Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur444001
पिपाणी चिन्ह विवाद: चुनाव आयोग ने आखिरकार चिन्ह बदला
AKAMAR KANE
Nov 13, 2025 06:31:46
Nagpur, Maharashtra
पिपाणी चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच तुतारी चिन्ह हे एकसारखे दिसत होते त्यामुळे मोठा फटका आम्हाला लोकसभा निवडणुकीत बसला.. शशिकांत शिंदे पडले फक्त पिपाणीमुळे... पिपाणी आणि तू तरी एक सारखे दिसत असल्यामुळे मी पाणी ला 45000 मतदान झालं ... त्यामुळे सुरुवातीपासूनच आमची मागणी होती पिपाणी हे चिन्ह बदलावा... मात्र दबावाखाली निवडणूक आयोगाने हे चिन्ह बदललं नाही.... त्याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बसला... उशिरा काना होईना निवडणूक आयोगाचे डोळे उघडले आहे त्यांनी हे चिन्ह रद्द केलं..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Mar 03, 2026 01:01:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिकेची पहिलीच महासभा ठरली वादळी, सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर.. अँकर - सांगली महापालिकेची पहिल्याच महासभा प्रचंड वादळी ठरली.पहिल्याच पार पडलेल्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले, शहरातल्या स्वच्छता, पाणी पुरवठा, उद्यानांची दुरवस्था, ड्रेनेज योजना, आणि एलइडी प्रकल्पासह प्रशासकीय काळातील कारभारावरून अधिकारयांना चांगलेचं धारेवर धरले. तर प्रशासकीय काळात महासभा घेऊन करण्यात आलेले ठराव रद्द करण्याची जोरदार मागणी देखील महासभेत करण्यात आली,यावर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी याबाबत पडताळणी करून बेकायदेशीर असणारे ठराव विखंडित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल,असा आश्वासन या सभेमध्ये दिले. तसेच एलइडी बाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. बाईट - मंगेश चव्हाण - विरोधी पक्ष नेते - सांगली महापालिका.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 03, 2026 01:00:51
Amravati, Maharashtra:पाच फाईल आहे बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा आज तिसरा दिवस; बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रा आणि कर्जमाफी आठवण पदयात्रेला मोठा प्रतिसाद 30 जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर 1 जुलैपासून एकही रेल्वे फिरू देणार नाही; AI तंत्रज्ञानाचा वापर करून बच्चू कडू करणार आंदोलन अँकर :- देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झाले मात्र अमरावतीच्या मेळघाट मधीलआदिवासी लोकांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळत नाही, अजूनही मेळघाट्यातील आदिवासी समाज मागासलेच आहे त्यांच्या अस्तित्वासाठी व शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची सरकारला आठवण करून देण्यासाठी मेळघाटातील अतिदुर्गम भागातून बच्चू कडू यांनी संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे, ही संघर्ष यात्रा नऊ तारखेपर्यंत चालणार असून 9 तारखेला सलोना ते चिखलदरा या यात्रेचा स्वरूप बदलणार आहे... सरकारने आमच्या प्रश्नाची दखल न घेतल्यास 9 तारखेला सरकार हतबल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, आणि 9 तारखेला भगतसिंग च्या विचाराच पाऊल टाकू असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य सरकारला इशारा दिला...प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंची मेळघाट मध्ये 250 किलोमीटरची मेळघाट संघर्ष व कर्जमाफीसाठी आठवण पदयात्रा सुरू झाली असून याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे 1 ते 9 मार्च पर्यंत बच्चू कडूंची मेळघाटातील मूलभूत प्रश्नांवर आणि सरकारला कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी ही पदयात्रा आहे, मेळघाटातील समस्या आदिवासींच्या मूलभूत गरजा रस्ते पाणी,रोजगार, माता मृत्यू कुपोषण यासाठी बच्चू कडूंची यात्रा आहे,9 मार्चला सलोना ते चिखलदरा महापदयात्रा काढून करणार यात्रेचा समारोप होणार आहे. दरम्यान 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही तर एक जुलैला एकही रेल्वे रुळावर फिरू देणार नाही तसेच AI तंत्रज्ञानाचा वापर करून आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे बाईट :- बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 02, 2026 16:47:24
