Back
कोल्हापुर गोकुळ सभा में विरोधी-घोषणा से हंगामा, करीबी घेराबंदी
PNPratap Naik1
Sept 09, 2025 11:46:26
Kolhapur, Maharashtra
Kop Gokul PKG
Feed:- Live U
Anc:- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची 63 वी सर्वसाधारण वार्षिक सभा आज गोंधळात पार पडली.. मागील वार्षिक सभेसारखा अभूतपूर्व गोंधळ झाला नसला तरी सभासदांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत असा आरोप विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी केलाय. सत्ताधारी नेत्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभेच्या कामकाजात अडथळा आणला असा आरोप देखील महाडिक यांनी केला आहे.
VO 1:- कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा आणि गोंधळ हे समीकरण कायमचंच ठरलेला असतं... गोकुळचे सर्वसाधारण सभा सुरळीत पार पाडू द्यायचीच नाही हा त्या त्या वेळच्या विरोधकांचा एकमेव अजेंडा पाहायला मिळाला. गोकुळच्या सभेमध्ये गोंधळ घालण्याची परंपरा गेल्या सहा वर्षांपासून पाहायला मिळते. सत्ताधाऱ्यांना ठराव मंजूर करायचे असतात आणि विरोधकांना त्या ठरावांना विरोध करायचा असतो.याही वर्षी समर्थक आणि विरोधक या दोघांच्या घोषणाबाजीत आजची गोकुळची वार्षिक सभा पार पडली.. गोकुळच्या विरोधी संचालिका शोमीका महाडिक यांनी गोकुळची ज्या पद्धतीने सभा पार पडली त्याबाबत मी समाधानी नसल्याचं म्हटलंय.
Byte:- शौमिका महाडिक, विरोधी संचालिका ( बाईट 121 मधील काढून घ्यावा)
VO 2 :- दरम्यान सत्ताधारी नेत्यांनी मात्र सभा अतिशय सुरळीत आणि शांततेत पार पडल्याचा दावा केला आहे. इतकच नाही तर महाडिक विरोधक काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी किमान आता तरी विरोधकांनी समजूतदारपणा दाखवायला हवा होता अशी भूमिका मांडत महाडिक यांच्यावर टीका केलीय.
Byte:- आमदार सतेज पाटील, नेते गोकुळ
VO 3:- गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांनी देखील सभा अतिशय खेळीमेळीत पार पडली असून महाडिक यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत, त्यातून त्याचे समाधान झाले नसेल तर त्यांना साधनकारक उत्तर देवू असं आश्वासन दिलय.
Byte:- नावेद मुश्रीफ, अध्यक्ष गोकुळ दूध संघ
VO 4:- गोकुळचा इतिहास पाहता सर्वात आधी गोकुळचे दूध वाहतूक करणाऱ्या टँकर वरून महाडिक यांना निशाणा बनवले. त्यावेळी आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांनी गोकुळच्या कारभारावर टीका करत महाडिक यांच्या विरोधात दंड थोपटले. 2018 साली पहिल्यांदा गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा पाहायला मिळाला. एकीकडे सतेज पाटील हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके आपल्या समर्थक सभासदांसह सर्वसाधारण सभेमध्ये घुसले होते त्यावेळी खुर्च्यांची तोडफोड चपलांची फेकाफेक आणि गाडीची तोडफोड झाली होती. त्याच वर्षापासून गोकुळच्या सर्वसाधारण सभेत दरवर्षी गोंधळ पाहायला मिळू लागला. याही वर्षी सभासदांच्या घोषणातच गोकुळची सभा पार पडली.सत्ताधारी संचालकानी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून सभासदांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. पण दुसरीकडे मात्र विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांना मात्र बोलू दिले नाही असा आरोप केला जातोय. यावरूनच गोकुळच्या सत्तेच्या सारीपाटात आरोप प्रत्यारोप आज पर्यंत पाहायला मिळाले, यापुढे देखील तसेच आरोग्य प्रत्यारोप पाहायला मिळणार आहेत. पण त्यामध्ये सभासदांचे हित जोपासलं पाहिजे असं दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाटतय.
प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
आत्तापर्यंत गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेत झालेल्या गोंधळाचा इतिहास ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया.
GFX In
30 सप्टेंबर 2018
सत्ताधाऱ्यांकडून म्हणजेच महादेवराव महाडिक, अरुण नरके, स्वर्गीय पी एन पाटील यांच्याकडून चुकीचा कारभार होत असल्याचे सांगत सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके सभासद आणि समर्थक यांच्यासह गोकुळच्या सभेमध्ये शिरले होते. त्याचवेळी सगळ्यात मोठा राडा पाहायला मिळाला....
30 ऑगस्ट 2019
गतवर्षी झालेल्या राड्याचा अनुभव पाहता 2019 साली खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली होती... मात्र त्यावेळी देखील घोषणाबाजीने सर्वसाधारण सभा दणाणून गेली...
2020 आणि 24 सप्टेंबर 2021
कोरोना काळामुळे या दोन वर्षी गोकुळची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने झाली...
29 ऑगस्ट 2022
गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर ही पहिल्याच सभेत महाडिक आणि नरके यांचे केवळ 4 संचालक निवडून आले तर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचे 17 संचालक निवडून आले... विरोधी संचालकांमध्ये महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांचा समावेश होता, त्यामुळे त्यांनी गोकुळची सर्वसाधारण सभा अक्षरशः दणाणून सोडली.
15 सप्टेंबर 2023
2023 च्या सभेत शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांना अक्षरशा घाम फोडला... निवडून आलेल्या विरोधातील संचालकांपैकी केवळ शौमिका महाडिकच सर्व संचालकांनी विरोधात लढू लागल्या इतर तीन संचालक सत्ताधाऱ्यांबरोबर पाहायला मिळाले.
30 ऑगस्ट 2024
पशुखाद्य कारखाना ठिकाणी देखील सभेमध्ये गोंधळ होऊ लागल्याने बॅरिकेट लावून सभासदांना सोडले जाऊ लागले...यावेळी शौमिका महाडिक यांच्यासोबत आलेल्या सर्व सभासदांनी बॅरिकेट तोडून सभेच्या ठिकाणी प्रवेश केला.
आज झालेल्या सभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला नसला तरी सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणामध्ये आजची सभा पार पडली. गोकुळच्या विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी सभेचे
GFX Out
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:30:390
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 08:21:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:411
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:570
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:48:523
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:47:165
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 07:46:121
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:45:492
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 07:45:130
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 07:30:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 07:24:212
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:23:344
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 07:20:413
Report