Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109
राहाता तालुक़े में 125 मिमी बारिश: झेंडू फसल पानी में, भारी नुकसान!
KJKunal Jamdade
Sept 28, 2025 05:30:23
Shirdi, Maharashtra
Rahata News Flash दसऱ्याच्या तोंडावर हाताशी आलेलं पिक पाण्यात.. *झेंडूफुल शेतीच मोठ नुकसान..* राहता तालुक्यातील खडकेवाके परिसरातील शेतकरी... *दोन दिवसांनी दसऱ्याला बाजारात जाणारा झेंडू पाण्यात... पूर्ण शेतीत गुडघाभर पाणी...* राहाता तालुक्यात काल रात्रीपासून ढगपुढी सदृश्य पावसाचे थैमान.. तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला.. गावाबाहेरून जाणाऱ्या ओढा नाल्याना नदीचे स्वरूप.. *काल रात्रीपासून 125 मिमी पाऊस झाल्याची प्राथमिक माहिती* पूर्ण राहता तालुक्यात शभर टक्के नुकसानीचा अंदाज.... झेंडू शेतीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी... Wkt kunal jamdade
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Sept 28, 2025 07:22:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Pkg Sng_patil_vs_patil स्लग - चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटलांच्या रंगली जुगलबंदी, उशीरा आल्याने चंद्रकांत पाटलांचा विशाल पाटलांना खोचक टोला.. अँकर - भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यात सांगली मध्ये चांगलीचं टोलेबाजी रंगली, कार्यक्रमाला उशिरा आल्यावरून चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटील कदाचित मॉर्निंग वॉकला गेले असतील,नाहीतर संभाजी भिडे यांच्या दौड मध्ये गेले असतील ,असा खोचक टोला लगावला,तर चंद्रकांत दादा नेहमी वेळेत येतात त्याची सवय आम्हाला लावून घ्यावी लागेल,असा प्रति टोला विशाल पाटलांनी लगावला. व्ही वो - सांगलीच्या मिरजेमध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमाला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.कार्यक्रमासाठी धर्मादाय आयुक्त विभागाकडून मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं होतं,या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील हे देखील येणार होते. पालकमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्यानंतर विशाल पाटील कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले,तर विशाल पाटलांच्या उशिरा येण्याच्या कारणावरून भाषणातच चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांचा खोचक समाचार घेतला, कदाचित खासदार विशाल पाटील द मॉर्निंग वॉकला गेले असतील किंवा संभाजी भिडे यांच्या दौड ला गेले असतील त्यामुळे उशीर झाला असेल असा खोचक टोला चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना लगावताच सभागृहात एकच हशा पिकली. साऊंड बाईट - चंद्रकांत पाटील - पालकमंत्री सांगली. व्ही वो - भाषण संपल्यानंतर चंद्रकांत पाटील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले यानंतर खासदार विशाल पाटलांनी भाषण करताना,कार्यक्रमाला उशिरा आल्याबद्दल उपस्थितांची माफी मागितली..तसेच चंद्रकांत दादा नेहमीच वेळेत येतात,त्यांची सवय आम्हाला लावावी लागेल,आम्ही राजकारनी 8 चा कार्यक्रम म्हंटला की साडे आठला येतो, असं सांगत मध्ये चंद्रकांत पाटलांना प्रति टोला लगावला. साऊंड - विशाल पाटील -खासदार, सांगली. व्ही वो - चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये नेहमीच जुगलबंदी रंगत असते, चंद्रकांत पाटलांकडून विशाल पाटलांना भाजप प्रवेश करण्यासाठी वारंवार देण्यात येते पण विशाल पाटलांकडून ती नाकारण्यात येते, त्यामुळे दोघां मध्ये नेहमीच टोलेबाजी रंगल्याचं पाहायला मिळतंय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 28, 2025 07:06:01
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आमची इच्छा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच रहावे - मंत्री चंद्रकांत पाटील. अँकर - देवेंद्र फडणवीस यांनी 2029 नंतर केंद्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी निर्णय केंद्र पातळीवर होतो,पण आमची इच्छा त्यांनी महाराष्ट्रातच रहावे अशी आहे, असं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.तसेच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले,ते प्रश्न सोडवण्यासाठी पर्याय उपलब्ध करणे गरजेचे आहे.त्यामुळे याच्यापेक्षा केंद्रात त्यांना नेण्याऐवजी महाराष्ट्रात ठेवावे हीच आमची इच्छा आहे.देवेंद्र फडणवीस यांनी इच्छा व्यक्त केली असली तरी केंद्र पातळीवर आमचा निर्णय होतो इच्छा कोणाची नसते इच्छा सर्वांची असते पण केंद्रीय नेतृत्व याच्यावर निर्णय घेतो,असे देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे,ते सांगली बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. व्ही वो - राज्यातील पूर परिस्थिती गंभीर आहे,पण सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,त्यांचे समाधान होईल,अशी मदत सरकार करेल,असा विश्वास देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 28, 2025 07:05:40