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीकर सीआयएसएफ जवान बसंत सिंग यांचे हैदराबाद येथे प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन डोंबिवलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार डोंबिवलीतून एक अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. डोंबिवली येथील सीआयएसएफचे जवान बसंत सिंग यांचे प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना हैदराबाद येथे घडली असून, त्यांच्या आकस्मिक निधनाने डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बसंत सिंग हे सीआयएसएफच्या प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथे गेले होते. प्रशिक्षणादरम्यान अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली, मात्र उपचारांदरम्यान त्यांच्या निधन झाले. त्यांचे पार्थिव डोंबिवलीत आणण्यात आले. येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासकीय अधिकारीांसह स्थानिक नागरिक, मित्रपरिवार आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेत कार्यरत असलेल्या जवानाला अखेरचा निरोप देताना वातावरण भावुक झाले होते. बसंत सिंग यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या या जवानाच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 02, 2026 16:32:58
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी येथे शेतकरी एल्गार समितीच्या वतीने आज होळीच्या दिवशी अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले. अमेरिका-भारत शेतकरी व्यापारी करार रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत प्रतीकात्मक स्वरूपात कराराची होळी साजरी केली. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत हा करार शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप केला. या करारामुळे स्थानिक शेतमालाच्या किमतींवर परिणाम होऊन शेतकरी अडचणीत येतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली. गावातील अनेक नागरिक आणि शेतकरी एल्गार समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 02, 2026 16:00:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - इटकरे येथे राहत्या घराला भीषण आग, आगीत साडेसात लाखांची रोकडसह सोन्या- चांदीचे दागिने जळून खाक.. अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या इटकरे येथे राहत्या घराला भीषण आग लागली आहे.ज्यामध्ये सुमारे नऊ लाखांचं नुकसान झालं आहे.इटकरे येथील माने बंधूंच्या घराला ही आग लागली आहे. ज्यामध्ये दोन्ही भावांचे घर जळून खाक झाली आहेत,या आगीमध्ये साडेसात लाखांच्या रोकड आणि सोन्या चांदीचे दागिनेही जळाले आहेत.घराच्या बांधकामासाठी दोघा भावांनी ही रक्कम घरात ठेवली होती.दुपारच्या सुमारास माने यांच्या घरातुन अचानकपणे धुराचे लोळ उठले,काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलं, ज्यामध्ये घरातील संसार साहित्यासह इतर साहित्य रोख रक्कम आणि सोने चांदीचे दागिने जळून खाक झाले आहेत, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे,मात्र आगीचं कारण हे समजू शकलो नाही,पण या घटनेमुळे इटकरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 02, 2026 16:00:14
Kalyan, Maharashtra:कल्याण मोहने परिसरात उल्हास नदी किनारी निषेध होळी निषेध व्यक्त करत नदी वाचवा,भविष्य वाचवा असा जोरदार घोषणा देत निषेध होळीच्या माध्यमातून नदी प्रदूषणाविरोधात जनजागृती करण्याचा आणि संबंधित यंत्रणांना जागे करण्याचा प्रयत्न करून निषेध होळी पेटवण्यात आली उल्हास नदीतील वाढते सांडपाणी, औद्योगिक रसायने आणि कचऱ्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याचा थेट परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची भावना गावकरी आणि स्थानिकांनी व्यक्त केली. या वेळी मोठ्या संख्येने गावकरी व स्थानिक नागरिक आणि नदी बचाव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत नदी वाचवा – भविष्य वाचवा असा जोरदार घोषणा देखील दिली . निषेध होळीच्या माध्यमातून प्रशासनाने तातडीने कारवाई करून नदी स्वच्छतेसाठी ठोस पावले उचलावीत, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी गावकऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 02, 2026 15:47:38
