Back

ग्रामीण भागात आजही अशी नागपंचमी साजरी केली जाते
Buldana, Maharashtra:
नागपंचमी म्हणजे नागतेवतेला पुजण्याचा सण. शेतकरी वर्गात या सणाला महत्त्व आहे. आजही जुन्या चालीरीती परंपरा जोपासण्याचं काम ग्रामीण भागातील शेतकरी करत असतो. आरबाडी मंडळ म्हणून प्रचलित असलेली जुनी मंडळी आजही नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करतात. ग्रामीण भागात नागपंचमी कशी साजरी केली जाते याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी.
0
Report
शेतकऱ्यांचा अनोखा जुगाड: सागाच्या पानांपासून दहा मिनिटांत रेनकोट
Buldana, Maharashtra:
पावसाळ्यात गुरांना मोकळ्या रानात चरायला नेताना शेतकऱ्यांना पावसापासून संरक्षणाची गरज असते. छत्री नसल्यास ते सागाच्या पानांपासून अवघ्या दहा मिनिटांत रेनकोट तयार करतात. हा देशी जुगाड त्यांना पावसापासून वाचवतो. गुरे चरता चरता दूर गेल्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या मागे जावे लागते. अशा वेळी अचानक येणाऱ्या पावसापासून बचावासाठी हा सोपा उपाय उपयोगी पडतो. अशा प्रकारे ग्रामीण भागातील शेतकरी नैसर्गिक साधनांचा कौशल्याने वापर करून स्वतःचे संरक्षण करतात.
0
Report