Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur444001
नागपुर महापालिका भ्रष्टाचार पर पांच प्रमुख मुद्दों की गवाही
AKAMAR KANE
Oct 22, 2025 09:58:08
Nagpur, Maharashtra
आ. विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस ने नागपूर महापालिका में प्रशासक होने के कारण जनता को त्रस्त बताया है और कहा कि उनके पास समर्थक नहीं हैं। आज पांच विषय हैं: 1) लोकशाही मार्गे उपोषण और आंदोलनों का अधिकार है, पर डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनेशनल पार्क बनाने की मांग के लिए स्थानीय लोग कई दिन से प्रदर्शन कर रहे थे, पर महापालिका अधीकारी राऊत ने बुलडोजर चलवाकर अतिक्रमण विभाग से हटवाया। इसके पीछे कौन है? जातीय दंगा भड़कना होता तो जिम्मेदारी कौन लेता? महापालिका अधीक्षक पर कार्रवाई होनी चाहिए। राज्य सरकार प्रशासक से जवाब चाहती है। कार्रवाई नहीं हुई तो भविष्य में प्रशासक जिम्मेदार है। 2) बर्डी मेनरोड हॉकर पर कार्रवाही। हरिश राऊत का चालक एक हॉकर से पैसे मांग रहा था, गरीबों पर अत्याचार कर रहे हैं। 3) कचरा संकलन—निजी कंपनी द्वारा कचरा उठवाया जाता है, पर कंपनी के कर्मचारी भी जनता से पैसे लेते हैं; गडर लाइन जाम है; महापालिका प्रशासक नाकारा है। बिना परवानगी मैप और बिना फायर सर्टिफिकेट के इमारतें बनी हैं। 4) अमृत योजना में काम करने वाले ठेकेदारों ने अच्छे रास्ते फोड़कर निकृष्ट दर्जे का काम किया; बड़े भ्रष्टाचार के प्रमाण हैं; अधिकारी बिल्डर से पार्टी लेते हैं। 5) महापालिका में एजेंट काम कर रहे हैं; फायर NOC, नक़्शा पास करवाने के लिए एजेंट को भेजना, अधिकारी एजेंट के पास भेजते हैं (ऑडियो क्लिप सुनी जा सकती है) और एजेंट कह रहा है कि टॉप लोग मुझसे काम करवाते हैं; पुलिस में शिकायत करूंगा। आज पाच विषयों के साथ संभावित विषय और भी हैं।Town Planning और Fire का उल्लेख ऑडियो क्लिप में है; आयुक्त भ्रष्टाचार के लिए जिम्मेदार हैं और मी सभागृह में प्रमाण प्रस्तुत करूंगा।
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRANAV POLEKAR
Oct 24, 2025 08:06:58
Ratnagiri, Maharashtra:उदय सामंत आणि बाळ माने यांच्यात शाब्दिक कलगीतुरा उदय सामंत यांचा byte या अगोदर पाठवला आहे त्यामुळे two विंडो करून आरोप प्रत्यारोप करता येईल बेईमानीचे बाळकडू बाळ माने यांना मिळाले नाही, बाळ माने यांचं उदय सामंत यांना उत्तर मी बांधलेलं शिवबंधन मी आयुष्यभर आहे - माने शिंदे सेनेतील बडा नेता भाजपमध्ये जाणार आहे त्यांना सांगायचे होते असेल - माने आदित्य ठाकरे यांच्यासोबत फ्रँकी खात असताना आम्ही गुहाटीला गेलो नाही - माने लाखोबा लोखंडे या पात्रसोबत माने यांनी सामंत यांची केली तुलना - माने भाजप आता हाऊसफुल... मला भाजपमध्ये जाण्याची गरज नाही - माने Pa चं नाव घेण्यापेक्षा माझे देवा भाऊ यांच्याशी संबंध - माने माझे cdr तापास - माने रत्नागिरीतील देव भैरी बुवाची शपथ घेऊन त्यांनी मी शिंदे यांच्यासोबत राहीन भाजपमध्ये जाणार नाहीअसं सांगावे - माने तुम्ही प्रश्नांना बगल द्याल तेवढं तुम्ही अडचणमध्ये याल - माने लोकांचा माझ्यावर विश्वास - माने ED च्या भीतीने आम्ही पळालो नाही - माने मी पळून जाऊन प्रवेश केला नाही - माने नाहीतर रत्नागिरीतील जनता तुम्हाला खड्यात घालेल - माने जबाबदारी झाकण्यासाठी उदय सामंत असे आरोप करत आहेत - माने नोव्हेंबरमध्ये शिवसेना कुणाची याचा निर्णय येईल...