Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501
उपमुख्यमंत्री शिंदे की मिमिक्री कर ओमराजे ने खल्ली उड़ाई
DPdnyaneshwar patange
Dec 01, 2025 03:46:54
Dharashiv, Maharashtra
धाराशिव - खासदार ओमराजे निंबाळकरांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्याच भाषणाची मिमिक्री करत उडवली खिल्ली हॅलो उदयजी मी कळंब मध्ये आलोय इथल एक हालगाट दूध देत नाही, मंत्र्यांनी म्हणायचं एक चरवी दूध काढून दोन दिवसात पाठवतो, कशानं हाणाव आम्हाला कायबी आलं की हॅलो, tिजोरीच्या चव्यच लय अवघड आहे, एक म्हणतय माझ्या माणसाला काट मारली तर तुमच्या निधीच लय अवघड आहे, अजित पवारांवर ओमराजे निंबाळकर यांची अप्रत्यक्ष टीका निधी कोणाचा आहे, दुसरं म्हणत तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा मालक कोण आहे , आमचा आहे तिसरा म्हणताय चाव्या तुमच्याकडे असल्या मला तुमचा जरी असला तर मधला माल आमचा आहे महायुती मधील तिन्ही महाभागाला कशाचा पडले तर तिजोरी माल आणि चावी, ही जनता उधळत इकडच अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करत उडवली खिल्ली
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Dec 01, 2025 04:32:58
Satara, Maharashtra:सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट चे राजेंद्र चोरगे यांनी एक अनोखा कार्यक्रम साताऱ्यात आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये सातारा नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी उभे असणाऱ्या सर्व पक्षातील उमेदवारांना त्यांनी आमंत्रित केले होते यावेळी पक्ष, चिन्ह, आघाडी निवडणुकीनंतर बाजूला जाईल आणि साताऱ्याचा शाश्वत विकास हाच आमचा एकमेव अजेंडा राहील. असा विश्वास एकत्र आलेल्या सर्वच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी व्यक्त केला. एवढेच नाही तर दिलेला आश्वासनांवर कटिबद्ध राहण्याचा वचन नामा बाँड देखील सर्व सातारकारांच्या साक्षीने लिहून दिला... यावेळी बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेल्या भाजप,महाविकास आघाडी याबरोबरच इतर पक्ष अपक्ष उमेदवारांना सातारा शहराशी निगडित असणारे रॅपिड फायर प्रश्न विचारले असता यावर कोणालाही पूर्ण उत्तर देता आले नाही.... या राबवलेल्या उपक्रमाला साताऱ्यातील प्रत्येक क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते... या कार्यक्रमाला सातारकरांनी देखील मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 01, 2025 04:32:34
Kalyan, Maharashtra:डोबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून कामाची पाहणी.. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पीओपी चा स्लॅब कोसळल्याचे घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती त्यानंतर हे नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले होते अखेर या कामासाठी 12 कोटींचा निधीचे निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती भाजपाचे दीपेश म्हात्रे यांनी दिली. आज डोंबिवलीचे आमदार प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या नाट्यगृहाच्या कामाचे पाहणी केली. लवकरच या नाट्यगृहाची दुरुस्ती ,नूतनीकरण करण्यात येणार असून हे नाट्यगृह सहा महिन्यात रसिकांसाठी खुले होईल असे म्हात्रे यांनी सांगितले
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 01, 2025 04:01:08
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगरपरिषदेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. या नगर परिषदेत 10 प्रभागातून 20 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत . नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीसाठी 10 उमेदवार रिंगणात आहेत मावळत्या नगरपरिषदेतील भाजपच्या सत्तेला अन्य पक्षांचे आव्हान आहे. रणसंग्रामात महायुती और महाविकास आघाडीत फाटाफूट झाली है. संग्राम त्रिकोणी होण्याची शक्यता असून मैदानात रा. कॉ. शरद पवार गट वगळता सर्वच दंड थोपटून उभे आहेत. शहर विकासाच्या मुद्द्यावर भाजप मते मागत असून विरोधी पक्षांनी गेल्या पाच वर्षात कुठलीही विकास कामे झाली नसल्याचा दावा करत टिकेची झोड उठविली आहे.
