Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
महापालिका चुनाव में बंडखोरी करने वालों को भाजपा ने पार्टी से बाहर कर दिया
VKVISHAL KAROLE
Jan 05, 2026 03:05:56
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या २२ जणांना भाजपने पक्षातून काढले. भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिस्तभंगाची कारवाई केल्याचे म्हटले आहे. भाजपकडे महापालिका निवडणुकीसाठी १४,०० इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. भाजपची उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांना इतर पक्षांनी उमेदवारी दिली. शिंदेसेनेने १२, राष्ट्रवादी अजित पवार गटाने ५, तर उद्धवसेनेने एकाला उमेदवारी दिली. बंडखोरांचे पक्ष सदस्यत्व, पद भाजपने रद्द केले आहे. तर पक्ष प्रचार कार्यालयावर गोंधळ करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आलीय...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Jan 06, 2026 10:11:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा दंगलीची भाषा सुरू झाली आहे ,एमआयएम विखारी प्रचार करत आहे त्यामुळे त्यांना शहरात दंगली करायचा आहे असा सनसानाटी आरोप पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केला मात्र दंगली केल्यास जशास तसे उत्तर देऊ असेही संजय शिरसाठ म्हणाले त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय... एमआयएम छत्रपती संभाजी नगरात दंगल घडवणार पालकमंत्री संजय शिरसाठ यांचा आरोप मुद्दे नसल्याने दंगलीची भाषा, एमआयएमचा पलटवार... छत्रपती संभाजी नगर मध्ये आता निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे प्रत्येक पक्ष जोरान प्रचार करत आहे त्यात चौरंगी लढत असल्याने सगळेच पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचे चित्र आहे.. या सगळ्यात छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी एमआयएम वर गंभीर आरोप केले आहे एमआयएमचा विखारी प्रचार सुरू आहे त्यांना शहरात दंगली घडावायच्या आहे त्या पद्धतीने त्यांचे नियोजन सुरू आहे मात्र उत्तरास प्रतिउत्तर मिळेल असा इशाराही संजय शिरसाठ यांनी दिला आणि हिंदू मतदारांनी ही सगळीकडे लक्ष ठेवावं असा आवाहनही त्यांनी केले त्यामुळंय यामुळे संभाजीनगरचा राजकीय वातावरण चांगलय.. Byte संजय शिरसाठ, पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरला जातीय प्रचार नवा नाही मात्र शहराचे पालक असलेले पालकमंत्री दंगलीचा एका राजकीय पक्षावर आरोप करत असेल तर या याबाबत नक्कीच विचार करावा लागतो, आता हा आरोप राजकीय असेल तर ठीक आहे नाहीतर या संपूर्ण प्रकरणात आता पोलिसांनी ही लक्ष घालायची गरज आहे तूर्तास या विषयांवरून प्रचार मात्र चांगलाच पेटलाय.. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Jan 06, 2026 09:14:54
Mumbai, Maharashtra:अँकर -- मनसेचे माजी नगरसेवक आणि वरळी विभाग अध्यक्ष संतोष धुरी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करत भाजप मध्ये प्रवेश केला.काल त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.आज मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये अधिकृत रित्या प्रवेश केलं.संतोष धुरी हे वॉर्ड क्रमांक १९४ मधून मनसे कडून निवडणूक लढवणार होते पण मनसेची शिवसेना,उद्बाव ळासाहेब ठाकरे पक्षासोबत युती झाली आहे हा वॉर्ड त्यांना लढण्यासाठी दिला.यशवंत किल्लेदार यांच्यासाठी वॉर्ड क्रमांक १९२ हा राज ठाकरे यांनी मिळावा म्हणून प्रयत्न केले पण संतोष धुरी यांना १९४ वॉर्ड मिळावा यासाठी प्रयत्न केले नाही.त्यामुळे संतोष धुरी गेल्या १० दिवसांपासून नाराज होते.अखेर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. वॉर्ड क्रमांक १९४ मध्ये शिवसेना UBT कडून विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना उमेदवारी दिली.तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पूजा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.संतोष धुरी हे २०१२ ते २०१७ पर्यंत या विभागातून नगरसेवक होते.त्यांनीच या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अस्तित्व टिकवून ठेवलं होत.त्यांच्या भाजप प्रवेशाने मनसे आणि शिवसेना UBT ला किती फटका बसतो हे १६ जानेवारीच्या निकालानंतरच कळेल.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 06, 2026 08:28:48