उदय सामंत कोर्ट निकालनंतर भाजपमध्ये जातील - माने सामंत यांनी paपेक्षा देवा भाऊ, बावनकुळे याचा रेफरन्स दिला पाहिजे - माने सत्ता आणि पैसा याचा सामंत यांना माज - माने उदय सामंत यांनी दिवाली पहाट रत्नागिरीमध्ये साजरी केली पाहिजे.. उदय सामंत दिवाळीला कुठं जातात माहिती नाही - माने उदय सामंत यांनी रस्ते मुद्यावर रत्नागिरीकराना उत्तर दिले पाहिजे - माने जर्मनी, जपानला सामंत जातात.. आणि पैशाचा अपव्यय करू नये - माने सामंन त्यांना कुटुंबातून भीती असावी म्हणून ते सिक्युरिटी मध्ये फिरतात... ते काही दहशतवादी नाहीत किंवा त्यांनी हिंदूबाबत काही भूमिका घेतली नाही ज्यामुळे त्यांना धोका आहे - माने बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव आणि आदित्य यांना साथ ड्या असं सांगितलं होते... म्हणून आम्ही ठाकरे यांना साथ देत आहोत - माने उदय सामंत हे पळपुटे आमदार - माने बेईमानी आणि गदारी किती करायची? - माने आमचा लढा व्यक्तीविरोधात नाही - माने रत्नागिरीत स्थानिक निवडणूक कशा लढायचं हे उद्धव ठाकरे ठरवतील - माने मधील प्लांट तपासून घेऊ - माने आमच्यावर कायदा, नियम पाळायचे संस्कार - माने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उदया उदय सामंत यांच्या पाली निवासस्थानी शिवसेना पदाधिकारि आणि कार्यकर्त्यांच्या बैठकी उदय सामंत यांच्या रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय घेणार आढावा सकाळी 9 वाजल्यापासून होणार बैठकिला सुरुवात
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 24, 2025 07:49:14
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 24, 2025 07:48:53
Ratnagiri, Maharashtra:हर्णे किनाऱ्यावर पर्यटकांची पुन्हा हुल्लडबाजी सुरू\nदापोली तालुक्यातील हर्णे येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांकडून हुल्लडबाजी करण्याचा प्रकार पुन्हा उघड झाला आहे. \nदिवाळीच्या सुट्टीमुळे दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत . मात्र त्यातील काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे. \nहर्णै येथील समुद्रकिनाऱ्यावरआपली वाहने नेवून हुल्लडबाजी करण्याचा प्रकार आज उघड झाला आहे. पर्यटनासाठी आलेल्या अनेक पर्यटकांना समुद्राच्या भरती ओहोटीचे वेळापत्रक माहित नसल्याने समुद्रकिनारी नेलेली वाहने भरतीच्या पाण्याने किनारीच रुतून बसल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. अनेक पर्यटक समुद्रकिनारी वेगाने वाहने चालवून स्टंट करत असल्याने किनाऱ्यावरील इतर पर्यटकांना त्याचा त्रास होतो व अपघाताचा धोकाही संभवतो त्यामुळे जिल्हा पोलीस दलाने समुद्रकिनाऱारी वाहने नेण्यास मनाई केली होती. मात्र त्याकडेही हे पर्यटक दुर्लक्ष करत असल्याने आता स्थानिक पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 24, 2025 07:21:33
Nagpur, Maharashtra:नागपूर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर- व्हॉट्सअप ग्रुप भंडारा भाषण भंडारामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत आमच्या पक्षाचे बैठक होती, आमच्या पक्षाचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यावर आम्ही काम करतो, निवडणुकीच्या दरम्यान अनेक निगेटिव्ह पॉझिटिव्ह बातम्या येत असतात, काल मी म्हटले की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कमेंट काम हे व्हाट्सअप ग्रुप आणि आमचं जे वॉर रूम आहे ते संपूर्ण चेक करतो त्यामुळे निवडणुकीच्या काळात पक्षाच्या कार्यात जी काही भूमिका घेतली जी काही भूमिका घेतली पण आमच्या सरकारी योजना त्या ठिकाणी मॉनिटर करतो आणि जनतेपर्यंत पोहोचवणे व्हाट्सअप च्या माध्यमातून पोहोचवणे एक लक्ष व्हाट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत, ही आमच्या पक्षाची यंत्रणा आहे त्यामुळे आमचा पक्ष कसा चालवावा हे आम्हाला शिकवणारे संजय राऊत कोण, आमचं सरकार डबल इंजिन सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरिता योजनांच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काम करीत असतो आणि या एक लक्ष व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पूर्ण त्याची चाचणी करून त्यावर काय काम केलेले पाहिजे, काय अडचणी आहेत ते सोडवण्याचा काम करतो माझ्या आमच्या पक्ष आमच्या पक्षामध्ये आमच्या स्वतःचे बूथप्रमुखांचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूम सोबत जोडल्या गेला आहे आमच्या पक्षात आम्ही काय करावे हे संजय राऊत ठरवणारे कोण आहेत त्यामुळे संजय राऊत काय बोलले