Back
Kolhapur के दिवाळी पाडवा में म्हैस पळविणे और सजावट स्पर्धा रोमांचक रंगों के साथ
PNPratap Naik1
Oct 22, 2025 08:17:13
Kolhapur, Maharashtra
दिवाळी पाडवा म्हटलं की कोल्हापूरकरांसाठी हा केवळ सण नाही, तर परंपरेचं प्रतीक आहे. आणि या परंपरेचा अविभाज्य भाग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात म्हैस पळविणे आणि म्हैस सजावट स्पर्धा होय. दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने शेकडो शेतकरी आणि जनावरांचे प्रेमी यात उत्साहाने सहभागी होतात..
कोल्हापूर शहरातील कसबा बावडा परिसरात आज दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पारंपरिक म्हैस पळविणे आणि सजावट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. गेली अनेक दशके सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जाते. सकाळपासूनच परिसरात जनावरांचे मालक, शेतकरी, तरुण मंडळी आणि प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसून आली. रंगीबेरंगी रंगाने सजवलेल्या म्हशी, त्यांना घातलेल्या फुलांच्या माळांनी म्हैसी नٹल्या होत्या. नटलेल्या या म्हशींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काही म्हशींना विशेष पारंपरिक अलंकार आणि सोनेरी साखळ्या घालून सजवण्यात आले होते. यानंतर झालेल्या म्हैस पळविण्याच्या स्पर्धेत म्हशींनी अक्षरशः वेगाची झेप घेत मालकाच्या मागे धावत होते. म्हैस पळवण्यामध्ये शेतकऱ्यांच्या लेकरदेखील मागे नवती..
या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ म्हशींचा पळण्याचा वेगच नाही, तर म्हशींची सजावट, आरोग्य आणि सांभाळ यावरही परीक्षकांकडून गुण दिले जातात. विजेत्या म्हशींच्या मालकांना नारळ सुपारी आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात येत.. स्थानिक ग्रामस्थ आणि आयोजक मंडळाच्या प्रयत्नातून दरवर्षी ही परंपरा अधिक रंगतदार होत असून, कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवात ही स्पर्धा आजही शेतकरी संस्कृतीचा जिवंत नमुना म्हणून ओळखली जाते, या स्पर्धेचा शेतकरी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, शेतकऱ्यांच्या लेकी बरोबरच लोकप्रतिनिधींना देखील नाद आहे. त्यामुळेच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील देखील म्हैस पळवताना दरवर्षी दिसतात..
आयोजक, भारतवीर तरुण मंडळ
आमदार सतेज पाटील, नेते काँग्रेस
कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील ही पारंपरिक म्हैस पळविण्याची आणि सजावट स्पर्धा keval manorajan nahi, तर आपल्या ग्रामीण संस्कृतीचा, पशुप्रेमाचा आणि परंपरेचा सुंदर संगम आहे. दिवाळीच्या आनंदात निसर्गाशी आणि जनावरांशी असलेलं नातं जपणारी ही परंपरा पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरतेय.
प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowOct 24, 2025 08:06:580
Report
JMJAVED MULANI
FollowOct 24, 2025 07:49:140
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 24, 2025 07:48:530
Report
AKAMAR KANE
FollowOct 24, 2025 07:21:330
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 24, 2025 07:19:073
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 24, 2025 06:50:050
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 24, 2025 06:20:240
Report
PNPratap Naik1
FollowOct 24, 2025 06:17:160
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 24, 2025 05:53:440
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 24, 2025 05:49:540
Report
KPKAILAS PURI
FollowOct 24, 2025 05:49:221
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 24, 2025 05:46:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 24, 2025 05:20:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 24, 2025 05:17:330
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 24, 2025 05:04:210
Report