kolhapur, Maharashtra:नागपूर EXCLUSIVE "तर्री पोहा विथ देवा भाऊ" खास नागपुरी संकल्पनेसह देवेंद्र फडणवीस नागपुरात प्रचाराचा धुरळा उडवणार. 8 जानेवारी रोजी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत होणार आहे. या कार्यक्रमात नागपूरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे प्रभावशाली व्यक्तींनाही नागपूरच्या विकासासंदर्भात भाजपचा आणि मुख्यमंत्र्यांचा विजन ऐकण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. या मुलाखतीनंतर मुख्यमंत्री नागपूरकर जनतेसोबत "तर्री पोह्या"चा आस्वाद घेणार आहे. जनतेच्या काही प्रश्नांची उत्तरेही देवाभाऊ देतील असे माहिती भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे. मुलाखत घेणाऱ्यांमध्ये एक वैदर्भीय कलाकार असल्याची माहिती आहे. 8 जानेवारीला नागपुरात होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत प्रकट आणि लाईव्ह मोडमध्ये असेल. देवा भाऊ ठाकरे बंधूसारखी रेकॉर्डेड आणि नियंत्रित प्रश्नांची मुलाखत देणार नाही अशी उपरोधिक टीका तिवारी यांनी यावेळी केली. 8 जानेवारी ची मुख्यमंत्रीांची प्रकट मुलाखत शहरातील 50 मोठ्या चौकांवर स्क्रीन लावून हजारो नागपूरकरांना लाईव्ह दाखवण्याची व्यवस्था ही भाजप द्वारे केली जात आहे. त्यामुळे राज्यभरात प्रचाराचा धडाका लावणारे मुख्यमंत्री नागपूरात "देवा भाऊ"च्या स्वरूपात जोरदार प्रचाराचा धुरळा पुढील काही दिवसात उडवणार आहेत. याशिवाय प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 13 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांचा एक खास रोड शो नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. मध्य नागपूर मधील "भारत माता चौक"वरून तो रोडशो सुरू करण्याचे नियोजन केले जात असल्याची ही माहिती तिवारी यांनी दिली. आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याशी संवाद साधला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 06, 2026 07:08:35
kolhapur, Maharashtra:चंद्रशेखर बावनकुळे - आज मैं पिम्परी चिंचवड़ और पुणे के हमारे उम्मीदवारों के प्रचार के लिए जाता हूँ मुझे विश्वास है पुणे और पिंपरी चिंचवड के महापौर दो तृतीयांश बहुमत से विजयी होंगे देवेन्द्र फडणवीस महाराष्ट्र के एकमेव नेता हैं। दीड़ कोटी सदस्य वाले भाजपा को देवेन्द्र एकमेव आधार हैं। हमारे पक्ष में गुटबंदी वाला राजनीति नहीं हमारा पक्ष देवेन्द्र जी के नाम से एकजुट है। कांग्रेस में जैसी स्थिति है, वैसी पार्टबद्दल बोला जा रहा है। इससे वे हमारे छुपे युद्ध के प्रयास कर रहे हैं सर्व पक्ष देवेंद्र फडणवीस के पीछे खड़े हैं सुधीर मुनगंटीवार कभी भी देवेंद्र जी के बारे में नाराज नहीं रहते। मतभेद नहीं। कुछ उनके स्थानीय स्तर पर नाराजी देवेन्द्र जी बोले जो शब्द पक्ष के लिए अंतिम हैं। हमारे पक्ष में गुट-बंट संभव नहीं आनंद व्यक्त करने के लिए होंगे। उसमें भीड़ का क्या संबंध है। महिलाओं ने अपना आनंद व्यक्त किया होगा छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास सभी को ज्ञात है ठाकरे बंधु की मुलाकात… इसका मतलब यह है कि उन्होंने उन्हें लिखकर दिया है, और वे उन्हें लिखकर दे देंगे। इतना ही नहीं। उस मुलाकात को कोई गंभीरता से नहीं लेता: उसकी उत्सुकता खत्म हो गई है मुख्यमंत्री से चर्चा हो चुकी है अब партия अध्यक्ष उनके प्रवेश के बारे में निर्णय लेंगे (मनसे धुरी) बिनविरोध चुनाव होना यह अच्छी लोकतंत्र की निशानी हैः स्थानीय नेतृत्व पर विश्वास करके विकास के मुद्दों पर बिनविरोध होते हैं ज्यादा से अधिक चुनाव बिनविरोध होकर होने चाहिए नागपुर में मेरी 20 सभाएं हैं शिंदे जी उन्हें विकास समझते हैं इसलिए उनका प्रचार-प्रसार है (ठाकरे बंधु सभा अनुमति) भावनात्मक तरीके से विपक्षी राजनीति करते हैं। हर किसी के लिए। सभा करने का अधिकार है विकास मतलब देवेंद्र फडणवीस है। इसलिए भाजपा की बड़ी जीत होने वाली है
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 06, 2026 07:08:18
kolhapur, Maharashtra:नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकट मुलाखती नागपुरात होत आहेत... आठ तारखेला सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रकट मुलाखत होईल... याबाबत झी २४ तासने अगोदर वृत्त दिले होते. हॉटेल सेंटर पॉइंट येथे ही प्रकट मुलाखत होईल.. एकीकडे राज्याची राजधानी मुंबईत ठाकरे बंधुंची मुलाखत होत असताना राज्याच्या उपराजधानीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही मुलाखत लक्षवेधी ठरणार आहे...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील प्रकट मुलाखती शिवाय राज्यातील आणखी तीन शहरांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकट मुलाखती होणार आहे...विशेष म्हणजे ठाण्यातही एक मुलाखत होणार असल्याची माहिती आहे...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 06, 2026 06:01:47