Nashik, Maharashtra:nsk_nandur feed by 2C anchor मराठवाड्यासाठी अधिक चिंतेची बातमी...नाशिक जिल्ह्यातील नांदूर माध्यमेश्वर जंक्शन मधून 50 हजार क्युसेक्स वेगापेक्षाही अधिक वेगाने गोदावरी मध्ये पाणी विसर्जित होत आहे सध्या 54,169 क्यू सिक्स वेगाने पाणी सुरू असल्याने जायकवाडी धरणाकडे संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी पोहोचणार आहे परिणामी जायकवाडीतून विसर्ग अधिक वाढवावा लागणार आहे मराठवाड्यात आधीच पूरग्रस्त परिस्थिती असताना नाशिकमध्ये पाऊस थांबत नसल्याने सर्व धरणातून विसर्ग करण्यात येतोय परिणामी नांदूर माध्यमेश्वर जंक्शन मधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागते. सध्या गोदावरी काठावरील सर्व गावांना आणि शेतकऱ्यांना सतरतेचा आवाहन करण्यात आला आहे
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 28, 2025 07:04:48
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 28, 2025 07:02:00
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2809ZT_MAVAL_KASARSAI Total files : 01 Headline : कासारसाई धरणातून विसर्गात वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा Anchor: मावळ आणि मुळशी तालुक्यातील दहा गावांना पाणीपुरवठा व सिंचन करणाऱ्या कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सांडव्यातून नदीपात्रात सुरू असलेला 150 क्युसेक विसर्ग वाढवून 450 क्युसेक करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने नदीपात्रात कोणीही उतरू नये, तसेच नदीपात्रात जनावरे अथवा साहित्य असल्यास तात्काळ हलविण्याचे आवाहन केले आहे. सखल भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 28, 2025 07:01:51
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Dam Feed on - 2C --------------------------------- Anchor - गोदावरी नदीत वरच्या भागातून अजूनही पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरु असल्याने नदीचा पुर कायम आहे. काल नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वरच्या भागातही पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे नांदेड जवळच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे सतरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या तीन लाख 17 हजार क्युसेस इतक्या प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 2006 नंतर यंदा पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत विसर्ग केला जात आहे. मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत विसर्ग सुरु असल्याने नदीला पुर आलाय. पुराचे पाणी नदीकाठच्या अनेक भागात साचले आहे. नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावातील वसाहतीतील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. जायकवाडी धारणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने पुर परिस्थिती अजूनही कायम राहणार आहे. ---------------------------
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 28, 2025 06:49:24
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2809ZT_MAVAL_LON_RAIN Total files : 01 Headline : लोणावळ्यात 24 तासांत 88 मिमी पाऊस -यंदाच्या हंगामात आतापर्यंत 5977 मिमी पर्जन्य Anchor: पर्यटन नगरी लोणावळ्यात अवघ्या 24 तासांत तब्बल 88 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यभरात वातावरणातील बदलामुळे मुसळधार पावसाचा जोर सुरू असून, हवामान विभागाने 30 सप्टेंबरपर्यंत अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या घाटमाथ्याच्या परिसरातही मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोणावळा शहरात यंदा आतापर्यंत 5977 मिमी पर्जन्यवृष्टी नोंदली गेली असून, गेल्या वर्षीच्या सरासरी पावसाला गाठण्यासाठी आता केवळ एक इंच पावसाची कमतरता आहे. मे महिन्यापासून सलग पाच महिने शहरात सुरू असलेल्या पावसामुळे नागरिक हैराण झाले असून, शेतकऱ्यांच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 28, 2025 06:49:00
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2809ZT_MAVAL_PAVANA_DAM Total files : 02 Headline : पवना धरणातून 2880 क्युसेक विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा Anchor: मावळ तालुक्याला शेतशिवार सिंचन व पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरण सध्या शंभर टक्के भरलेले आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी पवना नदी पात्रात 1400 क्युसेक विसर्ग सुरू असून, आज सकाळी तो वाढवून एकूण 2880 क्युसेक करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी-जास्त केला जाऊ शकतो. पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना पवना पाटबंधारे खात्याने सतर्कतेचा इशारा देत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top