त्यांनी सकाळी ठरवलेलं आहे की एखाद्या गोष्टीचं बात का बतंगड बनवायचं म्हणून त्याला फार किंमत नाही आमच्यास पक्षाच्या यंत्रणेत आम्ही काम करतोय आमच्या पक्षाचा सोशल मीडिया आणि रोज वॉच करतो आणि त्यावर आलेले कॉमेंट्स वाचून आमच्या कार्यकर्त्यांशी संवाद ठेवतो असं आमच्यावर रूमचा स्ट्रक्चर आहे संजय राऊत पुढे आले पाहिजे आणि त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे (on गुन्हा दाखल) सातारा डॉक्टर आत्महत्या मी घटना बघितली नाही पण त्यावर आमचे तिथले प्रकाश अबीटकर शिवेंद्रराजे जयकुमार गोरे त्यांच्याशी चर्चा करेल आणि या घटनेमध्ये तातडीने कारवाई झाली पाहिजे ही चौकशी झाली पाहिजे याची मागणी करेल नाना पटोळे भाजपा चर्चा नाणा पटोळे यांच्या व्यक्तिमत्त्वावर असल्या कुठल्याही प्रकारच्या संशय निर्माण करण्यात काही तथ्य नाही नाना पटोले कुठल्याही भाजपच्या संपर्कात नाही ते निष्ठावान काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांनी काँग्रेसचे भूमिका निवडणुकीत पार पाडली भाजपमध्ये पक्षप्रवेश अशी कुठल्याही नेत्याची किंवा कार्यकर्त्यांसोबत भूमिका घेऊ शकत नाही ते काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत नेते आहेत पक्षातील आणि नेत्यातील संवाद यात फार मोठी विसंगती निर्माण झाली आहे कोण कार्यकर्ता आपला आयुष्य खराब करेल म्हणून मोठमोठे नेते काँग्रेसच्या या जोडीला नवी संवादाला कंटाळलेले आहेत भाजपचा कार्यकर्ता हा वरिष्ठ नेत्यांना भेटू शकतो मात्र काँग्रेसमध्ये राज्यातील नेत्यांना भेटण्याची कुठेही शक्यता नाही विसंवाद आहे यातून कार्यकर्ते तुटलेले आहेत हार्षवर्धन सपकाळ डिफेंडर आरोप सकाळी झोपून उठल्यावर त्यांना व्हीजनवर बोलता येत नाही विकासावर बोलता येत नाही तेव्हा डिफेंडर सारखे झालं याला काही अर्थ नाही मला वाटतं की विकासावर बोललं पाहिजे विकासाची गरज आहे राज्याला मागच्या एका वर्षात विरोधी पक्षाच्या विकासावर चर्चा करण्याकरिता देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितलेली नाही फक्त निवेदन दिल अतिवृष्टीची नौटंकी आणि नाटकबाजी केली सरकार आणि विरोधी पक्षाचा हे स्ट्रक्चर आहे की विरोधी पक्षाने पाच वर्ष शेवटच्या व्यक्ती करता सरकारला धारेवर धरणे वारंवार सरकारकडे जाणे आपल्या भूमिका मांडणे या राज्यातील विरोधी पक्ष हा विकासाच्या मुद्द्यावरून दूर गेला आहे त्यामुळे डिफेंडर आणि अशीच काही विषय समोर आणतात धंगेकर- मोहोळ महायुतीच्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना सूचना दिले आहेत आम्हाला सूचना दिले आहेत की महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही असं कुठलाही व्यक्तव्य करायचा नाही भाजपने आता बऱ्यापैकी भूमिका घेतल्या आहे शिंदे देखील सांगतील त्यांच्या कार्यकर्त्यांना हे मनभेद आणि मतभेद होणार नाही पण एखाद्याला वारंवारच सवय पडली आपली व्यक्तिगत दुश्मनी काढायची आहे मतदारसंघात स्वतःचा व्यक्तीगत वाद अस्तिव टिकवण्यासाठी काही लोक महायुतीच्या लोकांन विरोधक समजत आहेत आपला विरोधक कोण आहे हे महायुतीच्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे आपण सरकार मध्ये काम करतोय आमच्याकडे असेल किंवा त्यांच्याकडे असेल प्रमुख नेत्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना भाजप पाळेल एकनाथ शिंदे आणि अजितदादा आपल्या नेत्यांना सांगतील धंगेकर आरोप धंगेकर हे स्थानिक राजकारणात मुरलीधर मोहोळ यांना आपला विरोधक समजत आहेत कारण त्यांचा निवडणुकीत प्रचंड मतांनी पराभव झाला मोहोळ यांनी स्पष्ट केला आहे की त्यांचे संबंध होते पण निवडणुकीनंतर तुमचा काम संबंध नाही पण हे पिसाळलेले लोक आहेत त्यांना त्यांचा स्थानिक राजकारण करायचा आहे मोहोळ वर बोलल्याशिवाय त्यांना आपलं राजकारण जिवंत ठेवता येत नाही ते त्यांना विरोधक मानतात त्यांचे स्थानिक लढाई तयार झाली आहे मोहोळ बिल्डर गाडी- त्या प्रकरणातून ते दूर असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केला आहे बिल्डरशी कुठूनही