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 02, 2026 15:46:13
Akola, Maharashtra:अकोल्यात आज होळीचा पारंपारिक उत्सव पहायला मिळाला. शहरातील राणीसती मंदिरात पारंपारिक पद्धतीने ' होळीका दहना 'चा कार्यक्रम पार पडला. गेल्या 25 वर्षांपासून येथील होळी दहनाच्या कार्यक्रमाला अकोलेकर मोठी गर्दी करत असतात.आज रात्री आठच्या सुमारास होळी दहन करण्यात आली.पौराणिक काळात राजा हिरण्यकष्यपूची बहिण होलीका हिच्या वधाचा दिवस होळी म्हणून साजरा केला जातो.भक्त प्रल्हादाचा वध करण्यासाठी भक्त प्रल्हादसह सरणावर बसलेल्या होलीकेचाच मृत्यू यामध्ये झाल्याची आख्यायिका आहे. राणीसती मंदिरात याच आख्यायिकेचा सुंदर देखावा निर्माण करून होलीका दहन केले जाते.आज या कार्यक्रमात होलीकेचे दहन करून वाईट विचारांची होळी करण्यात आली. या निमित्ताने हजारोच्या संख्येने अकोलेकर या ठिकाणी दर्शनाला येतात.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 02, 2026 15:34:52
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 02, 2026 15:31:27
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरात होळी सणादिवशीचं निवडणूक भत्ता मिळावा यासाठी आशा सेविका रस्त्यावर उतरून आंदोलन केले.. कोल्हापुर महापालिकेची निवडणूक होवून दीड महिना झालं तरीसुध्दा 275 आशा सेविकांना निवडणूक भत्ता मिळालेला नाही.. त्यामुळे आज भारतीय मजदूर संघाच्या वतीने आशा सेविकांकडून महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आलीत.. यावेळी आंदोलक महिलांनी जोरदार घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला.. दरम्यान महापौर रुपाराणी निकम यांनी या आंदोलक महिलांची भेट घेत निवेदन स्विकारलं.. शिवाय येत्या 12 दिवसात निवडणूक भत्ता देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय.. तसचं महिला आपल्या हक्कांसाठी लढत असल्याचं कौतुक केलंय.. यावेळी आपण महापालिकेच्या कारभारावर कंटाळलो आहे.. त्यामुळे आता मी ॲक्शन मोडवर आल्याचं म्हणतं आपण ताराराणीच्या लेकी आहात.. रस्त्यावर आंदोलन करायला लागतयं हा कमीपणा असल्याची खंत महापौरांनी बोलून दाखवली.. महिलांनी रस्त्यावर बसलेलं मला आवडणार नाही.. आपण काय भीक मागत नाही.. त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रश्नांसाठी महापालिकेत आपल्याला पहिल्यांदा भेटावं अस महापौरांनी सांगितलं..
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 02, 2026 15:15:51
Amravati, Maharashtra:अमरावती शहराचे ग्रामदैवत असलेल्या आंबा देवी संस्थान समोर परंपरेप्रमाणे नवसाच्या होळीचे दहन; महिनाभर नवस बोलून रचली जाते होळी अमरावती शहराचे ग्रामदैवत असलेल्या आंबा देवी संस्थान समोर दररोज प्रमाणे याहीवर्षी परंपरेप्रमाणे नवसाच्या होळीचे दहन करण्यात आले आहे. माघ पौर्णिमेपासून या होळी उत्सवाची औपचारिक सुरुवात होत असून यंदा १ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. नवसाची होळी म्हणून या होळीची ओळख असून महिनाभर नवस बोलून भाविक नारळ करतात. होळीच्या मध्यभागी हेटीच्या झाडाचे खोड रोवले जाते त्याचा धूर औषधी मानला जातो अशी श्रद्धा आहे. शास्त्रोक्त विधीने शेणाच्या गोवऱ्या, लाकडे व गाठींची रचना करून होळी उभारली जाते. महिला भाविकांची मोठी गर्दी इच्छा पूर्ण झालेल्या महिला होळीची ओटी भरतात अनेक महिला आगामी मनोकामनेसाठी नवस बोलून नारळ वाहतात अंबा देवी मंदिर संस्थांच्या नोंदीनुसार ही परंपरा सुमारे १२5 वर्षांहून अधिक काळा पासून अखंड होळी सुरू आहे. आज या होळीची सूर्यास्तावेळी विधीवत पूजा करून होळी दहन करण्यात आले असून यावेळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top