166
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 01, 2025 03:30:21
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत पिंपळे सौदागर परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात अडकलेल्या 7 तरुणींची सुटका केली आहे. पिंपळे सौदागर येथील आयकॉन बिल्डिंगमध्ये ‘द औरा थाई स्पा’ हे सेंटर सुरू होते, परंतु या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली प्रत्यक्षात येथे अवैध वेश्याव्यवसाय चालवला जात होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असून स्पा सेंटरमधून अवैध साहित्य जप्त केले असून, या कारवाईनंतर द औरा थाई स्पाचा मालक असलेल्या अभिजीत लॉरेन्स याच्याविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.
228
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 01, 2025 02:51:17
Kolhapur, Maharashtra:त Tet पेपर प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड मधून नव्याने तिघा जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. नव्याने निष्पन्न झालेले आरोपी TET Pepar फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी महेश गायकवाड यांचे साथीदार आहेत. आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली असून कऱ्हाड मधील आरोपींना अटक केल्यानंतर ही संख्या 22 वर पोहोचणार आहे. इतकच नाही तर परराज्यातील आरोपींच्या शोधात देखील कोल्हापूर पोलीस आहे. त्या त्या आरोपींना अटक केल्यानंतर ती संख्या कुठेपर्यंत पोहोचेल हे आत्ताच सांगता येणार नाही. पण या प्रकरणात अटक करण्यात येणाऱ्या आरोपींची संख्या पाहता TET पेपर फुटी प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे दिसून येत आहे.
68
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 01, 2025 02:51:04
87
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 01, 2025 02:48:29
Dhule, Maharashtra:धुळे शहरासह जिल्ह्याचा तापमानाचा पारा पुन्हा दिवसागणित कमी होत आहे. जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद होत आहे. विशेष म्हणजे आता तापमानाचा पारा हा 7 अंश सेल्सिअस कडून पाच अंश सेल्सिअस कडे वाटचाल करीत आहे. वाढत्या थंडीचा कडाका हा शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहे. कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावर प्रचंड परिणाम दिसून येत आहेत. रस्ते निर्मनुष्य होत आहेत. तर अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या देखील कमी झालेली है. जिल्ह्यातील थंडीचा प्रवास हा शीतलहरीकडे होत आहे. उत्तर भारतामध्ये गार वाऱ्यांचा परिणाम हा धुळे जिल्ह्यातही दिसून येत आहे
153
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 01, 2025 02:47:37
Bhandara, Maharashtra:भंडारा नगर परिषद निवडणणीक वाद! पाच अधिकारी–कर्मचारी पोस्टल बॅलेटविना मतदानापासून वंचित Anchor :- २ डिसेंबरला होणाऱ्या भंडारा नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक यंत्रणेतील गंभीर अनियमितता समोर आली आहे. भंडारा येथील वास्तव्यास असून तुमसर तालुक्यात सेवेत असलेल्या पाच अधिकारी–कर्मचाऱ्यांना नियमानुसार मिळायला हवे असलेले टपाल मतपत्रिका (Postal Ballot) उपलब्ध नाही, असे आरोप समोर आले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कथित मनमानीमुळे हे अधिकारी–कर्मचारी मतदानाचा मूलभूत हक्क गमावणार आहेत, ज्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. निवडणूक नियमावलीनुसार, आपल्या मूळ मतदारसंघाबाहेर ड्युटीवर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी परिशिष्ट-१ (Annexure-1) भरल्यानंतर पोस्टल बॅलेट मिळणे बंधनकारक आहे. तथापि, पीडित अधिकारी–कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भंडारा नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी यांनी वेळेवर कायदेशीर प्रक्रिया केली नाही. या निष्काळजीपणामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदानापासून वंचित अधिकारी–कर्मचारी संजय जांभुळकर – नायब तहसीलदार, भंडारा लिलाधर गेडाम – अधिकारी शशिकांत वसू – कर्मचारी भारती बोन्द्रे – कर्मचारी श्यामसुंदर सेलोकर – कर्मचारी हे सर्व अधिकारी भंडारा येथील नोंदणीकृत मतदार असून, तुमसरमध्ये ड्युटीवर असल्यामुळे त्यांना पोस्टल बॅलेट मिळणे बंधनकारक होते.
119
comment0
Report
Advertisement
Back to top