संबंध त्यांचा राहिला नाही त्यामुळे महायुतीतील कार्यकर्त्यांनी हा विषय संपला पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे जर ते रोज काढता येत याचा अर्थ ते स्थानिक आहेत राज- उद्धव आम्हाला त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही त्यांची जवळीक अधिक पाडावी कौटुंबिक संबंध अधिक समृद्ध व्हावे ठाकरे कुटुंबीय राजकारणाकरिता वेगळे झाले होते राजकारणाकरिता एकत्र आले तर त्याला काय महाराष्ट्र बघतोय राजकारणाकरिता वेगळे झाले आणि राजकारणाकरिता एकत्र येत असतील तर माझ्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी चर्चा करायची नाही महाविकास आघाडीत कितीही जुळले तरी महायुती 51 टक्के मतदान संपूर्ण जिल्हा परिषदा मनपा जिंकेल विधानसभेत जेवढे मत मिळाले त्यापेक्षा जात असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपा महायुतीला मिळतील एकही जिल्हा परिषद नगरपालिका महाविकास आघाडीला जिंकता येणार नाही नागपूर हा पुढच्या काळात खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर म्हणून डेव्हलप होणार आहे मुंबईत त्याचा झाला तस नवीन नागपूर हे बिझनेस सेंटर होणार आहे छटपूजा ठाकरे चांगला आहे हे परिवर्तन चांगला आहे छटपूजा ही देशातील उत्तर भारतीय समाजाकरिता महत्त्वाची आहे आपले संस्कृती परंपरा हे छटपूजा आहे या धार्मिक कार्यात त्यांचा मन परिवर्तन होऊन सर्वजण आले तर चांगले या ठिकाणी महायुती होत असेल त्या ठिकाणी युती केली पाहिजे पहिला आपला जोर महायुतीवर आहे प्रत्येक जिल्ह्यात तीन-तीन नेत्यांची समिती बनवलेली आहे ज्याठिकाणी दोन कार्यकर्ते तुल्यबळ आहेत तिथे आपसात लढतील मात्र मनभेदाने मतभेद होणार नाही त्याची सत्ता महाराष्ट्रात असणार आहे धंगेकर आम्ही धंगेकरवर कुठलीही कारवाई करण्याची मागणी केली नाही आम्ही हे सांगतोय की माहिती जे वातावरण आमच्याकडून किंवा त्यांच्याकडून कुठेही खराब होणार नाही म्हणून वेद आणि मतभेद तयार होणार नाही यावर लक्ष ठेवणार आहोत
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 24, 2025 07:19:07
3
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 24, 2025 06:50:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:राजारामबापू कारखान्याच्या प्रवेश कमानीवर लावलेलं डफळे नावाची पाटी आली हटवण्यात.. घटनास्थळाची जत पोलिसांकडून पाहणी.. जत मधील तिप्पेहळी या ठिकाणी जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे युनिट चार हा साखर कारखाना आहे. या कारख्याच्या मुख्य प्रवेशदरावरील असणाऱ्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नावावर काळे फासत अज्ञातांकडून राजे विजयसिंह डफळे अश्या नाम फलकाचे डिजिटल फ्लेक्स रात्री मध्ये लावण्यात आले आहे, या घटनेनंतर जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केली आहे, दरम्यान मुख्य प्रवेश कमानीवर लावण्यात आलेला राजज विजयसिंह डफळे नावाचा फ्लेक्स उतरवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी कारखान्याची मालकी, मूळ सभासदांची असून तो जयंत पाटलांनी मूळ सभासदांना परत करावा, अशी मागणी करत यंदा कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही, प्रसंगी रस्त्यावरचा आणि न्यायालयाने संघर्ष करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान कारखान्याच्या नामकरण प्रकारावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष आणखी वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 24, 2025 06:20:24
Nashik, Maharashtra:निफाड तालुक्यातील कानळद येथील आशा वर्कर चा 102 अॅम्बुलन्स चालकाकडून लैंगिक छळ. 18 ऑक्टोबर रोजी ड्युटीदरम्यान घडलेली संतापजनक घटना. जाधव यांनी दिवसभर गर्भवती महिलेला देवगाव, निफाड व नाशिक सिव्हील येथे नेण्याची सेवा बजावली. रात्री परतताना अॅम्बुलन्स चालकाने केलेल्या गैरवर्तनाची तक्रार. –आयटक सलग्न आशा व गतप्रवर्तक संघटनेचा निषेध ,आरोपीवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी. महिला आरोग्यसेविकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण जाहीर करण्याची मागणी. आशा वर्कर समाजाच्या आरोग्यरक्षक असून त्यांचा सन्मान व सुरक्षितता धोक्यात. घटनेमुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 24, 2025 06:17:16
