 08:05:06
Kolhapur, Maharashtra
Kop Mahadik Ekakki PKG
Feed:- Live U
Anc:- कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक कुटुंबीयांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गोकुळमध्ये महायुतीचे चेअरमन असताना वार्षिक सभेत सर्वपक्षीय संचालक व्यासपीठावर आणि शौमिका महाडिक मात्र एकाकी पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे जिल्ह्याचा राजकारणात महाडिक वरचढ ठरवू नये यासाठी सर्वजणच प्रयत्न करतात का ? असं चित्र कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या दिसू लागला आहे.
GFX In
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक कुटुंबीयाना एकाकी पाडण्याचा प्रयत्न ?
गोकुळ वार्षिक सभेच्या निमित्ताने महाडिक यांची गोची करण्याचा प्रयत्न
एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असणाऱ्या महाडिक यांना महाविकास आघाडी सोबतच महायुती मध्येच अंतर्गत विरोध होतोय ?
GFX Out
VO 1:- एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर तब्बल 18 वर्षे महादेवराव महाडिक यांची एक हाती सत्ता होती. महाडिक यांची एकहाती असणारी सत्ता उलथवून लावण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी विशेष करून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी पूर्ण ताकत लावून जिल्ह्यातील आर्थिक नाड्या एक एक करून काढून घेतल्या. तेव्हापासून महत्त्वाच्या सत्ता केंद्रात येण्यासाठी महादेवराव महाडिक यांच्यासह भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह शौमिका महाडिक प्रयत्नशील आहेत. पण महाडिक कुटुंबीयांना प्रत्येक सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वपक्षीय म्हणजेच महायुतीतील घटक पक्ष देखील प्रयत्न करतायेत का ? अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.
Byte:- गुरुबाळ माळी, ज्येष्ठ पत्रकार
VO 2:- माजी आमदार महादेवराव महाडिक हे नेहमीच शोले मधील शिक्याचा उदाहरण देत चित भी मेरी और पट भी मेरा अशा भूमिकेत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात तब्बल 18 वर्ष निर्विवाद वावर होता.. त्यामुळे महाडिक यांच्याकडे सत्ता गेली की ते कोणाला विचारणार नाही या भूमिकेतून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक यांना बाजूला करण्याचे सूत्र बांधलं जातंय का ? अशी चर्चा देखील सुरू आहे. सहकार असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये पक्षीय पातळीवरच्या निवडणुका यापूर्वी होत नव्हत्या.. गटतट, पॅनल या माध्यमातूनच समविचारी पक्ष एकत्र येत या निवडणुका लढवत होत्या. पण गोकुळ अध्यक्षपद निवडीच्या निमित्ताने मात्र महायुती म्हणून गोकुळ मधली सत्ता महायुतीकडेच पाहिजे ही भूमिका महाडिक कुटुंबीयांची मांडली. पण गोकुळ मध्ये सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी अध्यक्ष जरी महायुतीचा असला तरी सत्ता ही राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीकडे असल्याची भूमिका उघडपणे मांडली होती, त्यामुळंच गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने शौमीका महाडिक ह्या एकाकी पडल्याचे पाहायला मिळाले. गोकुळच्या व्यासपीठावर महाविकास आघाडी बरोबरच जिल्ह्यातील महायुतीचे घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप मध्ये पक्षप्रवेश केलेले संचालक अमरीश घाडगे हे देखील व्यासपीठावर होते.. यावरूनच काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांना डिवचले आहे.
Byte:- आमदार सतेज पाटील, सत्ताधारी नेते गोकुळ
VO 3:- कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सर्व महाडिक कुटुंबीय भाजपात आहेत. पण महाडिक गट म्हणून जिल्ह्यात त्यांची ताकद आहे. त्यामुळेच एकदा का महाडिक यांच्या हातात सत्ता गेली तर ते कोणालाच विचारणार नाहीत अशी भीती महायुती मधीलच घटक पक्षांना वाटू लागली आहे अशी चर्चा राजकारणाच्या वलयात पाहायला मिळत आहे.. त्यामुळेच आगामी गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक असो वा सहकारातील निवडणूक महाडिक कुटुंबीयांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न यापुढे देखील केल जाईल अस राजकीय जाणकारांना वाटतय..
प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 08:21:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:410
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:570
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:48:523
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:47:165
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 07:46:120
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:45:490
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 07:45:130
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 07:30:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 07:24:212
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:23:344
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 07:20:413
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:20:003
Report