Back
तुलजापुर ड्रग्स मामले ने विधानसभा में हंगामा मचा दिया; उच्चस्तरीय जांच की मांग
DPdnyaneshwar patange
Dec 14, 2025 13:03:59
Dharashiv, Maharashtra
धाराशिव
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून विधिमंडळात रणसंग्राम, उबाठा आमदार कैलास घाडगे पाटील विरुद्ध भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यात जुंपली
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचे पडसाद आज थेट विधिमंडळात उमटले. तुळजापूरमध्ये ड्रग्ज माफिया मोकाट असल्याचा गंभीर आरोप करत ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास घाडडे पाटील यांनी विधानसभा सभागृहात सरकारला थेट सवाल केला. तर दुसरीकडे भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी विरोधक तुळजापूरची नाहक बदनामी करत असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आमदार कैलास पाटील यांनी, “तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरण इतकं गंभीर असताना मुख्यमंत्री हे प्रकरण हलक्यात का घेत आहेत?” असा थेट सवाल उपस्थित केला. तसंच, “ड्रग्ज प्रकरणातील ‘अग्रवाल’ नावाचा मुख्य आरोपी अद्याप अटक का नाही?” असा सवाल करत पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
तर भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी सभागृहात प्रत्युत्तर देताना सांगितलं की, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाबाबत मिळालेली माहिती आपण तात्काळ पोलिसांच्या कानावर घातली होती आणि त्यानंतर मोठी कारवाई झाली. मात्र या प्रकरणाचा आधार घेत काही विरोधक एकत्र येऊन षडयंत्र रचत तुळजापूरची बदनामी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
तुळजापूरची नाहक बदनामी कोण करतंय, याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करावी, अशी मागणीही आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी विधिमंडळात केली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowDec 14, 2025 17:15:200
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 14, 2025 14:47:060
Report
ABATISH BHOIR
FollowDec 14, 2025 14:32:180
Report
AKAMAR KANE
FollowDec 14, 2025 13:54:470
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 14, 2025 13:54:280
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 14, 2025 12:38:340
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 14, 2025 12:16:150
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 14, 2025 11:53:170
Report
SNSWATI NAIK
FollowDec 14, 2025 10:37:500
Report
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 10:21:110
Report
SNSWATI NAIK
FollowDec 14, 2025 10:15:480
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 14, 2025 09:49:420
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 14, 2025 09:33:160
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 14, 2025 09:23:110
Report