Kolhapur, Maharashtra:सलगच्या सुट्ट्या आणि देवीचा वार असल्यामुळे करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूर मध्ये आज भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.... पूर्व दरवाज्याजवळ असलेला दर्शन मंडप पूर्णपणे भरून दर्शन रांग भवानी मंडपापर्यंत पोहोचली आहे.... साधारण रांगेमध्ये उभा राहिल्यानंतर साधारण दोन ते तीन तासांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन होत आहे. आज पहाटेपासून आतापर्यंत जवळपास एक लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे.. सध्या काकडा सोहळा असल्यामुळे पहाटे तीन वाजल्यापासून देवीचे मंदिर दर्शनासाठी खुले असते. लहान मुलांसह येणाऱ्या महिलांसाठी विशेष अशी दर्शन सुविधा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करायला हवी अशी इच्छा भाविकांनी व्यक्त केली आहे...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 24, 2025 05:49:54
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Oct 24, 2025 05:49:22
Pimpri-Chinchwad, Maharashtra:चिंचवडमध्ये पत्नीकडून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमध्ये घडली आहे. नकुल आनंद भोईर (वय ४०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, चैताली भोईर असे हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात असलेल्या पत्नीने पती नकुलचा कापडाने गळा आवळून खून केला. या दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षांची दोन लहान मुले आहेत. पतीची हत्या केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.
1
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 24, 2025 05:46:24
Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या माढा तालुक्यातील मोडनिंब ग्रामपंचायतीतील मंजूर झालेली 109 घरकुले अधिकाऱ्यांनी अचानकपणे रद्द केली आहे सदर घरकुले पुन्हा तातडीने मंजूर करावी अन्यथा १५ दिवसात अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी दिला आहे. मोडनिंब ग्रामपंचायतीला 109 घरकुल मंजूर झाली होती. कोणतीही ग्रामसभा न घेता सदर घरकुल काही राजकीय पुढार्‍यांच्या दबावामुळे ग्रामविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी रद्द केलीली आहे यामुळे गरजू ग्रामस्थांवर अन्याय झालेला आहे सदर घरकुले तातडीने पुन्हा मंजूर करण्याची मागणी मनसेने केली आहे अन्यथा सदर अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिलेला आहे
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 24, 2025 05:17:33
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 24, 2025 05:04:21
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर : आरएसएसवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचं आरएसएस कार्यालयावर निघणार मोर्चा, पोलिसांचा आरएसएस कार्यालयाबाहेर चोख बंदोबस्त, मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही वंचित मोर्चावर ठाम. अँकर : आरएसएसवर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहूजन आघाडीच्या वतीने आरएसएस कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. पोलिसांनी वंचितच्या या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तरीही वंचितचे पदाधिकारी मोर्तोर मोर्चावर ठाम आहेत. सकाळी 11 वाजता क्रांती चौक ते आरएसएस कार्यालय असा मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरातील समर्थनगर मधील आरएसएस कार्यालयाबाहेर चोख पोलिस बंदोबस्त तैनात केलाय. आणि आरएसएस कार्यालयाबाहेरून या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top