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:हे प्रकरण वाढेल असे दिसतंय, फोनो वगरे घेता येईल... ANC : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डॉक्टरांच्या वेशात राजकीय सौदेबाजी करून आमच्या उमेदवाराला त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप दानवेंनी केला. २२ जून २०२४ पर्यंतचेच नियुक्ती आदेश असतानाही सुक्रे पदावर कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणी राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करून गुन्हा दाखल व निलंबनाची मागणी केल्याचे दानवेंनी केली होती त्यावर आरोपांची दखल आता छत्रपती संभाजी नगर निवडणूक विभागाने आज अंबादास दानवे आणि घाटी हॉस्पिटलचे डीन शिवाजी शुक्रे याना चौकशी साठी बोलावले आहे आरोपात काय तथ्य आहे ते शोधण्यासाठी आज या दोघांना बोलावून घेतल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 06, 2026 05:08:58
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू ग्रुपचे समरजित घाटगे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगरपालिका निवडणुकांनंतर घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता. मात्र, सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांची धामधूम तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यामुळे घाटगे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त काहीसा लांबला आहे. दरम्यान, 8 जानेवारी रोजी कागल येथे समरजित घाटगे राजे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुकांतील राजे गटाची भूमिका काय असणार, याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 06, 2026 03:01:04
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 06, 2026 02:49:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणुकीच्यारणधुमाळीत आता जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. एमआयएम शहरात जातीचे विष पसरवत असून त्यांच्या प्रचारामुळे दंगली घडू शकतात, असा खळबळजनक आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात सोमवारी आयोजित उमेदवारांच्या बैठकीत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली, परिस्थिती त्यांनी खराब केली तर उत्तराला प्रतिउत्तर मिळेल असे ही संजय शिरसाठ म्हणाले, तर भाजप ने ही संजय शिरसाठ यांचीच री ओढली, पालकमंत्र्यांना परिस्थिती जास्त माहिती असेल असे सांगत असे काही झाले आम्हीही पालकमंत्री आणि शिवसेनेसोबत असू असे भाजप नेते बावनकुळे म्हणाले...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 06, 2026 02:33:41
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 06, 2026 02:00:12
Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा इचलकरंजी शहरातील पाणी प्रश्नांचा मुद्दा प्रचारामध्ये ऐरणीवर आहे. इचलकरंजी शहरवासीयांच्या दृष्टीने संवेदनशील असणारा पाणी प्रश्नाचा मुद्दा कोणाला मारक ठरणार याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. इचलकरंजी शहराने औद्योगिक प्रगती केली असली तरी पाण्याचा मूलभूत प्रश्न अध्याप कोणाचाच पक्षाला सोडवण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष सत्ता द्या पाणी प्रश्न मिटवू असे आश्वासन देत आहे. सत्ताधारी भाजप आमदार राहुल आवाडे आणि नेते केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपाचा महापौर आल्यास इचलकरंजीचा पाणी प्रश्न चुटकी सरशी मिटवू असे आवाहन केले जात आहे. तर शिव शाहू आघाडी केंद्रात राज्यात सरकार असताना अजूनही इचलकरंजीचा पाणी प्रश्न का मिटला नाही ? असा सावल उपस्थित करत महायुतीला कात्रीत पकडत आहे. आता इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत इचलकरंजीकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा पाणी प्रश्न कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला याचा फटका बसणार निवडणूक निकालानंतर कळणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top