Back
Chaitralli Raajapurkar
Pune412106blurImage

मावळ तालुक्यातील आंबी रस्त्यावर गौण खनिज उत्खनन सुरू, ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला

Chaitralli RaajapurkarChaitralli RaajapurkarAug 06, 2024 12:28:46
Pune, Maharashtra:

मावळ तालुक्यातील आंबी एमआयडीसीतील आंबी ते मंगरूळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू आहे. यामुळे रस्ता जीवघेणा ठरला असून शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अवजड वाहने या रस्त्यावरून जात असल्याने रस्ता खराब झाला असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्त करण्याची वारंवार मागणी केली असली तरी याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी रास्ता रोको करून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

0
Report