Back
कोकाटेच्या मोबाईलवर गेम का? शंभूराज देसाईंचा सवाल!
TTTUSHAR TAPASE
FollowJul 20, 2025 10:01:06
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE
9 FILES
SLUG NAME -SAT_DESAI
*सातारा: शंभूराज देसाई बाईट पॉइंटर*
कृषिमंत्री कोकाटे हे नेमकं मोबाईल मध्ये काय पाहतायत हे पहावं लागेल. मोबाईल मध्ये जर गेम खेळत असतील तर हे योग्य नाही सर्वांनीच विधिमंडळातील नियम पाळले पाहिजेत. कोकाटे हे स्वतः याचा खुलासा करतील
दोन शिवसेना एकत्र येतील अशी आशा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली असेल यावर शंभूराज देसाई यांनी असं कोणीही आशा व्यक्त करू शकतो.. आता उबाठा आणि मनसे एकत्र येणार अशी आशा धरून काहीजण बसले आहेत.... मात्र मनसे म्हणत आहे आम्ही मराठीचा मुद्द्यावरून एकत्र आलो आहे.. आमच्या पक्षात राष्ट्रीय राज्य कार्यकारणी झाली यामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी कोणतीही चर्चा नाही.
आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्या बातम्या पाहून कोणीतरी गावी जाईल अशी टीका शिंदेंवर केली याला शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिल आहे.... छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा दाखला देत संताजी आणि धनाजी त्यांचे शूर सरदार होते. मुघलांची घोडी तळ्यामध्ये पाणी प्यायला गेले तरी त्यांना हे दोन शूर सरदार दिसायचे. अशी अवस्था उबाठा नेत्यांची झाली आहे. सगळीकडे आमचे साहेब त्यांना दिसतात.. जास्त बोलू नका आमच्याकडे अनेक गोष्टी आहेत. नितेश आणि नीलेश राणे नेहमी म्हणत असतात अनेक गोष्टींची चौकशी करा. यामध्ये कोणाचे कुठे संबंध आहेत हे उघड होईल. असे जर सातत्याने उबाठा चे नेते बोलू लागले तर सर्व प्रकरणाच्या खोलात जावे लागेल
हनी ट्रॅप प्रकरणात फडणवीसांनी सांगितलेला आहे असला कुठला हानी नाही आणि ट्रॅप ही नाही कपो कल्पित या गोष्टी आहेत. ज्या आधारे वडेटीवार बोलतायत... हा पुरावा पहिल्यांदा अध्यक्षांकडे द्यावा लागतो तो दिलेला नाही. याचा अर्थ हवेत तीर मारायचं काम काँग्रेसचे नेते करत आहेत. असं कोणताही प्रकरण घडलेलं नाही
सरनाईक हे कोणत्या अर्थाने शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील हे बोलले हे मला माहीत नाही. मला त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय समजणार नाही यावर मी नंतर बोलेल
उबाठाच्या नेत्यांचं असे म्हणणं आहे जादूटोणा करून महायुतीने 200 जागा मिळवल्या तर लोकसभेला महाविकास आघाडीने केला असा कोणता जादूटोणा केला की तुमचे उमेदवार निवडून आले तुम्ही दहा डायनासोर कापले होते का?..
जादूटोणा करून जर जागा निवडून येत असत्या तर आपण खोल्या भरून पैसे ठेवले असते.. जादूटोण्यावरून उबाठा गटाच्या नेत्यांनी बोलणे म्हणजे आता यांची परिस्थिती किती केविलवाणी झाली याचा अंदाज येतो.
शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा जातोय या उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियाला शंभूराज देसाई यांनी प्रतिउत्तर दिलय. महायुतीच्या सरकारचा कारभार योग्य चालू आहे. अनावधानाने कळत नकळत महायुती मधील काही नेत्यांकडून काही चुका घडत असतील तर त्यांना सावरण्याची समजावण्याची संधी आमचे तिन्ही वरिष्ठ नेते देतात. दुसऱ्या कोणी आम्हाला सांगायची गरज नाही
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे दिली आहे ते आमचे चांगले मित्र आहेत उत्तम नेते आहेत मात्र त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कोणताही परिणाम पश्चिम महाराष्ट्र किंवा जिल्ह्याच्या राजकारणावर होणार नाही. महायुती जिल्ह्यामध्ये भक्कम आहे असे मत शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले
राज आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेत.. राजकीय मुद्द्यावरून त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.. तुम्ही दोघांचीही मुलाखती पहा. त्यांनी कार्यक्रमात कोणताही पक्षाचा झेंडा वापरलेला नाही. निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही पक्षांच्या भूमिका स्पष्ट होऊ द्या मग आम्ही यावर बोलू
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement